Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 19, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through January 19, 2007 « Previous Next »

Ajjuka
Thursday, January 18, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली बाई,
कृपया मला यापुढे मेल करू नका. जे काय आरोप करायचे ते इथेच आणि उघडपणे करा. मी वर म्हणालेय तसं.. जे पटतं त्याला चिकटून रहायची हिंमत आहे माझ्यात. तुम्ही हसा नाहीतर शिव्या द्या.


Ajjuka
Thursday, January 18, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि १८,
खरंतर गरज नाही explain करण्याची पण तरीही
I do not see what point you are trying to make by posting these messages. Do you feel this person should close this BB?
मी इथे लिहू नये असे तुम्ही सुचवता आहत का? थोदक्यात 'हे सदर फक्त बापू भक्तांसाठी आहे.' हेच सांगायचय का तुम्हाल? शर्करावगुंठीत?

थोड नीट वाचलत तर लक्षात येईल तुमच्या की 'माझं हसू होतंय' अशी भिती या बाईंनी घातलीये त्यांच्या एका पोस्ट मधे म्हणूनच केवळ मला त्याची भिती नाही हे म्हणालेय मी. आणि मी त्यांना भक्ती करू नका असे सांगितल्याचे कुठे दिसत नाहीये तेव्हा उगीच you should also accept right of other people to follow the same for the principle that they believe in हे मला म्हणण्यात काय अर्थ आहे?

असो..


Mansmi18
Thursday, January 18, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A question cannot be answer to a question.

I asked you a simple question..
What point are you trying to make by your messages?

I am not sugar coating anything or trying to tell you anything. If you read my message carefully, I have suggested to you as well as this board creator to respect each others view thats all.

Aso. Sudnyas adhik sangale nalage.

apala namra

Storvi
Thursday, January 18, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नेहमी एक प्रश्न पडतो... कुठलाही प्रचार करायचा असला की कोण लोक त्यात आहेत त्याचा का गाजावाजा केला जातो? म्हणजे BJP चा प्रचार करायचा असेल तर, Army मधली वरच्या हुद्द्यावरची माणसे कशी त्यांचे समर्थन करतात, तसेच बापू वगैरे सार्ख्या पंथांचे अमुक उच्चविद्याविभुशित माणुस कसा अनुग्रही आहे वगैरे असले प्रचार असतात. त्याने काय साध्य होते कोणास ठाऊक? बापूंबद्दल मला नेहमी एइकवण्यात येतं की ते Doctor असुन हे सगळ करतात त्या अर्थी त्यात तथ्य असल पाहिजे.. काय सम्बंध?? एरवी doctor जेंव्हा सांगतात मुलांना एका वर्षाच्या आत मध देऊ नये तेंव्हा ' आम्ही नाही का कायम देत आलो, त्या dr. ला काय कळतय ' :-O
असो.. मी गरोदर असतांना मला एकांनी बापुंच्या कडचे कसले तरी भस्म दिले होते, ते रोज लाव आणि सकाळी बापुंचे नामस्मरण कर, म्हणजे सगळे व्यवस्थित होइल... NCT
:-O

Peshawa
Thursday, January 18, 2007 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलाही प्रचार करायचा असला की कोण लोक त्यात आहेत त्याचा का गाजावाजा केला जातो? म्हणजे BJP चा प्रचार करायचा असेल तर, Army मधली वरच्या हुद्द्यावरची माणसे कशी त्यांचे समर्थन करतात, तसेच बापू वगैरे सार्ख्या पंथांचे अमुक उच्चविद्याविभुशित माणुस कसा अनुग्रही आहे वगैरे असले प्रचार असतात. त्याने काय साध्य होते कोणास ठाऊक?>>>

This is the following type of fallacy in reasoning


quote:

APPEAL TO AUTHORITY: (ipse dixit also called ad verecundiam sometimes) attempts to justify an argument by citing a highly admired or well-known (but not necessarily qualified) figure who supports the conclusion being offered.




Many people fall for it. the examples are numerous. consider Noam Chomsky (I know this would be a controversial example) who is considered as Einstein when it comes to languages and its structure. This authority is looked upon when his comments on US foreign policy are debated. His work on policy is not academic in nature (many published books and public debates but as far as I know no academic research papers and all) but there is a cult that follows him (most of them intellectuals/activists) and he is cited quoted by many activists (Arundhati Roy being one amongst many) to prove a point on US policy.


Peshawa
Thursday, January 18, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://beta.communities.msn.de/AniruddhaBapu/shrianiruddhsharnammam.msnw?albumlist=2 >>>
hmm interesting ...

Mahesh
Friday, January 19, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा कोणताही गैरसमज झाला नाही आणी होणार पण नाही.
मला एकच कळते, की जी व्यक्ती स्वतचा उदोउदो करवून घेते, ती व्यक्ती नक्कीच संत महंत असू शकत नाही. आता हे बापू खुप चांगले समाजसेवक असतीलही, पण ते पैसे वगैरे घेणे काही पटले नाही. कोणी स्वखुशीने देत असेल आणी ते सुद्धा समाजकार्यासाठी तर ठीक आहे.
श्रद्धा असावी, अंधश्रद्धा असू नये ईतकेच.


Ajjuka
Friday, January 19, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, स्टो... एकदम पटले..
yes महेश.. ही बाजू आहे नि ती कळावी लोकांना ह्यासाठीच हा खटाटोप.. पण it seems काहींना त्रास होतोय त्याचा.. ते विचारतात तुम्ही खर्‍या गोष्टी सांगून काय मिळवताय..
असो.. लिंक पाह्यली.. काय विनोदी आहे.. महेश, तुम्ही पण पहा ती लिंक.


Limbutimbu
Friday, January 19, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> आता हे बापू खुप चांगले समाजसेवक असतीलही, पण ते पैसे वगैरे घेणे काही पटले नाही
महेश, माझा काही या बापू किन्वा बुवा आणि साधुन्शी सम्बन्ध आला नाही, यायची शक्यताही खुपच नगण्य हे!
पण.........
उगाच चार लोक नाव ठेवतात, नाव ठेवण्याची क्रेझ हे तर आपणही त्यात सामिल होऊन, चार चौघान्सारख बोलणही मला जमत नाही, भले मी खड्या सारखा बाजुला वेगळा पडलो तरी......!
हे केवळ तुम्हालाच मुद्दामुनच सान्गतो हे.......! एनिवे
एक गोष्ट सान्गतो.......
फार फार वर्षान्पुर्वी, म्हणजे स्वातन्त्र्य मिळण्याच्याही आधी, एक थोऽऽर स्वातन्त्र्य सेनानी होऊन गेला.....!
त्याच नाव नेताजी सुभाषचन्द्र बोस!
कॉन्ग्रेसी धरसोडीच्या राजकारणाला कण्टाळुन, आणि अध्यक्ष म्हणुन निवडुन आल्यावर केवळ "महात्म्याच्या" अन "चाचाजीन्च्या" दबावामुळे एकही जण कार्यकारीणीचा सदस्य म्हणुन यायला तयारच होईना म्हणुन कॉन्ग्रेसचे अध्यक्षपद सोडावे लागल्यावर या गृहस्थान्नी स्वतन्त्र मार्ग चोखाळला, इतिहासाच्या पुस्तकात त्यान्च्याबद्दलची अगदी तुरळक माहीती या देशीची बालके शिकत असतील, ती रिपीट करीत नाही........!
तर हे गृहस्थ जेव्हा जर्मनीतून भौगोलिक अडचणि आणि भरीव सहाय्याच्या कमतरतेमुळे काही करणे अशक्य दिसल्यावर पाणबोटीतून जपान अन्कीत भागात गेले (नेमके कुठे तो तपशील आठवत नाही) त्यानन्तर ते ब्रह्मदेशापर्यन्त आले.....
ठीकठिकाणि चन्दा इकठ्ठा करण्यासाठी ते सभा घेत..... त्यान्च्या गळ्यातल्या हारान्चा लिलाव होई.......
वरील केवळ टीकेकरीता टीका म्हणुन वापरलेली बापुन्बद्दलची तर्कदुष्टता नेताजीन्च्या बद्दलही तशीच लावावी लागेल नाही का?
तुमचे उत्तर होय असेल तर माझी ही पोस्ट "वाया" गेली असे मी समजेन,
तुमचे उत्तर नाही असेल, तर एकच सल्ला देईन, जग बोलतय, चार चौघे जण / जणि येवुन फॅशन म्हणुन किन्वा त्यान्ची मते तशी म्हणुन टीकेचा भडीमार करताहेत, केवळ तसल्या तर्कदुष्टतेला ग्राह्य धरुन स्वतःचे मत बनवु नका.....
अधिक काय लीहू?
तुम्हाला माझ्या पोस्टचा राग येणार नाही अशी आशा करतो! :-)
बाकीच्यान्च सान्गवत नाही....!
DDD

Limbutimbu
Friday, January 19, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> वैशाली तुमची रास मकर किंवा तुळ आहे काय? कारण ह्या राशीचे लोक भोंदुगिरी, बुवाबाजी ला बळी पडतात व त्यांना ते कळत नाही.
अरे केदार, आत्ता मुडी हवी होती इथ! :-) ती नेमक सान्गु शकली अस्ती!
मकर व तूळ ऐवजी तुम्ही कर्क व कन्या अशी उदाहरने दिली असतीत तर चालले अस्ते!
मकर ही रास "ठेविले अनन्ते तैसेची रहावे" या वृत्तीची असते तर तूळ "उण्टाच्या पाठीवरच्या ओझ्यावर शेवटची काडी पडेस्तोवर" बॅलन्स्ड असते असा आमचा अनुभव हे!
निरीश्वरवादी किन्वा नास्तीक हे सर्वसाधारणतः वृश्चिक वा मकरेचे वा मेषेचे आढळतात!
मात्र यात राशिन्पेक्षा कुन्डलीत असलेल्या ग्रहान्चा सम्बन्ध जास्त असतो की कोण दैववादी, कोण कर्मवादी, कोण नास्तिक वगैरे वगैरे...
हा या बीबीचा विषय नाही.... आणि माझा त्यावर जास्त अभ्यासही नाही, हव तर राशीचक्रच्या शरद उपाध्येन्चा कार्यक्रम बघावा, ते बहुतेक माझ्याच राशीचे हेत......!
त्यामूळे येवढेच...
बाकी चालूद्या!
(सावधगीरीची पुणेरी सुचना: कृपया आता बापुन्ना सोडुन कुन्डली बघणे कसे चूक यावर धाड घालू नये!
) DDD

Bhramar_vihar
Friday, January 19, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बापु म्हणे आधि साइबाबांचे अवतार होते. पण यात गोची अशी की त्यांची बायको (नंदाई) आणि त्यांचा परमशिष्य (सुचितदा) यांना काहीच scope राहिला नाही. म्हणुन मग ते विष्णूचा अवतार वगैरे! ह्या बापुंचे एक slogan आहे, तू आणि मी मिळुन शक्य नाही, अस या जगात काहीही नाही. आता हा "मी" कोण? तर्त डॉ. जोशी जे KEM मधे काहीतरी गफला केला म्हणुन बदलापूरला गेले आणि तिथे डॉक्टरकी करता करता रोग्यांना आपल्या नादी लावु लागले. यांच्या सुरस आणि चमत्कारीक कहाण्या किती ऐकाल? काय तर म्हणे एका बाईचा हात भाजला. बापुंनी त्यवर आपला हात फिरवला आणि तो बरा झाला. मग हे बापु हॉस्पिटलना का नाही भेटी देत ही treatment द्यायला? मधे वाचल होत की या सुचितने एका बाईचा विनयभंग केला म्हणुन! हा शेष भगवान!

Limbutimbu
Friday, January 19, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही मोजकेच, आपल्या शब्दसामर्थ्याच्या आणि तुटपुन्ज्या वा भरीव ज्ञानाच्या, वक्तृत्वाच्या बळावर "ऐकणार्‍यास" धडे देतात व त्याबद्दल फुल ना फुलाची पाकळि म्हणुन मोबदला घेतात!
काही जण आपल्या लेखन कौशल्यावर कथा, नाटके, इतरान्ची वा स्वतःची चरीत्रे, कविता वगैरे वगैरे लिहून प्रसिद्ध करतात व मोबदला घेतात!
काही जण खरी खोटी स्वप्ने विकतात........! लेखन, वक्तृत्व, नाटक, शिणेमा, गाणी..... अशा असन्ख्य प्रकारे बरेच जण स्वप्ने विकतात.......! तेव्हा ते सर्वजण लेखक, कलाकार, आर्टिस्ट, दिग्दर्शक, निर्माते, गायक वगैरे वगैरे पूजनीय असतात.......!
मात्र जेव्हा एखादा बुवा किन्वा बाई......! वर उल्लेखिलेल्या पहिल्या प्रकारातील मार्गदर्शन "विकतात" असे म्हणु किन्वा "करतात" असे म्हणु तेव्हा मात्र ते ढोन्गी कसे काय ठरतात? त्यान्चे ग्राहक "मूर्ख" कसे काय ठरतात?
जर ठरत असतील........
तर टीव्ही ला आम्ही काही मोजकेजण आधीच इडियट बॉक्स म्हणतो... तसच थेटरात जावून शिणेमे नाटके बघणारे आम्ही, पैशे देवुन सवाईला जावुन बसणारे आम्ही... आम्ही सगळेच मूर्ख होत!
तर्कदूष्टता करायचीच असेल तर वरील टिकान्ची सन्गती मी अशी लावेन........!


Princess
Friday, January 19, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, स्माईली मुळे गैरसमज झाला वाटते. पण माझा प्रश्न सरळच होता ग... मला विचारायचे होते आपल्याला पटत नाही ते आपल्या आइ वडिलाना किंवा मित्र मैत्रिणीना सांगणे सोपे असते पण सासरच्याना :-( म्हणुन मी म्हणाली की तू त्याना कसे सांगतेस.

पण एक बरे झाले मला बरीच माहिती मिळाली यातुन.

लिम्बु, सुभाषचंद्र आणि अनिरुद्ध बापु . नका हो असे करू :-(


Ajjuka
Friday, January 19, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकतायत तर विकताय म्हणा की सरळ..
देवाचा अवतार म्हणून कशाला बोंबलता?
हो आम्ही आपली कला विकतो. त्या त्या कलेचे ज्ञान पैसे खर्च करुन घेतो आणि त्या ज्ञानाच्या बळावर कष्ट करतो लोकांना एक illusionary experience देण्यासाठी, एक विषय मांडण्यासाठी. पण आम्ही देव व्हायला बघत नाही. माणूस च असतो.
इथे विकणारा देव बनलाय आणि त्याची कृती ही निव्वळ एका विक्रेत्याची न मानली जाता समाजोपयोगी मानली जाते आहे. आपण लुटले जात आहोत हे भान कुणालाही राहू दिले जात नाही. याचाच अर्थ ह्यामधे फसवाफसवी आहे. स्वतःचा बिनाभांडवली, शून्य उपयोगाचा धंदा चालावा म्हणून लोकांना गोलमाल भाषेत प्रवचनं देणं आणि त्यांना नाही त्या कुबड्या देऊन पांगळं व्हायला लावणं हा भ्रष्टाचारच की.
बापू नुसता नाही तर general च भोंदूगिरी हीच एक कीड आहे समाजाला लागलेली. जोवर आपण कमकुवत मनाचे आहोत तोवर ही कीड फोफावणार. आणि मला असं वाततं की ही कीड काढून टाकण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे.
पण याला तुम्ही fashion म्हणणार.. मी बापूचा भक्त आहे.. मी चूकीचा असूच शकत नाही या arrogance ला काय म्हणणार तुम्ही? भक्ती?



Ajjuka
Friday, January 19, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुभाषबाबूंनी पैसे कशासाठी गोळा केले? आझाद हिंद सेना स्थापण्यासाठी, देशाच्या कार्यासाठी.
अनिरूद्ध बापू पैसा कशासाठी गोळा करतो? लखो करोडो भक्त आहेत त्याचे. पण Income आणि सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा पैसा याचे प्रमाण १००:१ असे का? tax benefit मिळण्यासाठी industrialist ने charity साठी पैसे काढून ठेवावेत तसे हे झाले. मग तुम्ही देव कसे झालात? तुम्ही विष्णू, बायको लक्ष्मी आणि भाऊ का मेव्हणा शेषनाग.. हे कशासाठी?

एक नक्की.. हा बापू प्रचंड हुशार आहे.. सॉलिड जमलंय याला हे सगळं. भारतीय लोक कशानेही मूर्ख बनू शकतात हेच याने सिद्ध केलय परत..


Limbutimbu
Friday, January 19, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> एक नक्की.. हा बापू प्रचंड हुशार आहे..
चलाऽऽ, हे मान्य हे ना? गुड! :-)

>>>>भारतीय लोक कशानेही मूर्ख बनू शकतात
आयाईऽऽगऽऽऽ.....

प्रिन्सेस, दुसरी उदाहरण चिक्कार हेत, पण मला वेळेत आठवली नाहीत :-(
मी फक्त बीजगणितातले सूत्र चालविल्याप्रमाणे "युक्तीवाद" चालवुन बघत होतो :-)


Mahesh
Friday, January 19, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुटिंबु, मला तुमच्या लिहिण्याचा राग नाही,
पण तुम्ही ते विक्रिबद्दल जे लिहिले आहे ना ते तुम्हीच वाचुन बघा आणी मनाला पटते का ते सांगा.
जर कोणी counselling करत असेल आणी त्याची फी घेत असेल तर मान्य आहे. तसेच कोणी पत्रिका पाहून भविष्य पहात असेल आणी त्याचे पैसे घेत असेल तरी मान्य आहे.
पण ईथे नक्की कशाची विक्रि आहे ? बर पैसे घेणे न घेणे यापेक्षाही स्वतच स्वतचे उदात्तीकरण करणे हे अतिशय चुकीचे आहे.
जे संत होऊन गेले त्यांनी स्वतचा कुठे उदो उदो केल्याचे ऐकिवात आहे का हो ? ज्ञानेश्वर, तुकाराम, साईबाबा, ई. संतांनी कुठे असे भक्त जमा केले होते आणी त्यातुन खुप संपत्ती जमवली होती ?
माझाही या बापूंबरोबर काहीच संबंध नाहीये, पण मला जे वाटले ते लिहित आहे. चारचौघांप्रमाणे टिकेला टिका म्हणून नाही. उलट मला उत्सुकता होती म्हणून दुसर्‍याच मेसेज मधे मी माहिती विचारली.
मला आश्चर्य असे वाटते की, अ नि स चे ईकडे लक्ष का जात नाही ?
अजुनही लिहायचे आहे, पण सगळे एकाच मेसेज मधे नको लिहायला.


Neelu_n
Friday, January 19, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका तुम्हाला प्रचंड अनुमोदन. मलाही अश्या प्रकाराची प्रचंड प्रचंड चीड येते.
तुम्ही म्हणता ते अगदी १००% खरय.. लोकांना अश्या तर्‍हेने आपल्या कह्यात करायाला भरपुर हुशारीच लागते.. आणि त्यातही माझ्या पहाण्यात तरुण मुले ह्यात जास्त आहेत.. हे तर आपल्या समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.:-(
लिंबु भाउ तुम्ही म्हणतायत ते खरय की समाजात असे अनेक घटक आहेत जे आपल्याला सहज उल्लु बनवुन जातात. आणि आपलाल्या कळतही नाही आपण ते बनतोय ते.. पण त्यात बुवाबाजीचा वाटा सर्वाधीक होत चाललाय ही नक्कीच वाईट गोष्ट आहे की नाही? माझ्या माहितीप्रमाणे पुर्वी दादरला त्यांचे भजन व्हायचे. त्यानंतर आरती फिरवताना देणगी पेटीत प्रत्येकी १० रु. च घालावे अशी त्यांची सक्ती असायची. हे कितपत योग्य आहे??


Shyamli
Friday, January 19, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अयाई ग काय चाल्लय,
ओंकार रुप, विश्णु रुप ..

आणि समाज सेवा??????????? ही अशी?????????

बाबा आमटेंना भेटुन या म्हणाव जरा जाऊन

बा द वे आज्जुका तुझ्या सगळ्याच posts एकदम पटेश...
एकदम मुद्देसुद...



Yoga
Friday, January 19, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskar,
mi maaybolicha niyamit vachak aahe. hi site mala avadate. jagbhar vikhurlelya marathi manasala kuthetari dilasa milava, mayechi savali milavi ashi hi site aahe, ase maze mat hote. ho, hote. karan gelya 2 diwasapasoon mi baghtoya ki ithe vaiyaktik patalivar vadvivad chaalu aahe. he paahun vayeet vatate. pratek goshtila kaahitari maryada asate. parantu mala ek Sr. citizen mhanun ithe sangavese vatate ki aaplyakade asnarya ardhavat mahitivar koni konavar shintode vadavu naye. Mi mumbailach rahaat aslyamule Anirudha Bapunchya karyabaddal parichit aahe. tyanche anek chaangale upkram aahet. te swatah swatala dev anyatha konacha avatar manat naahit. agadi sarwasamanya manusach mantat. Mumbaila kinva itaratrahi ekhadya politics partychi meeting asel tar lokana paise devun sabhet gardi dakhavali jate. parantu Dr. Anirudha Joshina hyachi garaj bhasat naahi. te apalya karyacha prachaar karat naahit. bizi lifemule lokankade tevadha vel naahi, tarisudha tyanchya pravachanala gardi asate. karan tyamadhe kaahitari tathya aahe mhanunach. lokana kaahitari anubhav yeto mhanunach. aaj lakhochya sankhene tyanche bhakta aahet. kutlyahi gair margane kinva bhondugirine te paisa uklat naahit. aaj anek lokana tyani rojgar dila aahe. gramin bhagatil shala dattak gheun tethil mulanchya shikshanacha aani tyanchya itar garjancha bhar te uchlat aahet. tyanchya anek bhaktanpaiki konakadunahi te kapalala sadha gandhacha tilahi laun ghet naahit, haar turyancha prashna phaar lambchach. 26 July roji tyanche A.A.D.M's risk ghevun lokana madat karat hote, tyaanche pran vachavat hote. aajhi ganpati visarjan, sidhivinyak temple, mahalakshmi temple aani asha anek gardichya thikani tyanche A.A.D.M.'s Volentarsche kaam agadi chokhapane karat astat. Mumbaiche Police darvarshi tyanche sahay ghete. tumache saglyanche mail vachun mala kharach phaar kiv vaatali tumha sarvanchi. Mi swata ek patrakar aslyamule mala aani maaybolicha niyamit vachak aslyamule he sagale sangave lagat aahe. aaplyala naahi patat ekhadi goshta, thik aahe, sodun dyavi. tyavar vaadvivad karane aani swatahchach mhanan khare karane thambvave. jo aapala prant naahi tithe jane kashala. itar lekh lihun lokanch manoranjan kara. lokanshi sampark sadha. jenekarun aapli maayboli hi aapli raahil..
tumacha mitra.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators