Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 12, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through September 12, 2007 « Previous Next »

Vinaydesai
Wednesday, August 29, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prepone हा शब्द अस्तित्वात आहे की...

(नवीन तयार झालेले शब्द इंग्रजीत सहजपणे आणले जातात.. म्हणूनच (My job has be Bangalored) मधला (Bangalored) हा ही शब्द Dictionary मध्ये सापडू शकतो )

http://dictionary.reference.com/browse/prepone

Farend
Wednesday, August 29, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण खूप देशांमधे अशी local variations होतच असतात. इंग्रजीत असेच नवीन शब्द वाढत गेलेले आहेत. येथे अमेरिकेत सुद्धा असे अनेक शब्द तयार झाले आहे. मला वाटते की प्रचंड संख्येने लोक वापरू लागले की आपोआपच तो valid शब्द म्हणून official होतो Websters वगैरे मधे.

अमेरिकेत advice शब्द noun & verb दोन्ही साठी advice/advicing असाच वापरलेला मी पाहिला आहे. शाळेत आम्ही शिकलो की क्रियापद म्हणून असेल तर s वापरतात.


Slarti
Wednesday, August 29, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द 'अधिकृतरित्या' भाषेचा भाग झाला आहे हे कसे कळते ? याबाबत dictionary.com वगैरे संकेतस्थळांपेक्षा Webster, OED हे संदर्भ जास्त योग्य मानावेत काय ?
btw, dictionary.com जे स्त्रोत वापरते ते सर्व अमेरिकन आहेत.


Kedarjoshi
Wednesday, August 29, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेबस्टर च्या साइट वर तो शब्द पाहीला तर तो अधिकृत आहे असे ग़ृहीत धरायला हरकत नसावी. मध्ये गोरा जेव्हा add झाले तेव्हा ते वेबस्टर नेच प्रकाशित केले होते.

Bee
Thursday, August 30, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा नवल वाटले ही माहिती वाचून.. ईंग्रजी भाषेत अशानी शब्दांची भरभराट होईल.

Vinaydesai
Thursday, August 30, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दरवर्षी बरेच नवे शब्द इंग्रजी भाषेत येत असतात.. सध्या भारतातूनही बरेच नवे शब्द येतात. ( Times Of India ) मध्ये मधून मधून तशी Article दिसतात..

Dictionary मध्ये आला की तो अधिकृत, मग तो American असो British असो...


Shonoo
Thursday, August 30, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकन लोकांनी वापरून वापरून preventive च्या जोडीने preventative पण official शब्द झाला आहे. w बुश आणखीन काही वर्ष राहिले तर कदाचित nukiller बरोबर आणि nuclear चूक असं ही होइल :-)


Slarti
Thursday, August 30, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय शोनू. शब्दाची चुकीची रुपे रुळणे हे सगळीकडेच घडते आणि काही काळाने बरोबर शब्द चूक वाटू लागतो. मला आठवते, कॉलेजच्या वार्षिकावर काम करताना मतितार्थ हा शब्द खरा मथितार्थ आहे हे मला सिद्ध करुन दाखवावे लागले होते.

Zakki
Thursday, August 30, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टिव्हन कोल्बेऽ ने Truthiness नावाचा शब्द 'तयार' केला. तो आता अधिकृत झाला आहे. threepeat म्हणजे लागोपाठ तिसर्‍यांदा असाहि शब्द अधिकृत झाला की नाही माहित नाही, पण त्याचे पेटंट पण पॅट रायलीने घेतले आहे. आता तो शब्द तुम्ही वापरला तर त्याला पैसे द्यावे लागतील!

Dhumketu
Friday, August 31, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://en.wikipedia.org/wiki/Indian_English .. .. .. ..

Bee
Friday, August 31, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतु, वरील लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. खूपच सुरेख माहिती मिळाली. माझ्या बर्‍याच शंका होत्या त्या काही प्रमाणात दूर झाल्यात आणि काही निरिक्षण होते ते वाचून खूप बरे वाटले. प्रत्येकानी वाचावी अशी माहिती आहे.

Hkumar
Friday, August 31, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, पोस्टपोन हा अख्हा १ शब्द असून त्यात पोस्ट हा प्रिफ़िक्स नाही. त्यामुळे विरुधार्थी प्रिपोन करता येत नाही. नवे शब्द रुळवताना या मूलभूत गोष्टी ध्यानात हव्याच


Pooh
Friday, August 31, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hkumar, check this out.

[Latin postpōnere : post-, post- + pōnere, to put; see post2.]

http://www.answers.com/topic/postpone

prepone

Prepone --- to bring forward in time --- is a word which is currently used in the Indian subcontinent as an antonym to the word 'postpone'. Most Indians do not know that this word does not figure in standard English and is mostly unknown to the rest of the English speaking world. The word is succinct and has a precise meaning which makes it difficult to replace with any other word and hence the continued usage in India.

The word 'prepone' is found in The New Oxford Dictionary of English, published 1998. It is listed as being Indian (from India) and is defined as "to bring forward to an earlier date or time." Example given: The publication date has been preponed from July to June.

http://www.answers.com/prepone


Hkumar
Saturday, September 01, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you Pooh. I considered only 'concise oxford' as the standard dict.
can anyone guide me regarding : while i am typing in devnagari, how do i insert an english word as it is among the oter marathi matter ? I'm not suceeding so far.

Hkumar
Thursday, September 06, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'निहायत' हा अरेबिक मधून आलेला शब्द आहे. मी तो तेंडुलकरांच्या लेखनात वाचला.( जगण्यावर नि... प्रेम करणारा). त्याचा अर्थ 'पराकाष्ठा' आहे.

Hkumar
Saturday, September 08, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'सळनळ' हा एक मजेदार शब्द व्यंकटेश माडगूळकरांच्या लिखाणात वाचला. त्याचा अर्थ आहे 'सरळ'. ( ते पोर बाकावर स..... पसरले होते.)

Devdattag
Monday, September 10, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी सांगू शकेल का की आरतीमधल्या 'रत्न खचित फरा' मधील 'फरा' चा अर्थ काय?

Sashal
Monday, September 10, 2007 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुटाच्या पुढच्या बाजूला मध्यभागी जो पीस किंवा तुर्‍यासारखा भाग असतो त्याला फ़रा म्हणत असावेत का? किंवा मग गळ्यातल्या हाराला? ..

Shonoo
Tuesday, September 11, 2007 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निहायत चा उर्दू शब्दकोषात अर्थ असा आहे अन्त, शेवट, टोक. विशेषण रुपात अत्यंत, फार.

Shriramb
Wednesday, September 12, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फरा : खवाटा, तंगडी, धान्याचे माप, पिंपळवन, कळप, सैन्याची रांग.
(संदर्भ : शब्दरत्नाकर)
यापैकी इथे 'माप' हा अर्थ योग्य वाटतो, 'रत्नांनी भरलेले माप तुला अर्पण' अशा अर्थाने. चूभूदेघे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators