Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 02, 2007

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through May 02, 2007 « Previous Next »

Chyayla
Saturday, February 10, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम राम मन्डळी... हा BB बरेच दीवसान्पासुन वाचतोय पण आजच ईथे लिहित आहे तुमच्यासोबत चर्चा करायला आवडेल. पण ह्या BB वर पहातो आहे केवळ स्वामी समर्थ, गोन्दवलेकर महाराजच दीसतात. माझा त्याना अजीबात विरोध नाही... मला त्यातल्या त्यात प्रशान्तजीन्नी जी माहिती दीली ती पण आवडली शिवाय दीव्या नी लिहिलेले पोस्ट खुप आवडले. तशीच चर्चा परत सुरु झाली तर या BB च्या शिर्षकाला न्याय मिळेल असे वाटते. कृपया गैरसमज करुन घेउ नये ही विनन्ती.

मला एक विचारायचे आहे की ईकडे सगळे "अखन्ड नामस्मरण" वरच जोर देत आहेत मला हेही माहित आहे की ईश्वराला शब्द ब्रह्म म्हटल्या जाते व हा सुद्धा एक उत्तम मार्ग आहे पण अध्यात्मिक उन्नती करण्याचे ईतरही मार्ग आहेत, एकच मार्ग सगळ्याच व्यक्तिन्ना कसा योग्य ठरु शकतो? कारण या जगात व्यक्ति, प्रकृती ह्या भीन्न भीन्न असतात तेन्व्हा सरसकट सगळ्यानीच नाम मन्त्र घेउन पुढे जावे हे कितपत योग्य आहे, याबद्दल कुणी सान्गेल का?

चु. भु, दे. घे.


Limbutimbu
Saturday, February 10, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> एकच मार्ग सगळ्याच व्यक्तिन्ना कसा योग्य ठरु शकतो?
च्यायला, च्यामारी तुला आता "वेन्धळेपणाच्या" किन्वा "इब्लिसपणाच्या" किश्श्यान्सारख जुगवुन सान्गू की अनुभुतीच सान्गू??? DDD

हिन्दु शास्त्राप्रमाणे..... आणि माझ्या जे ऐकण्यात वाचण्यात आले त्यातले जेवढे आठवते त्यानुसार.....!
आइच्या उदरात गर्भ असताना देखिल तो "कोऽऽहं" हा उच्चार आन्तरीक उर्जेतून करीत असतो अस मानल हे! ज्याक्षणि जन्म होवुन पहिला श्वास घेतला जातो तेव्हा प्रत्येक श्वासागणिक "कोऽऽहं" या प्रश्णाला श्वासातूनच "सोऽऽहं" हे उत्तर मिळु लागते! (या कोऽऽहं आणि सोऽऽहं चा अर्थ कुणीतरी विषद करा रे, मला नेमक्या शब्दात आठवत नाही हे, फक्त आशय जाणवतो हे जो शब्दात व्यक्त करता येत नाही

तसच, उदरातच आन्तरीक उजेतून कोहं ला सोहं अस उत्तर मिळत का ते पण विषद करा...
करण मला खर्रच काहीही आठवत नाही हे तेव्हान्च......! ) DDD

पण त्याचे आकलन देहबुद्धीला होत नसते...!
तेव्हा या प्रश्णान्ची देहबुद्धिला उत्तर मिळेस्तोवर न सम्पणारी मालीका प्रत्येकातच अस्तित्वात असते
श्वास आणि स्वरयन्त्र यान्च्या सन्योगाने उच्चारीत ध्वनि निर्माण होतो
या ध्वनीच्या माध्यमाचा वापर करीत, किन्वा श्वासागणिक मनातल्या मनात नामस्मरण करीत रहाणे अपेक्षित असते
हे नामस्मरण करण्याने काय होते, का करावे वगैरे माहात्म्य इतरान्नी वर दिलेच आहे, ते पुन्हा पुन्हा सान्गत बसत नाही
तर तुमचा प्रश्ण की सगळ्याच व्यक्तीन्ना योग्य कसे ठरेल... तर पुर्वसन्चिन, व या जन्मीची पापेपुण्ये विचारात न घेता, परमेश्वराप्रती जाण्याच्या (उलटपक्षी, आपल्यातच स्थित परमेश्वरास ओळखुन त्याप्रमाने "सुवळ" वागण्याच्या) किमान सोप्या सुविधा प्रत्येकालाच उपलब्ध असतात, त्या सुविधेतील एक मार्ग तो नामस्मरणाचा.. जे कोणीही व्यक्ती करू शकते.... जर मनात आणले तर!
करेल की नाही, ते विचारायला ज्योतिष बीबी वर जा कुन्डली घेवुन....!
(वरील पोस्ट करीता चु. भु. दे. घे.)
मी येथिल फारस वाचल नाही हे, पण वर वर बघता जे विवेचन इथे केल गेल हे ते सुन्दर आणि उपयोगी हे!
सर्वान्ना मनःपुर्वक धन्यवाद!
:-)


Chyayla
Sunday, February 11, 2007 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बुटिम्बु अरे बाबा का छळतोस... मी काय नेहमी वेन्धळेपणा किन्वा ईब्लिसपणाच करतो असे नाही. म्हणतात ना कानफ़ाट्या नाव पडले की काय होत तसच काही तरी माझ्या बाबतित समजुत केलेली दीसते. माझा प्रश्न आईशप्पथ प्रामाणिक होता रे, कारण मला खात्री आहे त्याचे उत्तर मला इथे नक्कीच मिळेल.

तर असो तु अनुभुतीचच सान्ग... त्यातल्या त्यात तु खरच एकदम छान उत्तर लिहिलेस,थोडासा वेन्धळलास पण चालायचच.

तु जे कोSS हम (बरोबर लिहिता नाही येत आहे) त्याबद्दल... जीव जेन्व्हा आईच्या गर्भात असतो तेन्व्हा त्याला तो कोण आहे माहिती असते तो हे जाणुन असतो की हा जीवच शीवाचा अन्श (परमेश्वराचा अन्श) आहे म्हणजे "अहम ब्रह्मास्मी" हे सत्य त्याला माहित असत. पण जसा तो बाहेरच्या जगतात येतो त्यावर मायेच आवरण चढत आणी तो आत्मविस्मृत होउन प्रश्न विचारतो कोहम म्हणजे मी कोण आहे? आणी त्याला उत्तर मिळत सोहम म्हणजे मी तोच आहे.


Pillu
Monday, February 12, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

मंदार छान प्रश्न विचारलास,
खरे तर मला पक्के ठाऊक नाही, कि हा तारक मंत्र स्वामींनी कुणाला दिला पण मला जे माहित आहे ते मात्र सांगायला काहिच हरकत नस्सवी. नागपुरच्या कोणी श्री. विश्वनाथ दमोदर व्-हाडपांडे म्हणुन आहेत त्यांना हा मंत्र दिल्याचे ऐकीवात आहे. हा कूठल्याही ग्रंथात ( जुन्या ) सापणार नाही. पण अत्यंत प्रभावी व चटकन गुण येणारा मंत्र आहे.

हा तारक मंत्र म्हणण्याची पध्द्त अशी आहे.
एक पेला भरुन ( भांड ) पाणी घ्यायचे स्वामींसमोर आसन टाकुन बसावे. एक उदबत्ती लावावी. त्याची राख ( भस्म ) त्या भांड्यात पदेल असे करावे. ३,५,७,११, जितके वेळ शक्य आहे तितक्या वेळ म्हणावे. मधे कोणाशी बोलु नये,उठू नये, म्हणुन झाल्या नंतर ते भांड स्वामी चर्णी लाऊन घरातील सर्वांना द्यावे. याला काळ वेळ काही नाही कारण संकटे काही सांगुन येत नाही. मात्र एक लक्षात असु द्यावे की प्रचंड विश्वासाने हा तारक मंत्र जपावा याच्या प्रत्येक शब्दात खुप खोल अर्थ दड्लेला आहे तो लक्षात घेत प्रतेक शब्दावर जोर देत तो म्हणावा. विशेशत्: हा आजारी व्यक्ती, लहान मुल या करीता प्रभावी आहेच आहे.

बरेच काही लिहु शकतो पण आत्त एव्हढेच.

जर कुणाला या बद्द्ल अजुन काही माहिती असेल तर त्यांनी ती जरुर येथे पोस्ट करावी ही नम्र विनंती


Mrdmahesh
Monday, February 12, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|| श्री स्वामी समर्थ ||
बर्‍याच दिवसांनी येतोय... सगळे पोस्ट्स वाचून खूप छान वाटलं.. मल पहिल्यांदा मुक्तीच्या प्रश्नाला उत्तर द्यावसं तीव्रतेनं वाटलं म्हणून त्याबद्दल लिहितोय.. बाकी प्रश्नांबद्दल जसा वेळ मिळेल तसा लिहिण्याचा प्रयत्न करेन. (वेळ मिळतच नाहिये... प्रोजेक्टच्या कामात खूप गुंतलोय :-() असो..
मुक्ती,
तुम्ही इतक्या वर्षांपासून जप करत आहात.. मला सर्वप्रथम हे विचारायचे आहे की ह्या मंत्राचा जप कर असं आपल्याला कुणी सांगितलं की आपण स्वत:हून हा जप करत आहात की घरात पूर्वापार हाच मंत्र जपला जातो म्हणून याच मंत्राचा जप करत आहात? तुम्ही गुरुंना शरण जाण्याविषयी लिहिलं आहे याचा अर्थ आपल्याला गुरु नाहीत.. बरोबर?? (मी असं समजून चालतो की आपल्याला गुरु नाहीत).
कुठला जप करावा हा प्रश्न साधकाला पडणारा पहिला प्रश्न.. त्याचं मला उमगलेलं (स्वानुभवातून) उत्तर असं..
कोणत्याही साधकाला सुरुवातीला हे माहित नसतं की कोणते नाम घ्यावे (जप कोणता करावा)? ते कळण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. यालाच अनुग्रह असं म्हणतात. मग अनुग्रहाशिवाय नाम घेताच येत नाही असं नाही.. नाम घेता येते पण कोणते? आपल्या सगळ्यांन माहित असते की आपल्याला एक कुलस्वामिनी असते. ही आपल्या कुळाची माता असते. लहान मूल जसं प्रत्येक बाबतीत आईवर अवलंबून असतं तसंच साधकही अध्यात्मात या लहान मुलासारखाच असतो. म्हणून साधकाने सुरुवातीला आपल्या कुलास्वामिनीला शरण जावे. तिचे नामस्मरण करावे. तिला विनंती करावी की हे माते मला नामाची अनिवार ओढ आहे पण कुठले नाम घ्यावे हे कळत नाहीये.. तू माझी माता आहेस म्हणून मी तुझ्याकडे धाव घेतली.. आता तूच मला मार्ग दाखव.. अशी भावना मनात ठेवून तिचा रोज किमान एक माळ तरी जप करावा. तुमची आर्त विनवणी तिच्यापर्यंत नक्कीच पोचेल (याचा निश्चित कालावधी नाही. एक, दोन, पाच, सात, दहा, एक तपाचाही काळ लागू शकतो..). एकदा का तुमची विनंती तिच्यापर्यंत पोचली की तुम्हाला अलगदपणे तुमच्या गुरुंपर्यंत नेऊन सोडते. आणि गुरुभेट झाल्यावर यथावकाश तुम्हाला त्यांच्याकडून नाम मिळेलच (अनुग्रह होईल.) गुरु कदाचित तुमच्या कुलस्वामिनीचंच नाम तुम्हाला देतील (कोण जाणे?).
मला हाच अनुभव आला आहे. स्वानुभवावरून जेवढे माझ्या अल्पमतीला कळाले ते सांगितले.. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती..
|| श्री स्वामी समर्थ ||


Hariom
Thursday, March 01, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नम्स्कार आज मी मायबोली मध्ये पहिले पाउल ठेवीत आहे तरी मला सभालुन घ्य्या.
मला काहि बाइठकीतील प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत ते मि कसे विचारु मला मद्त हावि आहे.


Mahesh
Friday, March 02, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैठकीतले प्रश्न ? तुम्ही नक्की बरोबर बोर्डावर मेसेज लिहिला आहे ना
गमतीने लिहिले आहे, सिरिअसली घेऊ नका. लवकरच या विषयातले तज्ञ तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

Pillu
Saturday, March 03, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

मी आज ईथे स्वामींची एक अप्रकाशीत पण बरीचशी माहिती असलेली लीला सांगतो

स्वामी सेवेत अनेक सेवेकरी होते.ते त्यांच्यापरीने सेवा करीत पण यात थोर असलेले श्रीमद्सद्गुरु श्री बाळाप्पा महाराज या बद्द्लचा हा प्रसंग आहे. यांनी स्वामीसेवेची निट व्यवस्था ठेवली होती. किंबहुना असे म्हणु की स्वामींची सेवा कशी करावी याचाच परिपाठ यांनी सर्वांना घालुन दिला जो आजही कार्यरत आहे.
रोज सकाळी भुपाळीने सुरवात करुन स्नान वगैरे जी सेवा असायची यात बाळाप्पा,भुजंगा,चोळाप्पाचे जावाई श्रीपाद स्वामी, सुंदराबाई, हे व ईतर जण असावयाचे.प्रत्येकाकडे कामे ठारलेली असायची यात ढवळा ढवळ चालायची नाही. कुणाचीही हिमंत नसायची ढवळा ढवळ करायला.

रोज आरती व्हायचीच मग स्वामी कोठेही असोत यात खंड पडला नाही. आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवैद्द आसेल तो मात्र स्वामी स्वहस्ते वाटत हेतु हा की सर्वांना स्वामींचे दर्शन मिळावे. हा प्रसाद वाटत असतांना बाळाप्पा नेहेमी प्रसादा करीता हात पुढे करीत पण स्वामींनी कधिही बाळाप्पाला प्रसाद दिला नाही. बाळाप्पा रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या निवास स्थानी येत अन आज ही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत.

अशी बरीच वर्षे गेली रोज बाळाप्पा हात पुढे करीत अन स्वामी काहिही देत नसत. एक दिवस मात्र बाळाप्पानीं ठरवले की काहिही हिवो आज प्रसाद घेतल्या शिवाय परत फिरायचेच नाही आरती झाली अन दर्शन व प्रसाद घेण्या करीता नेहेमी प्रमाने भक्त गण स्वामींच्या भोवती गोलाकार ऊभे राहिले. स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले. बाळाप्पानी काय केले असावे? एक भक्ताच्या दोन पाया मधुन हात घातला अन प्रसादाची वत पाहु लागले हेतु हा की मी स्वामींना दिसुच नये . ( वास्तवीक स्वामीच या स्रुष्टीचे चालक पालक आहेत मग कुठलिही गोष्ट त्यांच्या पासुन लपणे शक्यच नाही पण लिलाच करायच्या म्हटल्या नंतर त्यांना कोण अडवणार नाही का ?)


असो स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळाप्पांच्या हाता पर्यंत आले अन फक्त एक क्षण भरच ऽऽ स्वामी थांबले अन दुसर्याक्षणी बाळाप्पांच्या हतात भली मोठी खारीक प्रसाद म्हणुन पडली.

बस्स एका क्षणात बाळाप्पांनी ती खारीक घट्ट पकडली तेथून धुम ठोकली न जाणो स्वामी पहातील अन मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद स्वामी काढुन घेतील.

बाळाप्पा आपल्या घरी आले, दरवाजा आतुन बंद केला,
ह्रुदयाशी प्रसाद म्हणुन मिळालेली खारिक घट्ट धरली, अन डोळे बन्द करुन हमसुन हमसुन अतिशय आनंदाने ते रडू लागले." स्वामी का हो ईतुका वेळ लावलात या गरिबाला प्रसाद देण्यास. मज पामराकडुन असा काय अपराध घडला की मला येव्हढी वाट पाहावी लागली. हा हा मज पामराचे आज भाग्य ऊजळले मला स्वामींचा प्रसाद मिळाला ," असे म्हणत म्हणत ते लहान मुलासारखे किती तरी वेळ तो प्रसाद न खाता रडत राहीले त्यांची भाव समाधी लागली होती अन एव्हढ्यात दर्वाजा जोर जोरात वाजु लागला. "बाळाप्पा दार ऊघडा" . "बाळाप्पा दार ऊघडा" . स्वामींनी तुम्हांला असेल तसे बोलावले आहे.

झाले, बाळाप्पांनी ओळखले की स्वामींनी का बोलावले ते. त्यांच्या पुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता.

मान खाली घालुन बाळाप्पा स्वामीं पुढे हाताची मुठ धरुन ऊभे राहिले.

" हरामखोर हमसे नजर चुराके परसाद लेके जाताय तु बडा जिंद है. ना तु मुझे छोडेगा, ना मै तुझे ला ओ परसाद ला, "

बाळाप्पांनी ति खारीक स्वामींना देऊन टाकली.
स्वामींनी ती खारीक घेतली अन बाळाप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले " अरे तु या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधिच दिला आहे माझ्या मांडीवर तुला घेतले आहे माझ्या मांडी शेजारीच मांडी घालुन बस हाच तुला प्रसाद. या नंतर बाळाप्पांनी कधिही प्रसादाचा हट्ट केला नाही.

ओळखलात का तो कुठला प्रसाद

नाहीना

स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी. जी कोणालाही मिळाली नाही.
धन्य ते स्वामीगुरु अन धन्य ते शिष्य बाळाप्पा


Kalika
Wednesday, March 14, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायम लक्षात ठेवण्याजोगे:
न्याय करा - हक्काच्या बाजूने
लपवून ठेवा – इतरातील दोष
नतमस्तक व्हा – फ़क्त परमेश्वरापुढे
देऊन टाका – कर्ज त्वरेने
रडा – इश्वराच्या भीतीपोटी
दया करा – गरीबांवर
प्रेम करा – लहानग्यांवर
चौकशी करा – आजा~यांची
निर्भत्सना करा – दुष्कर्मांची
आठवण ठेवा – मरणाची


एक प्रवास – हा पुर्ण करा
एक खेळ – मनसोक्त खेळा
एक रहस्य – हे उलगडा
एक तडजोड – ही पुर्ण करा
एक दु:ख – यावर ताबा मिळवा
एक गाणे – मनमुराद गा
एक प्रेम – याचा आनंद लुटा
जीवन फ़ार दुखांन्त आहे त्याच्याशी झुंज दया


जीवन म्हणजे……….
एक रस्ता – यावर चालत रहा
एक संघर्ष – यामध्ये विजयी व्हा
एक आव्हान – याचा स्वीकार करा
एक सौंदर्य – याची पुजा करा
एक कर्तव्य – हे पुर्ण करा
एक स्वप्न – याचा अनुभव घ्या


Pillu
Wednesday, March 14, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा कलिका खुपच सुंदर थोड्याच शब्दात पण चांगला बोध केलास.

आज काल कोणी ईकडे फिरकत का नाही.प्रशांत,महेश,म्रुदगंधा,हे सगळे कुठे गायब झालेत.

मी उद्या पासुन सुट्टीवर आहे. म्हणुन या व ईतर सर्व साईटवर येणा~या सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्याही सर्व स्वामी भक्तांस हार्दिक शुभेच्छा.


Mansmi18
Thursday, March 15, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

||श्री सद्गुरुनाथ महाराज कि जय्||
||परमपुज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय्||

नमस्कार.

आमच्या परमपुज्य आई म्हणतात..
"कलियुगात आयुश्याचे प्रमाण फ़ार कमी असल्याने असाध्य ते साध्य करुन घ्यायला हरीनामासरखे सोपे साधन दुसरे नाही. खर्च नाही, त्रास नाही, येता, जाता, उठता बसता मुखात नाम घोळत ठेवता येते. हाताने कामे करायला अडचण येत नाही. नाम अमक्या वेळि घ्यावे अमक्या वेळि घेउ नये, अमक्याने घ्यावे, अमक्याने घेउ नये असे काहीही बन्धन नाही. नामाला सोडुन अन्य साधनान्च्या भरीस पडलो तर व्यर्थ मात्र होइल."

तुमचे म्हणणे योग्य आहे कि इश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत पण सामान्यात सामान्य माणुस आचरणात आणु शकतो असा सोपा आणि सुगम मार्ग हा नामस्मरणाचा असल्याने सन्तानी तो मार्ग सुचवला आहे.

||ओम नम: शिवाय||



Pillu
Tuesday, March 27, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

अरे काय हे सगळ्यांनी ईकडे येणे सोडुन दिले आहे काय
स्वामी जयंती नुकतीच झाली.पण कुणाचे कार्यक्रम कसे झाले जरा सांगल का?

आज मी मात्र नविन अनुभव सांगणार आहे. स्वामी भक्ती कशी असावी याचे उत्तम उदाहरण ठरावे.( अर्थात मी कुणालाही कमी लेखत नाही आणि कुणी वेगळा अर्थ काढू नये हि नम्र विनंती)

३ महिन्यांपुर्वी एक मुलगी माझ्या संपर्कात आली हिचा प्रेम विवाह झला आहे. आणि अर्थातच घरी तो मान्य नाही. या मुळे उभयतांच्या घरातुन य दोघांची हकालपट्टी झाली. ईतका राग की हे दोघे जिथे म्हणुन कामाला जातिल तिथे मालकाला सांगुन यांना काढायला लावायचे. ६ महिने अतीशय त्रास सहन केला पण दोघ एकाही शब्दांनी कुणालाही बोलले नाहीत.
तिला कोणी तरी आपल्या स्वामी मंदिराचे नाव सांगीतले. अन ती स्वामींक डे आली. अर्थात मी कोनालाही स्वामी अज्ञेशिवाय काहीही सांगत नाही. ती मंदिरात आली अन धाय मोकलुन रडु लागली. विचार्पुस केल्यानंतर तिने तिची कर्म कहाणी सांगीतली. हे दोघे अक्षरश्: रस्त्यावर झोपत असत कारण भाड्याने घर घेणे शक्य नव्हते मिळालेल्या पैश्यावर वडा पाव खाऊन हे दिवस काढित होते. मला खुप वाईट वाटले. मी माझ्या ओळ्खीने एका सभ्यग्रुहस्ता कडे तिच्या नव्~या करिता शब्द टाकला अन स्वामी क्रुपेने त्यानेही लगेच आइकला त्याला नोकरी तर मिळाले आता घराचे काय पण तोही प्रश्न स्वामींनीच सोडवला त्या माणसाचाच मला परत फोन आला कि अरे हे जमणार नाही कारण मला एक जोडपे हवे आहे आनि ते कयम स्वरुपी माझ्या कडे राहायला हवे हा मुलगा तयार होईल का हे विचार

आंधळा मागतो एक डोळा अन स्वामी त्याला दोनच काय पन सगळेच देउन टाकतात नाही काय?
घराचा अन कामाचा प्रश्न तर संपला आता घरात भांडी तर हवित ना. माझ्या कडेही पैसे नव्ह्ते पण स्वामींची माफी मागुन मी दान पेटीतली काही रक्कम घेतली अन तिला भांडिही घेउन दिली. ती पुन्हा रडुन सांगु लागली की दादा मी हे पैसे मेहनत करुन नक्कि फेडुन टाकील
तेव्हा मी म्हाणालो बाई तुझा सावकार मी नाही पण स्वामी आहेत. तो तर माझ्यापेक्षाही कडक आहे पठानी व्याजाने तो वसुल करतो. जर तुला खरेच फेडायची असेल तर तु त्यांची सेवा तितकीच तन्मयतेने कर.

होता होता ३ महिने निघुन गेले. मजेत रहात होते सांगीतलेली सेवा प्राणापलीकडे जपुन दोघेही करत आहेत.

स्वामी जयंतीच्या आधी मला तिचा फोन आला की मलाही स्वामी जयंती करायची आहे कशी करायची ते सांग मी तिला सांगीतले कशी करायची ते आनी हे पन आवर्जुन सांगीतले की पुरण पोळी करायची. नैवेद्याला काय करायचे ते सारे सांगीतले. पण ती म्हणाली अरे बाबा मला पुरण पोळी येत नाही ना मला स्वयंपाक अजुन येतच नाही मग रे? मग पेढे आन असे सांगीतले अन फोन ठेवुन दिला.
स्वामी जयंतीच्या रात्री तिने मला कशी स्वामींनी सेवा करुन घेतलि ते सांगीतले मीही खुप दमलो होतो १२ वाजता आम्ही सगळे झोपलो अन भल्या पहाटे मझा मोबाईल वाजु लागला फोन घेतला तर या बाईसाहेब दादा करुन रडु लागली ईतकी की तिल शब्दच फुटत नव्हता. मला भिती वाटले की हिला पुन्हा कोणीतरी त्रास दिल आसावा. पण घडले मात्र वेगळेच होते.

रात्री शेजारती करुन हि झोपली होती अन पहाटे स्वामींनी हिला स्वप्नात ऊठवले अन फर्मान सोडले
" मला जेवायला घाल आम्ही दिवसभर बहुत हिंडलो पण कोठेही पोटभर जेवलो नाही आता तु तरी नीदान पोटभर जेवायला घालशील ना? " "स्वामी अहो मला तर काही करता येत नाही कि हो मग काय वाढु. " "मुर्ख मुली सगळा स्वयंपाक केलास अन खोटे का बोलतेस चल वाढ " मग हिने जाऊन पाहिले तर सगळा स्वयंपाक तयार होता मग छानपैकी रंगोळी काढुन तिने स्वामींना जेवायला वाढले."बापाला घास भरवायला लाज कसली. मला घास भरव." पोटभर स्वामी जेवले त्रुप्तीचा ढेकर देत तिच्या कडे विडा मागीतला अन म्हणाले ऊठ आणि हा राहिलेला प्रसाद खा.
हि खाड्कन झोपेतुन जागी झाली. स्वामीन्च्या तसबिरी समोर पहाते तर खरेच पाट मांडलेला,रांगोळी काढलेली, आणि ताटात ३ पुरण पोळी उष्ट्या करुन ठेवलेल्या. अत्यानंदाने वेडी व्हायची बाकी राहिली होती ती. त्याच आवस्थेत तिने नव~याला ऊठवले अन मला फोन करुन ईती व्रुत्तांत सांगितला.मग मी तिच्या घरी जाउन तो सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला आणि तिच्या स्वामी भक्तीला वंदन करुन स्वामींचा प्रसाद ग्रहण केला.


Ultima
Tuesday, April 17, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी आइ आजी बरोबर हरिपाठ म्हणायची. पुढे तो वारसा जपतन रामकृष्ण आश्रम कधी आपलासा झाला हे निश्चित आठवत नाही. तिथे अनेक विचारवंतांच्या रामकृष्ण मिशन च्या अनेक पुस्तकांच्या चर्च्या होउन चांगले विचार कानावर पडत. ग़ीता सुन्दरपणे उलगडुन सांगतना, त्यावेळी त्यातला गहनपणा त्याची खोली उमजली नाही. पण एक गोष्ट मनात पक्की ठसली ती म्हणजे "गीता" ही ऐकण्याची गोष्ट नसुन जगण्याची दिशा आहे. गीतेचा शब्द न शब्द मनात साठवुन आपल कण न कण सार्थकी लावावा. जगण्याला न्याय द्यावा. माणसाला अष्टवधानी बनवुन आयुष्याला अर्थ देणारी ती गीता!
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फ़लेषु कदाचन" कर्म करत रहा, फ़ळाची अपेक्षा करु नको. हा गीतेचा सर्वोच्य बिन्दु "कर्मयोग"! कर्मयोगाच आचरण करताना आपल्यावर येणार्‍या आपत्ती भगवंताची लीला आहे. त्यामुळे ताठरलेले मन नम्र होते. मोह उडुन जाउन जीवनाचे नश्वरत्व प्रचीतीला येते. अहंकाराचे भुत पळुन जाते. आपत्ती जीवनाच्या कल्याणार्थ असुन वरच्या वर्गात नेणार्‍या त्या परिक्षा अहेत. परिक्षांना घाबरण्यापेक्षा त्यांना तोंड देण्याच्या तयारीने त्यांचे स्वागत केले पहिजे. कारण त्याच आपल्याला मोठं करतात. फ़ी माफ़ करता येइल पण अभ्यास मात्र नाही! दुर्दैवाने अध्यात्म मार्गात अभ्यासाची नादारी मागणारेच फ़ार भेटतात. प्रयत्न हा दैव आणि फ़ळ यातील महत्वाचा दुवा आहे. दैव अनुकुल असल्याशिवाय प्रयत्न व्यर्थ ठरतात, प्रयत्नांशिवाय अनुकुल दैवाचा लाभ उठवता येत नाही. म्हणुन सतत प्रयत्नशिल राहुन दैव अनुकुल आहे का हे तपसाव.
आयुष्य सगळेच जगतात, पण पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेल्य उन्हाळ्यांवर माणसाच खर वय अवलंबुन असत.

ज्याची कृती संस्कृती असते तो देव होतो.
ज्याची कृती प्रकृती असते तो मानव होतो.
ज्याची कृती विकृती असते तो दानव होतो.

तुम्हीच ठरवा तुम्हाला काय व्हायचय ते!


Mandarp
Wednesday, April 18, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

प्रशांत, धनंजय दादा, म्रुद्गंधा कुठे गेलात तुम्ही सगळे? कोणीच कसे येत नाही इथे? कुठे गायब झाला आहात? लवकर या आणी परत इथे लिहायला सुरुवात करा.

आमचा मुलगा नुकताच १ वर्शाचा झाला. त्याचा एक किस्सा सांगतो.
धनंजय दादांच्या स्वामी मन्दीरात काही महिन्यांपुर्वी गेलो होतो. तेंव्हा स्वामींच्यामुर्तीचा फोटो काढला होता. (पुर्वी इथे तो पोस्ट केला आहे).
तर हा फोटो आम्ही एका अल्बम मधे लावून ठेवला आहे.
आमचा मुलगा हा फोटो शोधून काढतो, आणी फोटोवर डोके ठेवून नमस्कार करतो, आणी आम्च्याकडे पाहून हसतो.
आणी स्वामी कुठे आहेत? असे विचारले की खोलीतील स्वामींच्या तसबिरीकडे बोट दाखवतो.

स्वामीहो
मंदार



Ultima
Friday, April 20, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ज्ञान म्हणजे तरी काय?..दुसर्‍याला पडताना पाहुन जो स्वत्:ला सांभाळतो, तो ज्ञानी स्वत्: पडल्यावर जो सांभाळुन चालतो तो अनुभवी आणि जो वारंवार पडुनही उन्मत्तच राहतो तो अज्ञानी

सत संगती ही आरशासारखी असते. मनुष्याला स्वत्:चे दोष त्यामुळे दिसु लागतात. अवनतीच्या खोल दरीत जायचे असल्यास काहीही धडपड करावी लागत नाही. मनाला मोकाट सोडले म्हणजे झाले. अत्मोन्नतीच्या उच्च शिखरावर आरोहण करायचे असेल्यास फ़ार श्रम पडतात. अधोगती सहज क्रिया आहे. गिर्यारोहण श्रमाचे चिकटीचे काम आहे.

कार्बन उलटा ठेवला की दुसरी काॅपी कोरीच राहते. तसे कान आणि मन दोन्ही ज्ञानोपासनेकडे नसल्यास जीव असंस्कारीतच राहतो. नुसत श्रवण नको, मनन चिंतनही हवं.

मीठाच महत्व आमटीला, बसुंदीला नव्हे.... नासायच नसेल तर बासुंदीने मीठापासुन कटाक्षाने दुर रहायला हव.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे, आणि कर्मात अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञान आणि भक्ती दोन्ही कोरडे आहेत. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचे ३ पदर म्हणजे "जानवं". या तिन्हीची एकत्र बांधलेली गाठ म्हणजे "ब्रह्मगाठ". कर्म-ज्ञान-भक्ती जेंव्हा एकजीव होतात तेव्हाच ब्रह्माची गाठ पडते.
५०० रुपयांच्या नोटेच्या जागी लहान बालकाल फ़क्त कागद दिसतो, तसा प्रपंच भासु लागला की मुक्ती दुर नाही.


Pillu
Wednesday, April 25, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shreeश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मी ऊद्या पासुन ईथे स्वामींवर रोज एक गीत सादर करणार आहे आशा आहे की स्वामी भक्तांनी यास प्रतिसाद द्यावा.


Pillu
Thursday, April 26, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

सर्व स्वामी भक्तांना एक विनम्र निवेदन

या वर्षी पुरषोत्तम मास ( अधिक मास ) मे महिन्यात येत आहे या निमित्ताने मांजरी व तळेगांव दाभाडे ( पुणे ) येथे स्वामी नाम मत्रंजपाचा सोहळा आयोजित केला आहे. हा एकुण जप ६ कोटी करावयाचा आहे. हे काम एकट्या दुकट्याचे नाही.
तेव्हा सर्वांना नम्र विनंती यात भाग घेऊन सहकार्य करावे. ज्या भक्तांना या सोह्ळ्यात भाग घ्यावयचा आहे त्यांसाठी खालील नियम आहेत.

१) जप कोणीही करु शकतो फक्त स्त्रियांनी त्यांच्या अडचणीच्या वेळी करु नये.
२)जप एका जाग्यावर बसुन हात पाय धुवुन करावा.

३) जर जप करीत असताना एकापेक्षा अधिक व्यक्ती अस्तील तर माळ एकाच्या हाती द्यावी अन जप मोजताना मात्र १ गुणीले जीतके भक्त असतील तितके मोजावे

४) जपाची नोंद रोज ठेवावी
५) जप झाल्यावर "तुमच्या दासाकडुन तुम्ही करुन घेतलेला तुमचा जप तुमच्याच चरणी समर्पित करुन घ्या . " असे म्हणुन स्वामींच्या चरणी थोडेसे जल समर्पीत करावे.
६) २८ दिवस जप केल्यानंतर मला खाली पत्यावर कळवावा हि विनंती
धनंजय हरिभाऊ गोहाड,
श्री स्वामी समर्थ मंदिर
घुले वस्ती,मांजरी रोड
पुणे ४१२३०७ फोन नं ०२० ६५८०९६
मोबाईल नं ९८२२६१४९५०





Pillu
Thursday, April 26, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


स्वामी म्हणे

( श्री स्वामींच्या उपदेश वचनांवरील काव्य )
स्वामी भक्त हो सप्रेम नमस्कार ठरविल्या प्रमाणे आज पासुन स्वामीक्रुपेने रोज एक स्वामी म्हणे या वचनावर काव्य लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रथम हे काव्य स्वामींचा ज्यांना सिद्ध हस्त लाभलेले श्री. माधव रावजी दिक्षित यांची आहे. आणि स्वामींच्याच ईच्छेने व दिक्षित काकांनी उदार अंत:करणानी दिलेल्या परवानगीनेच हे ईथे प्रसिध्द होत आहे.

श्री स्वामी समर्थ

ही काव्यरचना स्वामीभक्त श्री. गोपाळराव केळ्कर यांनी लिहिलेल्या स्वामींच्या बखरीमधे निरनिराळ्या प्रसंगी स्वामींनी उत्स्फूर्तपणे उच्चरिलेल्या वचनांवर आधारलेली आहे. स्वामी निरनिराळ्या व्रुत्तीत असताना भक्तांशी जे बोलत असत ते बोल स्वामींचे बोल त्यांच्या शैलीत कठोर अपशब्दांसकट कोणताही संकोच न बाळगता गोपाळरावांनी बखरीत लिहुन ठेवले आहेत त्या मुळे स्वामींचे व्यक्तिमत्व कसे होते याचा नेमका बोध होतो. हे गोपाळरावांचे स्वामी भक्तांवर अनंत उपकार आहेत.



हे बोलले शब्द भक्तांस स्वामी
मी भारवाही धनी ना कधी मी
स्वामी असे हा धनी बोलविता
"स्वामी म्हणे " या काव्यास कर्ता
स्फुरणास देई लिहिण्यास हाता
काव्याम्रुताचा प्रसाद भक्ता
घेतो जयाचे तया काय द्यावे
करां जोडितो भक्त मी भक्तिभावे
स्वामी एक विनंती नित्य चरणी द्यावी मला चाकरी
आनंदी उगि स्वस्थ घेईन मुखी जी द्याल ती भाकरी


Manakawada
Friday, April 27, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तन्वी, अत्यंत सुंदर लिहले आहे...

Pillu
Wednesday, May 02, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
पुष्प २ रे
साधकाला स्वामी कसे दिसतात नव्हे नव्हे भक्त स्वांमी मधे काय पहातात हे येथे कवीने अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे. पाहुयात काय म्हणतात

सर्व देवाधिदेवानां खल्विदं रुपदर्शनम
योगिराजेश्वरस्यैवं ध्यानं सर्वांग सुंदरम
भव्योदरं गणेशस्य मुलं ओमकार रुपकम
रामचंद्र्: महाबाहो आजानु उभयो करौ
विठ्ठलस्य इदं रुपम करौ द्वैहि कटिस्थितौ
भासते जगदंबा सा तस्य वक्षावलोकनात
दतात्रेय गुरोम्रुर्ति: पिनाकिन पार्वती पती:
वटव्रुक्षतले स्वामी निरलंबासने शिव:
उग्र म्रुद्रा विभूतिश्च निटिले गंध विभुषित्:
सर्वसंग परित्यागी कंठे रुद्राक्ष धारक्:
भगवान सरवसा च मुलपुरुष सनातन्:
व्याघ्रजिन स्थित स्वामी संन्याशी मुक्त वे मुनी:
इतीध्यानं समर्थस्य ह्र्दये सस्थितो स्तु मे


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators