Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 24, 2006

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through November 24, 2006 « Previous Next »

Maudee
Thursday, November 23, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो, मी आज परत एक माझी समस्या घेऊन आलेय इथे.

सर्व प्रथम मी ही समस्या तुम्हाला सांगण्याच कारण सांगते. मागे मी कुठल्या तरी एका पुस्तकात वाचल होतं. समर्थांच होत की गोंदवलेकर महाराजांच आठवत नाही. त्यात सांगितलं होत की कुठली समस्या जर आली आणि विचार करुनही उत्तर मिळत नसेल तर रात्री झोपताना देवाला समस्या सांगत जा. सकाळी उठल्यावर त्या प्रश्नाचं जे उत्तर प्रथम मनात येईल त्यानुसार वर्तन कर.
मी काल रात्री अशीच प्रार्थनाअ करून झोपले आआणि सकाळी मला असं वाटलं की हा प्रश्न इथे टाकावा.
neways , नमनालाच घडाभर तेल झालं
माझी समस्या अशी आहे की मी सध्या गितेच्या भावार्था वरच एक पुस्तक वाचत आहे. १०व्या अध्यायापर्यंत ख़ूप छान वाटत होतं. आता पर्यंत कधीही न वाचलेल्या गोष्टी पुढे बघून इतकी भारावून गेले होते. पण ११व अध्याय वाचला आणि सर्वच बिघडून गेलं. म्हणजे ११व्य्या अध्यायात ज्या विश्वस्वरुपाला बघून अर्जून घाबरला होता त्याच नुसतं वर्णन वाचूनच मी इतकी घाबरलेली आहे की विचारू नकात. मी पुढच पान वाचू शकत नाहीये... आणि त्या शिवाय दुसर्‍या कशाचा विचार करू शकत नाहिये. या घाबरलेल्या अवस्थेचा माझ्या बाळावर जे आता माझ्या पोटात आहे त्यावर कसा परिणाम होईल ही सुध्हाअ एक चिंता लागली आहे.
म्हणजे मी घाबरली आहे की confuse झाली आहे हेच मला कळत नाहीये.
मी असा विचार केला की देव हा असा आहे जो नियमाना मानतो. जर एकाने चूक केली तर तो त्याचा कितीका लाडका असेना त्याला चुकीची जाणीव आणि पश्चाताप झाल्याशिवाय तो सोडणार नाही. हा देवाअचा आणि सृष्टीचा नियमच आहे. या भवसागरातून सुटका होण्यासाठी बरेच मार्ग दिलेत कृष्णाने गीतेत. पण सर्वच अतिशय अवघड आहेत. आनि सुरुवात कुठून करायची हेही कळेनास झालय.
म्हणजे माहीत आहे की मुंबईला जायचय. तिथे जाण्यासाठी कस जाऊ शकतो ते सांगितलय पण नक्की कसं जाऊ train ने की बसने. बर घरातून बाहेर पडून पहिल्यांदा कुठे वळू म्हणजे मी योग्य मार्गावर पोचेल.
मी इथे माझा प्रश्न व्यव्स्थित मांडला आहे की नाही हेही मी ख़ात्रीपुर्वक सांगू शकत नाही.. i hope मी तुम्हा लोकानाच confuse केलं नाहीये.


Prashantnk
Thursday, November 23, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,
आपली ह्या बी.बी. वरील उपस्थिती प्रार्थनिय आहे. आपले सुरूवातीचे लेख मी वाचले आहेत.

आपल्याला एक कळकळीने सांगू इच्छितो, जर घाबरायचे असेल, तर फ़क्त परमेश्वरालाच घाबरावे. आपण mail मध्ये विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तेव्हा तो इथे परत विचारावा अशी नम्र विंनती.


Mrudgandha6
Thursday, November 23, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रशांतदादा,
अगदी सोप्प्या भाषेत सांगितले आहेस.. आणि मलाही पटतेय की ठराविक वेळेला रोज साधना करणे हे खरेच आवश्यक आहे.मी एकदा कुठेतरी वाचले होते.. की एखाद्या दगडावर एकदम पाणी ओतन्याने काही फ़रक पडत नाही परंतु,तेच त्या दगडावर रोज सतत एखदी संततधार सोडली तर तो दगडही भिजून त्यात पाणी मुरत जाते.तसेच असते रोजच्या साधनेचे.. लवकरच सुरु करतेय स्वामींच्या आशिर्वादाने. :-)


Princess
Thursday, November 23, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशंतदादा, मी इथे नेहमीच येते. आणि तुमचे लेख वाचते. तुम्ही, महेशदादा, पिल्लु, मृ सगळेच खुप छान लिहितात. भक्तीरसात न्हाउन निघते इथे आल्यावर मी.

मला एक विचारायचे आहे, देवपुजा करताना माझे चित्त खुपदा विचलित होते. म्हणजे, माझा लहान बाळ काय खेळतोय, त्याने तोंडात काही खेळणे तर नाही ना टाकले... इ.इ. नंतर मला खुप guilty वाटायला लागते...:-(. देवाची क्षमा मागुन मग मी पुन्हा पुजा continue करते. पण अशा पुजेला काही अर्थ आहे का... असेच मला वाटत राहते. यावर काही उपाय सुचवाल का? मन विचलित होउ नये म्हणुन मी काय करायला हवे?

स्वामींची माझ्या माता पित्यावर मात्र खुप कृपा आहे. त्यांनीच माझ्या वडिलांना मोठ्या अपघातातुन बरे केले. श्री स्वामी समर्थ


Princess
Thursday, November 23, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वामींची अर्थातच माझ्यावरही कृपा आहेच... माझ्या वडिलाना मरणाच्या वाटेवरुन परत केलय त्यांनी.
पण माझे मन पुजेत लागले नाही की मला वाटते, स्वामींचे आता मी लाडके लेकरु नाही :-(


Prashantnk
Thursday, November 23, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

princess ,
नमस्कार,

'जसा भाव, तसा देव' ह्या संत वचनानुसार,
देवाच करण म्हणजे, भाव बदलने. तुम्ही तुमच्या लहान बाळात श्री स्वामी बघायला लागा, त्याच करताना श्री स्वामींची सेवा करतोय हा भाव मनी बाळगा(अगदी पुजा करताना सुध्दा).मग बघा कशी जादुची कांडी फ़िरते! अनुभव अवश्य कळवा.

परमार्थ खरच सोपा आहे. आपण जे रोज करतो, तेच करायच असत, फ़क्त भाव बदलायचे आणि पकडून ठेवायचे, परिणाम जादुसारखा दिसतो.परमेश्वर आपल्या सर्वात जवळ आहे, नव्हे आपल्यातच आहे, तसाच सगळीकडेही आहे.



Mrudgandha6
Thursday, November 23, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पुनम,
अग आपण सर्वच स्वामींची लाडकी लेकरे नेहमीच असतो.प्रशांतदादा म्हणतो तसेच करून बघ.खरेच आहे सगळीकडे "परमात्म्याला" पाहयला लागले की सगळे सोप्पे जाते.. आणि तसा तो असतोही सर्वांत.

प्रशांतदादा, खरे तर २-३ दिवस झाले मी साधनेवर विचार करत होते.म्हणजे आत सुरु करावी म्हणून परवा ठरवले की आज गुरुवार पासून करावी,पण कालच माझा एक कुत्रा अचानक देवाघरी गेला.. so आज सुरुवात नाही केली. आणि येऊन बघते तर तु असे बोलला. असो, आता उशिर नाही करत.

शिल्पा,मध्ये मी रोज भगवद्गीता वाचत होते.. रोज मला त्यातून वेगळे अर्थ कळत होते. असे करत मी ९-१० वेळा पुर्न भगवद्गीता वाचून काधली.मलाही खूप प्रश्न पडले. आणि मी एक हट्टी मुलगी आहे.. मला जर काही प्रश्न पडले तर मी प्रत्यक्ष कृष्णाशी तर्कवाद करते, प्रसंगी त्याला भंडावून सोडते,आरोपही करते,मी दास्यभक्ती कधीच केली नाही,माझी कृष्णाशी साख्यभक्ती आहे.मी त्याला राखीही बांधते त्यामुळे हक्कने मग,एका भावाशी अथवा सख्याशी जसे आपण बोलतो,भांडतो तसेच मी त्याच्याशी भांडते. नाही पटले तर नाही पटले म्हणून सांगते.. अर्थात तो जे बोलतो ते नेहमी पटतेच.

गेले ४-५ महिन्यांपासून जेव्हा मी इथे लिहायला सुरुवात केली त्यानंतर काही दिवसांनी,मला अनेक प्रश्न पडत गेले.. त्याची उत्तरे मला मिळत गेली,पण प्रत्येक वेळी मी "माधवाला" फ़ार पिडले.त्याने काही प्रश्नांची मला जी उत्तरे दिली ती मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतेय.

मला एक महत्वाचा प्रश्न पडला होता..
परमात्म्याला एकापसून अनेक व्हावे वाटले म्हणून त्याने सृष्टीची उत्पत्ती केली.. ठिक आहे केली,..मानवाला निर्माण केले.. महत्वाचे म्हणजे मनवाला जन्म दिला तेव्हा त्याला त्याच्या मुळ स्वरूपाचे विस्मरण[आत्मभानाचे विस्मरण,ज्ञानाचे विस्मरण ]का होते?ते तर "त्याच्याच" इच्छेने होते. माधवाने स्वतः सांगितले आहे की स्मरण विस्मरण हे त्याच्यामुळेच होते. मग,आधीच मुक्त व ज्ञानी आत्म्याला त्याने देह दिला [सुरुवातीला] आणि त्याला पुन्हा मोक्ष प्राप्त करण्याचे कर्तव्य आणि आव्हान का ठेवले?म्हणजे आधि आहे ते विसरून पुन्हा तेच मिळवणे यात काय साध्य होणार?असे त्याला का बरे करु वाटले..?त्याला वाटले असते तर त्याने संपुर्ण ज्ञानी आत्मभान जागृत असणारा मनुष्य निर्माण केला असता,पण त्याने असे का नाही केले?खरेच सृष्टी निर्मितीच्या मागचा हेतू काय?

उत्तर असे आहे..
की उन्हात फ़िरल्याशिवाय सावलीची कदर करता येत नाही. अज्ञनाने जीव होरपळला तरच ज्ञानाची लज्जत कळते.समुद्रात पडले तरच पोहता येते आणि पोहता येणे किती महत्वाचे आहे ते कळते. आधीच पोहता येणार्‍याला जर त्याच्या skill चे विस्मरण नाही झाले तर त्याला बुडणे काय कळणार नाही,आणि बुडल्याशिवाय पोहता येणे कसे जरुरी तेही कळणार नाहि.शिवाय कुठल्याही आईला जसे स्वतःच्या बाळाने स्वत कष्ट करुन सर्व मिळवावे असे वाटते तसेच आपल्या मुळ आईला[परमात्म्याला] आपण हे कष्टाने ज्ञान मिळवावे असे वाटले तर काय नवल.
दुसरे असे की.. आई जशी मुलाला शिकण्यात मदत करते तसा तोही करत असतो.. पण आईने मुलावर शिकवून कसे वागयचे त्याच्यावर सोपवून ठेवलेले असते तसेच त्यानेही हे सर्व आपल्यावर सोपवून ठेवले आहे.तो आपल्या मुलाची परिक्षाही घेतो,त्याशिवाय मुल प्रगत कसे होणार..जॉ यात उत्तिर्ण होतो,तोच पुध्च्या इयत्तेत जातो,असे करत पुर्ण ज्ञान प्र्रप्त करतो.परमात्मा ज्ञान देतोय,ते घ्या,आणि कसे वागयचे ते तुम्हीच ठरवा.. जो योग्य वागत नाहि त्यात त्या मानवाचेच अहित आहे.योग्य वागले तर आपलेच कल्याण आहे.

अरे संसार संसार
जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
.. चटके मिळाल्यावर भाकरीची लज्जत वाढते नाही का?
आणि संसार क्षनभंगुर जरुर आहे पण खोटा नाही,ती एक शाळा आहे,शाळा खोटी कशी असेल?त्यातून आपल्याला ज्ञान घ्यायचे आहे. आपण शाळेत जातो,शिकतो आणि स्वतःकडे फ़क्त ज्ञान ठेवतो.. पण शाळा घरी आणतो का? नाही.. तसेच संसाराचे आहे,इथे आपण शिकतो,ते ज्ञानच आपण आपल्याकडे बाळगावे,इथे प्रेम करावे,शिकावे,मोठे व्हावे,पण मोहात गुंतु नये.. शालेच्या इमारतित अडकू नये.
संसार याच साठी आहे यातूनच ज्ञान किती जरुरी आहे ते कळते,ज्ञान आपल्याकडे आधीच आहे फ़क्त आपण आता ते विसरलो आहोत.. तेच आपल्याला प्राप्त करायचे आहे.







Prashantnk
Thursday, November 23, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्ग़ंधा,
श्रीकृष्णाला नेमक कस शब्दात पकडाव, हे तूझ्याकडून शिकाव. ही भाषा तूला लवकर समजते. (म्हणूनच मीही तूला राधा-कृष्णाच्या भाषेतच सांगितल.) आनंद वाटला.(कुत्र्याला काय झाले होते?)
'नवविधा' भक्तीविषयी तू लिहावस, अशी मनात एक इच्छा आली आहे.



Mrudgandha6
Thursday, November 23, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रशांतदादा,
धन्यवाद.
कृष्ण म्हणजे माझा बालसखा त्यामुळे जरा त्याच्या बबतित हळवी आहे.

कुत्र्याला[किको नाव होते] कय झाले होते नक्की कळाले नही आम्ही त्याला घरचाच member समजत होतो[त्याला खरे तर मोठा असताना आणले,आधीच्या माणसांनी त्याला नीट खायला प्यायला घातले नव्हते म्हणून तो आधीच नाजुक होता]इकडे आल्यावर त्याची तब्येत सुधारली पण आतून नाजुकच राहिला होता,त्यातच south african त्यामूळे हवामान्ही मानवले नसावे.,अजून एक आहे..त्यालाही लहाणपणापसून अगदी बाळासारखे वाढवलेय.खूप त्रास होतो त्याना काही झाले तर. असो.दत्त त्याचे कल्यानच करतील,
,त्याचे विषेश म्हणजे आजारी ३-४ दिवसापसून होता.काही खायचा नाही..परवा देवदिपवाळीला मात्र त्याला आईने नैवैद्याची पोळी त्याला घातलि,कसे आईच्या मनात आले कुणास ठावुक..त्याने ती मात्र खल्ली.तेच त्याचे शेवटचे जेवण.. आणि त्या दिवशी तो सुधारला होता.मग,त्या दिवशी त्याने आम्च्या घराला,[ actually देवघराला धरुन, ते स्वतन्त्र आहे,पण जोडून आनि बाहेरुन मन्दिरासारखे दिसते] त्याने सलग ३ प्रदिक्षणा घातल्या.. मी म्हणाले याला काय झाले प्रदक्षिणा घालायला..तर तो असा गेला.जातानाही आम्च्या देवघरामागे औदुंबराचे झाड आहे ते विशेष आहे..ते नंतर सांगेन.. तर त्याकडे त्याचे पाय होते.. अंगात त्राण नव्हते तरी त्याने शेवटच्या घटकेला उठून,औदुंबराकडे डोके केले आणि लगेच प्राण सोडले. असो. दत्तगुरु त्याच्या आत्म्याला सद्गती देवो.

मी नवविधा भक्तीवर काय लिहणार?बापुडी.. तरीही लिहेन.. पण तू जास्त सुरेख लिहशील असे मला वाटते.मी नंतर लिहेनच.





Divya
Thursday, November 23, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांतजी धन्यवाद. पण आपल्याकडुन माझ्या प्रश्नाचे उत्तर जरुर हवे आहे ते तुम्ही इथे जरुर द्यवे जेणे करुन सग्ळ्यांनाच मार्गदर्शन होइल.

माउडी, भगवंतानी अकराव्या अध्यायात अर्जुनाला विश्वरुप दर्शन दिले आणि अर्जुनही ते विश्वरुप बघुन घाबरुन गेला तर तिथे आपल्या सारख्या सामान्य माणसाची काय वाण. भगवंताच जे अव्यक्त आणि निर्गुण अस रुप आहे तिथे माणसाची मन बुद्धी सुद्धा ते समजुन घ्यायल अपुरी आहे, तो समजणे हा बुद्धीच्या पलिकडचा विषय आहे आणि जे बुद्धीलाच झेपण अवघड आहे ते सहज स्वीकारण तर तितकच कठीणही म्हणुन तर या अध्यायानंतर अर्जुन म्हणतो हे प्रभु तुझे हे विराट रुप बघुन मी अचंबीत तर झालोच आहे पण तरी भयभीतही झालो आहे तरी तु परत तुझे सगुण रुपच धारण कर तेच मला जास्त प्रिय आहे कारण ते मला त्याहुन जास्त आपलेसे जवळचे वाटते. आता या अध्याया नन्तर अर्जुन confuse झाला की हे भगवंताचे निर्गुण निराकार रुप ही खरे आणि समोरच असलेले सगुण साकार रुपही खरे मग तरी यात श्रेष्ठ रुप कोणते? म्हणुन भगवंताने बारावा अध्याय भक्तीयोग सान्गीतला आहे. आणि त्याने अर्जुनाला पुर्ण शान्त केले अगदी त्याच्या सर्व शन्का दुर केल्या. ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातली तेवीसावा श्लोक

तरि व्यक्त आणि अव्यक्त| हें तूंचि एक निभ्रांत|
भक्तीं पाविजे व्यक्त| अव्यक्त योगें|| (12:23)
तया आणि जी भक्तां| येरयेरांमाजी अनंता|
कवणें योगु तत्वता| जाणितला सांगा|| (12:33)

या दोन श्लोकांमधले सर्व श्लोक हे अर्जुनाची मनस्थिती, त्याला पडणारे प्रश्न सांगीतले आहेत. कदाचित त्यातले बरेचसे प्रश्न तुझेही असतील तु पुढचा १२वा भक्तीयोग वाचायला सुरवात कर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवंतच देईल.

जय श्रीकृष्णार्पणमस्तु.


Pillu
Friday, November 24, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

वा वा एका पेक्षा एक सरस असा मधाचा धबधबा इथे वाहु लागलाय खुप बरे वाटतेय हे सर्व वाचुन.

आता मला एक कथा सांगाविशी वाटतेय. एकदा एक गरुड पक्षी आकाश मार्गे भ्रमण करीत असताना सहज खाली उतरतो आणि विश्रांती घेत बसतो. त्या वेळी जमिनीवर एक किटक एका घाण वस्तुसाठी व्याकुळ होऊन ति वस्तु नेण्याचा प्रयत्न करित असतो. तेव्हा हा गरुड त्या किटकाला म्हणतो अरे ईथे काय करतोस या घाणित. चल तुला चांगली वस्तु देतो. तेव्हा त्याच्या उत्तराची वाट न पहाता त्या किटकाला उचलुन तो गरुड एका कमळ पुष्पात नेऊन सोडतो त्याच वेळी सांयकाळ झाल्यामुळे कमळपुष्पांच्या पाकळ्या मिटल्या जातात. भल्या पहाटे एक वाटसरु तेच कमळ खोडुन ते फुल तो श्री शंकराचरणी अर्पण करतो. तेव्हा श्री शंकर त्या कमळात पहातात तर आत मधे तो किटक असतो श्री शंकर म्हणतात अरे याने तर आपला सारा देह माझ्या चरणी समर्पित केला आहे. या वर श्री शंकर त्या वर प्रसन्न होऊन त्याला कैलासलोक बहाल करतात.

मी ही एक किटकच आहे. या संसार रुपी घाणीशी चिटकुन त्याचा आस्वाद घेत होतो. पण ईथे श्री.प्रशातजी,म्रुद्गंधा,महेश,माऊडी, दिव्या या सारखे अनेक गरुडांनी मला या बिबि रुपी कमळात घालुन ज्ञानसागरातील अनेक अम्रुत कण पाजुन धन्य केले आहे. या सर्वानचा मी रुणी आहे.(प्रयत्न करुन ही मला खरा रु लिहिता आला नाही )



Prashantnk
Friday, November 24, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्याने विचारलेला प्रश्न खाली देत आहे.

ग़ुरुभेट ही सुध्दा प्रारब्धानुसारच होते का? कारण
कधी कधी खुप सामान्य माणसाला सुधा सहज गुरु मिळतात
आणि खरोखर वैराग्य आणि ज्ञान आणि नम्रता आसुन गुरु भेटलेले
नसतात असे कसे? आणि अशा व्यक्तीना जेव्हा गुरु भेटतात तेव्हा
ते खुप थोड्याच अवधीत समाधी अवस्थे पर्यन्त प्रगती
करतात मग गुरु भेट होणे हे ही प्रारब्धानुसारच का?


Prashantnk
Friday, November 24, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार पिल्लू,
काल नुसताच S.M.S. पाठवून गेलात?
पण काही म्हणा, आपण ओले आहात, आम्ही अजूनही ठणठणीत कोरडेच आहोत.
आणि परत हा 'श्री' व 'जी' कुठून आला????? उगाच 'उपाधी' चिकटवू नये, नंतर सुटणे अवघड जाते. सुटण्याचा विचार, आत शिरतानाच-अगोदरच करून ठेवलेला बरा. 'आपण ह्याठिकाणी कायम रहाण्याकरिता नाही आलोय', हे मनाला सारख बजावायला लागत. त्यामूळे नंतरचा मनस्ताप नाहीसा होतो.


हे न फ़िटणार ऋण( RuNa ) श्री सद्ग़ुरूंचे आहे. त्यांनीच दिलेले अमृत( amRuta ) कण आहेत. हे 'कण'ज्यांच्या हाती पडले, ते धन्य झाले, ज्यांना ते 'अमृत' आहे हे कळाले आणि वळाले, ते महा-धन्य होय!


Mrdmahesh
Friday, November 24, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
वा धनंजय म्हणतो तसा इथे ज्ञानाचा नुसता धबधबा वाहतोय... मी चिंब भिजून गेलोय.. खूप छान वाटतंय..
मी माऊडीच्या प्रश्नावर कालपासून विचार करतोय. काल उत्तर सापडत नव्हतं. आज ते सापडल्यासारखं वाटतंय म्हणून मी माझ्या अल्पमतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मी दिव्याच्या प्रश्नाचेही उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
माऊडी,
तुला भीती वाटणे स्वाभाविक आहे. जिथे अर्जुनाची ही अवस्था झाली तिथे आपल्यासारख्याची काय कथा?
आपण एखादा भला मोठा अजगर पाहिल्यावर सहजच म्हणून जातो "अबब काय मोठा अजगर आहे हा?" या उद्गारात त्याच्या रुपाबद्दल वाटणारी एक भीतीच आपण व्यक्त करत असतो. जेव्हा जेव्हा मनुष्याला भव्य, अजस्त्र, विराट गोष्टी दिसल्या तेव्हा तेव्हा तो प्रथम घाबरलेला आहे. तेव्हा ही एक स्वाभाविक गोष्ट आहे तेव्हा तू फार विचार करू नकोस. एकच कर. ज्या परमेश्वराने तुला गीता वाचायची बुद्धी दिली त्या परमात्म्यालाच विनंती कर, श्री स्वामींना विनंती कर की "तुमच्या प्रेरणेने मी गीता वाचन करत आहे. तुम्हीच माझ्याकडून हे करवून घेत आहात. तेव्हा हे करत असताना माझ्या मनात तुमच्या बद्दल प्रीती निर्माण होईल असं करा. मी एक तुमचे लेकरू आहे. तुमचे विराट रूप पाहून मला भीती वाटत आहे. ती घालवा." अशी विनंती करून श्री स्वामींचा जप कर. गीता वाचायला सुरुवात करण्या आधी अशी श्री स्वामींना विनंती करून त्यांचा जप कर. मग गीता वाचन कर. बघ नक्कीच फरक पडेल [एव्हाना फरक पडला देखील असेल]. कदाचित असंही असेल की श्री स्वामी तुझी परीक्षा पहात असतील. म्हणत असतील की हिला माझ्या विराट रुपासंबंधी कल्पना आल्यावर ही स्थिर रहाते का? किती वेळ लागेल हिला स्थिर व्हायला? जी भीती उत्पन्न झाली आहे त्याच्या छायेत ही किती रहाते? नेटाने वाचन पुढे चालू ठेवते की घाबरून जाऊन नाद सोडून देते? इ. इ. तेव्हा हे सगळं बाजूला ठेव. श्रद्धेने, विश्वासाने वाचन पुढे चालू ठेव. नक्कीच तुला भगवंतांच्या प्रेमळ, गोड रूपाची प्रचिती येईल. आणि बाळाची काळजी करू नकोस. ज्या अर्थी तू बाळावर उत्तम संकार करण्याच्या उद्देशाने, मन स्थिर रहाण्याच्या उद्देशाने परमेश्वर स्मरण करत आहेस त्या अर्थी त्या परमात्म्याने तुझ्या बाळाची काळजी घ्यायची जबाबदारी स्वीकारली आहे. उरला प्रश्न तुझा. तो तू श्री स्वामींवर श्रद्धा, विश्वास वाढवत नेऊन नेटाने गीटा वाचून पूर्ण करून सोडवू शकशील हे निश्चित.
श्री स्वामी तुला सर्वप्रकारे मदत करो ही त्यांच्याकडे माझी प्रार्थना.


Mrdmahesh
Friday, November 24, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम,
आता तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. प्रशांतने तुला एक मार्ग सुचवला आहेच. मीही एक सुचवतो. तुला जो योग्य वाटेल तो तू स्वीकार.
सगळ्यात आधी तुझ्या मनातली काळजी काढून टाक. या काळजीमुळेच तुझ्या विचारांची शृंखला वाढत जाईल. तशी ती वाढलेली दिसतेच आहे [उदा. त्याने खेळणे नाही ना टाकले... वगैरे..].
एक लक्षात घे की पूजा करणे हा भगवंताच्या आराधनेचाच एक भाग आहे. जेव्हा एखादा भक्त त्याची आराधना करत असतो तेव्हा त्याची सर्वंकष काळजी भगवंत घेत असतात. पूजा करताना श्री स्वामींना विनंती कर की माझं बाळ खेळत आहे कृपया त्याची काळजी घ्या. खरंतर लौकिकार्थाने जरी तू त्याची माता असलीस तरी श्री स्वामीच खरे त्याची माऊली आहेत. तेव्हा तेच त्याची काळजी वहातील. तेव्हा काळजी करणं आधी सोड. तू असंही म्हणतेस की तुला अपराधी भावना येते. अग, हे स्वाभाविक आहे तुला guilty feeling येऊ देऊ नकोस. तू एक माता आहेस. मातेने तिच्या बाळाची काळजी करणं हे स्वाभाविक आहे. हे भगवंतही जाणतात. तेव्हा तेही म्हणत असतील की हिचे लक्ष विचलित झाले तरी मला चालेल. म्हणून guilty feelings येऊ देऊ नकोस.
पूजेच्या आधी श्री स्वामींना विनंती कर की "माझं बाळ खेळतंय ते असंच छान खेळत रहावं अशी काही तुम्ही योजना करा". मग बघ, श्री स्वामी तुला तुला कशा युक्त्या सुचवतात ते. कदाचित तुझ्या बाळाची काळजी घेण्यासाठी ते एखाद्या व्यक्तिची योजना सुद्धा करतील. तू तुझ्या बाळाला अशी काही खेळणी आणून दे की जी त्याला इजा करणार नाहीत आणि ते ही त्याबरोबर खेळण्यात रंगून जाईल. किंवा तू तुझ्या बाळाला अशा जागी ठेव की जिथे तुझे सहज लक्ष जाईल. तुझ्या नजरे समोर ते राहील. असं करता करता मग तुझ्याच मनात एक विश्वास येईल की बाळ नक्कीच शांतपणे खेळेल आणि मग तू काळजी करणं आपसूकच सोडून देशील.
मलातर एक नेहमी वाटत आलेलं आहे की आपल्याला काही अडचण आली तर ती आधी श्री स्वामींना सांगावी. त्या अडचणी वर मात करण्याचे मार्ग श्री स्वामी नक्कीच सुचवतात.
बघ नेटानं प्रयत्न करून. श्री स्वामी तुझ्या प्रयत्नांना यश देवो.


Mrdmahesh
Friday, November 24, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,
कर्म आणि भोग हे प्रत्येकाच्या आयुष्याचे दोन भाग आहेत. त्यापैकी कर्म हे त्या व्यक्तीच्या बुद्धी नुसार होते तर भोग (फळ) हे त्याच्या कर्मानुसार मिळते. एकदा एखादा भोग एखाद्याच्या नशीबी आला तर त्याला तो भोग भोगावाच लागतो त्यातून सुटका नाही.
गुरुभेट ही प्रारब्धानुसारच असते की नाही यावर मी अधिकारवाणीने सांगण्याइतकी माझी पात्रता नक्कीच नाही. जे काही सांगेन ते मला जे आकळले आहे त्यानुसारच सांगेन.
गुरुभेट हे सुद्धा एक फळ आहे जे पूर्व कर्मानुसारच मिळते (निदान माझा तरी असा समज आहे. खरं काय हे मलाही माहित नाही). काही लोकांना लवकर गुरु मिळतात कारण त्यांची पूर्वजन्मीची कर्मेच अशी असतात की ज्यामुळे त्यांना गुरु भेटणे क्रमप्राप्त होते. काही लोकांना ज्ञान, वैराग्य असूनही गुरु मिळत नाहीत कारण त्यांच्या फळातच गुरुभेट लिहिलेली नसते. या जन्मीची वैराग्य, ज्ञान मिळवण्यासाठी केलेली कर्मे त्याला त्याच जन्मी किंवा पुढील जन्मी गुरु चे सुख देऊन शांत होतात. आता कुणाला या जन्मात गुरु मिळणार आहेत की पुढच्या जन्मात हे कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. तेव्हा गुरुभेट या फळाची अपेक्षा न धरता आपली साधना चालू ठेवावी. मी काही व्यक्ती अशा पाहिलेल्या आहेत की ज्यांना त्यांचा शेवट जवळ आला असताना गुरु मिळालेले आहेत.
प्रत्येक मनुष्य वृत्तीनुसार (तामस, राजस, सात्त्विक) वागत असतो. ही वृत्ती अंगी बाळगणे हे त्या मनुष्याच्या हातात असते. एकदा का एखादी वृत्ती अंगी बाणली की त्याची कर्मेही त्या प्रमाणे होत असतात.
सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ति फळाची (गुरुभेटीची) अपेक्षा न धरता आपले कर्म करत राहील. तर राजस वृत्तीची व्यक्ती कर्म करता करताच गुरु केव्हा भेटतील याची काळजी करत राहील तर तामसी व्यक्ती मुळात या मार्गात येणारच नाही. आणि आली तरी मल गुरु भेटत नाही म्हणून अकांडतांडव करील. ज्यायोगे परत काही अप्रिय कर्मे करील.
मृद्गंधाने वर एका प्रश्नाचे उत्तर दिलेच आहे. ते उत्तर इथेही लागू होते. या मार्गात असलेल्या व्यक्तीला गुरुचे महत्व कळावे. त्यांची भेट व्हावी म्हणून (म्हणजेच फळाची अपेक्षा धरून का होईना) त्याने कर्मे करणे भगवंताला अपेक्षित असावे. म्हणूनच कदाचित गुरुभेट ही प्रारब्धावर आधारलेली असावी.
मी एका बाईंचे (त्यांचे नाव आठवत नाही.. बेडेकर का असंच काही आहे) अनुभव वाचलेले आहेत. त्या अनुभवांवरून असं दिसलं की त्यांची मूलाधार सोडून बाकी सर्व चक्रे गुरुभेटी शिवाय जागृत झाली होती. आणि बरोबर मूलाधार चक्र जागृत व्हायची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांना गुरु मिळाले. आणि तिथून पुढे त्यांना कुंडलिनी जागृती संबंधी मार्गदर्शन मिळत गेले व त्यांची कुंडलिनी जागृत झाली.
अशा एकेकाच्या कथा....


Princess
Friday, November 24, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांतदादा, मृ, महेशदादा, तुमची खुप खुप आभारी आहे मी. महेश दादा, तुम्ही लिहिलेले वाचुन तर मला खुप खुप छान वाटले. कालपासुन मी प्रशांत दादाने सांगितल्या प्रमाणे करतेय... बाळातच स्वामीना बघतेय. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण करेन. अनुभव कळवेनच. तुम्ही सर्व लिहित राहा आणि आम्हाला भक्ती रसाचा आनंद देत राहा.

कालच (गुरुवारी) माझ्या परिक्षेचा result लागला. त्यात मी अतिउत्तम मार्कानी (८२%) पास झाली. स्वामींची कृपा.



Prashantnk
Friday, November 24, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,
तुमची हा प्रश्न विचारायच्या मागची तळमळ जाणवली, आणि म्हणूनच खाली विस्तार पुर्वक लिहतोय. ही होणारी तगमग, तडफ़ड, घुसमट मला चांगलीच माहीत आहे. मी ही या परिस्थितीतून गेलो आहे.
ह्या मध्ये जे जे ‘चांगल वाटेल’ ते ते सर्व श्रीसद्गुरुंच देण आहे, जे ‘वाईट वाटेल’ ते सर्वस्वी माझ प्रारब्ध आहे . वाचताना जेथे जेथे ‘श्रीसद्गुरू’ असा शब्द येतो, तो अर्थात ‘श्रीभगवंत’ ह्या अर्थांनी आहे. कारण ही दोन्ही म्हणजे एकच तत्त्व आहे .


Prashantnk
Friday, November 24, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

// श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ //

श्रीसद्गुरू भेट कधी होते? प्रारब्धा नूसारच असते का?

ह्या प्रश्नाच्या खोलात जायच्या अगोदर , श्रीसद्गुरू तत्व म्हणजे काय हे समजावून घेण जरूरीच आहे. म्हणजे हळूहळू प्रश्नाची उकल आपोआप होईल.

श्रीसद्गुरुतत्व-

श्री भगवंतानी सृष्टिकरिता जी पंचकर्मे स्वत: करिता ठेवली आहेत, ती अशी आहेत,
१) उत्पत्ति, २) पालन, ३) लय , ४) निग्रह, ५) अनुग्रह.

ह्या मधिल जे ५ वे आहे , ते म्हणजे श्रीसद्गुरुतत्व, अनुग्रह करणे.

ह्या तत्वाच कामच मूळी ‘अज्ञानाचा नाश करणे’ होय. श्रीभगवंताचा सृष्टिनिर्माण करण्याचा जो संकल्प केला, त्याच्या विरूध्द म्हणजे परत श्री भगवंतात मिळून जाण्याकरिता हे काम करते.
स्वत: भगवंताचाच हा सगळा स्वतंत्र कारभार असतो, ह्यातील अधिकारि वेगळे असतात.
असे हे सद्गुरु खरे म्हणजे आपले आत्मसखे, जिवलग आहेत. आपल्याला असा प्रश्न पडातो कि, हे सखे या जन्मापुरतेच बरोबर असतात की जन्मजन्मांतरीचे असतात? तर ते त्या जीवाबरोबर अखंड असतात. यात फ़क्त प्रश्न एवढाच असतो की, त्या जीवाची कर्म्यसाम्यदशा येते त्याच वेळी हे तत्व करूणेने प्रकट होते. पण ते जरी प्रकटले नाही, तरी ते जीवाला अखंड सोबत करते.

प्रारब्ध-

जीवाने केलेल्या पूर्वकर्मानूसार , असणाऱ्या कर्मफ़ळामधूनच काही कर्मफ़ळ भोगण्याकरिता बाजूला काढले जाते, त्याला प्रारब्ध म्हणतात. त्यानुसार अनुकूल शरीराचा आणि वातावरणाचा लाभ जीवाला होतो. प्रारब्ध बाजूला काढून राहीलेले कर्मफ़ळ म्हणजे संचित, हे भोगायचे अजुन बाकी रहाते.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे कि ह्या प्रारब्धाचे भोग ( चांगले-वाईट, दोन्हीहि) हे शरीराला असतात, आत्म्याला नव्हे आणि आत्मा म्हणजे आपण होय. महत्वाची गोष्ट श्रीसद्गुरुतत्व हे आपले ,म्हणजे ‘ आत्मसखे ’ असतात. हे जर लक्षात नाही घेतले तर विचारांचा गोंधळ होतो.


कर्मसाम्यदशा-

ऐशी कर्मे साम्य दशा / होय तेथ वीरेशा /
मग श्रीगुरू आपैसा / भेटेचि गा // ज्ञाने.१८.४९.९६६ //


आता हे कर्म्यसाम्यदशा आणणारे ,हरिनाम घ्यायची बुध्दी कधी होते, त्याचाही एक क्रम आहे ,

१) संसारात दु:ख होते, ह्या दु:खाने,
२) संसाराचा उद्वेग (संसार नकोसा वाटतो)यायला लागतो, हा उद्वेग आल्यावर श्रीभगवन्नाम घ्यायची बुद्धि होते,(अशी बुद्धी त्यावेळी होण हे महत्वाच)

ह्या नामाने शुध्दपुण्याची वाढ होते, ज्या कर्माच्या (प्रारब्ध) योगाने, रात्रंदिवस आपला प्रपंच चाललेला असतो, त्या कर्माचा जोर कमी होतो.अशा वेळी कर्मसाम्यदशा येते. आणि मग सद्गुरू भेट होते. लक्षात घ्या कि हे शुद्धपुण्य आणि ज्या अशुद्ध पाप-पुण्यामूळे ( अशुद्ध अशाकरीता की त्याला जीवाच्या वासना-वृत्ती चिकटलेल्या असतात, म्हणजेच प्रारब्ध ) आपला जन्म झालेला असतो, ते पुर्णपणे वेगळे आहेत. परमेश्वराच्या / श्रीसद्गुरूंच्या भेटीच्या आसक्तिने-इच्छेने केलेल कोणतही कर्म, शुद्धपुण्यात वाढ करत.

३) मग सद्गुरुकृपा होते,
४) त्यामुळे उदासीनता येते, तीचे रुपांतर नंतर अतीवभक्तीत होते,
५) शेवटी ‘वासुदेव बोधाची स्थिती येते, म्हणजे सर्वत्र मीच व्यापून राहलोय हा बोध होतो.

वरच्या ठळक गोष्टींचा संगतवार विचार केला की दिव्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते.

१) श्रीसद्गुरु भेट होण, हे सर्वस्वी त्या जीवाने केलेल्या शुद्धकर्मावर(वासनारहित,आसक्ती रहित), म्हणजेच शुद्धपुण्यावर अवलंबून आहे, पण त्याच वेळी हे ही लक्षात घेण जरुरी आहे कि शुद्ध पुण्य जरी जीवाच्या बरोबर असलेतरी, प्रारब्ध आणि संचित ही बरोबर असते, आणि चालू जन्मातल होणार कर्म, म्हणजेच क्रियमाण ही बरोबर असते. ह्या सगळ्यांची बेरीज, वजा प्रारब्ध करुन जे उरत त्यानुसार पुढचा जन्म मिळतो.
२) आता नवीन जन्मात, वरच सगळ गाठॊडे बरोबर असते. ह्या जन्मातील प्रारब्धानुसार शरीर आणि त्याच बरोबर भोग असतात. तो जीव दिसतो कसा, खातो काय, त्याच्याजवळ वैराग्य किती असेल, त्याला ज्ञान काय असेल, हे सगळ प्रारब्धानुसार मिळत. पण त्याच बरोबर त्याच्या बरोबर असणाऱ्या शुद्धपुण्यानुसार त्याच्यासमोर लवकर किंवा उशिरा श्री सद्गुरुतत्व प्रकट होण्याचा बहुमान त्याला मिळतो.
३) आता हे सगळ थांबणार कधी, हेच महत्वाच. ह्याच्या करीता तर मनुष्यजन्म आहे, असे एकजात सगळे संतमहात्मे सांगतात. ते तर अशी ग्वाही देतात की, “ ह्याची देही, ह्याची डॊळा”, मुक्तीचा सोहळा पहाता येतो. हा जर सोहळा पहायचा असेल तर, कलीयुगात नामस्मरणा(निर्बीज नाम) सारखा दुसरा सहज उपाय नाही. जेणे करुन शुद्ध पुण्यवाढेल, श्री सद्गुरु भेट होइल, मग त्यांनी दिलेल्या ‘सबीज नामाने, उरलेल संचिताचे बी जळून जातील, विवेक जागृत झाल्याने(श्रीकृष्ण-कर्मसिध्दांत) नवीन हॊणार क्रियमाण थांबेल, राहिलेला प्रारब्धभोग सुसह्य होईल,
देहातच असताना, आपल्याच डोळ्याने, आपल्याच मुक्तीचा सोहळा पहाता येईल.

संदर्भ उदाहरण-
सुरुवातीला दु:खाने उद्वेग आल्यावर, न राहवून श्रीसंत नामदेव महाराज देवाला म्हणतात,

तुझा माझा देवा कां रे वैराकार / दु:खाचे डोंगर दाखविसी // १ //
बळे बांधोनियां काळा हातीं / ऐंसे काय चित्तीं आलें तुझ्या // २ //


तर श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात,

होतो निश्चिंतीने करितसे सेवा / कां हो देवा, मन उद्वेगिले//

हेच श्रीसंत नामदेव महाराज श्रीसद्गुरु (श्रीसंत विसोबा खेचर) भेट्ल्यावर म्हणतात,

सद्गुरुसारिखा सोइरा जीवलग / तोडिला उद्वेग संसारींचा //
काय उतराई होऊं कवण्या गुणें / जन्मा नाही येणे ऐसें केलें //


श्रीसंत ज्ञानेश्वर म्हणतात,

ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों /
आतां उध्दरलो गुरुकृपे //६७६.४ //


असे हे अखंड साथ देणाऱ्या श्री सद्गुरूतत्वाच ऋण न फ़िटणार आहे. त्याला माझे अनंत दंडवत.ही त्यानींच करूवून घेतलेली ही सेवा, त्यांच्याच सुकोमल चरणी सविनय अर्पण.

//अवधूतचिंतन, श्री गुरूदेव दत्त //


Prashantnk
Friday, November 24, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस,
तुम्ही तुमच्या वडिलांना झालेल्या अपघाताविषयीच लिहलेल ललीत मी वाचल होत. आता कसे आहेत ते?
परिक्षेतील यशाबद्दल तुमचे अभिनंदन!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators