Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 17, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through July 17, 2006 « Previous Next »

Robeenhood
Thursday, July 13, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गाणे कांचा रे कांचा असे आहे.कांचा हे नेपाळी शब्द असून त्याचा अर्थ beloved असा होतो. इथे त्याचा सम्बन्ध नाही. ते तुला तसे ऐकू यायचे शिंच्याच्या ऐवजी...

माझ्या शिव्याशास्त्रातील गतीचा अनुभव पहाण्यासाठी खासगीत भेटावे व लाभ घ्यावा...
नेहमीच्या गिर्‍हायकाला फशिवणार नाय..


Giriraj
Thursday, July 13, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बी,तू अशक्य आहेस.. अजून येऊ देत..
:-)
रॉबिन,मला शिकवा तुमचे हे शास्त्र.. मला उपयोग करण्यायोग्य एक व्यक्ति दिसतेय.. तुमचि शिकवण वाया जाऊ देणार नाही


Limbutimbu
Thursday, July 13, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीच्या "कन्चा" वरुन मला कंडा हा शब्द आठवला, त्याचा अर्थ काय नी वाक्यात कसा उपयोग करावा?
रॉबिन..... शिव्याशास्त्र


Limbutimbu
Thursday, July 13, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> रॉबिन,मला शिकवा तुमचे हे शास्त्र.. मला उपयोग करण्यायोग्य एक व्यक्ति दिसतेय.. तुमचि शिकवण वाया जाऊ देणार नाही
गिर्‍या, ती वेळ लग्ना नन्तर येतेच येते! आधीच त्या योग्य व्यक्तीला शिव्या देवु नकोस! आणि त्याकरता रॉबिन गुरुजीन्कडुन मनातल्या मनात द्यायच्या शिव्याही शिकुन घे, नाहीतर डोक्यावर टेन्गळ घेवुन फिरायची वेळ येइल! DDD

Lopamudraa
Thursday, July 13, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या शिव्याशास्त्रातील गतीचा अनुभव पहाण्यासाठी खासगीत भेटावे व लाभ घ्यावा...
नेहमीच्या गिर्‍हायकाला फशिवणार नाय.>>>. farach great roobinhood .

बी,तू अशक्य आहेस.. अजून येऊ देत..>>> kharach re baabaa... are kanchaa re kanchaa chaa kuthalaa arth kuthe jodaalaas..



Moodi
Thursday, July 13, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी पोट धरुन हसवलेस तू आज.
मी मागे टीव्ही वर वाट चुकलेले नवरे हा राजा गोसावी अन शरद तळवलकरचा सिनेमा बघितला होता. सगळे गावातील वातावरण, ती हिरॉईन सारखी विचारते कंच? कंच म्हणजे कोणते. किंवा वेगळा अर्थ असेलही. पण ती वारंवार म्हणते कंच वो भावजी?


Bee
Thursday, July 13, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, तुमची शब्दसंपदा छान आहे. आता फ़क्त त्या साचाचा अर्थ सांगा.. कांचा रे कांचा रे प्यार मेरा साचा.. म्हणजे माझे प्रेम खरे आहे असेच ना.. इथे मराठी साचा नाही म्हणत मी :-)

Giriraj
Thursday, July 13, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा बी.. मागणी पाहून तू अजून येऊ दिले तर!:-)

ते 'साचा' असे नसून 'सांचा' असे आहे..आणि अर्थ तू सांगितलासच आहेस...


ती वेळ लग्ना नन्तर येतेच येते! आधीच त्या योग्य व्यक्तीला शिव्या देवु नकोस! आणि त्याकरता रॉबिन गुरुजीन्कडुन मनातल्या मनात द्यायच्या शिव्याही शिकुन घे, नाहीतर डोक्यावर टेन्गळ घेवुन फिरायची वेळ येइल!> >>> रॉबिन आता दोन व्यक्ति दिसताहेत मला.. दुसरा तो लिम्ब्या आपला तो 'ब्या'!


Lopamudraa
Thursday, July 13, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचि शिकवण वाया जाऊ देणार नाही >>>. giri lage raho..
are don naahii pahilichii sar koaanaalaa nahi yenaar itak sar kathin disatay.. tu uttar deun thakashil.

Limbutimbu
Thursday, July 13, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> रॉबिन आता दोन व्यक्ति दिसताहेत मला.. दुसरा तो लिम्ब्या आपला तो 'ब्या'!
आपला तो 'ब्या' काय? त्या 'ब्या'च्या अलिकडचा "रॉ" दिसतो हे मला! DDD

Zakki
Thursday, July 13, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूटिंबू, तू खरच 'कंडा' या शब्दाचा अर्थ विचारतो आहेस? अरे तू पुण्याचा ना? नि तुला त्या शब्दाचा अर्थ माहीत नाही?

क्काय म्हणावे या पुण्याच्या लोकांना! छ्या:!!
आमच्या वेळी पाळण्यातल्या पोराला सुद्धा ठाउक होते कंडा म्हणजे काय! आता निसर्गाचे नियम पण बदलून टाकले काय, भ्रष्टाचार करून, नि आरक्षण करून?

हटकेश्वर, हटकेश्वर!


Robeenhood
Thursday, July 13, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढे भारी शिष्योत्तम मिळाल्यावर बहुधा गुरुची विद्या गुरूलाच फळणार असे दिसते.
शिष्यादपि पराजयेत का काय म्हणतात तसे.
पु.लंच्या जातिवन्त पानवाल्याचे गिर्‍हाईक जसे पानाची पहिली पिचकारी जशी पानवाल्याच्याच अंगणात मारते तसे कोर्स पूर्ण होताच पहिली शिवी गुरुलाच देऊन applied Shivyalogy चा वापर सुरू होणार.
मला मग द्रोणाचार्यासारखे त्याची जीभ गुरुदक्षिणा म्हणून मागावी लागेल....


Robeenhood
Thursday, July 13, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांॅचा म्हणजे पवित्र. सांॅचा नाम तेरा असे कुठल्या तरी भक्तीगीतात आहे ना...

बोवाजी कुठली अश्मयुगीन Terminology वापरता हो तुम्ही? कंडा शब्द हा 186 generation चा आहे. हल्ली सुंदर मुलीना 'माल','चीज','आयटम'असे शब्द वापरतात.(ऐका, तू चीज बडी है मस्त मस्त...)अगदीच 'बाळू'आहात बुवा तुम्ही!!!


Giriraj
Friday, July 14, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'विदग्ध' या शब्दाचा अर्थ काय आहे?

Limbutimbu
Friday, July 14, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> मला मग द्रोणाचार्यासारखे त्याची जीभ गुरुदक्षिणा म्हणून मागावी लागेल....
गिर्‍या, हे तुझ्यासाठी होत अस कळल्यावर तुझी जी अवस्था झाली असेल किन्वा होऊशकेल त्यास विदग्ध म्हणतात! DDD
विदग्ध म्हणजे प्रत्यक्षात आगिने नाही पण तरीही सम्पुर्ण जळलेला, सन्तापाने पेटुन उठलेला या अर्थाने देखिल वापरतात
चुक भुल देणे घेणे


Shonoo
Friday, July 14, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विदग्ध शब्द पश्चात्ताप दग्ध अशा अर्थाने, किंवा विरहाग्नीने पोळलेला(ली) अशा अर्थाने जास्त वापरला जातो.


Chandya
Friday, July 14, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vidagdha (p. 758) [ vidagdha ] p (S) Burned to ashes, burned thoroughly. 2 Half-digested, ill-concocted--food. 3 Half-scorched and half-raw--dressed food. 4 Well roast- ed, toasted, or broiled. Ex. suska supaka vidagdha caturvidhanne uttama khadya . 5 Clever, capable, skilful.

http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=vidagdha&display=simple&table=molesworth

Bee
Tuesday, July 18, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बावते ह्या शब्दाचा अर्थ कुणी सांगेल का?

माझ्या मते बावने म्हणजे उमलने

इथे कुठला न वापरायचा तेही सांगा..

मन रमविण्याचा मध्ये न की ण..


Maitreyee
Tuesday, July 18, 2006 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बावते? कुठे अहे हा शब्द? काहीतरी संदर्भ दे.



Bee
Tuesday, July 18, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका कवितेच्या ओळीत वाचले मैत्रेयी..

धगीने फ़ुल बावते

अशी काहीशी ती ओळ आहे.

अजून एक शब्द.. बग म्हणजे ढग का.. हा शब्द पण मी एका कवितेतच वाचला आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators