Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 09, 2008

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through April 09, 2008 « Previous Next »

Bee
Thursday, March 20, 2008 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिता, पुर्ण अर्थ लिही ना.. मला खूप नाही कळला म्हणून विनंती करतो आहे..

Shendenaxatra
Friday, March 21, 2008 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृक्षवल्ली आम्हा सोयरे ह्या तुकारामाच्या अभंगातील ह्या ओळींचा अर्थ काय?

कंथा कमंडलू देह उपचारा
जाणवितो वारा अवसरु

हरिकथा भोजन परवडी विस्तार
करोनी प्रकार सेवु रुची

(शेवटचे कडवे छान आहे
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणाशी)



Chioo
Saturday, March 22, 2008 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, झेलम आणि बी, धन्यवाद. :-) जोगव्याला वारी म्हणतात हे लक्षातच आलं नाही. :-)

Bee
Sunday, March 23, 2008 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, नाही वारी आणि जोगवा दोन्ही वेगळे शब्द आहेत.

जोगवा म्हणजे एक प्रकारची माधुकरी पण जी रोज रोज मागितली जात नाही. तिला एक स्थान आहे संस्कृतीमधे. माधुकरी ही पोटासाठी मागितली जाते, पण जोगवा हा देवासाठी मागितला जातो. खास करून नवरात्रात.

वारी म्हणजे दर्शनासाठी केलेली यात्रा. आपण म्हणत नाही का मी वार्‍या केल्यात. देव पावण्यासाठी भाविक वार्‍या करतात. त्याचेच एकवचनी रूप वारी आहे.

चुक भुल द्यावी घ्यावी.


D_ani
Sunday, March 23, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
तुमच्या २० मार्च १२:३८ च्या पोस्ट्चे उत्तर म्हणून हे पोस्ट लिहित आहे.
हरिपाठाचे अभंग नामस्मरणाचा महिमा सांगतात. प्रापंचिकाला सहजसाध्य जे आहे ते नामस्मरण. प्रत्येक प्रापंचिक कर्तव्याला नामस्मरणाची जोड असणे आवश्यक आहे. माऊली म्हणतात, त्रिवेणी संगम आणि विविध ठिकाणी तीर्थयात्रा केली पण नामस्मरण नाही केले तर त्या तीर्थयात्रेचे साफ़ल्य होणार नाही. सर्वसामान्यांच्या समजुतीप्रमाणे तीर्थयात्रेनंतर पापे धुतली जातात. ’नामासी विन्मुख’ म्हणजे जो नाम विसरला तो. असा मनुष्य तीर्थयात्रा करूनही पापीच राहील. धावा केल्यावर पावणारा असा एक फक्त हरीच आहे. त्याचे नामस्मरण केल्याने केवळ तुमचेच नाही तर तुमच्या कुळातील, म्हणजे तुमच्या परिवारातील सगळ्यांचे आचरण शुद्ध होईल.

पूर्ण हरिपाठ अवश्य वाचावा. सरळ सोपे आणि सहज आचरणात येण्यासारखे तत्व सांगितले आहे.
-अनिता

Bee
Monday, March 24, 2008 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिता, उत्तर दिले त्याबद्दल तुमचे आभार.


D_ani
Monday, March 24, 2008 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुमचे शंका समाधान झाले का? पूर्ण अर्थ कळला का?

Bee
Monday, March 24, 2008 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो अनिता बर्‍यापैकी माहिती दिलीस तू..

Shonoo
Tuesday, March 25, 2008 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नतद्रष्ट अन कपाळकरंटा या शब्दांचे नेमके अर्थ कोणाला माहित आहेत का?

Shyamli
Wednesday, March 26, 2008 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नतद्रष्ट>>>खाष्ट आणि कपाळकरंटा>>दुर्दैवी असा शब्दश: अर्थ आहे

Zakasrao
Wednesday, March 26, 2008 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कपाळकरंटा>>दुर्दैवी असा शब्दश: अर्थ आहे>>>>>>>
सटवाई बाळजन्मापासुन पाचव्या दिवशीच्या रात्री येवुन आपल नशीब कपाळावर लिहुन जाते अशी समजुत आहे.
(बाळाची पाचवी पुजन हा त्या संदर्भातच एक विधी असतो.)
त्यामुळे कपाळ करंटा हा शब्द आला असेल.
नतद्रष्ट हा शब्द मला कोल्हापुरात वापरल्या जाणार्‍या "किर्‍यानष्ट" शी साम्य दाखवणारा वाटतो.
नेमका अर्थ शामलीने सांगितलेला बरोबर असेल. ( खाष्ट ची पुढची पायरी अस आपल मला वाटत:-))


Bee
Thursday, April 03, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सैंधव ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?

मथणी म्हणजेच रवी का जी वरण ढवळायला आपण वापरतो?

पण पद्मा गोळेच्या 'मी घरात आले' ह्या कवितेत एक ओळ आहे,

'मथणीत नाचत राहिले' जर मथणी म्हणजेच रवी असेल तर मथणीत नाचत राहणे कसे होईल हे कळले नाही.


Satishmadhekar
Friday, April 04, 2008 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंधु नदीच्या किनार्‍यावर (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) मिठाच्या खाणी आहेत. खाणीत सापडलेल्या मिठाला सैंधव किंवा सिंधलवण (लवण म्हणजे मीठ) किंवा शेंदेलोण (सिंधलवणचा अपभ्रंश) म्हटले जाते. खाणीतले मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेल्या मिठापेक्षा औषधी समजले जाते.).

Bee
Friday, April 04, 2008 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, सहीच अर्थ सांगिताला. धन्यवाद.

कृपया मथणीचा अर्थ कुणी सांगू शकेल का?


Gajanandesai
Saturday, April 05, 2008 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंथणी हे सोनाराचे मणी घडवायचे एक उपकरण असते. पण हा शब्द मंथणी आहे ('म' वर अनुस्वार).
बोलीभाषेत काही वेळा अक्षरांवरचे अनुस्वार उच्चारले जात नाहीत. त्याप्रकारे हा शब्द वापरला आहे का?


Tanyabedekar
Tuesday, April 08, 2008 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डच भाषेमध्ये अननसाला अननस असेच म्हटले जाते. अगदी आपण जसा अननस उच्चार करतो अगदी तसेच. तुंबाडचे खोत ह्या पुस्तकामध्ये अननस हा कॅरेबियन बेटांवरुन भारतात आला असा उल्लेख आहे (अर्थात तुंबाडचे खोत हे फिक्शन आहे व ते काही पुरावा म्हणुन वापरता नाही येणार). परंतु मुळात अननस हा कोणत्या भाषेतील शब्द असावा?


Bee
Wednesday, April 09, 2008 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रेन्च भाषेत अननस असेच म्हणतात. कित्येक भाषेत हाच शब्द वापरतात.

Hkumar
Wednesday, April 09, 2008 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी अननसाबरोबर 'पपनस' या फळाचा उल्लेख होत असे. खरेच असते काय ते फळ?

Swa_26
Wednesday, April 09, 2008 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पपनस हे मोसंबीच्या जातीचे फळ आहे. आकाराने थोडे मोठे असते नि आतल्या पाकळ्या गुलाबी रंगाच्या!

Hkumar
Wednesday, April 09, 2008 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ध न्य वा द, स्वाती




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators