Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
श्री. ना. पेंडसे ...

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » श्री. ना. पेंडसे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 06, 200620 02-06-06  9:59 am

Farend
Wednesday, September 13, 2006 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच 'लव्हाळी' वाचून संपविले. 'खोत' आणि 'रथचक्र' पेक्षा एकदम वेगळे आहे. मला फार आवडले, एकदम हलके फुलके लिखाण आहे. काही काही वाक्ये तर छान विनोदी आहेत. जरूर वाचा.



Tanyabedekar
Monday, March 26, 2007 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसुद, मुर्डी, दापोली, दाभोळ, गिरगाव यांना जिवंत करणारा साहित्यिक संपला

Zakasrao
Tuesday, March 27, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक अफ़ाट लेखन करणारा लेखक गेला. त्याना माझी आदरांजली
जायच्या आधी ४ ते ५ दिवस त्यानी काहितरी प्रकाशित केल अस वाचल्याच स्मरत. कोणाला नक्कि माहीत आहे का?


Tanyabedekar
Tuesday, March 27, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाळाची हाक हे लो. टिळकांवर पुस्तक ते जायच्या आधी फक्त २ दिवस प्रकाशित झाले. विंदांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यामधे झाले. ही कांदंबरी आहे की नॉन्-फिक्शन हे नक्की माहिती नाही. डोंबिवली मध्ये मजेस्टिक श्री नांच्या पुस्तकांचा स्टॉल लावणार आहे बहुतेक.

Zakasrao
Wednesday, March 28, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद शंतनु.
तु मिरज चा आहेस का?
मी कोल्हापुर.

Tanyabedekar
Thursday, March 29, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय झकासराव मी मिरजेचा आहे.

श्री ना गेल्यावर एक उदासी आली. कितीतरी दिवस आणि रात्री श्री नांच्या पुस्तकांनी आणि व्यक्तिंनी भरलेली आहेत. बापु, राधा, नरसू-दादा-नाना खोत, ताई, जुम्मन, ओड्डल, बजापा, जावईबापु, जुलाली, तो आणि त्याची आई, विंदा आणि महादेव, एल्गार, लव्हाळी, तुंबाड.. कितीतरी..

श्रीना न वाचता दापोली, दाभोळ, मुर्डी, हर्णे, आंजर्ले, कर्दे, आसुद, व्याघ्रेश्वर, फणसाच्या लाकडाचे देउळ हे बघणे अशक्यच..




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators