Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 27, 2008

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through February 27, 2008 « Previous Next »

Hkumar
Sunday, January 27, 2008 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका शब्दकोड्यात 'बागुरडा' शब्द होता. त्याचा अर्थ झुरळ!
बापरे, काय भन्नाट शब्द आहे.


Hkumar
Tuesday, January 29, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'नताशा' चा रशियन मधील अर्थ फुलपाखरू. दुर्दैवाने हा शब्द शरिरविक्रय करणार्‍या तरुणींसाठी वापरात आहे. ( संदर्भ आजचा म.टा. - नताशांची घातक नशा ).

Shonoo
Sunday, February 10, 2008 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारपरिग्रह म्हणजे काय कोणाला माहिती आहे का?

Bee
Monday, February 11, 2008 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादी गोष्ट नाही आवडली तर विदर्भात म्हणात.. 'धडा ना गोडाची'.

ह्या ओळीनंतर पुढे पण काही ओळ आहे का?

मागे 'लष्कराच्या भाकरी भाजणे' च्या आधीची ओळ मैत्रेयी ताईने लिहिली होती. त्यानंतर ती म्हण मला अधिकच आवडायला लागली. धन्यावाद मैत्रेयी :-)

शोनू, Orkut वर तुला पाहिले मी काल :-)


Slarti
Monday, February 11, 2008 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारपरिग्रह म्हणजे बायको करणे.

Bee
Monday, February 11, 2008 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, जरा उदाहरण किंवा संदर्भ देत चल असे अपरिचित शब्द विचारायचे झाले की.

Shonoo
Monday, February 11, 2008 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी:
धन्यबाद. व्युत्पत्ती, संधि विग्रह वगैरे पण सांगा ना प्लीज. मराठी प्रेमकविता नावाचं पुस्तक चाळत होते. त्यात होता हा शब्द. 'दारपरिग्रहाचे दिवस' अशी ओळ होती. पूर्ण आता आठवत नाहीये :-) आठवली की लिहीन.
बी तू सांध्यपर्वातील वैष्णवी बद्दल विचारलं होतंस मागे. ते पुस्तक तू वाचलंयस का?

हल्ली ऑफ़िसमधून ऑर्कूट, फ़ेसबूक सगळं बंद आहे:-(


Tonaga
Monday, February 11, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारा म्हनजे बायको... दार नव्हे त्यामुळे हा अर्थ बरोबर वाटत नाही.....

Tonaga
Monday, February 11, 2008 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धड ना गोडाची हा शब्द पुण्याच्या आसपास ग्रामीण भागातही आहेहोता...

Slarti
Monday, February 11, 2008 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दार या संस्कृत शब्दाचा अर्थ बायको (हा शब्दार्थ बरोबर आहे) आणि परिग्रह म्हणजे घेणे, स्विकारणे, ताबा घेणे इ.

Shonoo
Tuesday, February 12, 2008 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी
धन्यवाद. ( तुमच्या आय डी चे जसेच्या तसे देवनागरीकरण केले आहे. चुकीचेच केले असणार ते मी, त्या बद्दल क्षमा असावी! )

ती कविता पद्य, कृ ब निकुंब या भागात लिहिली आहे.



Bee
Tuesday, February 12, 2008 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेसचा तो संग्रह मिळवायचा आहे अजून. कुणाकडे आहे हे मात्र शोधून झाले आहे :-)

शोनू, आणखी प्रेमकविता लिहिता येईल का, म्हणजे तुझ्या नव्हे.. त्या वाचते आहे त्या संग्रहातून :-) खरच शतश्: धन्यवाद!

कविता वाचली निकुंबांची. धन्य्वाद!

स्लार्टी, तुम्ही चौफ़ेर वाचता, जरा भर घाला ना साहित्याच्या बीबीवर तुमच्याकडनं.


Slarti
Tuesday, February 12, 2008 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, 'स्लार्टी' हे बरोबर आहे

Gajanandesai
Friday, February 22, 2008 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलीकडेच अविनाश बिनीवाल्यांच्या (भाषांचा चांगला अभ्यास आहे त्यांचा) एका लेखात वाचलं की, 'वेठबिगार' हा शब्द 'wait beggar' पासून आला. पूर्वी इकडे इंग्रज साहेब आला होता, तेव्हा इथला गरीब कामकरी त्याच्याकडे काहीतरी काम मिळावे म्हणून त्याच्या मागे-मागे करायचा. तेव्हा चिडून तो "Wait beggar!" ही शिवी हासडायचा. पण त्याचा नेमका अर्थ काय आहे हे कामकरी वर्गाला कळले नाही आणि 'वेठबिगार' शब्द प्रचलीत झाला.

Bee
Friday, February 22, 2008 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेल असेल.. पण मी पहिल्यांदाच वाचत आहे हा शब्द.. कधी ऐकला नाही.

Satishmadhekar
Tuesday, February 26, 2008 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"स्वामी" या कांदंबरीत रामशास्त्री प्रभुणे माधवराव पेशव्यांशी बोलताना "वेठीचा हुकूम" अशा शब्दांचा उल्लेख करतात. रणजित देसाईंचा इतिहासाचा चांगला अभ्यास होता. ज्याअर्थी त्यांनी हा शब्द ऐतिहासिक कांदंबरीत वापरला आहे, त्याअर्थी तो खूप जुना प्रचलित शब्द असावा.

Bee
Tuesday, February 26, 2008 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी भाषा ही नक्की कुणाची घ्यावी? ज्ञानेश्वरांची ती वेगळी, शिवाजी महाराजांची ती वेगळी, पेशव्यांची ती वेगळी आणि आता जी आहे तीही वेगळीच. वेगळी म्हणजे अगदी सगळीच वेगळी असे मी म्हणत नाही पण ज्या प्रकारी तेंव्हा जशी मराठी भाषा बोलली जात होती तशी आज बोलल्या जात नाही.

Bee
Tuesday, February 26, 2008 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साखरफ़ुटाणे जे आपण प्रसादाला वापरतो त्यात फ़ुटाणे नसतात. मग त्याला साखरफ़ुटाणे का म्हणतात? साखरेच्या पाकात घोळवलेले फ़ुटाणे साखरफ़ुटाणे असा अर्थ मी घेतला आहे. पण अजून तरी असा साखरेच्या पाकात घोळवलेला फ़ुटाणा खाल्लेला नाही.

विदर्भात, साखरफ़ुटाण्याला चिरंजिवी म्हणतात. त्या मागचा अर्थ मला अजून माहिती नाही. नुकताच मी भारतातून आलो. अकोल्यातील दुकानदाराला विचारले तुमच्याकडे साखरफ़ुटाणे मिळतील का. त्याला कळलेच नाही. मग चिरंजीवीचे दाणे मिळतील का असे विचारले तर तो हो म्हणाला.

तसेच, गुढीपाडव्याला आपण जी साखरळमाळ बांधतो तांब्याच्या कळसाला, त्याला आमच्याकडे, म्हणजे विदर्भात गाठी म्हणतात. गाठी का म्हणत असावे माहिती नाही. बहुतेक साखरमाळेतील एक एक साखरेचे फ़ुल म्हणजे एक गाठ असे कुणाला वाटत असावे.


Hkumar
Wednesday, February 27, 2008 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शब्दविनोद: शंकरपाळीत शंकर कुठे असतो? :-)

Tonaga
Wednesday, February 27, 2008 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शण्कर पाळे हे शक्कर पारे या हिन्दी शब्दाचा अपभ्रंश आहे...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators