Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बा. भ. बोरकर

Hitguj » Language and Literature » पद्य » बा. भ. बोरकर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 11, 200315 04-22-03  12:39 pm
Archive through August 19, 200335 08-19-03  9:31 am
Archive through February 04, 200435 02-04-04  5:47 pm
Archive through November 17, 200435 11-17-04  6:14 am
Archive through May 30, 200535 05-31-05  3:43 am
Archive through May 30, 200620 05-30-06  11:03 am

Kshipra
Tuesday, May 30, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणासाठी तरी

कुणासाठी तरी या रे या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका झुका जडून फुलांनी
कुणासाठी तरी या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी गा रे मुक्त सहस्त्र मुखांनी
पसरूने पाळेमुळे धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे तिच्या कुसव्याचे जळ
भुजाबाहूंनी कवळा स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यात रात्री बिंबवा रे तारे
व्हा रे असे अलौकिक लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी मुळी राहून तटस्थ


Iravati
Friday, June 02, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे पांगलेले मन सांग सांग कसे बांधू
माझे भंगलेले मन सांग सांग कसे सांधू
आले गगन भरुन तसे मन आसवांनी
तुझ्यासाठी परी अडे असे पापण्यांत पाणी
पक्षी भाळला आभाळा वाट मागची विसरे
मौन तुझे तीरसे गे मात्र काळजांत शिरे
सांग सांग कशी तुला पुन्हा बोलकी गे करूं
कसे पिसावलें चित्त आत्ता मुठीत आवरू



Iravati
Friday, June 02, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रस्त्यांत कोणसा आंधळा गातो
दिशांत, पाण्यांत भगवा रंग
प्रकाशवेगांत क्षणांत त्याचा
आकाशाएवढा होतो अभंग
एकतारी भिजे अश्रूंच्या सरी
जागच्या जागीच थिजते नदी
घाईंत जाणारा वाटेचा कोणी
अस्वस्थ होऊन थांबतो मधी
भिकारी गणून केविलवाणा
दयेने टकून बारीक नाणें
कानांत तुळशी घालून जातो
ध्यानांत घेतल्यावाचून गाणें


Iravati
Friday, June 02, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसात जागला समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा

काठ काठ ढासळे, पिसाट माड स्फुंदती
आंधळ्या ढगांतूनी प्रकाशबिंदू सांडती

हाक ये दूरुन एक झाकळून टाकते
गाढ गूढ आठवांत मूक वेल वाकते

माखते चराचरी अथांग गांग गारवा
आगळा जगास ये उदास रंग पारवा

धूसरे सरींत दूर, सूरसूर व्याकळे
भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे

कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते
सागरार्थ कोणत्या उसासुनी उधाणते


Kshipra
Tuesday, June 13, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळत जाते तसे

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होऊन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरून जाते?
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरुन जाते?
कळत जाते तसे कश्या मूर्ती सार्‍या झिजून जातात?
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात?
शब्द सारे मिटून कसे तळ्यामध्येच पेंगू लागतात?
कळत जाते तसे कश्या दूरच्या घंटा ऐकू येतात?
दूरचे रंग, दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव?
रागरोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?


Bee
Tuesday, June 13, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळत जाते तसे ही कविता प्रचंड आवडली. धन्यवाद क्षिप्राताई!

Kaavya_rasikaa
Thursday, June 22, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी तुज समजावू सांग...

कशी तुज समजावू सांग
का भामिनी उगीच राग

हास्याहुनि मधु रुसवा
हेमन्ती उष्ण हवा
सन्ध्येचा सा.ज नवा
हा का प्रणयानुराग

चाफेकळी केवि फुले
ओष्ठकमल जेवि उले
भोवती मधुगंध फळे
का प्रसन्नवदन राग

वृत्तीचा होम अमुप
त्यात जाळु दे विकल्प
होउनिया निर्विकल्प
अक्षय करु यज्ञयाग

ओठांचे फेड बंध
गाइ गडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंध
हृदयांचे मधुप्रयाग

काव्य: बा. भ. बोरकर
संगीत: पंडित. जितेंद्र अभिषेकी
गायक: पंडित. जितेंद्र अभिषेकी


P.S. Some words might be incorrect, as these are the lyrics that I could make out from the recorded song. If anyone has the printed version that is different from this, I would be glad to have it...

Nakulpadalkar
Tuesday, February 27, 2007 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala "Loachani ye aaj pani twa smrutine sajani" he kavita koni devu shakel ka??

Graceful
Thursday, May 10, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दिसा वडाकडेन

त्या दिसा वडाकडेन गडद तिन्सना
मन्द मन्द वाजत आयली तुजी गो पायजणा
मौन पडले सगळ्या रानानं
शिरशिरुन थांबली पाना
कवळी जाग आयली तणांक
झेमता झेमताना..

पयसुल्यान वाजाली घांट
दाटलो न्हयचो कंठप्राण
सावळ्यानी घंमघंमाट
सुटलो त्या खिणात

फ़ुलल्यो वैर चंद्रजोती
रंध्रानी लागल्यो वाती
नवलांची जाउन्क लागली
शकुन लक्शणा

कळ्यासुखांत दोळ्या दु:खात
लकलकली जांव तिका
नकळता एक जांली
आमी दोगाय जाणा

तातले काय उल्ला आज?
सगळे जिणेक आयला सांज्
तरी अकस्मात् तरी
वाजत पायजणा.....

बा. भ. बोरकर


Sunilt
Friday, May 11, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद ग्रेसफूल ! मी २८ नोव्हेंबर २००४ ल्या विचारलेल्या प्रश्नाचे आज उत्तर मिळाले !

Sarvesh_srujan
Tuesday, September 11, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद काव्यरसिका! माझ्या प्रचंड आवडिचे जितेन्द्र अभिषेकिंनी गायलेले हे गाणे कवी बोरकरांचे आहे हे मला माहित नव्हते. ती पूर्ण कविता दिल्या बद्दल आभार!!!

Subhash_1
Wednesday, March 05, 2008 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namaskar, Malaa koni "Nilyaa Jalavar Kaman Kali' hi kavita deu shakel kaa?

Shonoo
Wednesday, March 05, 2008 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथेच आर्काइव्ह मधे आहे. शोधा म्हणजे सापडेल.

Subhash_1
Thursday, March 06, 2008 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shonoo Dhanyavad! Ithlya postchya frequencies baghun itkya lavakar uttar milel hyachi apeksha navhati.



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators