Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 06, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 06, 2007 « Previous Next »

Mahesh
Tuesday, April 03, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कधीतरी डोकावत असतो. पण सद्ध्या वाईट्ट बिजी बिजी चालू आहे.
त्यामुळे लिहिणे लांबच वाचायला पण वेळ होत नाही बरेचदा.


Swapnanaik
Tuesday, April 03, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, तुमच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत मला. पण सध्या ख़ुप काम आहे त्यामुळे वेळ मिळत नाहीय.

Anamikaa
Tuesday, April 03, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम सग़ळ्या बापु भक्तांना नमस्कार!
कुणाच्याही श्रद्धेल तडा देण्याचा अथवा कुणाला दुखवावे या हेतुने मी हे लिहित नाहि आहे याचे स्पष्टिकरण आधिच देते.
नविन नविन जेंव्हा" बापु" लोकांना ज्ञात होत होते आणि ते माझ्यासाठी अज्ञात होते तेंव्हा.
मी एकदा दादरला माझ्या आत्याकडे गेले होते.
तिथे जी sportsshops आहेत तेथिल एका दुकानात मी माझ्या लेकासाठी sportshoes विकत घेण्यास माझ्या आत्येभावसोबत गेले.दुकानात एक फोटो लावलेला दिसला आणि त्या फोटोची एक व्यक्ति पुजा करत होता.मला समजले नाहि आणि मी फ़क्त भावाल इतकेच विचारले कि अरे हा तर त्या गुंड "अरुण गवळी" चा फोटो आहे ना? मग काय ईतके वाईट दिवस आलेत कि अश्या लोकांचे फोटो दुकानात लावुन पुजा करावि लागतेय?. दुकानदाराने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला ते बघुन भाऊ इतका घाबरला कि त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि ओढतच मला बाहेर आणले मी त्याला वैतागतच विचारले कि अरे बाबा झाले काय असे? तर म्हणाला त्या दुकानदाराने बदडले असते तुला!मी एकदम अवाक झाले मला कळेना कि असे मी काय बोलले कि त्या दुकानदाराला एव्हढे जिव्हारी लागावे.
नंतर भावाने सांगितले की तो फोटो "अरुण गवळी "याचा नसुन "अनिरुद्ध बापु" यांचा आहे. माझी फ़क्त दातखीळी बसायची बाकि होती.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अनामिका!


Savyasachi
Tuesday, April 03, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

haha... anamika, lol... arun gavali ! mishya tari tashach ahet.

Disha013
Tuesday, April 03, 2007 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका,सेम पिंच! मीही पहिल्यांदा पाहिला ना अनिरुद्ध बापुंचा फोटो मलाही अरुण गवळीचीच आठवण झाली होती.

Anamikaa
Thursday, April 05, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यासाची दिशा
"बापु" आणि अरुण गवळी यांच्या चेहर्‍यात खरच खुप साम्य आहे. मला अजुनहि कधि त्यांचा फोटो दिसला कि हसायलाच येते.
मागे नवाकाळ मधे "बापु" च्या अनुयायांचे अनुभव कथन असायचे त्यात एक अनुभव मला तरि जरा विनोदि वाटला.
एका मुलिने लिहिले होते कि ती तिच्या १२वि च्या परिक्षेसाठि निघालि होति. train मधुन प्रवास करतान तिला वाटले की तिचे hall ticket ती घेण्यास विसरली आहे. परत घरि जावुन घेवुन येणे तिला शक्य नव्हते कारण घर बरेच लांब होते म्हणुन तिने तसेच परिक्षाकेंद्रावर जायचे ठरवले. तिने घाबरुन "बापु"चे नामस्मरण करण्यास सुरुवात केली. काहि वेळाने जेंव्हा ती परिक्षा केंद्रावर पोहोचली तेंव्हा तिने पर्स मधे बघितले असता तिला तिचे hallticket पर्स मधेच सापडले. तिने हायसे वाटुन तिने बापुं"चे आभार मानले. आणि त्याक्षणा पासुन ती बापु"ची परम भक्त झाली.
हे वाचुन माझी हसुन हसुन पुरेवाट झाली.कारण असेच काहिसे माझ्या बाबतित १२वीत असताना घडले होते.(आता तेंव्हा स्मरण करायला बापु" नव्हते आणि असते तरि मी नामस्मरण केले नसते हा भाग वेगळा)
आता तीचे तथाकथित विसरलेले hallticket काय बापुंनी आणुन तिच्या पर्स मधे ठेवले असेल का?याला मुर्खपणा नाही तर काय म्हणायचे?१० वी, १२वी च्या परीक्षांच्या दिवसात तणाव असतो म्हणुन असे प्रकार घडतात इतकेच! यात बापुंचा साक्षात्कार कुठुन आला?

"अनामिका"


Savyasachi
Thursday, April 05, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका, वाईट एवढच आहे की तशी माणस खरच असतात. इतकी अंधश्रध्धाळू. आणि वर भांडतात पण की तेच कसे बरोबर आहेत आणि आपल्याला कसे कळत नाही. बा मुला, तुला काय कळणार परमेश्वराची लीला वगैरे वगैरे... :-)
बाकी, बापुंचा लेदर बेल्ट, पन्ट शर्ट असा फोटो पाहून त्यांना चुकून कोणितरी बापू केले अस वाटत.


Anamikaa
Thursday, April 05, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेच तर सव्यासाची,
अरे कुणाला "गुरु" मानु नये असे मी म्हणत नाही फ़क्त त्याचे अवडंबर आणि स्तोम माजवु नये इतकीच अपेक्षा.सध्या कायस्थ समाज बर्‍यापैकी "बापुं"चा अनुयायी आहे. एरवी पैसे नाहित म्हणुन बोंबलणारे माझे काहि ओळखितले लोक बापुंचे प्रवचन ऐकण्यासठी प्रसंगी हजार रुपयाचे तिकिट विकत घेवुन हजेरी लावतात.
माझ्या जवळच्या नात्यातल्या एकाने नविन घर घेतले म्हणुन वास्तुशांतिला मला बोलावले. नविन घरी गेल्यावर पाया पडायचे म्हणुन देव्हार्‍याजवळ गेले तर देव दिसेनात फ़क्त एक फोटो दिसला.कुणाचा ते कळेना म्हणुन शेवटि न राहावुन काकांना विचारले तर समजले कि तो "अनिरुद्ध बापुं"चा फोटो आहे त्यांच्या बरोबर फोटोत अजुन दोन व्यक्ति आहेत त्या कोण असे विचारले असता उत्तर आले की त्यांच्या बायको आणि मित्राचा
मी पण भोचक त्यांचा फोटोत असण्याचा काय संबंध असा प्रश्न विचारला असता नापसंती दर्शवत आणि कपाळाला आठ्या पाडत त्यांनी "श्रीराम (बापु),लक्ष्मण(मित्र) ,सिता(अर्धांगिनी)"यांचा अवतार असल्याचे सांगितले.मी अवाक झाले मला डोक्यावर हात मारुन घेण्याव्यतिरिक्त इतर काहि प्रतिक्रिया देणे त्याक्षणी सुचले नाहि. मुर्खपणा आणि सुशिक्षित अज्ञानी या शिवाय इतर शब्द मलातरी सुचत नाही.
"अनामिका"


Swapnanaik
Friday, April 06, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका,
प्रथम म्हणजे हा बापू भक्तांसाठी चालू केला होता त्यामुळे ज्यांना आपले फ़क्त विचार लिहायचे असतिल त्यांनी ते मधे लिहावे असे मला वाटते
बापूंना मानणे अथवा न मानणे हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. त्यामुळे जे त्यांना मानतात त्यांची खिल्ली उडवणे ह्यालाही 'शहाणपणा सुशिक्षितपणा' म्हणतात असे मला वाटत नाही.
जे बापुंना मानतात, ते आज बापुंना अनुसरून खुप काही समाजसेवा करत आहेत. त्यांना मुर्ख म्हणणारी माणसं फ़क्त बडबड करण्यापलिकडे काही करतात असं मला वाटत नाही


Mahesh
Friday, April 06, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, तुम्ही मुळ मुद्दा लक्षात घेत नाही आहात.
समाजसेवा वगैरे चांगल्या गोष्टींबाबत कोणाचे दुमत नाही, पण त्याचे दैवीकरण करून अंधश्रद्धाळू अवडंबर वाढविणे योग्य वाटत नाही. श्रद्धा असणे केव्हाही चांगलेच की. लोकांची तशी श्रद्धा अनेक समाजसेवकांवर होती अजुनही आहे. गाडगेबाबा, ई. लोक काय कमी समाजसेवक होते की काय ? पण त्यांना कोणी देवत्व नाही बहाल केले. मागे कोणी तरी याच बोर्डवर लिहिले आहे की समर्थ, गोंदावलेकर महाराज, ई. लोकांना नाही का देवत्व मिळाले ? तेव्हा मी विचारात पडलो की खरे आहे पुर्वी जर खुप चांगल्या लोकांना संत, अवतार मानले गेले, तर आजच्या काळात असे होत असेल तर बिघडले कुठे ? पण पुढच्याच क्षणी मी तो विचार झटकून टाकला, कारण पुर्वीच्या लोकांची ज्ञानमत्ता, महत्ता आणी अधिकार आजकाल कोणाकडेच तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. त्या लोकांचे सर्वात मोठे लक्षण होते ते म्हणजे निस्वार्थीपणा आणी सत्ता, संपत्ती, किर्तीचा मोह नसणे.
आता कोणी विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर लगेच जाणवते की या व्यक्तीमधे खरोखरच काही विशेष गुरुत्व आहे. मला तरी अनिरुद्ध जोशींचे फोटो पाहून अजुन तरी असे काही वाटले नाही. याचा अर्थ असा नाही की ते महान नाहीत, ते एक चांगले समाज सुधारक असतील पण अवतार, ई. गोष्टी जरा अती वाटतात.
येथे कोणी लिहिले आहे की ते स्वताहा तसे मानत नाहीत, म्हणत नाहीत, तसे असेल तर नक्कीच चांगले आहे, पण त्यांनी लोकांना देखील असे मानण्यापासून परावृत्त केले तर अजुन चांगली समाज सुधारणा होवू शकेल. समाजात श्रद्धा आणी अन्धश्रद्धा यामधे नेहेमीच गल्लत होत असते.
असो जे चांगले घडत असेल त्याला कधीच कोणी विरोध करणार नाही, करू नये, पण याही पुढे जाऊन जे चांगले आहे ते अधिक चांगले कसे होवू शकेल हेही पहावे.
जर माझे विचार चूक असतील तर योग्य मार्गदर्शन करावे. धन्यवाद.


Swapnanaik
Friday, April 06, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सगळ्या गोष्टींसाठीच मी मागेही लिहीलं होतं की नुसते असे 'BB' लिहत बसण्या ऐवजी वांद्र्याला साई निवासला जाऊन का येत नाही? दुसर्‍यावर नसला तरी सगळ्यांचा स्वत्:वर तर विश्वास आहे ना? मग स्वत्: जाऊन शहानिशा करवी. आणि ते ही करायचं नसेल तर उगाच कुणाच्या भावना का दुखवायच्या?


Nandini2911
Friday, April 06, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाजी.. हा बीबी पब्लिक फ़ोरम आहे. त्यामुळे इथे येऊन कुणीही आपले मत मांडू शकतो, आपण इथे फ़क्त बापू भक्तानीच लिहावे असे म्हणत असाल तर ते चूक आहे. श्रद्धा ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. यात दुमत नाही. पण श्रद्धा आणि अंधश्रध्दा यात फ़रक आहेच ना..
बापूचे जर कार्य सामाजिक असेल तर त्याना विष्णुचा अवतार कुणी केलं? पेन, अंगठ्या आणि लॉकेट विकून कुठले सामाजिक कार्य किंवा धार्मिक कृत्य होते?
जर बापू इतकेच तळमळीने समाजासाठी काम करायचे असेल तर ते अध्यात्मिक मार्गदर्शन का करतात?
वहीवर "राम" आणि "श्री अनिरुद्धाय नम:" ही वाक्ये लिहायला कुणी सुरुवात केली?

महेशजीनी तुम्हाला बरेच प्रश्न विचारले होते. त्यात माझी भर...
पण तुम्हाला उत्तरे द्यायला वेळच नाहिये ना.... काय करणार?
तो पर्यन्त चालू द्या...


Nandini2911
Friday, April 06, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाजी.. रत्नागिरीला बापूचे एक मंदिर उभारले आहे. त्याच्या उद्घाटनाला बापू खुद्द आले होते. आणि मी त्याना "प्रत्यक्ष" भेटले आहे कारण माझ्या पेपरच्या वतीने मी तो कार्यक्रम कव्हर केला होता. बापू व्यक्ती म्हणून मला चांगले वाटले. पण "रामाचा" अवतार? वर त्याची धर्मपत्नी... सीतेचा अवतार? सुचित"दादा"बद्दल बरंच आलं आहे म्हणून...
आता राहिलं समाजसेवेबद्दल... तुम्हाला असं म्हणायचं का कि फ़क्त बापूभक्तच समाजसेवा करतात आणि आम्ही मजा बघतो?
कारण तुम्हीच तर म्हटलय की.. "जे बापुंना मानतात, ते आज बापुंना अनुसरून खुप काही समाजसेवा करत आहेत. त्यांना मुर्ख म्हणणारी माणसं फ़क्त बडबड करण्यापलिकडे काही करतात असं मला वाटत नाही "

For your Kind INformation बापूच्या येण्याआधी ही समाजसेवक होते आणि राहतील... डॉ अभय बंग, प्रकाश आमटे कुठल्याही बापूच्या आदेशावरून काम करत नाहीत.

आता माझ्याविषयी म्हणाल तर मी समाजसेवा करत नाही.. पण होईता होईल तितके समाजचे ऋण मात्र फ़ेडायचा प्रयत्न करते.


Swapnanaik
Friday, April 06, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही पत्रकार आहात हे ऐकून चांगले वाट्ले. तुम्ही रत्नागिरीला जाऊन पुर्ण कार्यक्रम कव्हर केला आहेत.
बापुंकडे जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ते अवतार वाटतात. तुम्हाला वाटत नाही त्यात एवढे काय? या जगात फ़क्त बापु भक्तच सेवा करतात असं नाही. पण हे ही खरंच आहे की तिकडे येणारा अगदी प्रत्येक माणूस त्याच्या परीने जितकी होइल तितकी सेवा करतो.
You must be knowing 'Aniruddha Academy of Disaster Management' and its contribution during floods and all other events. Who are the people in AADM? The common people like you and me only right?
If you are really interseted in knowing Bapu and what he does you can go to Bandra New English school on thursdays and ask any of the person who comes there for why he comes there ...
Regarding Bapu being 'reincarnation' of 'Ram' you are best person to get info ... you are journalist .... it will be helpful for whole society if you present facts .... isnt it??

Nandini2911
Friday, April 06, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yeah sure.. why not... Now its my responsibility to present the facts.. Thats a very clever thing to say but .. Sorry mam I have other works to do. I have already said that, I am against the kind of commercialization behind this person called BAPU.

बापुंकडे जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ते अवतार वाटतात. तुम्हाला वाटत नाही त्यात एवढे काय?
म्हणजे मी काय व्यक्ती नाही असं वाटलं का तुम्हाला? दिवे घ्या...

इथे बापूभक्तानी चालवलेल्या सामाजिक उपक्रमाची नव्हे तर बापू "देवाचा" अवतार आहेत का याचा खुलासा तुम्हाला विचारला होता. साधारणपणे महिन्याभरापूर्वी.. त्या प्रश्नाना उत्तरे देण्याचे तुम्ही टाळत आहात आणि एकसारखे "समाजसेवा" हा जप म्हणत आहात..
तेव्हा जरा महेशजीच्या प्रश्नाना उत्तरे द्या...
आता वेळ असेल ना तुमच्याकडे? नाही म्हणजे समाजसेवेत बिझी असाल तर वाट बघतो आम्ही अजून...
झक्की काका तुमचे ऐकूनच.. धीर धरी धीर धरी...


Swapnanaik
Friday, April 06, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

for your kind information ... i am not avoiding it ... as you also said ...even i have other works to do ... i will feel very happy to give all those details and i will surely give ... and yess i am busy with doing social work too ... may be not they way you must be doing ... in mean time you can try going to Sai Nivas in Bandra(W) and meet Appasaheb Dabholkar (if you wish to and find time from doing other work ) ... he will be best person to give all answers for your questions including the reincarnation and social work too ...
Best Regards...

Anamikaa
Friday, April 06, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाजी!
तुम्ही बापुंचे अनुयायी असावे वा नसावे हा तुमच वैयक्तिक प्रश्न आहे.मला त्या बद्दल आक्षेप घेण्याचा अजिबात अधिकार नाहि मान्य. मी तो घेवु इच्छित देखिल नाही. मी जे काहि लिहिले आहे ते स्वानुभावावरुन लिहिले आहे. बापु समाजकार्य करत असतिलही अर्थात मला तरि अजुन कुठे असे अढळलेले नाहि.
असो पण मी स्वतच्या कर्मावर विश्वास ठेवणारि व्यक्ति आहे. प्रत्येक व्यक्तिला कुणी तरि मार्गदर्शक त्याहीपेक्षा दिशादर्शक हा हवाच असतो. आणि तो कोण असावा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. समाजसेवा हि घराबाहेर पडुनच करायला हवी हे जरुरि नक्किच नाहि.ज्या समाजात आपण रहातो त्याहीपेक्षा ज्या घरात आपण राहतो त्या घरातिल वडिलधार्‍या माणसांशी आपुलकीने आस्थेने वागुन त्यांची काळजी घेणे हे देखिल एक सामाजिक कार्यच आहे असे मी मानते.
माझ्या माहितित काहि अशी माणसे आहेत जी बापुंचे अनुयायि आहेत पण प्रत्यक्षात मात्र त्यांचे वर्तन माणुसकीलाही काळिमा फ़ासणारे आहे.
स्वतच्या ७० गाठलेल्या सासुसासर्‍यांना दोन वेळचे पोट्भर जेवण आर्थिक परिस्थिति नाहि या सबबि खाली नाकारणारे महाभाग बापुंच्या प्रवचनासाठी १००० रु खर्च करु शकतात अश्या व्यक्तीना काय म्हणाल?... स्वतःची आई हॉस्पिटल मधे अत्यावस्थ असताना आणि नातवाला भेटण्यासाठी व्याकुळ असताना भेट नाकारणारे देखिल या मधे आहेत.
प्रवचनाच्या नावाखाली चार टाळकी गोळा करुन टवाळक्या करायच्या आणि दुसर्‍याच्या उखाळ्यापाखाळ्या काढायच्या याला समाजकार्य म्हणत नाहित. असो बापुंच्या अनुयायांत माणसाला माणुस देखिल न मानणार्‍यांचा भरणा जास्त असेल तर त्यात बापुंचा दोष खचितच नाही. मी तुम्हाला असे कैक दाखले देवु शकते पण जावु दे!
मला जे वाट्ले ते मी लिहिले यात कुणाच्या भावना दुखावल्या जाव्यात हा माझा उद्देश नाही.
पण जेंव्हा मानसिकदृष्ट्या कमकुवत असतो तेंव्हाच अश्या गोष्टिंच्या भजनी लागतो. "रामाचे" नाव घेवुन लोकांची दिशाभुल करणे कितपत योग्य आहे? हिंदुधर्माची दुरावस्था होण्यास हे देखिल काहीप्रमाणात जबाबदार नाहित काय?.

अनामिका"


Savyasachi
Friday, April 06, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे खुपच अंधश्रद्धा आहे. आणि लोक कधीच बधणार नाहीत हे मी अनुभवले आहे. ते या गोष्टीसाठी भरपूर पैसा खर्च करतात आणि करत रहातील. तर मग बापू जर त्याचा फ़ायदा घेऊन पैसे काढून त्यांचा चरितार्थ आणि उरलेले 'सगळे' पैसे समाजसेवेसाठी वापरत असतील तर मला तरी काही गैर वाटत नाही.
पण अनामिकाने म्हटल्याप्रमाणे काही घडत असेल तर त्या भक्ताची कानऊघडणी पण जरूर करावी बापूंनी. प्रवचनातून ते ही गोष्ट नक्कीच साध्य करू शकतील. मी कोणाचाही अवतार नाही हे ही प्रवचनातून सांगू शकतील. (त्याचा फ़ारसा फ़ायदा नाही पन जे काय १ २ टक्के होईल तो).
बाकी राम सिता आणि लक्ष्मण... हेहेहे.. कहर आहे. अरे पण मग तुम्ही रामालाच का भजत नाही?


Savyasachi
Friday, April 06, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

anamika ur last words are perfectly true. manasik drushtya kamakuvat...

Nandini2911
Friday, April 06, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक कळत नही... या स्वप्नाजी सारखं त्या साई निवास ला भेट द्यायला का सांगत आहेत? आणि प्रश्नाची उत्तरे देण्याऐवजी उगाच मुद्दे का फ़िरवत आहेत?

मी समाजासाठी काहीही करत नही फ़क्त माझे ऋण फ़ेडण्याचा प्रयत्न करते.. हे लोक मात्र समाजाची सेवा कराय्चा इतका आव आणतात की बास्स,, अनामिका तुम्ही दिलेली उदाहरणे पुरेशी आहेत.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators