Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इरावती कर्वे

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » इरावती कर्वे « Previous Next »

Shrini
Monday, January 19, 2004 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इरावती कर्वे यांचे 'परिपूर्ती' पण नुकतेच वाचले. चांगले पुस्तक आहे. विशेषतः जुने पुस्तक असूनही वाचताना जुने वाटत नाही.

आणखी गंमत म्हणजे, 'परिपूर्ती' ही गोष्ट मी आधी वाचली नव्हती, पण त्या गोष्टीबद्दल ऐकले बरेच होते.

गोष्ट थोडक्यात अशी की,
एका समारंभात ईरावतीबाईंची ओळख, अमक्यांची कन्या, अमक्यांची सून, अमक्यांची बायको अशी करुन देण्यात येते. पण ही ओळख अपूर्ण आहे असे त्यांना वाटत असते. शेवटी, ईरावतीबाईंच्या शाळकरी मुलाच्या वर्गातल्या इतर मुलांनी , 'अरे ती बघ आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई' असे म्हटल्यावर त्यांना आपली ओळख पूर्ण झाल्याचे, 'परिपूर्ती'चे समाधान वाटते.

या गोष्टीचे अनेकांनी कौतुक केले होते, आणि स्त्री कितीही मोठी झाली तरी तिची खरी ओळख मातृत्वानेच कशी होते याबद्दल स्तोत्रे गायीली होती.

आणि मग एके ठिकाणी दस्तुरखुद्द ईरावतीबाईच म्हणाल्या होत्या कि ही गोष्ट त्यांनी अत्यंत उपहासाने लिहीली होती, कि स्त्री स्वतः कितीही कर्तृत्ववान असली तरी शेवटी तिची ओळख कुणाचीतरी मुलगी, कुणाचीतरी बायको आणि कुणाचीतरी आई इतकीच असते. पण कुणीही हा उपहास लक्षात न घेता, त्याचीच स्तुती केली. ईरावतीबाईंनी ही स्तुती ऐकून नक्की कपाळाला हात लावला असेल.

ही गोष्ट प्रत्यक्ष वाचल्यावर मात्र त्यातला उपहास मला चांगलाच जाणवला, आणि गौरी देशपांडे मधे खवचट विनोदाचे genes कोठून आले असतील याचा उलगडाही झाला. माय अगदी लेकीला शोभेल अशी आहे!
:-)

Mahaguru
Wednesday, January 28, 2004 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nauktoca [ravatI kvao- yaaMcao ‘yaugaant’ vaacalao. Cana Aaho.

Bee
Thursday, March 15, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, परिपुर्तीबद्दल इथेच खरड काय खरडायचे ते, जर हरकत नसेल तर :-)

Karadkar
Thursday, March 15, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युगांत वाचले मधे. महाभारतावर इतके छान पुस्तक पूर्वी वाचल्याचे आठवत नाही.
श्रीक्रिष्णावरच लेख तर उत्तमच.


Shonoo
Tuesday, April 03, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक दिवस शोधून शेवटी यु पेन च्या लायब्ररी मधून हे पुस्तक मिळाले आणि मिळाल्याबरोबर अधाशा सारखे वाचून काढले. त्या बद्दल लिहीन लिहीन म्हणताना बराच वेळ गेला. आता पुस्तक हाताशी नाही तरी प्रामुख्याने मला भावलेल्या काही गोष्टी.

आपल्या मुलांचा उल्लेख 'कार्टी' म्हणून अगदी बिनदिक्कत केलाय हे वाचून मला फार म्हणजे फारच बरं वाटलं. मी माझ्या मुलांना कार्टी म्हणते या बद्दल अपराधी वाटायचं कारण नाही. शिवाय ' त्यांना बोर्डिंगात घालीन' अशा धमक्या ही दिल्या आहेत. मुलांच्या मस्तीला त्या सुद्धा इतक्या कंटाळल्या तर मग माझ्या सारख्यांनी वैतागावं आणी दोन चार शेलके शब्द वापरावे यात काही चूक नाही!

त्यांनी वारीबद्दल लिहिलंय ते पहिल्यांदाच वाचलं. वारीला जाताना, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ( नक्की साल त्यांनी लिहिलं नाही) इतकी शिवाशिव, जाती पातींचं स्तोम वाचून फार वाइट वाटलं. वारीचे नवे अनुभव कोणी लिहिले असतील तर वाचायला आवडेल.

ख्रिस्ती धर्मप्रचारकांबद्दल लिहिलेलं पण मस्त आहे एकदम. हिन्दुधर्माबद्दल काहीही माहित नसताना त्याविरुद्ध प्रचार करणार्‍यांची खिल्ली उडवलेली आहे.

स्त्री राज्य नावाचा एक लेख आअहे तो मात्र अगदी बेकार वाटला. योगिनी जोगळेकर, स्नेहलता दसनूरकर यांच्या कादम्बरी टाइप. अर्थात त्यांनी वर्णन केलेली परिस्थिती खरीच असणार पण त्यात त्या परिस्थितीचे कौतुक आहे असा सूर मला वाटला आणि तेच जास्त खटकलं.

ओरिसा बद्दल फार छान माहिती आहे. त्याबद्दल त्यांनी आणखीन लिहायला हवं होतं.


Bee
Wednesday, April 04, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पुस्तक म्हणजे कुठल पुस्तक म्हणतेस शोनू..

Bee
Friday, August 24, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला इरावतीबाईंची खालिल पुस्तक हवी आहेत. कुठे मिळू शकतील कुणाला जर माहिती असेल तर लिहा इथे.


मराठी लोकांची संस्कृती (१९५१), आमची संस्कृती (१९६०), हिंदूंची समाजरचना (१९६७), महाराष्ट्र: एक अभ्यास (१९७१), धर्म (१९७१), संस्कृती (१९७२), हिंदू समाज: एक अन्वयार्थ (१९७५)



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators