Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through April 25, 2006 « Previous Next »

Maitreyee
Friday, April 21, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाक्याचा अर्थ बदलणार नसेल तर संकोच का शब्द चालावा..

Gajanandesai
Friday, April 21, 2006 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदर्भानुसार भीड या शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात.
भीड चेपणे=भीति कमी होणे / जाणे.
भीड घालणे=दबाव आणणे.
[भीड=भीति,दबाव]

भीड खर्चणे=वजन (influence) वापरणे.
भीडभाड=आदर.
मी त्याची अजिबात भीडभाड ठेवत नाही=मी त्याला अजिबात किम्मत देत नाही / मी त्याला अजिबात दबत नाही.
[भीड=आदर]


CBDG.


Ameyadeshpande
Friday, April 21, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिडस्त भीड पासूनच निघालाय वाटतं.

Chafa
Friday, April 21, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि भीड "भ्याड" पासून निघाला असावा. :-O

Robeenhood
Sunday, April 23, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भीड भिकेची बहीण अशी एक मराठीत म्हणही आहे म्हणजे लाजाळूपणाने अगर संकोची स्वभावाने व्यवसाय केल्यास भिकेला लागण्यास वेळ नाही

त्यामुळे पुणेकर कोणाचीही भीड भाड ठेवीत नाहीत..........


Robeenhood
Sunday, April 23, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
प्रकट हा शब्द बरोबर आहे..

प्रगट हा रूढ अपभ्रंश आहे.


Robeenhood
Sunday, April 23, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिडणे नावाचे एक क्रियापद आहे.त्यावरून भिडे आडनावाच्या लोकांवर आम्ही चावट असताना विनोद करीत असू. त्यातून हिन्दीत भिडन्त हा एक फारच अर्थवाही शब्द आहे अर्थ त्याचा encounter पण हिन्दीत तसे भिडना असे क्रियापद सर्वसाधारणपणे दिसत नाही

Atulpj
Sunday, April 23, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

[भीड=आदर] निर्भिड म्हणजे निरादर का?

Robeenhood
Sunday, April 23, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भीड म्हणजे आदर नाहीच आहे मुळी..... दडपणयुक्त संकोच म्हणा त्याला........

Ameyadeshpande
Sunday, April 23, 2006 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> भिडे आडनावाच्या लोकांवर आम्ही चावट असताना विनोद करीत असू.

चावट असताना म्हणजे नक्की कधी आणि चावटपणा असा जाऊ शकतो का

Savyasachi
Monday, April 24, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'खाजगी' बरोबर आहे की 'खासगी' ?

Robeenhood
Monday, April 24, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खासगी बरोबर आहे. खास आणि आम असे दोन विरोधी शब्द आहेत.खास पणा जिथे राखला जातो ती खासगी. आम म्हणजे सर्वासाठी. दीवान ए आम आणि दीवान ए खास या जागा प्रसिद्धच आहेत. तसेच राजांचा अथवा पेशव्यांचा खासगी नावाचा विभाग असे म्हणजे त्यांचा कौटुम्बीक विभाग. त्याची व्यवस्था बघण्यास जे कारभारी असत त्याना खासगीवाले म्हणत. अजुनही हे आडनाव दिसून येते.

Robeenhood
Monday, April 24, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चावट म्हणजे चावणारा.तशा अर्थाने कुत्रा, डास हेही चावट असतात. ढेकूण देखील.दात पडल्यानन्तर बहुधा चावटपनाजात असावा. काही पुरुष तर 'चावट्ट मेले' ही असतात. पुण्याच्या जवळच्या एका गावात चावट पाटील नावाचे एक मराठा समाजाचे आडनावही आहे.

Ameyadeshpande
Tuesday, April 25, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते शोधीतील सीता... संदेह ह्यात नाही...
निष्ठा प्लवंगमांची तु लोचनेस पाही...
होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला...
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला...

होता फ़िरून माझे...ते सैन्य वानरांचे...
होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे...
ते लंघतील सिंधू खणतील शैलमाला...
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला...

ह्यात पहिल्या कडव्या मधे प्लवंगम आणि दुसर्‍यात शैलमाला म्हणजे काय robinhood ?


Jo_s
Tuesday, April 25, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काटा रुते कुणाला" या गाण्याचा संदर्भ, मथितार्थ कोणी सांगेल का?

Nitu_teen
Tuesday, April 25, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलमाला म्हणजे पर्वतरांगा, प्लवंगमाचा मराठीत शब्दार्थ बेडकाच्या
ओरडण्याचा ताल असा दिला गेला आहे.


Sanghamitra
Tuesday, April 25, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


विप्लव म्हणजे माकड.
प्लवंगम म्हणजे पण माकडच असावे असे वाटतेय.
आणि या गाण्याच्या संदर्भानुसार ते माकडांच्या निष्ठेबद्दलच म्हटले असणार.
CBDG


Robeenhood
Tuesday, April 25, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, संघमित्र

प्लवंग म्हनजे बेडूकच.

वाल्मिकीच्या रामायणात पुढील श्लोक आहे
सत्पद तंत्री, मधुर अभिधानम
प्लवंगम उदीरित कंठ तालम
आविष्कृतम मेघ मृदंग नादै
वनेषु संगीतम इव प्रवृत्तिम

म्हणजे मधमाशांच्या मधुर गुंजारवाची तन्तुवाद्ये,बेडकांच्या डराव डरावचे कंठसंगीत,मेघांच्या गडगडाचे ढोल यांचे जंगलात सुनियोजित संगीत सुरू झाले आहे........

यावरून प्लवंग म्हणजे बेडूक हे स्पष्ट व्हावे.

विप्लव म्हणजे माकड नाही. विप्लव म्हणजे खरे तर झंझावात. सर्व उखडून टाकणारा

निष्ठेचाच प्रश्न असेल तर बेडूक पावसाळा आल्यावर ज्या religiously त्यांचे गायन करतो त्याच्याशी जोडता येईल.
(अर्थात हा त्याचा ब्रीडींग सीझन असल्याने बेडकिणीला साद घालण्यासाठी तो ध्वनी करतो असे शास्त्र म्हणते म्हणजे हा त्याच्या निष्ठेपेक्षा त्याच्या वासूगिरीचाच जास्त भाग दिसतो...)


Lopamudraa
Tuesday, April 25, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaa, vaa Chaan vishleshan keley, tumhi evhadhe kuthe vaachataa, i mean konatyaa pustakaat ?

Robeenhood
Tuesday, April 25, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे कुठे सापडत राहते.कधी आठवते, कधी नाही..

लोपे आहेस कुठे?
तुला तीन मेल्स पाठवल्यात..

मिळाल्या की नाही?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators