Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
psaayadana

Hitguj » Religion » साहित्य » psaayadana « Previous Next »

Shailesh2000 (Shailesh2000)
Wednesday, December 13, 2000 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aata ivaSvaa%mako dovao yaoNao vaagya&o taoYaavao
taoYaaonaI maja dyaavao psaayadana ho

jao KLaMcaI vyaMkTI saaMDao tyaa sa%kmaI- rtI vaaZao
BautaM prspro pDao maO~ jaIvaacao

duirtaMcao itmaIr jaavaao ivaSva svaQama- sauyao- pahao
jaao jao vaaMCIla tao to laahao pa`iNajaat

vaYa-t sakLmaMgaLI AISvarinaYzaMcaI maaMdIyaaLI
Anavart BaUmaMDLI BaoTtUBaUtaM

calaa klpt$Mcao Aarva caotnaa icaMtamaNaIMcao gaava
baaolato jao ANa-va pIyaUYaacao

caMd`mao jao AlaaMCna maat-MD jao tpaohIna
to sava-hI sada sajjana saaoyaro haotU

ikMbahunaa sava-sauKI pUNa- haoAunaI ithI laaokI
Baijatao AadI pu$KI AKMDIt

AaiNa ga`MqaaopjaIivayao ivaSaoYaI laaokI iAyao
dRYTadRYT ivajayao haoAavao jaI

yaoqa mhNao EaI ivaSvaoSvaravaao ha haoAIla dana psaavaao
yaoNao varo &anadovaao sauiKyaa Jaalaa


Sanuli (Sanuli)
Friday, December 15, 2000 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shailesh ... a real good work ..
1. Pahilyach oLi t psaayadana chya aivaji pasaayadana zale ahey

2. Martand je tpÜhIna nahi taphIna ahey mazya mate. Pls. confirm.

3. Bhajito aadi madhye BaijatÜ ahey ka BaijajaÜ ahey te pan confirm kar.

chuk bhul dene ghene :-)

Shailesh2000 (Shailesh2000)
Friday, December 15, 2000 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You are right sanuli,

Please check this
Pasaydan

Sagar29in (Sagar29in)
Wednesday, January 24, 2001 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

he ghe lihile

ata vishwatmake deve,yene wagyadhne toshave
toshoni maja dyave,pasayadan he = 1

je khalanchi vyankati sando,taya satkarmi rati vadho
bhoota paraspare jado,maitra jivanche = 2

duritanche timir javo,vishwaswadharma surye paho
jo je vancchil to te laho,prani jaat = 3

varshat sakal mangali,ishwarnishthanchi mandiyali
anawarat bhumandali,bhet tu bhuta = 4

chala kalpatarunche arav,chetana chintamaninche gaav
bolate je arnav piyushache = 5

chandrameje alancchan,martanda je taapheen
te sarva hi sada sajjan,soyare hot = 6

kimbahuna sarva sukhi,purn hovoni tinhi loki
bhaji jo aadi purushi,akhandit =7

aaNi gra.nthopajeevee ye visheShee lokee iye
drushta drushta vijaye,ho aa ve jee =8

yeth mhane shree vishweshwarao,ha hoeel daan pasavo
yene vare dnyan devo,sukhiya zala =9

Wakdya
Wednesday, June 05, 2002 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bhaji jo aadi puruSHI nahi, puruKHI asa barobare...

Shilp
Friday, May 26, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yacha artha koni sangu sankel ka?

Divya
Friday, May 26, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा निवृत्तीनाथांनी त्यांना काहितरी मागण इच्छा असेल तर मागायला सांगीतले तेव्हा ज्ञानेश्वरांनी हे पसायदान पुर्ण व्हावे हे मागणे निवृत्तीनाथांकडे मागीतले आणि निवृत्तीनाथांनी त्याला या पसायदानाला तथास्तु म्हटले.

आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञे तोषावे|
तोषोनी मज द्यावे पसायदान हे||१||

विश्वात्मके देवे हे निवृत्तीनाथांना उद्देशुन म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगीतली तो एक वाग्यज्ञच होता त्यावर तोषुन प्रसन्न होउन हे पसायदान हे मागण तुम्ही मला आता द्याव अशी विनंतीवजा मागण ते त्यांच्या गुरुकडे मागतात.

जे खळांची व्यंकटी सांडो| तया सत्कर्मी रती वाढो|
भूता परस्परे पडो| मैत्र जीवांचे||२||

या जगातील खळांची म्हणजे खलप्रवृत्ती असणार्या लोकांची व्यंकटी वाईटवृत्ती खलत्व जावो, दुष्टांचा दुष्टपणा जावो म्हणजे तमोगुणच नाहीशे होवोत, त्यांच्यात सत्कर्माची गोडी वाढो, सर्व माणसे स्त्वगुणी होवोत. भुता परस्परे म्हणजे सर्व भुतमात्र सर्व जीवांना एकमेकांविषयी प्रेम निर्माण होवो ते एकमेकांच्या जीवाचे मैत्र होवोत.

दुरितांचे तिमीर जावो| विश्वस्वधर्म सूर्ये पाहो|
जो जे वांच्छिल तो ते लाहो| प्राणिजात||३||

दुरितांचे तिमीर जावो म्हणजे जे अज्ञानामुळे अंधारात आहेत त्या लोकांना ज्ञान होउन त्यांचा अज्ञानाचा अंधार नाहीसा होवो. त्यांना स्वधर्माचे ज्ञान होवो असा स्वधर्माचे ज्ञान देणार्या सुर्याचे त्यांना दर्शन होवो. आणि असे ज्ञान झालेल्या सर्व प्राणिजातीचे मनोरथ जे जे ते मागेल ते पुर्ण होवो.

वर्षतसकळ मंगळी| ईष्वरनिष्ठांची मांदियाळी|
अनवरत भुमंडळी|भेटतु या भुता||४||

सर्व मांगल्यांचा वर्षाव करणारा, इश्वराशी निष्ठ असणार्यांची मांदियाळी म्हणजे समुहच्या समुह या भुमंडळावर सर्व जीवांना भेटो.

चला कल्पतरुंचे आरव| चेतना चिंता मणींचे गाव|
बोलते जे अर्णव पीयुषाचे||५||
चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन|
ते सर्वाही सदासज्जन सोयरे होतु||६||

जे कल्पतरुंचे बन असल्याप्रमाणे आहेत, कल्पतरु जस सर्व इच्छित देतो त्या प्रमाणे आहेत. जे मनाच्या मागण्या पुर्णकरणारे चिंतामणीचे गाव असल्यासारखे आहेत असे सज्जन संत आहेत जांचे बोलणे म्हणजे पीयुषाप्रमाणे अमृतासमान आहे. हे सज्जन म्हणजे डाग नसलेले चंद्रमाच आहेत. ताप न देणारे सुर्य आहेत असे जे संत सज्जन आहेत ते सर्वांना सोयरे अगदी जवळचे होवोत.

किंबहुना सर्वसुखी| पुर्ण होउनी तिही लोकी|
भजिजो आदीपुरुखी| अखंडित||७||

सर्वानी पुर्ण सुखी होउन, तिन्ही लोकात परिपुर्ण होउन आदिपुरुषाला अखंड भजावे.

आणि ग्रंथोपजीविये| विषेशी लोकी इये|
दृष्टादृष्टविजये होआवे जी||८||

या ग्रंथा प्रमाणे म्हणजे ज्ञानेश्वरीप्रमाणे जीवन जगणार्याना या लोकात दृष्ट अदृष्ट म्हणजे ऍहिक आणि पारमार्थिक भरभराट होवो.

तेथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो| हा होइल दानपसावो|
येणेवरे ज्ञानदेवो| सुखिया जाला||९||

यावर श्रीविश्वेश्वरावो म्हणजे निवृत्तीनाथ हे पसायदान पुर्ण होइल असा वर ज्ञानेश्वरांना देतात आणि त्याने ज्ञानेश्वर संतोष झाले सुखी झाले.

श्रीकृष्णार्पणमस्तु||







Ameyadeshpande
Friday, May 26, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या... wonderful!!! परत कधीही पसायदान म्हणताना तू लिहिलेल्या ह्या अर्थाची कायम आठवण होईल... नुसताच अर्थ नाही तर त्यातला रस पण उतरला आहे ह्यात... आणि त्या खाली कृष्णार्पणमस्तु :-)

मी तर प्रींटही मारून घेतली


Divya
Friday, May 26, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय उगी हरभरयाच्या झाडावर नको चढवु.... शब्दशा अर्थ लिहीला रे रसबिस नाही ओतला बर...

Ameyadeshpande
Friday, May 26, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहिलं... बाकीचे ही काय म्हणतात बघ मग :-)

Moodi
Friday, May 26, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या एवढे रसाळ अन भावपूर्ण वर्णन केलेस मग तुझे कौतुक नाही वाटणार तर काय?
अमेय म्हणतोय ते खरे आहे, मी पण सेव्ह केलेय.

अमृतातही पैजा जिंके अशी आपली मराठी अन त्यात आपल्या संतांची अशी कामगिरी की प्राध्यापक यु. म. पठाणांसारख्या व्यक्तीला संत साहित्यात डॉक्टरेट मिळाली ती अशाच साहित्याच्या आवडीनेच.



Divya
Friday, May 26, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी माझे कौतुक करण्यासारखे मी काही केले नाही.
सध्याच्या जगात मात्र पसायदान हे शाश्वत शान्तीमन्त्रा सारखाच वाटतो बघ. सगळीकडे चालु असलेली अराजकता, अशान्तता आणि अस्थिरता माणसाला अजुनच दुखाच्या खाइत लोटणारी आणि भ्रमिष्ट करणारी आहे. मानसिक समाधान, शान्ती, सबुरी श्रद्धा या सगळ्या पासुन माणुस दुर चालला आहे, स्वताजवळ जे आहे त्याचा आनंद घ्यायचे सोडुन धावत्याच्या पाठी लागण्यासारखे सगळीकडे चालु आहे. त्या पार्श्वभुमीवर ज्ञानेश्वरांचे पसायदान पुर्ण झाले तर खरोखर जगात शान्तता नांदेल. कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा असण्यापेक्षा माणुस असण्याला जास्त महत्व जेव्हा येइल तेव्हा समोरच्याला समजुन घेणे सोपे जाइल.


Bapucha
Friday, August 03, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर, अप्रतिम.
तीन चार दिवसा पुर्वी सहज पसाय दान गात होतो.घरात कुणी नाहि हे पाहुन.
या अर्थाने ते गाणे सुसह्य झाले.


Itgirl
Friday, August 03, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या, अतिशय सरळ, साध्या पण अचूक आणि परिणाम कारक शब्दांत उलगडले आहेस. खूप आवडल.

Vishalkhapre
Saturday, August 04, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,
ज्ञानेश्वरांनी हे पसायदान मागितले खरे, पण ते ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर आशिर्वाद म्हणुन. निवृत्तीबाप्पानी त्यावर तथास्तु न म्हणता एक प्रश्न विचारला, "अरे ज्ञाना, ही ज्ञानेश्वरी म्हणजे अनुवाद आहे गीतेचा. तु काय केलेस कि ज्यामुळे जगाचे कल्याण होणार आहे." यावर ज्ञानेश्वर महाराजानी अमृतानभव लिहिला, जी ज्ञानरायाची निर्मिती आहे.
यानंतर समाधीपुर्वी ज्यावेळी आशिर्वाद मागितला, त्यात फक्त पसायदान खरे व्हावे असा आशय होता.

विदिखा.

Sandeepguru
Monday, October 29, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला 'पसायदान' या शब्दाचा अर्थ सागा.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators