Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Ramdevji Maharaj And Yoga

Hitguj » Religion » व्यक्ती » Ramdevji Maharaj And Yoga « Previous Next »

Dhulekarpatil
Monday, June 18, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामदेवजी बाबा.....
आणि त्यान्चा योगाभ्यासाचा उपक्रम दोघेही स्तुत्य आहेत....

माझ्या मते निस्प्रुह व्रुत्तीने देशासाठी कार्य करनारी असे लोक बोटान्वर मोजण्या जीतकेच आहेत.

मला बाबान्ची सगळ्यात जास्ती आवडनारी गोष्ट म्हणजे.. ते कधीही कोणतेही उपदेश देत नाहीत....
आणी त्याणी जो सन्कल्प केला आहे (रोगमुक्त भारताचा) तो म्हनजे देशप्रेमाचाच पुरावा आहे....

त्यान्च्या वेयक्तीक आयुष्याबद्दल ते ही कधी बोलत नाहीत आनी कुणी जास्ती चर्चा करताना दिसत नाही...

बाबाना भक्त नाहीत, कारण ते काही धार्मीक प्रवचणे करीत नाहीत...
योग हे एक विज्ञाण आहे... आणी बाबा त्याला कधीच धार्मीक कीन्वा देवत्वाचा मुखवटा चढवत नाहीत.. आणी कुणाला चढवु सुद्धा देत नाहीत........

म्हणुन मला तरी वाटते की हेच रुप असावे वीज्ञानयुगातील बाबान्चे...
आनी ह्या द्वारेच ते खरी समाज सुधारणा घडवीत आहे...
कोनते ही श्रेय न घेता.. कीन्वा स्वताकडे देवत्व न घेता....

तुम्हाला काय वाटते???


(विषयाला धरुन) तुमची मते जरुर मान्डावीत...


Bhramar_vihar
Tuesday, June 19, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धार्मिक व्यक्ती मधे रामदेव बाबांचा समावेश करणे कितपत उचित आहे?

Bee
Thursday, June 21, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वीच्या काळी योगी अरण्यात जात असतं. तिथे कित्येक महीने राहून त्यांची दाढी मिशी वाढत असे. नेसायला त्यावेळी शर्ट पॅन्ट नव्हते म्हणून धोतर किंवा पायघोळ घालत असतं.

आता रामदेव बाबांना हे सर्व करायची गरज काय आहे? का त्यांनी ऐवढी दाढी मिशी वाढवली, भगवे वस्त्र परिधान केले? हा दिखावा आहे असे कुणाला वाटत नाही का?



Dhulekarpatil
Thursday, June 21, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धार्मिक व्यक्ती मधे रामदेव बाबांचा समावेश करणे कितपत उचित आहे?

अहो व्यकती म्हणुन दुसरा बी. बी नाही ना म्हणुन येथे टाकलय...
खरच वलय निर्माण करण्याचा कीन्वा दुसरा कोनता ही हेतु नाही....

मी पण व्यक्तीपुजेच्या वीरुद्ध आहे.....
एका चान्गल्या व्यक्तीच्या गौरवाचा हा मी प्रयत्न केला फ़क्त.....

-------------------------------------------------

बाकी मी आधीच लीहीलेले आहे....

बाबान्च्या पर्सनल गोष्टी पर्सनल राहोत....
मला योगाचे कार्य जास्ती महत्वाचे वाटते आहे.....
तुम्हीच सान्गा.... बाबा क्लीन शेव आसते तर आपण म्हटलो आसतो.....
सा** ढोन्गी आहे.... रोज़च क्लीन शेव करुन येतो ओफ़ीसर सारखा....

तो माझा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की त्यान्चा उपक्रम कीतपत परीणामकारक आहे.....

माफ़ करा बी पण मला तुमचा मुद्दा खोडुन काढायचा नाही...
एक सहज वीचार मान्ड्तो.....


(((((पुर्वीच्या काळी योगी अरण्यात जात असतं. तिथे कित्येक महीने राहून त्यांची दाढी मिशी वाढत असे. नेसायला त्यावेळी शर्ट पॅन्ट नव्हते म्हणून धोतर किंवा पायघोळ घालत असतं.......))))

पण पुर्वी पासुन वीरक्ती म्हनजे शरीराचे कमीत कमी लाड करायचे आनी गरजासुद्दधा कमीत कमी ठेवत असत... त्या मुळे "कदाचीत" बाबा तसे रहात आसतील....
म्हणजे मला असे वाटते... कदाचीत तुमचे बरोबर आसेल...
पण लोजीकली मला तरी बरोबर वाटते....


Bee
Friday, June 22, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील, तुम्हाला निकम गुरुजींबद्दल किंचित तरी माहिती असेल. त्यांनी योगाचा केलेला प्रसार कमी नाही! पुष्कळ आहे. ते साधेच राहत. कधी असा वेष धारण केला नाही त्यांनी. Officer सारखे राहणेही नाही म्हणत मी. चालू काळानुसार वेष धारण केला तर बुवाबाजीशी शंका कमी होईल असे मला वाटते.

Sach_b
Wednesday, June 27, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निव्वळ योगाचाच प्रसार करायचा असेल तर त्यांना असलेलं ज्ञान हेच त्यांच सर्वात मोठ asset आहे त्यासाठी मग बाकी सगळ्या अवडंबराची आवश्यकता ती काय???

Bee
Thursday, June 28, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सच, मला अगदी हेच म्हणायचं आहे. तुम्हाला ज्ञान आहे मग अवडंबर करण्याची गरज काय.

अनिरुद्ध बापूंबद्दलही मी खूप ऐकून आहे. काल एक MBA झालेली मुलगी वहीत राम नाम लिहित होती कारण बापूंनी तिला तसे सांगितले. आजच्या काळात लोक असे करतात तेही इतके शिकलेले. कमाल आहे खरच.


Ashwini_k
Thursday, June 28, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमाल आहे खरंच!!! हा बोर्ड रामदेवबाबान्च्यावर असुनसुद्धा चर्चा फ़िरुन बापुन्वरच! (गोन्धळ घालायला त्यान्च्या नावाचा अपुरा पडला का?) तरी धुळेकरपाटीलानी पहिल्या पोस्ट्च्या शेवटी विनंती केली होती की चर्चा विषयाला धरून करावी. अर्थात, त्यान्नीही रामदेवबाबान्च्या कार्याबद्द्ल न लिहिता खालील टिपण्णी केल्या होत्या:-

(बाबाना भक्त नाहीत, कारण ते काही धार्मीक प्रवचणे करीत नाहीत...
योग हे एक विज्ञाण आहे... आणी बाबा त्याला कधीच धार्मीक कीन्वा देवत्वाचा मुखवटा चढवत नाहीत.. आणी कुणाला चढवु सुद्धा देत नाहीत........

म्हणुन मला तरी वाटते की हेच रुप असावे वीज्ञानयुगातील बाबान्चे...
आनी ह्या द्वारेच ते खरी समाज सुधारणा घडवीत आहे...
कोनते ही श्रेय न घेता.. कीन्वा स्वताकडे देवत्व न घेता....

तुम्हाला काय वाटते???)

वरील टिपण्णीमुळे हा चालू करण्याच्या हेतूच्या शुद्धतेबद्द्ल प्रश्नचिन्ह उभे रहाते. पण जाउदे!!
हरि ओम. आज गुरुवार! मी चालले!


Bee
Thursday, June 28, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, ठिक आहे चूक मान्य करतो मी. तुला जर ह्यांच्यापैकी कुणाच्याही कार्याबद्दल माहिती असेल तर लिहि ना मग. सुरवात तुच कर.. एखाद्या थोर व्यक्तीबद्दल समाजात समज गैरसमज होतच असतात. अशा वेळी आपल्याला जर त्या थोर व्यक्तीविषयी काही माहिती असेल आणि योग्य वाटतं असेल तर पुढाकार घ्यावा. प्रत्येकाचा तर माणसांवर विश्वास असणार नाही ना. नास्तिकही लोक असतातच की जगात, देवावर विश्वास न ठेवणारे. इथे तर आम्ही माणसाबद्दल बोलत आहोत.

परत आलीस की रागावू नकोस :-)


Ashwini_k
Thursday, June 28, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम बी,

मला रामदेव बाबान्चाबद्दल खरंच काही माहित नाही. त्यामुळे मी चान्गल्यावाईट काहिच कॉमेन्ट्स करु शकत नाही. बाकी बापुन्च्या बद्दल जे वाटते त्यातील थोडेसे त्या बिबि वर लिहीले होते पण आता कोणाला काही सान्गत बसावेसे वाटत नाही. त्या बिबि वरसुद्धा आस्तिकनास्तिक (दोन्हिही पुर्ण चान्गले किव्वा पुर्ण वाईट नसतात. नाही का!) किव्वा तत्सम वाद अपेक्षित नव्हता तरीही मला ती चर्चा हेल्दी न वाटता बर्याचवेळा वितंडवाद वाटला त्यामुळे असेच वळण दुसर्या बिबिला लागू नये असे मला प्रामाणिकपणे वाटले म्हणून न राहवून लिहीले.

मी रागवायचा प्रश्नच येत नाही. (स्माईली) - मला स्माईली टाकता येत नाही!!

कॉम्प बंद करता करता पाहीला म्हणून लिहीले. आता खरंच चालले हा!!

हरि ओम.



Kedarjoshi
Thursday, June 28, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमरा कदाचित आदरनिय व्यक्ती असा बीबी नसल्यामुले त्यांनी ईकडे पोस्ट टाकले.

रामदेव बाबा बद्दल मला जास्त माहीती नाही. पण गेल्या भारत भेटीत रोज सकाळी मला आई वडिल सहा ला उठवुन टिव्ही समोर योगा साठी बसवत.

मला तरी तो देखावा वाटला नाही. ते स्वत सगळ करतात, जादु टोना, देव देव वैगरे नाही तर योगा वरच लक्ष केंद्रीत असते. गल्लीतल्या आजुबाजुच्या सर्व घरी सर्व वयाची माणसे (अपवाद सोडुन) मी योगा शिकताना पाहीलीत. भारतातील फक्त २० टक्के लोक जरी त्यांचे योगा साठी फालोअर असतील तर निरोगी भारत तयार होनार नाही का?

बी भाउ त्यांनी घोतर घातले, दाढी वाढवली याला विरोध? अरे तु तर योगा करतोस ना? मग तुलाच जास्त माहीती पाहीजे त्यांची. शिवाय आज्चे जगच दिखाव्याचे आहे मग थोडा कार्पोरेट पणा आणला तर काय वाईट?

ईकडे ग्रंथालयात जर योगाच्या पुस्तकांची यादी काढली तर सर्व गोर्या लोकांनी लिहीलेले पुस्तक मिळतील. एकही भारतीय नाही वर आपण सांगतो की योगा भारतीय संस्कृती चा एक घटक आहे मग जर रामदेव सारखे व्यक्ती योग चा सामान्य भारतीयांत प्रसार करुन (टिव्हि द्वारे) परत एकदा योगा ला फ्रंट पेज वर आणत असतील तर काय चुकले?


Bee
Friday, June 29, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, विसर्गानंतर एक उजवा कंस टाईप केला तर स्माईली मिळेल तुला.

केदार, मी योगा करतो आणि शिकवतोही स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण मठामधे. मी इथे एकही दांभिक व्यक्ती पाहिलेली नाही म्हणूनच मला इथे स्वयंसेवक होता आले.

दांभिकपणाचा लेप चढवून निरोगी भारत खरचं तयार होईल का? आधी अंगी जी दांभिकता भिनली आहे ती दूर केली तर बरे होईल असे वाटते. मलाही रामदेव बाबांच्या कार्याबद्दल काही माहिती नाही. मी नेटवर त्यांचे चार पाच छायाचित्र पाहिलेत आणि मला प्रथमदर्शीच ही व्यक्ती दांभिक वाटली. कदाचित माझा हा गैरसमज असेल पण भारतात बरेच ढोंगी साधूसंत देखील निर्माण झालेले आहेत आणि होतात. त्यात असे 'बाबा', 'स्वामी', 'बापू' आदी विशेषण धारण केलेले गुरु पाहिलेत की मला आजच्या काळाचा विचार करता त्यांच्या कार्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होते.

दुसरे असे की सर्वसामान्य माणसाला गुरुशिवाय विद्या मिळणे कठिण आहे. आता TV पुढे बसून बरेच जण योगा शिकतात पण हा एकदम चुकीचा मार्ग आहे. योगामधे जे आसन सरळ साधं सोपं वाटतं ते अचूक करणे खूप महत्त्वाचे आहे. वाचून पाहून योगा शिकणे अयोग्य आहे. योगा शिकायला शिक्षकाची गरज आहेच आहे.

रामदेवबाबा योगा करत असतील त्याचा प्रचारही करत असतील पण त्यांच्या शिकवणीबद्दल मला माहिती नाही. TV वर योगाचे प्रात्यक्षिक देणार्‍या पोरी पाश्चात्त पोषाख घालतात म्हणजे बनियान आणि slack . त्या दिसायला सुंदर कमनीय बांध्याच्या असतात. हे योग्य आहे का सांगा पाहू?

भारतीयांनी देखील योगावर खूप काही लिहून ठेवलेले आहे. परत नव्यानी सुलभ भाषेत लिहायची आणि प्रयोग करायची आता गरजही उरलेली नाही इतकी उदंड माहिती पुस्तके ग्रंथ योगावर भारतीय भाषांमधे उपलब्ध आहे. जी माहिती परकीयांनी लिहून काढली ती खरे तर भारतीय पुस्तकातूनच त्यांच्या पर्यंत पोचली. पण त्यांच्याकडे सबळ साधणं असल्यामुळे त्यांची आवृत्ती कदाचित जास्त आकर्षित वाटतं असेल. मी ईंग्रजी पुस्तके वाचून पाहिली आहेत. मला तुलनेने मराठीच पुस्तके अधिक आवडली.


Bhramar_vihar
Friday, July 06, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मात्र मान्य केले पाहिजे की रामदेव बाबांमुळे योग विद्येचा प्रचार "भारतात" मोठ्या प्रमाणावर होउ लागला आहे. निकम गुरुजी, स्वामी कुवलयानंद, सदाशिव निंबाळकर, अयांगार गुरुजी यांनी अनेक वर्षे योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता वेचली. पण त्यांना एव्हढे glamour प्राप्त नव्हते झाले. कदाचित त्याकाळि भारतात लोकांना मानसिक चिंता, stress वगैरे ईतक्या मोठ्या प्रमाणत जाणवत नव्हते म्हणुनही असेल.

रामदेव बाबा काही दावे मात्र अतिच करतात.. जसे ३ दिवसात १० किलो वजन कमी ई. या marketing ला भुलुन देखिल बरेच लोक तिथे वळतात. वर बी ने म्हटल्याप्रमाणे योग हा योग्य शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे. TV, casettes, CDs बघुन आसनं तथा प्राणयाम करणं धोक्याचं आणि कधी कधी अपायकारक देखिल होऊ शकतं!


Dhulekarpatil
Wednesday, July 11, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्ड्ळी...
सगळ्यात आधी धन्यवाद....
तुमच्या पोस्ट बद्दल.....

चर्चा खरच हेल्दी होत आहे.....
अगदी प्राणायाम केल्यासारखी :-)
आणी बी म्हनतात ते खरेच योग्य आहे.... फ़ोटो पाहुण माणुस खारच दाम्भिक वाटतो.... मुद्दा एकदम बरोबर आहे... धोतर आनी भगवे कपडे का??
माझ्याकडे उत्तर नाही.... कदाचीत रामदेव बाबाकडे पण नसेल..... :-)

पण बी एकदा त्यान्चा टी. व्ही. वरचा कार्यक्रम बघाच.... कदाचीत तुम्ही काहितरी नवीन माहिती आम्हाला सान्गु शकाल..... (सोन्याची पारख सोनारच करु शकतो न) आमचे ह्या विच्यात ज्ञान खुप मोठे नाहि......

आनी आश्वीनि मी बी. बी. उघडताना खरच काही वेगळ उद्देश ठेवला नव्हता.....

आनी तुम्ही चर्चा पुन्हा मुल मुद्द्यावर आन्लीत त्या बद्दल आभारी.....

भ्रमर... तुम्ही म्हन्तात ते १०० टक्के खरे आहे.....
योगाचा सगळ्यात जास्ती प्रसार होतो आहे हे अभिमानास्पद आहे........

(समजा एखाद्य मार्केटीन्ग कम्पनी ने योगाचा प्रासार केला असता तर...???)


Bhramar_vihar
Thursday, July 12, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा म्हणजे योगाचे विश्वविद्यापीठ बिहार येथे आहे. पण त्यांना कोणीच विचारत नाहिये! :-) एक गोष्ट मी सांगु ईच्छितो की आपण "योग" असे म्हटले पाहिजे.. "योगा" नव्हे!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators