Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नव्या जमान्यातली नवी "मरांग्रजी" भाषा...

Hitguj » Language and Literature » भाषा » नव्या जमान्यातली नवी "मरांग्रजी" भाषा « Previous Next »

Eksamanyamanus
Thursday, June 21, 2007 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कालनिर्णय" दिनदर्शिकेत एप्रिल महिन्याच्या पानाच्या बुडाशी "गार्निअर" कंपनीने तयार केलेल्या कलपांची एक जाहिरात आहे ती अशी :

.......................................................................

पांढरे केस गायब
फक्त सॉफ्ट, नॅचरल कलर.

......................................................................

माझ्या मते त्या जाहिरातदारांनी वरच्या जाहिरातीत खूपच मराठी शब्द मराठी भाषेच्या प्रेमाने हकनाक वापरले आहेत.

......................................................................

व्हाइट हेअर गायब

फक्त सॉफ्ट, नॅचरल कलर.

......................................................................

असे नव्या जमान्यातल्या "मरांग्रजी" भाषेतले अधिक परिणामकारक "घोषवाक्य" त्या जाहिरातदारांनी वापरायला हवे होते.


Chhatrapati
Friday, June 22, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल सगळीकडे मोस्टली असेच कम्युनिकेशन करतात. जर एखाद्याला अंडरस्टॅंडिंगच नसेल, तर तुमची मराठी लॅंगवेज वीक आहे असे कन्क्लूजन ड्रॉ करते पब्लिक. कॅलेंडरमध्ये देवनागरी स्क्रिप्ट असते ना ? मग मराठी राईटींगचा पर्पझ डेफ़िनेटली सर्व्ह होतोच की. नाहीतरी डेली रूटीनमध्ये लोक असाच यूसेज प्रिफर करतात. जर प्य़ुअर मराठी व्होक्याब्लरी असेल, तर तुम्ही रस्टीक वाटता. मी एकदा प्युअर मराठी मध्ये कम्युनिकेट केले, तर लोक मला म्हणाले "अरे तुला एक्स्प्रेस करणे डिफ़िकल्ट जाते, तुला मराठी लॅंगवेज येत नाही."


Storvi
Friday, June 22, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता नाव छत्रपती असेल तर रस्टिकच काय ऍन्टीक सुद्धा वाटेल लोकांना :-O

Eksamanyamanus
Monday, June 25, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


"माझी मरांग्रजीचि बोल कौतुके ।
परी अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके। मेळ्वीन ॥"

असे संत ज्ञानेश्वरांनी सेव्हन हंड्रेड इअर्सपूर्वी लिहून पुट केले होतेच.

Chhatrapati
Tuesday, June 26, 2007 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टोरवी, गुड वन ! :-)
एसामा, श्लोक पण आवडला :-)

Slarti
Tuesday, June 26, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी एका मराठी मुलीच्या तोंडून "मला एक थॉट आला" हे वाक्य ऐकण्याचा योग आला. आजकाल चित्रपट, दिग्दर्शक, निर्माता वगैरे शब्द वापरले की लोक लगेच विचारतात," कुठल्या शाळेत होतास ? "
आता हे बघा -
http://www.loksatta.com/lokprabha/
डावीकडे विविध स्तंभांची यादी आहे त्यात 'डिसिजन्स', 'ट्रेंड', 'द गुड बॅड अग्ली' इ.इ. बरे तेही ठिक आहे, पण 'मनी' ????
खासकरून विज्ञान तंत्रज्ञानावरील लेख असेल तर भयंकर खडखडाट असतो
उदा. http://www.esakal.com/esakal/06262007/Saptarang581B29B9F4.htm
त्यातही अगदीच तांत्रिक शब्दांचे समजू शकतो, पण 'थिएटर, प्रोसेसिंग, स्टोअरेज, डिस्ट्रीब्युशन' वगैरे म्हणजे... (आणि हे शब्द बोलायला सोपे असले तरी देवनागरीत लिहायला मुळीच सोपे नाहीत, मी 'स्टोअरेज' हा शब्द तीनवेळा लिहीला. शब्द लिहायला सुरू केला की इंग्रजी spelling आपोआप ताबा घेते आणि 'स्टोरेग / स्टोअरगे' अशी रुपे होतात.)

Hawa_hawai
Tuesday, June 26, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Storvi छत्रपतींना आपल्या मिन्ग्रजी बद्दल काहीच माहिती दिली नाहीस तू! शो. ना. हो.

umbrellahusband umhi kadhi us chya mingraji baddal hearlele lookat not. poorvi ashi ek language motherboli war people speakayche. moveli kuni mingraj comeat naslyane tila deathkaLa comeli is!!

Bee
Wednesday, June 27, 2007 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Air_Aire, youla howki daynantar Motherboli war seekato aahe. welcomegatam :-)


Chhatrapati
Wednesday, June 27, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा ! तुमच्या माऊथ मधून मरांग्रजीचे स्प्रे उडतायत ! ट्रूली स्पीकींग, तुमच्या टाईपिंगमधून स्प्रे उडतायत असेच रीफ्रेझ करायला हवे ! मी मराठी मिस्स करतोय. इथे पोस्ट केलेले ब्लॉग्ज पाहून ऍक्चुली मला खूपच सॅटिसफॅक्शन मिळतेय. वा वा ... ग्रेट, प्लीज कंटीन्यू !

Eksamanyamanus
Thursday, June 28, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




Hawa_Hawai आणि Bee ह्यांचे संदेश वाचून माझ्या लक्षात आले ते असे की नव्या पिढ्यांकरता मराठी - मिंग्रजी (किंवा मिंग्रजीत बोलायचे म्हणजे डायठी - मिंग्रजी) शब्दकोश लौकरात लौकर तयार
करण्याकरता सामुदायिक प्रयत्नांची निकड आहे. अर्थात चिनी भाषेत शब्द जसे वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतात तसेच मिंग्रजी भाषेतही काही काही शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतात ह्याची जाणही ह्या डायठी - मिंग्रजी शब्दकोशाद्वारे नव्या पिढ्यांना देणे फार इष्ट आहे. आता 'शुभस्य शीघ्रं' असे कालिदास, भवभूती, भास, भट्टनारायण वगैरेंपैकी कोणीतरी सुमारे हजार-दीडहजार वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहेच. तेव्हा त्या सूज्ञ सूचनेनुसार मीइथे मराठी - मिंग्रजी ('उर्फ' डायठी - मिंग्रजी) शब्दकोशरचनेच्या मह्त्वाच्या सामुदायिक कार्याला लगेच प्रारंभ करतो.


(टीप १: वरच्या परिच्छेदातल्याच काही मराठी शब्दांचे मिंग्रजी प्रतिशब्द मी खाली संग्रहित केले आहेत.)

(टीप २:मिंग्रजी आणि मरांग्रजी ह्या दोन भिन्न भाषा आहेत.)

............................................................


संदेश...............................संकंट्री; संनेशन

लक्षात............................हंड्रेड्थाउजंडात

शब्दकोश........................वर्डट्रेझरी

लौकर.............................लौडू

तयार.............................तफ्रेंड

निकड............................निरिम

आहे..............................आधिस

अर्थात..........................मिनिंगात

वेगवेगळ्या.................स्पीडस्पीडळ्या

येतात........................कमफादर

जाण.........................गोण

देणे..........................गिव्हणे

कालिदास...............कालिस्लेव्ह

भवभूती.................भवभूशी

ह्जार.....................हलव्हर

सूचनेनुसार...........सूचनेनुसूप

मी.......................आय

करतो..................डूतो


.................................................................................................................


Robeenhood
Thursday, June 28, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पी जे चा बी बी नाही आहे....

Eksamanyamanus
Thursday, June 28, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robbenhood ह्यांच्या संकंट्रीचे मिंग्रजीत भाषांसो असे आधिस :

हा पी जे टी बी बी नॉट आधिस.

Chhatrapati
Thursday, June 28, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एसामा, हे शब्द निर्माण करणे म्हणजे असामान्य माणसांचे कार्य आहे !
कदाचित पुढच्या एखाद्या पिढीला याचा अर्थबोध होईल व तो खूप आवडेल आणि ही व्यावहारीक भाषा होऊन जाईल. पण सर्व मराठी शब्दांचे प्रतिशब्द कधी उपलब्ध करून देणार तुम्ही ?





Eksamanyamanus
Thursday, June 28, 2007 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती,

इंग्रजीतल्या "वेब्स्टर्स"सारख्या शब्दकोशांची नवी आवृत्ती तयार करण्याचा पंधरावीस तज्ञ मंडळींचा सामुदायिक उपक्रम वीसवीस वर्षे चालत असतो. इथे तर मराठी - मिंग्रजी शब्दकोश जगाच्या इतिहासात प्रथमच रचण्याचा प्रस्ताव आहे. तेव्हा ह्या उपक्रमात जर समजा पाच मंडळींनी हातभार लावला तर तो उपक्रम पुरा होईपर्यंत निदान २०५७ साल उजाडणार हे उघड आहे. पण भारतातली लोकसंख्या २०५७ सालापर्यंत २,०००,०००,००० इतपतच रोकण्याइतकेच हे मराठी - मिंग्रजी शब्दकोशनिर्मितीचे कार्यही महाराष्ट्रातल्या (आणि महाराष्ट्राबाहेर जगभर पसरलेल्या) नव्या पिढ्यांच्या सुसंस्कृततेच्या दृष्टीने मला फार महत्वाचे दिसते.

सूज्ञ कन्फ्युशिअसने 'थेंबे थेंबे तळे साचे' असे (मराठी भाषेत) पंचवीसशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले आहेच.

Chhatrapati
Friday, June 29, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

’कन्फ्युशिअस’ हे नाव ’कनफ्युजन’ या शब्दाशी नकळत नाते जोडून जाते. पण मुद्दा तो नाही.

एसामा, तुम्ही म्हणता ते वाचून आश्चर्य वाटले. एक शब्दकोश तयार व्हायला इतका वेळ लागतो हे मला माहिती नवते. आपण किती किरकोळीत तो उघडून एखाद्या शब्दाचा अर्थ पाहतो आणि पाहून झाला की तितक्याच सहजपणे तो शब्दकोश परत पुस्तकांच्या कप्प्यात ठेवून देतो. हा शब्दकोश आपल्या भाषेला जसा आधार देतो, तसाच कप्प्यातल्या इतर पुस्तकांना आधार देत सर्वात उजवीकडे किंवा सर्वात डावीकडे एरवी आनंदाने उभा असतो ! मराठी भाषेचे थोडे दुर्दैव वाटते की व्यवहारात वापरायला काही काही शब्द चटकन उपलब्ध होत नाहीत, खरेतर हे मराठीचे नाही, आपले दुर्दैव म्हणावे लागेल. पण एखाद्याने अस्खलित मराठी बोलायचेच ठरवले, तर कधी कधी हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते, याचे कारण इतकेच की ज्या लोकांबरोबर आपण संवाद साधत असतो, त्यांना रोजच्या मराठी भाषेत नसणारा एखादा शब्द खूप अपरिचित आणि अवघड वाटतो. हे कोडे कसे सोडवायचे ? अगदी व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला, तर हे अवघड शब्द कसे प्रचलित करायचे ? मला तरी वाटते की हे काम अवघड आहे. म्हणजे अगदी साधे उदाहरण घेऊया. आपण रोजच्या भाषेत बोलताना कितीतरी वेळा असे म्हणतो, "तू चेक बॅंकेत भरलास का ?". हे शब्द इतके प्रचलित झालेत, की आपण "धनादेश", किंवा "पेढी" वगैरे शब्द वापरले, तर लोक बुचकळ्यात पडतील ! खरे पाहता, अगदी ९०% इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत, पण का कोण जाणे मागच्या ५० वर्षात लोकांनी ते शब्द वापरणे पूर्ण बंदच केले आहे. मी काम करतो तिथे जे चीनी लोक आहेत, ते जेव्हा एकमेकाशी त्यांच्या भाषेत बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात मी अगदी क्वचित इंग्रजी शब्द ऐकतो. इतकेच नाही, तर खूपशा तांत्रिक शब्दांनासुद्धा त्यांच्या भाषेत प्रतिशब्द आहेत, आणि ते त्याचा वापर सहजपणे करताना दिसतात. मराठी माणसांनी ही प्रथा का नाही टिकवली याचे मला आश्चर्य वाटते. इंग्रजांची दीडशे वर्षाची राजवट, हे एक कारण असू शकते. तसेच शास्त्र आणि गणित आठवीपासून इंग्रजीत शिकण्याची सोय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळानेच उपलब्ध करून ठेवली आहे, हे अजून एक कारण. पण प्रामाणिकपणे विचार केला, तर इंग्रज भारत सोडून गेल्यावर सुद्धा आपण शुद्ध मराठी बोलण्यासाठी मनापासून किती प्रयत्न केले ? खूप कमी ! सातवीत चांगला अभ्यास करून पहिल्या दोन तुकड्यांमध्ये प्रवेश नाही मिळाला, तर शास्त्र आणि गणित मराठीत शिकावे लागेल अशी भीती मुलांना असते ! समोरच्याला आपले विचार समजतात ना ? मग इंग्रजी शब्दप्रयोग केला तर काय फरक पडतो ? अशी प्रवृत्ती सगळीकडे दिसून येते. हल्ली कवितेत सुध्दा अनेक इंग्रजी शब्द पाहायला मिळतात. अजून ५० वर्षांनंतर तुमच्या ’मरांग्रजी’ किंवा ’मिंग्रजी’ भाषेत मराठी साहित्य छापून प्रकाशित केलेले दिसले, तर त्यात आश्चर्य नाही !
:-)



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators