Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 16, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through April 16, 2007 « Previous Next »

Savyasachi
Monday, March 19, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा :-)
बी चे नाव युवराजने न घेतल्याने बी पेटला असेल :-)


Bee
Tuesday, March 20, 2007 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)

फ़क्त मैत्रेयी आणि रॉबीनहूडचे नाव वाचून मला निःशब्द रहावले नाही :-)


Karadkar
Tuesday, March 20, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वदनी कवळ घेता बरोबर आहे की वदनी कवल घेता बरोबर आहे?

Maitreyee
Tuesday, March 20, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कवळ' बरोबर आहे.

Milindaa
Tuesday, March 20, 2007 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतर कवळी शब्द कशावरुन आला असेल असे वाटते? :-)

Zakki
Wednesday, March 21, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे म्हातारपणी, 'वदनी कवळी घेता' असे म्हणतात म्हणे! ख. खो. मा. ना.

Karadkar
Thursday, March 22, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, धन्यवाद

मिलिंदा :-)

झक्की HHPV


Robeenhood
Thursday, March 22, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी आणि रॉबिनहूड मला सांगा ना जरा की 'सांध्यपर्वातील वैष्णवी' चा अर्थ काय होतो?
>>>>
युवराजशेखर,
माझ्या रंगबेरंगी वरील पानावर'सांध्यपर्वातील वैष्णवी'वर काही लिहिले आहे....
खाली टिचकी मारा...


Robeenhood
Thursday, March 22, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांध्यपर्वातील वैष्णवी... ... ... ..

Zakki
Thursday, March 22, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचले ते. क्काहीतरीच काय? वय ६५ झाले म्हणजे लगेच संध्याकाळचे डोहाळे लागले म्हणे! एव्हढे काही वय झाले नाही ६५ म्हणजे.

चांगले मायबोलीवर यावे. जरा क्रिकेट, सिनेमे, मुसलमानी दहशतवाद, इ. विषयात रस घ्यावा, आपली मते मांडावीत, स्वत: निरनिराळ्या देवतांचे स्मरण करून अप्रत्यक्षपणे लहान मुलांचे लक्षहि अध्यात्माकडे वळवावे, लहान मुलांना उपदेश करावा, एक दोन विनोद करावे.

उगाच आपले उदास होऊन बसायचे! नि लोकांना उदास करायचे! काय कुणी ६५ वर्षाचे होतच नाहीत की काय?


Dineshvs
Friday, March 23, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि, मलाही असा घाऊक निराशावाद ( हा शब्दप्रयोग माझा नाही, कुसुमाग्रजांचा आहे ) आवडत नाही.
संध्याकाळ म्हणजे मृत्यु असा काहितरी विचित्र अर्थ लावलेला असतो. शिवाय त्याला भारतीय तत्वज्ञानाची जोड दिलेली असते.
भारतीय तत्वज्ञान मरणकल्पनेशी कधीच थांबत नाही. आत्म्याने जीर्ण वस्त्र टाकुन नवे वस्त्र ल्यावे, ईतका सुंदर अर्थ आहे आपल्याकडे मरणाचा. काही कवि आणि लेखकांच्या अश्या लेखनाकडे तरुण पिढी आकर्षित होते याचेच वाईट वाटते.
त्यांच्यापेक्षा तुम्ही आणि मी जास्त तरुण आहोत, म्हणायचे.


Amarhabib
Monday, April 09, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अ न ह द या श्ब्दाचा अर्थ काय?

Bee
Tuesday, April 10, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनहद नाही माहिती मला पण अनाहत माहिती आहे. अनाहत नावाचे एक चक्र आपल्या शरिरात असते. त्याची जागा म्हणजे आपले हृदय. अनाहत म्हणजे the one which is not scrapped..

चुभुदेघे..


Mansmi18
Friday, April 13, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, दिनेश

मी कुठेतरि वाचले होते कि महाभारत युद्धात जेव्हा भगवान श्रीक्रिश्नानी अर्जुनाला गीता सान्गितली होती तेव्हा अर्जुनाचे वय होते ६६ किन्वा ६८ आनि श्रीक्रिश्णाचे वय होते ११८:-)

धन्यवाद.


Robeenhood
Friday, April 13, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याकाळी झक्कींचे वय किती असेल बरे?

Zakki
Saturday, April 14, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

११८ पेक्षा निदान दहा बारा वर्षांनी तरी जास्तच असणार. मीच तर गीता सांगितली कृष्णाला! पण तेंव्हापासूनच प्रसिद्धीपरांग्मुख असल्याने कुणाला माहित नाही ते.

Farend
Saturday, April 14, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बहुधा हिंदीत आढळते, पण मीरीच्या भजनांत 'जोगी' उल्लेख जो आहे तो कृष्णाला उद्देशून आहे का? जर असेल तर 'जोगी' का? तसेच उत्तरेत कृष्णाला 'रणछोडजी' असे म्हणतात त्याचा नक्की अर्थ काय आहे?

Chioo
Monday, April 16, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदी, बंगाली, गुजराथी अशा भाषात दोन 'ज' आहेत. त्या भाषात 'युद्ध' याचा उच्चार 'जुद्ध' आहे. पण 'यज्ञ' मात्र 'य'च. तसंच 'जोगी' म्हणजे 'योगी'. बर्‍याचदा 'संसारी तपस्वी' या अर्थाने.

कृष्णाने कंसाला मारल्यानंतर जरासंधाने मथुरेवर हल्ला केला. तेव्हा कृष्ण मथुरेला वाचवण्यासाठी तिथून पळाला. म्हणून तो 'रणछोडदास'.


Robeenhood
Monday, April 16, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या कृष्णाने कंसाला मारले तो जरासंधाला मारू शकत नव्हता का? तो का पळाला?

(ए. भा. प्र.)


Kedarjoshi
Monday, April 16, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो रॊबीन तिकडे अनिरुध्द बापु आपल्या लिला दाखवतात तर कॄष्ण का नाही?

on serious note जरासंघ हा भिमापे़़आ बलबान व गदायुधात प्रविन होता. जर एका वर एक असे गदा युध्द झाले असते तर त्यात जरासंघच जिकंला असता हे कॄष्णाला माहीती होते असे वाटते. कॄष्नाने फक्त प्रतिकेशवाला (जो स्वतःला कॄश्ण म्हणुन घ्यायचा ) तसे हारविले बाकी तो युध्द मनेज करन्यातच प्रविन होता युध्द करन्यात नाही.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators