Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 18, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through September 18, 2006 « Previous Next »

Karadkar
Monday, September 11, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षय तृतियेचा मुहुर्त अर्धा मुहुर्त असतो. राहिलेला अर्धा दिवस श्राद्धाचा असतो. कुठल्या भागात ते माहीत नाही.

Moodi
Monday, September 11, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सापडले सापडले. हो अक्षय तृतियेला पण पितरांचे श्राद्ध करतात. विधी असा की दोन घट पाण्याने भरुन एकात तांदूळ व दुसर्‍यात तीळ ठेवुन त्यांना दोरा गुंडाळतात व ते धान्यावर ठेऊन त्यांना ब्रह्मा, विष्णु व शिवस्वरुप मानुन त्यांची पूजा करतात आण ते दान करतात. यामुळे पितर तृप्त होतात असे म्हणतात. साडेतीन मुहुर्तापैकी हा दिवस सामान्य शुभ कामाकरता चांगला मानतात. या दिवशी कृत युगाचा प्रारंभ झाल्याने याला युगादि म्हणतात. दाते पंचांगातुन साभार.

Karadkar
Tuesday, September 12, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्नाटकात गुढीपाडव्यालाच उगादी - युगादी म्हणतात ते का माहित नाही.

अक्षय्य तृतीयेला कर्नाटकात आमरस आणि पुरणपोळी असा नैवेद्य असतो आणि लोकाना तो तसाच आवडतो. आमरसात तुप, त्यात बुडवुन पुरणपोळी ती पण अगदी व्यवस्थित गोड असते. :-)
मी हा प्रकार अजुन खाउन पहिला नाहीये येवढ्यात बघेन असे वाटतही नाहीये :-)


Bee
Tuesday, September 12, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विदर्भात अक्षयतृतियेला केवढा तरी मान असतो. ह्या दिवशी जर तुम्ही बाजारात गेलात तर तुम्हाला बाजारपेठा खच्चून भरलेल्या आढळतील.

१) घागरी आणि कर्‍याची उतरंडी.
२) वाळ्याचा घमघमणारा वास.
३) पिकलेले गावरान आम्बे. हे आम्बे आकारले पिटुकले असतात पण चवीला आणि वासाला उत्तम!

अत्र्यांचे एक पुस्तक आहे 'कर्‍हेचे थंड पाणी' त्याचा काही घागरी कर्‍याचा संबंध आहे का माहिती नाही. पण घागरीवर एक छोटे मडके ठेवतात. त्याला वरतून एक छिद्र असते. पाणी पिताना त्या छिद्रातूनच धार खाली पडते.

अक्षय तृतियेला घागरी कर्‍याचा केवढा तरी मान आहे. जर नऊच्या आत तुम्ही बाजारात नाही पोचला तर तुम्हाला घागरी कर्‍हे विकत मिळणार नाही. मिळाले तर ते घरी आणेपर्यन्त किंवा त्यात पाणी भरल्यानंतर त्या घागरी फ़ुटतात. कुणी म्हणत की ज्याच्या हातची पुजा असते त्यानीच जावून घागर कर्‍हे घेऊन यावे. ह्यावेळी मी घ्यायला गेलो पण घरी आल्यानंतर घागर फ़ुटली. मग भाऊ गेला आणि नविन घागर घेऊन आला. मी आईला विचारलं काही अनर्थ होईल का माझ्या हातून घागर फ़ुटली तर? ती म्हणाली असे काहीच नाही. फ़क्त एकच लक्षात ठेवा की ज्याच्या हातचा घाट आहे त्यानीच दरवर्षी बाजारात जावून घागरी आणावी. आई नवरात्रीला आम्हाला आमच्या हातानी काहीच करु देत नाही. ती घटस्थापना स्वतच करते. कारण आजी गेल्यानंतर रितीरिवाजानुसार मोठ्या सुनेला तो मान मिळतो मग तो आपसूक आईकडे आला. ती असेपर्यन्त तिनेच सर्व केलं पाहिजे असे शास्त्र सांगते.

आता वर कुणीतरी श्राद्ध म्हणाल. आम्ही कधीच श्राद्ध हा शब्दप्रयोग करत नाही. पुर्वज घरी जेवायला येत आहेत आणि त्यासाठीच शुभमुहुर्त आला आहे असे गृहीत धरतो. ह्या शुभमुहुर्तावर ते तृप्त जेवन करुन आपल्याला आशिर्वाद देतात असा पण एक समज आहे.

आता ह्या दिवशीचा बेत. सकाळी उठून आम्ही घराला तोरण बांधतो. दारात रांगोळी काढतो. ह्या दिवशी रस आणि कुरडयाचा खूप मान असतो. पत्रावळीवर भाताची खळ करुन त्यात रस आणि वरतून कुरडईचा नैवेद्य दाखविला जातो. पुजा सुरु करताना पानाचा विडा गवरीच्या जळत्या खांडावर कुस्करल्या जातो. तोच नैवेद्या उचलून त्याचे छोटे छोटे घास करुन ते घराच्या वरती कावळ्यांना ते घास दिले जातात. जर कावळे आलेत तर नैवेद्य स्विकारला असे समजतात. म्हणजे आत्मे आलेत आणि जेवण करुन निघून गेलेल असा एक संकेत असतो. ह्यादिवशी आमच्या घरी वाटलेल्या डाळीचे वडे, आमरस, पन्हे, वाळ्याचे गार गार पाणी, तांदळाची खीर, कढी, भात, भजी, कुरडया, पापड असे खूप काही करत असे.. अर्थात अजूनही आई करतेच. पण मी तिथे नसतो. पण ह्यावेळी ताईच्या बाळंतपणासाठी गेलो आणि अक्षय तृतिया बघायला मिळाली.

भुसावळ जळगाव (खांदेश) जिल्यात येते. म्हणून तो भाग खांदेशात येतो. भुसावळ जंक्शन आलं म्हणजे अठी तठी.. वो भाऊ अशी सुरवात झाली असे समजावे :-)


Parop
Tuesday, September 12, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, व्वा! अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल आभार.


Hawa_hawai
Tuesday, September 12, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अत्र्यांच्या त्या पुस्तकाचे नाव कर्‍हेचे " थन्ड " पाणी नसून " कर्‍हेचे पाणी " इतकेच आहे. ते त्यांचे आत्मचरित्र आहे.
तु अजुन अत्र्यांचे पाणी जोखलेले दिसत नाहीस.


Bee
Tuesday, September 12, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) नाही मला त्यांचे ते आत्मचरित्र वाचायला मिळाले नाही अजून. छान ४ खंड आहेत ह्या पुस्तकाचे. "कर्‍हेचे" म्हणजे काय असेल बरे इथे?

Maudee
Tuesday, September 12, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद:-)

कराडकर,
आम्रस,पुरणपोळी with तुप ख़ाऊनच बघा... अप्रतीम लागते.


Giriraj
Tuesday, September 12, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिन्ट्स,खन्देशातही असाच बेत असतो... आणि इतके गोडेगोड जेवण जेवल्यावर हमखास तृप्तिची झोप येते.
(प्रश्नार्थींसाठी सूचना ः तृप्ती हे कुणा मुलीचे नाव नाही किंवा एखादा अवघड शब्दही नाही :-))

आणि खान्देशात अक्षय्य तृतियेला श्राद्ध घातले जाते. याबाबत अधिक महिति मिळवून सान्गेन. आमच्या घरी हे केले जाते.

मझ्या महितीप्रमाणे 'कर्हा' हे एका नदीचे नाव आहे. मि माझ्या शैशवात असतांना 'कर्हेचे पाणी' वाचले आहे.


Bee
Tuesday, September 12, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'य' ला 'य' लावायची गरज नाही. चुक आहे ती.

Parop
Tuesday, September 12, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मौदी, आमरस आणि पुरणपोळी बद्दल बरेच ऐकले होते. कधी खाऊन मात्र पाहिली नाही.

Kalandar77
Tuesday, September 12, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्‍हा नदी सासवड मधुन वाहते, अत्रे सासवडचे, म्हणून कर्‍हेचे पाणी! ही नदी आमच्या बारामतीमधुन देखील कधी कधी वाहते.

Kedarjoshi
Tuesday, September 12, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे अरे काय ही दशा. प्रल्हाद केशवांना देखील विसरता.

Kalandar77
Tuesday, September 12, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, थंड (पाणी) घे! ~D

Lopamudraa
Wednesday, September 13, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला धडा होता..मराठी पाठ्यपुस्तकात.. कितवीला ते नाही आठवत आता.. " कर्हेचे पाणी " मधला.. !!!

Bee
Wednesday, September 13, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कर्हेचे' ( karheche ) असे न लिहिता 'कर्‍हेचे' ( kaRheche ) असे लिहा.. रफ़ार नाही आहे इथे.. अर्धा 'र' आहे.

कलंदर धन्यवाद!


Parop
Thursday, September 14, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अत्र्यांचे 'मी कसा झालो' हे ही उत्तम आहे! त्यांची पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, सिनेनिर्माता म्हणून कारकीर्द माहित आहेच.
मिळालेल्या संधींचे अत्र्यांनी कसे सोने केले हे मुळातून वाचण्यासारखे आहे.



Bee
Monday, September 18, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्याहरीला प्रतिशब्द 'नाश्ता' आहे. लिहिताना देखील तो शब्द 'नाश्ता' असेच लिहितात असे माझे मत आहे. पण बरेच जण हा शब्द उच्चारताना आणि लिहिताना आपापली पद्धत वापरतात. मी खूपदा हा शब्द नास्ता, नाष्टा, नाश्टा, नाश्ता अशा वेगवेगळ्या प्रकारे ऐकला-वाचला आहे. आज तर एका कथेमध्ये तो नाशस्ता असाही वाचला तेंव्हा म्हंटल बरोबर काय ते इथे एकदाच विचारून बघावं.

Lopamudraa
Monday, September 18, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानता हू तू कंगूरा है
भूल मत बुनियाद है हम लोग!!!

यातला कंगूरा चा अर्थ कुणी सांगेल का?..


Chioo
Monday, September 18, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कंगूरा म्हणजे कंगोरा म्हणजेच शिखर किंवा टोक.

याचा अर्थ, जरी तू शिखर असलास तरी हे विसरू नको की, आम्ही पाया(बुनियाद) आहोत. आमच्या आधारानेच तू उभा आहेस.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators