Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कृ. ब. निकुंब

Hitguj » Language and Literature » पद्य » कृ. ब. निकुंब « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 13, 200820 02-13-08  5:16 pm

Bee
Thursday, February 14, 2008 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, धन्यवाद! पण ती कविता मी लगेच कशी मिळवू :-) तुझ्याकडे जर तो संग्रह असेल तर लिहीच आता :-)

शोनू, ह्याला नाही जमले तर तू आहेच हं backup मधे :-)


Asami
Thursday, February 14, 2008 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाय बा, एव्हढी मी नाही type करणाअर रे देवनागरीत. scope च नाही

Slarti
Friday, February 15, 2008 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एट टु असामी ?? मी तीव्र (व ग्रीक) निषेध नोंदवत आहे...
आता मलाच सांगू नकोस तूच लिही म्हणून...


Shonoo
Friday, February 15, 2008 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती कविता प्रेमकवितांमधे नाहीच्चे मुळी! ती कुसुमाग्रजांच्या १०० मराठी कविता या पुस्तकात आहे. सवडीने लिहिते- मला नाही मराठी टायपायचा आळस :-)
( गोष्टी अर्धवट सोडल्यात तेव्हढं सोडून हां)


Shonoo
Friday, February 15, 2008 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते et tu brutus फ़्रेन्च असावं असा माझा समज होता. ग्रीक आहे हे आता कळलं.
का तुम्ही फक्त दोन असाम्यांना खायच्या गोष्टी करत होतात?


Bee
Friday, February 15, 2008 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मी तुला लिहिणार होतो की इरावती, परागकण, गिरिराज, काकासाहेब ह्यांच्या कडून प्रेरणा घेऊन ती कविता लिही म्हणून. पण माहिती नव्हते आमची ही ताई आतूनच प्रेरीत आहे म्हणून :-) तुला सवड मिळेल तेंव्हा लिही पण न विसरता हं :-)

Asami
Friday, February 15, 2008 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एट टु असामी ?? मी तीव्र (व ग्रीक) निषेध नोंदवत आहे... >>आधी शुद्ध मराठीमधे निषेध नोंदव बर तू :-)

शोनू सवडीने लिहिणार म्हणजे :-)


Shonoo
Monday, February 18, 2008 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुसुमाग्रजांनी निवडलेल्या १०० कवितांच्या पुस्तकातून

कडी

नित्याचेंच दु:ख होतें
उशागतीं बसलेलें
त्याच्या रेंगाळत्या स्वरीं
मन होतें फसलेलें

फसलेल्या मनीं होती
एक पोकळी विशाल्-
दूरावर मात्र कुठें
होती जरा हालचाल!

तोंच अवचित आलें
सुख ठोठावीत दार
-परि फसलेलें मन
आणि माथ्यावरी भार्-

कडी काढितां उशिरा
दूरावर पाठमोरें...
सुख दिसे चालतांना;
शून्य मात्र आंत उरे!


Shonoo
Monday, February 18, 2008 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापटांची कविता योग्य जागी लिहिली आहे. या वरच्या कवितेत प्रत्येक कडव्याच्या दुसर्‍या अन चौथ्या ओळीच्या सुरुवातीला indent आहे. तो मला जमला नाही. मी नुसत्या स्पेसेस टाकल्या होत्या पण सगळ्याच ओळी Left aligned आल्या आहेत. Moderator कोणी नीट करतील काय?


Bee
Tuesday, February 19, 2008 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू keep it up :-)



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators