Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 05, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through September 05, 2006 « Previous Next »

Manishalimaye
Monday, August 28, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी किती वेळा असा अर्थ नव्हे,
तीन ठाव जेवले म्हणजे तीन ताटे भरुन [हल्लीच्या ताटल्या नाही जुनी मोठी ताटे] त्याच थोडक्यात अर्थ भरपुर जेवले
चारी ठाव जेवले म्हणजे चारी वेळा भरपुर जेवले


Gajanandesai
Monday, August 28, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ठाव' हा शब्द 'कितीदा' या अर्थाने वापरला गेलेला मला तरी आठवत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे,

मला काय ठाव नाही? या वाक्यातून जर 'मला काय माहीत नाही?' हा अर्थ अपेक्षीत असेल तर तो शब्द 'ठाव' नसून 'ठावं' असायला हवा.

ठावं = ठावे = ठाऊक.

हा शब्द 'चार ठाव जेवणे' यातल्या 'ठाव' पेक्षा (उच्चारायलादेखील) वेगळा आहे असं मला वाटतं.
मला काय ठाव नाही? चा अर्थ 'मला काही ठावठिकाणा नाही?' असा होईल.

Bee
Monday, August 28, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा ते वाक्य असे आहे.

मी दिवसातून चार ठाव जेवते.

असे वाक्य आहे म्हणून वाटते ते चार वेळा जेवते असे तिला म्हणायचे आहे, चार ताट इथे बहुतेक अपेक्षित नसावे.


Manishalimaye
Monday, August 28, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन बरोबर आहे तुमच तिथे ठावे चे ठावं झालं आहे.
खरतर उच्चार ठावं असला अर्थही बरोबर असला तरी कित्येकदा "मल ठाव न्हाय बा" इथे तो उच्चार ठाव असाच केला जातो आणि बोली म्हणुन भाषाशास्त्र हे मान्य करते
बी तिथे चार वेळा भरपुर असाच अर्थ आहे. चार वेळ नाही
अन्यथा चारी ठाव कमी जेवलो असेही म्हणणे वावगे ठारु नये पण तसे म्हटले जात नाही करण चारी ठाव हे भरपुरच असते [म्हणजेच अर्थत ठाव भरुन]


Lopamudraa
Thursday, August 31, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारी ठाव म्हणजे सकाळ.. दुपार.. सन्ध्याकाळ, रात्र.
अस गावाकडे नेहमी म्हणतात, अस असाव बहुदा..!!!


Maitreyee
Thursday, August 31, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार ठाव चा अर्थ ४ servings असा काहीसा आहे. म्हणजे भरपूर जेवण असाच. दिवसातून ४ वेळा असे नाहीये माझ्या मते..

Bee
Friday, September 01, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ दे आता मी तो पुर्ण परिच्छेदच इथे उतरवून काढतो म्हणजे इथे 'ठाव' काय आहे हे कुणाच्या तरी ध्यानात येईल.
-----------------------------
खरं म्हणजे सगळे रोमॅंटिक, इंग्रजी काय किंवा मराठी, मला फ़ार आवडायचे. पण ते काय सांगतात ते पुरेसं नाही, असं कुठेतरी वाटून जायचं. आणि हे वाटणं पुष्कळदा त्यांच्या प्रेमाची कल्पनेची टर उडवण्यात व्यक्त केलं जायचं. मग पुढे पुढे प्रेमामुळे मरणारे, आजारी पडणारे, वॅन, पेललि लॉयटरिंग सरदार हा सगळाच फ़ार्स आहे अशी माझी खात्री पटली. कारण, मी नाही का सतत प्रेमात पडत असूनही चांगली चार ठाव जेवत असे, दहा तास झोपत होते. आणि कित्येक प्रयत्न करून माझं वजन एक शेरदेखील कमी होत नव्हतं, मग झुरायची वगैरे गोष्टच सोडा.
-----------------------------------
आता वरील परिच्छेदावरून असे कळते की लेखिका म्हणते आहे ती दिवसातून चांगली चार वेळ four times in a day जेवत होती, दहा तास झोपा काढत होती.. अमुक अमुक..

म्हणून मला वाटते ठाव शब्दाचा इथला अर्थ हे 'चार ताट जेवण' नसून 'दिवसातून किती वेळा तर चार वेळा जेवण' असा आहे.


Gajanandesai
Friday, September 01, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो 'दिवसातून' हा शब्द मध्ये न घुसडता वाचून बघा.


Bee
Friday, September 01, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो शब्द तिथे अध्याहृत आहे. बरे काहीही असो.. काढून जरी टाकला तरी मला अर्थ तोच वाटतो..

Bee
Friday, September 01, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तो लेख वाचताना मला कुठेच अतिशयोक्ती आढळली नाही. म्हणून एखादी व्यक्ती- निदान बाईची जात तरी एकाच वेळी- चार ताटे जेवण जेवत असेल असे वाटत नाही.

Limbutimbu
Friday, September 01, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अस वाटत की......
पुर्ण भरल्या ताटातल्या जेवणाला / अन्नाला "चारी ठाव" म्हणतात
जसे की
ताटात वर खाली डावी उजवी कडे काय नि कसे वाढायचे याचे नियम हेत, त्या नियमाप्रमाणे (किमान चार बाजुन्ना) वाढलेले पुर्ण ताटभर जेवण म्हन्जे "चारी ठाव जेवण"
चार ठाव जेवण म्हन्जे चार ताटेही नाहीत की चार वेळाही नाही की चार ठिकाणीही नाही!
मात्र कुठे कुठे, "अरे बैलोबा, तुला चार ठाव गिळायला पाहीजे अन काम नको करायला" अशा प्रकारच्या वाक्यरचनेमुळे चार ठाव म्हन्जे चार वेळा असा गैरसमज होतो!


Bee
Friday, September 01, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मात्र हद्द झाली :-)

Limbutimbu
Friday, September 01, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोक्या पद्धतीने सान्गायचे तर पहिला वरण भात तुप, नन्तर दुसरा मसालेभात तुप, नन्तर तिसरे, केलेले पक्वान्न किन्वा रितसर पोळी भाकरी वगैरे अन शेवटी चौथे ताक भात किन्वा दही भात, जोडीला तोन्डीलावणी म्हणुन भाज्या, चटण्या, कोशिम्बिरी, कुर्डया पापड्या, लोणची वगैरे सिझनल माल मसाला घालुन वाढलेले आणि गिळ्ळेले जेवण ते चारी ठाव जेवण! "फोर कोर्सेस" असे म्हणु शकता!
ताटात चार दिशेला पदार्थ असणे किन्वा वरील प्रमाणे चार पदार्थ एकामागोमाग खायला उपलब्ध असणे ते हे चारी ठाव जेवण!


Limbutimbu
Friday, September 01, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> आता मात्र हद्द झाली :-)
नाही, आताऽऽ झाली असेल! DDD

Maitreyee
Friday, September 01, 2006 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी हद्द कसली यात? लिम्बूचे बरोबर आहे. तू लिहिलयस ते लिखाण पण त्याच अर्थाने लिहिलय पण तू ४ वेळा असा अर्थ मनात घेऊन बसलायस म्हणून तुला ते अध्यारुत वगैरे नसलेल्या ऍडिशन्स कराव्या असे वाटतय!

Storvi
Friday, September 01, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण मी म्हणते काय फ़रक पडतो? भरपुर जेवण एवढे कळले ना? चार वेळ की चार ठिकाणी की चार दातांनी ह्याने काय फ़रक पडणार आहे कथेला?... किती तो कीस काढायचा.. :-)

Bee
Monday, September 04, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर बर पुरे आता... शिल्पाचा अर्थ चार दातांनी हे एक नविन कळलयं ;-)

Parop
Monday, September 04, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ठावं जरा बाजूला ठेवुयात का?

'गणपती बाप्पा मोरया'तल्या मोरयाचा अर्थ काय?


Pinaz
Tuesday, September 05, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोरयाचा अर्थ काय?


यात मोरांना का बोलवतात -- मोर या -- कुणी सांगु शकेल का? --- ब्युवाच!!


Bee
Tuesday, September 05, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपतीची स्थापना करताना प्राणप्रतिष्ठा हा शब्द वापरतात. त्यामागचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयास चालला आहे. प्रतिष्ठापना असाही एक शब्द वापरतात ना..


प्राण + प्रतिष्ठा अशी फ़ोड करुन बघितली तरी देखील अर्थ उलगडत नाही. तो स्थापना ह्या शब्दाशी अन्वय साधत नाही.

तसेच

प्रति + ष्ठापना अशी फ़ोड केली तर दुसरा शब्दही उलगडत नाही. मला ष्ठापनाचा अर्थ माहिती नाही पण बहुतेक तो स्थापना ह्या शब्दा वरुन आला असेल असे वाटते.

मोरया बद्दल काही माहिती नाही.. पण ते नक्कीच मोराशी काही निगडीत नसावा.

चुभुदेघे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators