Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 21, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through May 21, 2007 « Previous Next »

Nanya
Friday, April 20, 2007 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिकवा = तक्रार असावे.. ...

Sunilt
Friday, April 20, 2007 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा !! "शिकवा" शिकवायचे राहूनच गेले !!

बरोबर. शिकवा = तक्रार


Disha013
Friday, April 20, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते,फ़ना म्हणजे कुर्बान असावे....

Bee
Friday, April 20, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागाचा पण फ़ना असतो ना..

Nanya
Friday, April 20, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागाचा फ़णा असतो. "फ़ना होना" म्हणजे "नष्ट होणे" असे कुठे तरी वाचले आहे.

Swa_26
Friday, April 20, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फना चा अर्थ उध्वस्त होणे...
C.B.D.G.

Psg
Friday, April 20, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर, फ़ना म्हणजे नष्ट होणेच, पण प्रेमात!
म्हणजे एखादा खाद्यपदार्थ खराब झाला, तर तो 'फ़ना' झाला असं म्हणणे बरोबर नाही :-)
फ़ना म्हणजे प्रेमात, प्रेमासाठी संपून जाणे. तो सिनेमा आला होता तेव्हा स्पष्टीकरण होते.. फ़ना.. destroyed in love .


Farend
Friday, April 20, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, कोठेही संपून जाणे असावे, फक्त प्रेमातच असेल असे वाटत नाही, कारण साहिरनेच म्हंटले आहे 'घटा मे छुपके सितारे फ़ना नही होते...'

Mahesh
Friday, April 20, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फनावरून एक शेर आठवला.

ईश्रत ए कतरा है
दरियामे फना हो जाना
दर्द का हद से गुजरना है
दवा हो जाना

इश्रत म्हणजे मुक्ती , कतरा म्हणजे थेंब , ईश्रत ए कतरा म्हणजे थेंबाची मुक्ती , दरियामे फना हो जाना म्हणजे समुद्रात मिसळून जाणे. पुढचा अर्थ सांगायची गरज नसावी.


Bee
Friday, April 20, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दूर, फ़नाचा अर्थ बरबाद होणे असा होतो पण तो संदर्भानुसार घ्यायचा असतो. केवळ प्रेमात पडून बरबाद होणे हा एकच अर्थ निघत नाही त्यातून..

Bee
Friday, April 20, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मराठीत देखील आपण एखादा पदार्थ खराब झाला तर तो पदार्थ नष्ट झाला असे म्हणत नाही.. :-)

Zakki
Friday, April 20, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल नि इतर, अनेक धन्यवाद. आता आपण ही चर्चा इथेच थांबवू का? नाहीतर 'मराठी पोलिस' (कोण असावेत बरे हे? पहिले अक्षर झ व शेवटचे की. ओळखा.) इथे येऊन ओरडतील, 'मायबोलीवर फक्त मराठी' म्हणून.

Shonoo
Friday, April 20, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ' रुसवाइयां है मेरे माझी की' या पूर्ण ओळीचा अर्थ काय? मला कधीच कळला नव्हता.

Bee
Monday, April 23, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पांधान वाजणे' ह्याचा अर्थ मला सांगू शकेल का कुणी इथे? मी कायद्याचे बोला ह्या मराठी चित्रपटात हा शब्द ऐकला..

पांधान म्हणजे बडीशेप, सुपारी, काथ, चुना ठेवायचा ट्रे.. बरोबर ना मी? मग त्याचा मी अर्थ असा लावला की पांधान वाजून हे सर्व व्यंजन एकत्रीत झाले. अर्थात एखादी गोष्ट बिघडणे.. पण नक्की अर्थ कळला तर बरे होइल.


Maitreyee
Monday, April 23, 2007 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायद्याचं बोला मधे? पांधान? मी नाही बॉ असं काही ऐकलं :-)

Swaatee_ambole
Monday, April 23, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, रुसवाई म्हणजे बदनामी.
मेरे हमराज़भी रुसवाईयाँ हैं मेरे माज़ी की..
माझ्यासोबत आता माझी ( भूतकाळात झालेली) अपकीर्तीच काय ती आहे.


Parop
Thursday, April 26, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांधान? माझ्यामते शब्द पानदान असावा... 'पानदान वाजणे' चा अर्थ बेरंग होणे किंवा बोजवारा उडणे असा आहे...मात्र त्याची व्युत्पत्ती माहित नाही!

Bee
Friday, April 27, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परोप, तुझे बरोबर आहे तो शब्द पानदान असाच आहे पण म्हणताना त्याचा उच्चार सहज पांधान असा होतो.. जसे लवकर म्हणताना लौकर होतो तसा.

मैत्रेयी, आहे हा वाक्प्रचार त्या सिनेमात. मी परत परत ऐकला...


Parop
Thursday, May 10, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी एखाद्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पानाचा विडा देण्या-घेण्याची पद्धत होती.. . चर्चा फ़िस्कटली या अर्थी 'पानदान' वाजले असा शब्दप्रयोग आला असेल का?....

Chhatrapati
Tuesday, May 22, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, माफ करा, पण या मुद्द्यावर माझा अलिकडेच एके ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद झाला. आपल्या मायबोलीतला सर्वांचा लाडका शब्द ’च्या आईला’ ही सर्वश्रुत शिवी आहे. परंतु ही शिवी कशी झाली हे मला उमजत नाही. खरे पाहता या दोन शब्दात काहीही वाईट नाही. कदाचित यापुढे एखादा अश्लील शब्द अध्याह्रुत असावा आणि तो जर त्यापुढे आला, तर खरोखर ती शिवी होवू शकेल. नुसत्या या दोन शब्दांनी फक्त वाक्य पूर्ण होते. मी असेही ऐकले की देऊन देऊन ही शिवी आता ’शिवी’ वाटत नाही, पण खरेतर ती शिवी आहे. बेसिकली, वाईट अर्थाचा शब्द म्हणजे शिवी, पण या दोन शब्दात वाईट काही नाही. हे तर मराठी अव्यय वाटते.

कृपया मदत करा. आपले विचार महत्त्वाचे आहेत.

धन्यवाद

-- छत्रपती.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators