Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 15, 2006

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through November 15, 2006 « Previous Next »

Pillu
Tuesday, November 07, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार अनुपमा ताई
मी तुमच्या मेल आय डी वर ऊत्तर पाठवले आहे.


Mrdmahesh
Thursday, November 09, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,
देवपूजा, देवघर या विषयावर काही मनात आले ते उतरवले आहे. कृपया
देवघर या लिंकवर टिचकी मारून माझा हा लेख वाचा अन् मला सांगा. तुमचेही काही अनुभव असतीलच :-)

Kalika
Friday, November 10, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान महेश दादा

Pillu
Friday, November 10, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ

आजच घडलेला ४.३० वाजताचा प्रसंग

ऑफीसच्या कामासाठी मला नेहमी बाहेर फिरावे लागते. जेव्हा मी कुठेही बाहेर निघतो तेव्हा स्वामी क्रुपेनेच मला एक सवय आहे,की स्वामी चला मी अमुक ठिकाणी चाललोय मज सोबत चला हेतु हा की रस्त्यात काही दुर्घटना घडू नये. तर असाच मी आज पुण्यातुन ऑफीस कडे येत होतो घाई खुप होती म्हणुन जरा जोरात होतो. माझ्या समोरुन एक डम्पर चालला होता. त्यात क्षमते पेक्षा जास्त राडारोडा भरला होता मोठे मोठे दगड धोंडे भरले होते त्यात. त्याच्या मागोमागच चाललो होतो. तोही जोरात अन मीही जोरात. ईतक्यात समर्थांकडून आज्ञा आली की मागे थांब,पुढे अजिबात जायचा प्रयत्न करू नकोस. मला कळाले नाही का पण आज्ञा म्हणजे आज्ञा. मी माझा स्पिड कमी केला अन काही फुटाचे अंतर मी मागे ठेवले आणि एकदम तोच डम्पर पुढचे एक चाक फुटले म्हणुन एकदम थांबला आणि त्यातिलच एक मोठा दगड धाड्कन खाली पडला. मी जर त्या बरोबर असतो तर माझ्या डोक्यात तो नक्कीच पडला असता.स्वामींनीच मला या संभाव्य संकटातुन वाचवले. म्हणुनच म्हणतात ना. "जेथे जातो तेथे तु माझ्या सांगाती चालवीशी हाती धरोनीया "


Mrudgandha6
Saturday, November 11, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वा!!! प्रशांतदादा अम्च्या गावीइ येवुन गेला अम्हाला खबर पण नाही..

मन्दार छानच..

महेशदादा,मस्त आहे link

धनूदादा.. खरेच खुप हृदयस्पर्शी प्रसंग आहे.

मला,एक स्वप्न पडले होते पुर्वी त्याचा अर्थ मला अजूनही लागत नाही..लवकरच ते सांगेन.. आत गडबडीत आहे.


Prashantnk
Saturday, November 11, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लू,
तुमचा व्यक्तिगत अनुभव वाचुन, त्यावेळी तुमच्या मनात; श्री स्वामी समर्था विषयी काय भावना आल्या असतील त्या शब्दात सांगणे, खरच कठीण आहे.
मला तरी एकच आठवल,प.पू.श्री टेंबेस्वामींनी सांगितलेल,

प्रार्थी वासुदेव; पदीं ठेवि भाव,
पदीं देवो ठाव;देव अत्रिनंदन//

तुमची स्वामीसेवा कशी सुरू झाली, या प्रवासाच वर्णन ऐकायला अवश्य आवडेल.

महेश,
तुमची लिंक छान आहे. प्रत्येक होणार्‍या गोष्टीमागे काहितरी कार्यकारणभाव असतोच. बरेच लोक म्हणतात,'माझा देवावर विश्वास आहे.' पण मोक्याच्या ठिकाणी घडलेल्या गोष्टीच कर्तृत्व स्वत:कडे घेतात,आणि फ़सतात. अशावेळी भगवंत मागे फ़िरतात. 'मी-मी', माझ-माझ जिथ असत, तिथ संसार मागे लागतो, सगळीकडे 'तू-तू', तुझ-तुझ ज्यावेळी सुरू होत, त्यावेळी परमेश्वर मागे लागतो. ह्याकरीताच स्वत्:वर स्वत्:चाच अखंड पहारा लागतो.

तुमच्या श्रध्देला फ़ुटलेली पालवि बघून बर वाटल. तुमच्या 'सगुणा' पासुन ते 'निर्गुणा' पर्यंत चालणार्‍या या प्रवासाला शुभेच्छा!

मृद्गंधा,
पुढच्या वेळेला नक्की खबर घेतो.

अजुन काय म्हणतात आमचे स्वामी समर्थ! श्री चोळप्पांच्यायेथील,स्वामीसमाधिच दर्शन घेतल का? श्री नूरबाबांच्या दर्ग्यात गेला होता का?हाक्या-मारुती दर्शन घेतल का?श्री बाळाप्पा समाधि मंदिर? काय माहीत मला स्वामींच बोलावण कधी येतय ते! नसीबवान आहेस.
कस आहे ना सगळ, मानल तर सगळ आहे, नाही मानल तर काहीच नाही! मानायची बुध्दी व्हायला हि त्याचीच कृपा व्हायला लागते. ही बुध्दि अखंड-स्थिर रहाण याला पण तीच कृपा लागते! तो पर्यंत चालूच रहात, आपल न संपणार रडगाण!!
तुझ्या कविता छानच असतात पण त्यात स्वामी असते तर दुधात साखरेचा योग होईल.कविता करणारे फ़ार हळव्या मनाचे असतात, हिच शक्ती 'त्याच्या चरणी' लागू दे. बाकी सगळ खोट आहे, फ़सव आहे,सतत बदलणार आहे, तात्पुरत्या सुखाचा आभास दाखवणार आहे. स्थिर असे फ़क्त आणि फ़क्त 'त्याचेच चरण' आहेत.
म्हणूनच मी मागे एकदा म्हणालो होतो की तू प.पू.श्री बाळेकुन्द्री महाराजांच, 'श्री दत्त प्रेम लहरी ' वाचच. खरी प्रेमभक्ती-काव्यभक्ती काय असते ते कळत.


Prashantnk
Sunday, November 12, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ//

परमात्मा, आत्मा, अंत:करण आणि देह-

सर्व जीवात परमात्म्याचा अंश असलेला असा आत्मा निवास करत असतो.स्थूलदेह हे त्या आत्म्याचे रहाण्याचे घर आहे. ह्या आत्म्याचा, ह्या स्थूल देहाशी 'तादात्म्य' नावाचा एक विलक्षण संबंध असतो. 'तादात्म्य' म्हणजे 'तोच मी' असे वाटणे,दोघांची एकरुपता आहे असे वाटणे. अर्थात हे काल्पनिक असते.

असे वाटण्याकरता एक मद्यस्थ काम करत असतो, त्यालाच अंत:करण असे म्हणतात.प्रथम हा आत्मा अंत:करणाशी तादात्म्य होतो, नंतर हे अंत:करण स्थूलदेहाशी तादात्म्य पावते. आशा रितीने नित्य शुध्द-बुध्द आत्मा, अशुध्द; जड देह म्हणजे 'मी' असे मानायला लागतो. हे घडते कसे ह्या करिता अंत:करणाच स्वरुप जाणून घेण गरजेच आहे.

अंत:करण हे देहासारखे स्थूल-जड नाही, ना आत्म्याप्रमाणे स्वयंप्रकाशित आहे. ते ह्या दोहोपेक्षा विलक्षण असून; दोघांचा संबंध जुळवणारे आहे. परमात्म्याचा अंक्षच असणार्‍या आत्म्याला, संसारबंधन(जन्म-मरण चक्र) आणि मोक्ष ह्या अंत:करणामुळेच प्राप्त होतो.

ह्या अंत:करणाचे त्याच्या कार्यानुसार पाच प्रकार मानले गेले आहेत. हे 'अंत:करण पंचक' असे-
१] अंत:करण-
अ) अंत:करण ही जीवाची उपाधी आहे. हे मुळात द्रवरुप असते. शरिरात असणार्‍या ७२,७२,१०,२०१ नाड्यामध्ये ते भरलेले असते.
ब) पाण्यावर तरंग यावेत याप्रमाणे, ह्या द्रवरुप अंत:करणात अनेक तरंग उठत असतात, त्यालाच 'वृत्ती' असे म्हणतात.प्रमाण, विपर्यास, विकल्प, निद्रा, स्मृती अशा पाच प्रकारात वरील वृत्तींचा संग्रह केलेला असतो.
क) ह्या खेरीज सुख, दु:ख, इच्छा वैगरे, अंत:करणाच्या इतरही वृत्ती आहेत. निर्विकल्प समाधि अवस्थेत अंत:करणात कोणतीही वृत्ती नसते.

२] मन-
एखादी गोष्ट; करावी की करू नये, अशा प्रकारच्या संशयाने युक्त असणार्‍या वृत्तींनी युक्त असणार्‍या अंत:करणालाच 'मन' असे म्हणतात.

३] बुध्दी-
मनाने वरील संशय उत्पन्न केला असता, अमुक एक गोष्टच योग्य आहे असे निश्चयपूर्वक ठरविणार्‍या अंत:करणालाच 'बुध्दी' म्हणतात.

४] चित्त-
घेतलेल्या अनुभवाचे सतत स्मरण ठेवणार्‍या अंत:करणालाच 'चित्त' असे नाव आहे. हे योग्य वेळी; योग्य त्या गोष्टींचे स्मरण करुन देत असते.

५] अहंकार-
आपल्याल सतत जी 'मी' ही जाणीव होत असते, त्या अंत:करण वृत्तीला 'अहंकार' असे म्हणतात.

अशारितीने एकच पदार्थ वेगवेगळ्या कार्यामुळे, विविध नावांनी ओळखला जातो. हे अंत:करण मूळात जड असूनही, चैतन्यरुपी आत्म्याच्या निजसानिध्याने, चेतनासारखे होऊन सर्व व्यवहार करत असते.

मानवी जीवनाचा मूळ हेतुच मूळी, ह्या अंत:करणातील सर्व वृत्ती-वासना संपवून, शरीरात असणार्‍या आत्म्याचे, मूळ परमात्म्याशी तादात्म्य पावणे, हा आणि हाच आहे.
माणूस मरताना ज्या वृत्ती,वासना,तरंग शिल्लक असतील त्या नुसार पुढचा जन्म मिळतो.


Pillu
Monday, November 13, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ

मला एक कल्पना सुचलीये, या बीबी वर असणारे आपण सर्व स्वामी भक्तांनी एकत्र अक्कल्कोट ला सह कुटूंब जाऊ यात अवघड असले तरि अशक्य नक्कीच नाही. या मुळे सर्वांची ओळख होईलच आणि ईतरही बरेच फायदे होतील. कल्पना आवडल्यास सांगा मी सगळी जबाबदारी घेण्यास तयार आहे.( खरे तर स्वामीच जबाबदारी घेणार, पण गाडी पहाणे,वैगेरे ईतर सर्व गोष्टी)


Mrdmahesh
Monday, November 13, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत,
धन्यवाद:-) सुंदर लिखाण. :-) अजून येऊ देत.
पिल्लू,
तुमचा अनुभव एकदम सहीच... श्री स्वामी आपल्या भक्तांची कशी काळजी घेतात याचेच हे एक सुंदर उदाहरण. तुमची कल्पना छान आहे. बघूया श्री स्वामी काय योग जुळवून आणतात ते.
आपण सर्वांनी माझ्या लेखाला दिलेल्या प्रतिसादा बद्दल आपले आभार. :-)


Maudee
Monday, November 13, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत ख़ूपच सुरेख़ लिहितोस तू. मनावरची झापडं ख़ाडकन उघडली जातात:-)

Mandarp
Monday, November 13, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश,
तुमचा देवघरा बद्दल लेख खूप चान्गला आहे.
मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे.
घरातील देवपुजा कधी करावी उत्तम वेळ कोणती
समजा एखादा दिवस, काही कारणास्तव उशीर झाला तर काय करावे

मन्दार.


(ithe questionmark umtat nahi ahe. Tyachasathi kai karaicha ?)

Pillu
Monday, November 13, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

प्रशांत वा क्या बात है,खरच खुप अप्रतिम लिहिलय आणी हो मी आपणास हवा असलेला विषया वर लिहितच आहे.पण थोडा वेळ लागतोय.
महेश तुमच्या देवघरा वर पण मी लिहितोय पण......
म्रुद्गंधा कुठे आहेस तु किती मेल केल्यात तुला पण उत्तर नाहिये


Nalini
Monday, November 13, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार, कसा आहेस? ma.ndaar, kasaa aahes?
मंदार, कसा आहेस ma.ndaar, kasaa aahes ?


Mrdmahesh
Monday, November 13, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार,
देवपूजा दुपारी १२ च्या आत व्हावी असा संकेत आहे. पूजा करण्यास सकाळची वेळ उत्तम. आपण आपल्या सोईनुसार एक वेळ ठरवावी (अर्थातच सकाळची). ही वेळ शक्यतो चुकवू नये.

अगदी पहाटे ३ वाजता सुद्धा पूजा करता येते. साधारण सगळे सकाळी ६ ते १० १०:३० पर्यंत पूजा करतात. एखादे दिवशी पूजेस उशीर झाला तरी काही हरकत नाही. पण पूजा जरूर करावी. काही कारणाने पूजा करता येत नसेल तरी चालेल (परंतु हे केव्हा तरीच झालेले चालते.). पूजेत भाव महत्वाचा... नुसती उपचार म्हणून करण्याला अर्थ नाही.
अरे question mark च लफडं असं आहे की त्याच्या आधी जर space असेल तर तो येत नाही. कुठलेतरी non-space character त्याच्या आधी हवे. तरच ? उमटतो. तू question mark, angled brackets मध्ये नुसताच टकला तरी उमटेल. बघ जमतंय का?


Pop
Monday, November 13, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ

आदरणीय प्रशांतदादा, मृद्गंधा,आणि सर्व स्वामीभक्तहो,
सादर सप्रेम नमस्कार.
तुम्हा सर्वांशी ओळख करुन घेताना अत्यानन्द होतोय. आज तुम्हा
सर्वांशी माझी ओळख होते आहे ती आपल्या सर्वांचा लाडका आणि
श्रेष्ठ स्वामीभक्त पिल्लू याच्यामुळे. माझ्यामध्ये स्वामीमाऊलीच्या प्रेमाची
आणि भक्तीची अमृतवल्ली निर्माण करण्यासाठी दयाघन स्वामीमाऊलीने
त्याला प्रेरणा दिली त्याबद्दल मी त्याची आणि त्या माऊलीची अत्यंत
ऋणी आहे.
तुम्हा सर्वांचे रोमहर्षक अनुभव वाचून खूप भरून आले.
तुम्हा सर्वान्च्याइतका अनुभवांचा साठा काही माझ्याजवळ नाहीये,
पण एवढं मात्र नक्की माहित आहे की मी स्वामींचे आनि तुम्हा सर्वांचे लहान लेकरु आहे, आणि तुम्ही सर्व या लेकराला निश्चितपणे सांभाळून
घ्याल आणि बोट धरुन मार्ग दाखवाल.
थोड्या दिवसांपूर्वीचा एक अनुभव सांगते आणि थांबते.
आदरणीय प्रकाश दीक्षितकाका नावाचे वयाने ज्ञानाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ साधक आहेत, आणि ते ज्ञानेश्वरीवर उत्तम प्रवचने करतात.
आमच्याघराजवळच्या एका दत्तमंदिरात एकदा त्यांचे प्रवचन ऐन रंगात आले असताना दत्तमूर्तीस जे टपोरे जास्वंदाचे फूल वाहिले होते त्याच्या
परागांमध्ये मला काहीतरी चमकत असल्यासारखे दिसले, मी स्वामींना
मनोमन प्रार्थना केली की ती वस्तू काय आहे ते मला दाखवा.
स्वामी नुसतेच हसत होते. डोळे बंद केल्यावर असे दिसले की मागे
संपूर्ण पिवळे ठिपके दिसत होते आणि स्वामींची कृपाकटाक्ष मुद्र प्रसन्नपणे हसत होती. नंतर स्वामी जेव्हा थोडे लहान झाले तेव्हा पाठीमागच्या पिवळ्या ठिपक्यान्च्या जागी जास्वंदाचे पराग दिसत होते, आणि गम्मत म्हण्जे तेव्हा नेमका विश्वरुप दर्शनाचा अध्याय चालु होता.


Pillu
Monday, November 13, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉप तुझे या बीबी वर मन्:पुर्वक स्वागत तुझ्या सारखी मुलगी या बीबीवर यावी हे बरेच दिवस मनात होते,आणि सांभाळुन घ्यायचे म्हणशील तर ईथे सगळे जण ग ची बाधा नसलेले आहेत. त्या मुळे काही हरकत नाही.लिहित जा आणि येत रहा.

Mrdmahesh
Tuesday, November 14, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉप,
तुझे या BB वर स्वागत :-). तुझा अनुभव फारच सुंदर आहे. असंच लिहित रहा.


Mai
Wednesday, November 15, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्तदादा आज पहिल्यान्दा मला " अन्त्:करण " ह्याचा अर्थ स्पष्टपणे कळला. फारच सुन्दर लिहिले आहे तुम्ही. धन्यवाद

Mai
Wednesday, November 15, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Here is a link to Shree Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj's "Shree Vasudev Manan " .
It is very good .

http://www.shrivasudevanandsaraswati.com/PDF/Manan.pdf

Shree Swami Samartha !


Mrdmahesh
Wednesday, November 15, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माई,
तुम्ही दिलेली लिंक अतिशय सुंदर... मनन हे प्रश्नोत्तर रुपी पुस्तक फारच छान आहे. संपूर्ण वाचले नही परंतु जेवढे वाचू शकलो ते खूपच सुंदर, सोपे मांडलेले आहे... धन्यवाद...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators