Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through February 23, 2007 « Previous Next »

Ameyadeshpande
Friday, December 22, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एक हिंदी गझल आहे.

सच ये है बेकार हमें गम होता है
जो चाहा था दुनिया में कम होता है

ह्या मधे पुढे एक शेर आहे ज्याच्या पहिल्या ओळीचा अर्थ काहीच लागत नाही.

जहन की शाखोंपर अशार आ जाते है
जब तेरी यादोंका मौसम होता है

जितका अंदाज लागतो तेवढ्यावरून "अंगावरती शहारे येतात" किंवा त्याच्या आसपास असा अर्थ आहे असं वाटतं.


Kedarjoshi
Friday, December 22, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या आठवनीने माझ सर्वागं (शरीर) रोमांचीत होत असा त्याचा अर्थ आहे.

Maitreyee
Saturday, December 23, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तो अर्थ चूक वाटत आहे. इतकं सोपं नसावं ते. जहन चा अर्थ मन, विचार असा कहीसा आहे..

Kedarjoshi
Saturday, December 23, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जहन म्हणजे शरीर.
अशार म्हणजे एकतर फुल किंवा काटे ( पुर्ण शेर जसा आहे तसा अर्थ घ्यावा लागेल).

जर आधीचे शेर प्रेम भावनेतील असतील तर रोमांचीत करनार्या आठवनी ( फुल) नाहीतर काटे. जसे शहारे येने वैगरे.


Sanghamitra
Friday, February 02, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जहन म्हणजे मेंदू बुद्धी.
आणि अशार हे शेर चे अनेकवचन आहे.
या शेराचा अर्थ तुझ्या आठवणींच्या काळात
खूप शेर सुचतात (मेंदूंच्या फांद्यांवर खूप शेर फुलतात) असा होतोय.


Shonoo
Tuesday, February 13, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी काल उर्दू शब्दकोष उघडून पाहिला
ज़ेहन असा शब्द आहे. ज़हन असा नाहीये,
त्याचा अर्थ बुद्धी, मेंदू, स्मरणशक्ती असा दिलाय.


Kedarjoshi
Tuesday, February 13, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ईकडे लक्ष न्हवत. सॉरी गाईज मी भलताच अर्थ लिहिला.

संघमित्रा नी शोनू धन्यवाद.


Zakki
Wednesday, February 14, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्षिकाति या मराठी शब्दाचा अर्थ इथे कळेल का? का हा BB फक्त परकीय शब्दांच्या मराठी अर्थासाठी आहे?

घन:श्याम सुंदरा या प्रसिद्ध गाण्यात तो शब्द येतो. पण त्याचा अर्थ माहित नाही.

धन्यवाद.


Dineshvs
Wednesday, February 14, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि, मला वाटते त्याचा अर्थ अपेक्षेने बघणे असा होत असावा.
लक्षिताति वासुरे, हरि धेनु स्तनपानाला

अशी ओळ आहे ना ती ?


Zakki
Wednesday, February 14, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाच अर्थ बरोबर वाटतो. धन्यवाद.

Mrinmayee
Wednesday, February 14, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्षिणे (विरुध्दार्थी : दुर्लक्षिणे) ह्यात अपेक्षेचा भाग येतो का? की लक्ष ह्या शब्दापासून तयार झाल्यामुळे त्यात फक्त 'बघणे (एका ठराविक ठिकाणी)' हाच भाग गृहीत असतो?

Yuvrajshekhar
Wednesday, February 14, 2007 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी मला 'सांध्यपर्वातील वैष्णवी' याचा अर्थ सांगेल काय?

Mrunmayi
Friday, February 23, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला चीनंशुक या शब्दाचा अर्थ हवा आहे कोणी सांगेल काय

Robeenhood
Friday, February 23, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाच पानावर दोन मृण्मया?
परमेश्वरा तुझी लीला अपरम्पार आहे...


Vinaydesai
Friday, February 23, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुडा, माताजींचे काय? त्या दाखवतील त्या लीला आपण बघायच्या... :-)


Pooh
Friday, February 23, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी,

तो शब्द चीनांशुक असा आहे.
त्याचा अर्थ "रेशमी वस्त्र" असा आहे. ९५% खात्री आहे. १००% नाही


Dineshvs
Friday, February 23, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीनशुंक चा अर्थ मला नाही माहित, पण मला वाटते पळसाच्या झाडाला किम्शुक असे नाव आहे. याचा अर्थ किम शुक, म्हणजे राघुच कि काय, असा आहे.
पळसाची कोवळी पालवी, हिरव्या पोपटांप्रमाणे दिसते म्हणुन, बहिणाबाईच्या एका ओवीत, पण असा उल्लेख आहे.


Karadkar
Friday, February 23, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंशुक म्हणजे वस्त्र ना?

Pooh
Friday, February 23, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर,

बरोबर, अंशुक म्हणजे वस्त्र.

मीन प्रभू यांच्या "चिनी माती" पुस्तकामधे रेशमाच्या इतिहासाची माहिती दिली आहे. त्यात रेशमाला संस्कृत मधे "चीन" म्हणतात असे लिहिल्याचे अंधुकसे आठवते आहे.

नक्की खात्री नव्हती म्हणून ९५% लिहिले होते.


Pooh
Friday, February 23, 2007 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच घरी आल्यावर "चिनी माती" पुस्तक काढून बघितले.

चीनांशुक म्हनजे चीन हून आलेले वस्त्र म्हणजे रेशीम. असा अर्थ दिला आहे.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators