Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इंदिरा

Hitguj » Language and Literature » पद्य » इंदिरा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 12, 200435 10-12-04  7:05 am
Archive through August 06, 200536 08-06-05  2:04 pm

Nitu_teen
Saturday, January 14, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंदिरा संतांचि निरोप' हि कविता फ़ारच सुंदर आहे. कुणी पोस्ट करेल का?

Iravati
Monday, February 06, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Iravati
Monday, February 06, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




Iravati
Monday, February 06, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




Dha
Friday, March 31, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवडलेली इन्दिरा संतांची एक कविता

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फ़िरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची...


Poojas
Saturday, May 20, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'' तवंग... ''

शेतावरती इथे नाचणी कशी बिलगते पायाभवती;
थरथरणारी नाजुक पाती इतुके कसले गूज सांगती

इवली इवली ही कारंजी, उडती ज्यांतुन हिरव्या धारा;
हिरवे शिंपण अंगावरती, रंग उजळतो त्यांतुन न्यारा

त्या रंगाची हिरवी भाषा, अजाण मी मज मुळि न कळे तर;
तरंगतो परि मनोमनावर त्या रंगाचा तवंग सुंदर....!!


'' मेंदी ''

Iravati
Sunday, November 26, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाकडे इंदीराबाईंची

' माझ्या मनीचे खुळे पाखरू,
मणीबंधावर तुझ्या उतरले....
तू तर असा दुष्ट्-नष्टसा,
घुंगूर त्याच्या पदी बांधले....'

ही कविता आहे का?


Swapnil_deshi
Sunday, January 21, 2007 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे


Shankasoor
Tuesday, March 27, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
....
ही कविता कोणी पूर्ण येत असेल तर इथे पोस्ट कराल का


Subhash_1
Wednesday, March 05, 2008 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..asaa kasaa re mala lagla sang tuza re tuza lala
Mitrasange malavarti patang udavit phirtana
tula pahile gavta varti dulta dulta zultana
visrun gelo patang nabhicha visruni gelo mitrala...pahun tuzya re rang chata....

mala itkech athvtey

Sahitya_rasik
Friday, July 04, 2008 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कढ
कुणी निन्दावे त्यालाही
करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा
त्याचा करावा सत्कार

काही वागावे कुणीही
मीच वागावे जपून
साम्भाळण्यासाठी मने
माझे गिळावे मीपण

कित्येकान्ना दिला आहे
माझ्या ताटातील घास,
कितिकान्च्या डोळ्यातील
पाणि माझ्या पदरास!

आज माझ्या आसवांना
एक साक्षि ते आभाळ
मनातील कढासाठी
एक अन्धार प्रेमळ

इन्दिरा संत


Sahitya_rasik
Friday, July 04, 2008 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्वरी जोशी यांनी वरील कविता आधिच टाकलेली आहे

मी फक्त देवनागरी मधे लिहिली आहे...


Sahitya_rasik
Friday, July 04, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे तसे
असे असावे वाटते
तसे नसावे वाटते
अशा तशा वाटण्याने
मन सारखे कोंडते

अशा वाटण्याने झाले
जग मजला पारखे
अशा वाटण्याने झाले
दुख माझे मुके मुके

किति उशिरा हि ठेच
किति उशिर हे ज्ञान
आता आजपासुनिया
माझे आभाळाचे मन


Sahitya_rasik
Friday, July 04, 2008 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाम्भळ्या आकाशाला

जा.म्भळ्या आकाशाला तुझ्या मोहुन निळ्या ज्वाला
केव्हाहुन मांड्लेला आहे जोहार सोहळा

केस ओले पाठीवरी काळ्या रात्रिचे मोकळे
चंद्रकोरीचे केशर भांगामधे रेखलेले

स्पर्श हिरव्या चुड्याचा नाद मावेना तालात
उतावळीची पैंजणे चंद भारली पायात

किति उशीर लावाया एक कुंकवाचे बोट.




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators