Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 05, 2007

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through December 05, 2007 « Previous Next »

Sheshhnag
Wednesday, October 17, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त अनुभव!
शब्द सुचत नाहीत. मला पण समर्थांची सेवा करायची बुद्धी होवो ही समर्थचरणी प्रार्थना!


Mrdmahesh
Wednesday, October 17, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय जबरदस्त अनुभव!!! अंगावर काटाच आला, रोमांचित झालो... धन्य ती रफिक शेख ची पत्नी... अशी सेवा हवी... धनंजय अजून येऊ दे रे.. उत्साह येतो असं वाचल्यावर...
आणि बांधून ठेवणार्‍या शक्तीबद्दल म्हणलं तर असू शकेल अशी शक्ती.. काही सांगता येत नाही..
सुदर्शन, तुम्हाला सेवेची संधी श्री स्वामी नक्कीच देतील.. :-) फक्त त्यांचे स्मरण करू लागा. :-) आणि पहा काय चमत्कार होतो ते!! यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!! :-)


Ashwini_k
Thursday, October 18, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ.

पिल्लू, मला वाटते, जसे शुध्द विद्येचे म्हणजेच शुध्द दैवतांचे म्हणजेच प्रकाशाचे उपासक असतात तसेच अविद्येचे म्हणजेच उग्र दैवतांचे म्हणजेच अंधाराचे उपासक असतात. त्यांच्या उपासना अघोरी असतात. अशा वाईट शक्ती किंवा उपासकांना श्रीरामरक्षेत "निशाचरचमु" म्हटले आहे. श्रीरामांचे म्हणजेच श्रीदत्तत्रेयांचे (दोन्ही एकच हे खास सांगायला नकोच!) रक्षाकवच लाभलेल्यांना म्हणजेच प्रकाशाचे उपासक असलेल्यांना निशाचरांची भिती नको. निशाचर व आपल्यामध्ये ते दत्तात्रेय उभे ठाकतातच. इथे त्या स्त्रीने दत्तत्रेयांच्या स्वामीरुपाची भक्ती केली त्यामुळे संकट दूर करताना तेच रुप दिसले.

मायबाप असतात हो सद्गुरू. कसे अलगद उचलून घेऊन पार करतात.


Pillu
Thursday, October 18, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ

अश्वीनी तु म्हणतेयस ते खुप खरे आहेच आहे, मी ही खुप खोलात शिरलो या गोष्टी करता नंतर मला समजले की ( कसे समजले हे क्रुपया विचारु नका ) स्वामींना हे करण्यास आठ दिवस का लागले. याचे उत्तर असे आहे जी काही ती शक्ती होती तिचा प्रभाव ही जबरदस्त होता आनी ज्या कोणी याचा प्रयोग केला ती ही आसामी पहुची हुयी होती. ती शक्ती सरळ सांगुनही स्वामींना दाद देईना तेव्हा स्वामींनी एक घाव दोन तुकडे केले त्या वक्तीलाही जबर अद्द्ल स्वामींनी घडवली आहे. मुळात या शेखचे आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम होते आहे. पण हेच त्या मर्‍आठी बाईला बघवले नाही आणि हो हे सांगायचे राहीले की बाई विधवा होती आणि वयानेही खुप मोठी होती.


Mrdmahesh
Thursday, October 18, 2007 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनंजय, तुला श्री स्वामींनीच हे सांगितलेलं दिसतंय.. :-)
काल मी माझ्या पत्नीला हा अनुभव सांगितला तर ती आजपर्यंतही त्यातून बाहेर आलेली नाहीये!! मला त्या शेखलाच भेटावसं वाटतंय.. अजून काही विचारावंसं वाटतंय.. खरंच तो किती भाग्यवान आहे.. श्री स्वामी त्याला वेगळ्या अवतारात का होईना पण भेटले.. आपल्या समोर श्री स्वामी अशा वेगळ्या अवतारात आले तर ओळखता येईल का असा प्रश्न मला पडलाय.. असो.. हे या जन्मात तरी होईल का हाच बेसिक प्रश्न आहे.. :-)
परवाचा म्हणजे सर्वपित्री अमावस्येचा अनुभव सांगतो..
त्या दिवशी मी घरी श्राद्ध करत होतो. वडील, आजोबा व पणजोबा तसंच आईचे वडील (आजोबा), पणजोबा (आईचे आजोबा) आणि आईचे पणजोबा.. अशा सहा जणांचं मी श्राद्ध करत होतो. गुरुजी जे सांगत ते करत होतो. गुरुजींनी सांगितलं की या सगळ्या जणांना तुम्ही येऊन जेवा असं आवाहन करायचं असतं.. मी अगदी तो भाव आणून आवाहन केलं आणि काय आश्चर्य! मला हे सहाही जण माझ्या डोळ्या समोर आले. मला असं स्पष्टपणे दिसलं की वडिलांकडचे एका सतरंजीवर आणि आईकडचे वेगळ्या सतरंजीवर बसलेले दिसले. वडील आणि आजोबा (आईचे वडील) (ज्यांना मी पाहिलेले आहे) हे मला अतिशय स्पष्टपणे दिसले (कारण त्यांचं ते रूप अजूनही माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहिये). ही सगळी मंडळी जेवण येण्याची वाट पहात आहेत असं दिसलं.. शेवटी मी त्यांना हा नैवेद्य दाखवत आहे त्याचा स्वीकार करा असं आवाहन केलं. पण ते जेवत आहेत असं काही दिसलं नाही याची खंत आहे..
मला असं विचारायचंय की जी काही थोडी बहुत साधना माझ्याकडून होत आहे त्याचा हा परिणाम आहे का? कारण माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच घडलंय...


Pillu
Thursday, October 18, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थातच त्याचाच हा परिणाम आहे. आपल्या भारतिय संस्क्रुतीत या ( महाराष्ट्रात ) या पंधरवड्याला फार महत्व आहे. पण बरेच जण वेळे अभावी म्हणा अथवा विश्वास नसल्या मुळे म्हणा फारसे कुणी करत नाही जे कुणी करतात त्यात श्रद्धेचा भाग किती असतो तुझ्या सारखी खुप कमी अशी लोक सापडतील की याचे महत्व कळुन आपल वाडवडीलांना प्रत्यक्षात खायला देणारे. ही देखील स्वामींचीच क्रुपा आहे





Preetib
Friday, October 19, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

He sagle anubhav vachun far chan watala.
Nusata vachun thamble nahi tar Sawmicha namsmaran chalu kela aahe. Manala shantata, dilasa milto he swataha anubhavala aahe.
Aapan sagle swamibhakta eka arthi aamhala margadarshan karat aahat.
Jai Jai Shree Swami Samaratha.

Mrdmahesh
Monday, October 22, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनंजय,
तू म्हणतोस ते खरेच आहे. मी माझ्या गुरुंना देखील हेच विचारले. त्यांच्या मते सुद्धा हे केवळ माझ्या अल्प साधनेमुळेच झाले आहे. ही सगळी श्री स्वामींचीच कृपा आहे.
प्रीती,
तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला वाचून चांगले वाटले आणि तुम्ही नामस्मरण चालू देखील केले हे वाचून मला खूपच आनंद झाला.. नेमका हाच या BB चा उद्देश आहे. इथे येणार्‍या वाचकाला अध्यात्माची आवड निर्माण होऊन तो नामस्मरण करू लागावा हाच माझा हा BB चालू करण्यामागे हेतू होता.. असो आपले नामस्मरण वाढत राहो आणि आपल्याला मन:शांती मिळत राहो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना.. आपण इथे असेच येत रहाल व आपले अनुभव लिहित रहाल अशी माझी खात्री आहे.. :-)


Pillu
Wednesday, November 07, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


सर्व मायबोलीकरांना हि दिपावली सुख,सम्रुद्धी,उत्तम आरोग्यची, व भरभराटीची जावो हीच स्वामींचरणी विनम्र प्रार्थना. शुभदिपावाली


Divya
Saturday, November 17, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज या बीबीवर येउन जेंव्हा मीच लिहीलेले वाचले तेंव्हा मलाच प्रश्न पडला कि ही मीच का जी तेंव्हा हे लिहीत होती. गेल्या सहा महिन्यांपासुन मला नामस्मरण काय काहीच विचार करायला देखिल फ़ुरसत मिळाली नाही. पण या नामस्मरणावरच्या आणि देवावरच्या दृढ विश्वासाने मला माझ्या depression वर मात करायला मदत झाली. खुप horrible मरणाचे विचार माझ्या मनात यायचे तेंव्हा. समोरच्या परिस्थितीला तोंड देण्याची आणि स्वीकारण्याची मानसिक तयारीच नसायची, कळतय पण वळत नाही असच काहीस. अति केलेला मृत्युचा विचार मला या अध्यात्माकडे घेउन आला, अस नाही की खुप काही कळल, जमल पण negative विचारांवर मात करायला नक्कीच मदत झाली या गोष्टींची. अस वाटत कुठलीतरी अदृष्य शक्तीच या negative विचारांपासुन मला सतत वाचवत होती.

Mrdmahesh
Monday, November 19, 2007 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,
तुम्हाला नामस्मरणाचा फायदा झाल्याचे वाचून आनंद झाला.. आपण नामस्मरण चालूच ठेवावे असे मला वाटते.. श्री स्वामी आपली सर्व संकटे दूर करो..
नामस्मरणाने ईश्वरच आपल्या पाठी उभा रहातो जो आपल्याला सर्व संकटांपासून वाचवतो (आपले भोग भोगत असताना सुद्धा तो आपल्याला जाणवू देत नाही की आपण किती भयंकर भोगत आहोत.. हा सगळा नामस्मरणाचा चमत्कार..). ही अदृश्य शक्ती म्हणजेच आपण ज्याचे नामस्मरण करत होता तीच असावी.


Pillu
Monday, November 19, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या तुमच्या मागे लिहिलेल्या पोस्ट मी वाचायचो खुपच छान लिहित होतात तुम्ही. मग एव्हढे सगळे असताना तुमच्या मनात असे विचार आले हे नवल आहे. पण मला वाटते की हि देखील त्या करत्या करवित्याचीच क्रुपा आहे असे मी मानीन. आपली त्यानी घेतलेली परीक्षाच आहे आणि त्याच्याच क्रुपेने तुम्ही पासही झालात असो पण मला वाटते ( मि तुम्हाला सल्ला देण्याइतका नक्कीच मोठा नाही ) एकदा नामस्मरणाची धरलेली कास माणसाने कधी सोडु नये. आपण श्वास घेणे कधी सोडु का? कारण आपण नामस्मरण करुन आपला ऊध्धार करुन घ्यावा असेच त्या परमेश्वराची ईच्छा असते पण आपण सर्व "जण ज्याने दिले हात पाय त्याचे नावच नाही ठाव" असे वागणे आसते. मी अनेक जण बघीतले आहेत की देवाच्या नावाचा तिटकारा आहे. आणी मग संकटे आली की मग देवाच्या मंदिराचे उंबरठे झिजवायचे. मग अश्याना देवही म्हणतो ल्पिज वेट यु आर इन दि क्यू

Divya
Monday, November 19, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जगावसच वाटायच नाही. आपले प्रश्न सुटुच शकणार नाहीत शेवटपर्यन्त अस वाटायच. मी जेंव्हा जेंव्हा येताना जाताना कब्रस्तान बघायचे तेंव्ह अस वाटायच कि हे गेलेले लोक या जगाच्या काळज्या, विवंचना, हेवे, दावे, struggling सगळ्यांपासुन मुक्त झालेत, शांतपणे झोपलेत. माझी एक मैत्रीणा कायमची भारतात परत चालली होती. ती माझी फ़ार close friend होती अस पण नाही, पण जाताना ती मला तिच्याकडची काही पुस्तक देउन गेली. एक खोक भरुन पुस्तक स्वामी माधवनाथांची होती, भगवतगीता आणि ज्ञानेश्वरीवरची. तिच्या घरचे त्यांहे शिष्य होते. ती सगळी पुस्तक मी public liabrary मधे नेउन टाकणार होते. टाकायच्या आधी ती वाचुन तरी बघावीत म्हणुन वाचायला घेतली आणि त्यानंतर माझ्या विचारांना मिळालेली कलाटणी या बीबीवर येउन बरसली. याला योगायोग म्हणायच कि अजुन काही ते माहित नाही. पण मला याचा खुप फ़ायदा झाला. माझे काहीही problems solve नाही केले देवाने पण मला दिशा मात्र नक्किच दाखवली आहे.

Zakki
Tuesday, November 20, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वेगळ्याच कारणा साठी जगायची इच्छा नव्हती. कारण माझी मुले शिकून चांगली सुखात आहेत. पत्नीलाहि तशी माझी फार गरज नाही. करायचे ते सगळे केले. खाणे, पिणे, भटकणे, पाऽर ऑस्ट्रेलिया ते अलास्का. मग आता लवकर जन्म संपला तर बरे, असे वाटू लागले.

पण मी थोडेसे काहीतरी वाचले नि पटले की मरण्याची इच्छा काही खरी नाही. त्या ऐवजी नामस्मरण करत राहिले की सर्व चिंता दूर होतात, मनाला शांति मिळते, नि मग त्या अवस्थेत किती का वर्षे होईनात, आपण नेहेमी सुखी नि आनंदितच रहातो.


Mrdmahesh
Tuesday, November 20, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
एकदम पटलं.. जन्म, मरण काही आपल्या हातात नाही.. मरण येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत तुम्ही म्हणता तसे मनाला शांती देणारं आणि पर्यायाने आनंद देणारं नामस्मरण करत रहाणं केव्हाही उत्तमच..


Mandarp
Monday, November 26, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता नामाची चर्चा चालू आहेच, तर दोन वाक्यं लिहायचा मोह आवरत नाहीये.

१. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन बनवायला हवे. : ब्रम्हचैतन्य गोन्दवलेकर महाराज.

२. इतके नाम घ्या की नामाच्या राशी पाडा. : बेलसरे बाबा.

मंदार


Zakki
Monday, November 26, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नामस्मरणाचा प्रत्यक्ष आलेला अनुभव. मला डॉक्टरकडे जायला अजिबात आवडत नाही. त्यातून मागल्या वर्षी मला इन्शुरन्सच्या भानगडीत दुसर्‍याच एका डॉक्टरकडे जावे लागले. त्यांची कस्टमर सर्व्हिस एकदम बेकार. तास न् तास बसवून ठेवायचे.

असाच एकदा माझा रागाचा पारा चढत असता, मला एकदम नामस्मरणाची आठवण झाली, नि मी लगेच नामस्मरण सुरू केले. नि लगेच माझा राग शांत झाला. नाहीतर त्यांनी मला हाय ब्लड प्रेशर, नि कोलेस्टेरॉल, नि माइंड ऑल्टरिंग ड्रग्स असले भलते सलते घ्यायला लावले असते.

नाहीतरी क्रोधात् भवति संमोह : इ. तुम्हाला माहितच आहे.


Preetib
Wednesday, December 05, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Divya even I have gone through rather going through the same sad phase as u. Sry for writing in english. Jeva maayboli var swatahala mokala karayacha try kela teva kahini tyawar comments agadi mail karun kelya jyane ajun tras jhala.

Ek bad phase yeun geli and I am still shocked he ka jhala ani kashasathi jhala.

Swami cha namsmaran chalu asta ani tyamule nakkich me yatun baher padin asa watata.
As u said, it gives us a positive energy.

Divya
Thursday, December 06, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीती, वाईट वाटल तु या phase मधुन गेली / जाते आहेस हे वाचुन. but don't worry, someone somewhere is..... for you. so स्वताकडे नीट लक्ष दे, खुश रहा. वाट बघ. आयुष्य छान वाटायला लागेल. I hope तु लवकर या sad mood मधुन बाहेर येशील.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators