Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 29, 2006

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through July 29, 2006 « Previous Next »

Mrdmahesh
Monday, July 03, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितीन चा अनुभव छान...
अभिजीत, साधना करताना रोजच छान अनुभव यावेत अशी अपेक्षा नसते (करू नये..). आला तर उत्तम. पण असा अनुभव येण्यासाठी साधनेच्या वेळी तुमची मानसिक स्थिती स्वस्थ असणे आवश्यक असते. बर्‍याचवेळेला असे होते की दिवसभरात अशा काही घडामोडी घडतात की ज्यामुळे मन स्वस्थ रहात नाही. त्याचाच परिणाम साधनेवर होतो. अर्थात सांसारिक माणसांच्याबाबतीत असे होणे स्वाभाविक असते... अनेक मनोव्यापारातून तो साधना करत असतो... षडरिपूंशी त्याची लढाई चालूच असते... त्यातूनच कधीकधी मनात दडलेली भीती, वाईट विचार उफाळून येतात अन् ते साधनेत reflect होतात... अशाने विचलित न होता साधना सुरुच ठेवावी. अगदीच जमत नसेल तर साधना न करता फक्त नामस्मरण करावे.. मुख्य म्हणजे, जेव्हा जेव्हा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो तेव्हा तेव्हा शक्यतो मानसिक पातळीवर तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करावा... त्याच्याशी संबंधित जर काही कर्तव्ये पार पाडायची असतील तर ती शक्य तितक्या तटस्थ भावनेने करावीत... ह्या गोष्टींची practice करणे म्हणजेच साधना... हे जमल्यास मन निर्विचार अवस्थेत नेणे सोपे जाते जे की साधने साठी आवश्यक आहे....
तेव्हा, मला काल छान वाटले होते... आज वाईट विचार आले... उद्या काय होईल इ. गोष्टीवर लक्ष न देता शक्यतो मन स्थिर ठेवून साधना करावी...
मझ्या अल्प-मतिला जे या क्षेत्रातले समजलेले आहे त्याप्रमाणे लिहिले आहे... चूक झाली असेल तर जाणकारांनी सुधारावी... :-)


Shrirampurkar
Monday, July 03, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही नवीन सभासद झालेलो आहे सध्या चन्दिगद ला असतो तुम्हा सर्वाशी गप्पा मारायला आव्देल मला.

Manswini
Saturday, July 08, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aura vishayi kahi mahiti milel ka ?

Prashantnk
Sunday, July 23, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ//

कर्माच्या फ़लाविषयी थोडस,

१) माणूस जन्म ही कर्म योनी(कर्म करण्याकरता) ,इतर जन्म ही भोग योनी(कर्माचे फ़ल भोगण्याकरता,ह्यामध्यील(जन्मातील) कर्मे ही फ़लहीन असतात.),
२) आपल प्रत्येक कर्म परत बुमरॅंग सारख परत आपल्याकडे परत येत, हेच कर्मफ़ल.
३) जस चांगले कर्म चांगली फ़ल देत,तसच वाईट वाईट फ़ल देत.
४) जशी जशी कर्म कर्त्यास त्याने केलेल्या कर्माच्या फ़ला विषयी अपेक्षा असेल,तसे तसे फ़ल(लक्ष्यात घ्या,चांगल वाईट,दोंन्हीही) भोगण्याकरता परत परत जन्म घ्यावे लागतात.परत नविन कर्म,परत फ़ल. ह्या मधे परमेश्वर कुठेहि मध्ये येत नाही)
५)ह्या चक्रातून सुटण्याकरता, परमेश्वराला मध्ये आणाव लागत.(प्रपंच प्रारब्धानुसार होतो(आपोआप),परमार्थ करावा लागतो.)
६)म्हणून,आपण केलेली कर्म त्याला अर्पण करावित आणि चांगल्या-वाईट फ़लाविषयी अपेक्षा बाळगुनये.त्यामुळे कर्मफ़लच नाहीस होईल, आणि जन्म-मरण चक्र नाहिस होईल.
७)कलीयुगात नामस्मरणच तारेल, आपण जर अस विचार करू कि हे सगळ भोगण अटळच आहे,तर मी नामस्मरणच कश्याला करु? उत्तर-,हे सगळ भोगण्याची ताकत येण्याकरता,त्याची तीव्रता कमी होण्याकरता. एक उदाहरण सांगतो, समजा धो धो पाऊस पडतो आहे(फ़ल),तुम्हाला बाहेर जायच आहे, पाऊस तर तुम्हि थांब.ऊ शकत नाहि,अश्यावेळी भंगवंताच नाम घेताच तो तुम्हाला छत्री घ्यायची बुध्दी देतो,म्हणजे संकट येणारच, भोग भोगावेच लागणार, संकटाचि तीव्रता कमी होते.


Prashantnk
Sunday, July 23, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ//

भक्त्तीची सुरुवात्-

१) भंगवंताच काही कराव... अशी इच्छा मनात येण ही त्याचीच कृपा असते.
२)भक्त्तीची सुरुवात करताना माणसाचे साधारणत्: असे विभाग होतात

अ)अर्थार्थी- काहि अपेक्षा(प्रापंचीक) ठेऊन,भक्ती करणारा,
आ)जिज्ञासु- भंगवंता विषयी जाणून घ्यायची ईच्छा झालेला,
इ)मुमूक्षू- भंगवंताविषयी (भेटीविषयी) मनात तळमळ सुरू झालेला,
ई)साधक- भेटीकरिता भक्ती करणारा,



Mrdmahesh
Monday, July 24, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत,
चांगले लिहितो आहेस... अजून येऊ देत...

||श्री स्वामी समर्थ||


Maudee
Monday, July 24, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chaan lihito aahes prashaa.nt:-)

Kanak27
Monday, July 24, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अध्यात्म म्हणजे मी कोण आहे ह्याचा शोध घेणे

Kanak27
Monday, July 24, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I would like to write many things but it's taking too much time to write in marathi.
I don't have pratice of it.
Adhyatam is to know your self . upto now u r identified as son,daughter,sister,brother,doctor etc but it is not your true identity ( It is changing as per relations) . To know your self really you need adhayatam & it is only
Dharm of each person.




Mrudgandha6
Monday, July 24, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे काही लिहायला आले तर याआधिच इथे इतके सुन्दर विवेचन झालेय प्रशांतजींकडून की काहि लिहायची गरजच उरली नाही. छान प्रशांतजी.

Mrudgandha6
Tuesday, July 25, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार.
मी अल्पमतीने इथे काही मत प्रकट करु इच्छिते.
महेशदादा, तुमचा हा bb सुरु करण्यामागील उद्देश काही लोकांअ जर परमेश्वरी साक्षात्कार प्रत्यक्ष झाला असेल तर तो दिव्य अनुभव इथे सांगावा असा अहे तुमची तळमळ अतिशय शुद्ध आहे.
परन्तु, माझ्या मते असले दिव्य अनुभव मुळातच कुणालाही सांगु नये असा सन्केत आहे. आणि अशा open चर्चेत BB वर तर कुनिही ते वाचु शकते आस्तिक नास्तिक सगळेच तेव्हा त्यांच्यासमोर तर नकोच असे मला वाटते. शिल्पाने ज्या प्रकारचे अनुभव सांगितले आहेत त्या प्रकारचे अनुभव असे openly BB वर सांगने हे चालु शकते त्यामुळे "देव आहे हेच फ़क्त" सिद्ध होते..त्यामुळे लोक भक्तिमार्गाकडे वळु शकतात. पण तुम्हाला ज्या प्रकारचे अनुभव हवे आहेत ते सांगितले तर देव आहे यापेक्ष "त्याचे गुढ रुप[जे तो सहसा कुणाला दाखवत नाही] कसे आहे हे प्रकट होणार."
पण असले दिव्य अनुभव हे फ़ार उच्चकोटिचे असतात ते का सांगु नयेत यामागील कारणे मझ्या मतप्रमाणे अशी आहेत.
१. असा साक्षात्कार देव आपल्याला देतो तेव्हा त्यावेळि त्याला आपण त्याबतित योग्य वाटलेले असतो. आपले भाव असे काहीतरि असतात कि ज्यामुळे ईश्वर अत्यांनदाने आपल्याला त्याचे दर्शन वेगवेगळ्या रुपत प्रत्यक्ष देतो.त्यामागे आपले भाव,साधना,भक्ति,प्रेम असते.म्हनजे एकप्रकारे ते आपले तप असते. ज्याचे फ़ळ त्याच्या साक्षात्काररुपी प्प्रसादाने मिळते. तसे नसते तर ईश्वर कुठेही कुणालाही त्या रुपात दिसला असता ना??
म्हणजेच आपल्याला असे अनुभव येतात तेव्हा अपली ते प्राप्त होण्याची योग्यता असते. मग असे अनुभव असे openly विविधप्रकारच्या लोकांसमोर जे तो अनुभव कुठल्याप्रकारे घेतिल हेही आपण सांगु शकत नाही.. ज्यांची ते प्राप्त करुन घेन्याची योग्यता आहे कि नाहि हे आपल्याल माहित नसते त्यांन [ त्यांच्या कष्टाशिवाय] कसे सांगावे? आता हे अनुभव वचणारे काही लोक खलप्रवृत्तिचेही असतील मग, त्यांअ याची थोडि तरि झलक मिळणे योग्य ठरेल का?
उद. लिम्बुटिम्बुदादांना एकदा भगवतीचे रुप पहाण्याचि अतिशय तळमळ निर्माण झाली तेव्हा त्यांन त्या गोष्टीचा ध्यास लागला आणि त्यान ते दिव्य स्वरूप दिसले कारण त्यान्ची तळमळ ही एकप्रकारची साधनाच होती.त्यामुळे ते ईश्वराला योग्य वाटले. मग त्यानी जर ते दिव्य स्वरूप इतक्या कष्टानन्तर पाहिले ते जर त्यानि इथे नमुद केले असते तर.. सगळ्यांनाच विनासायास त्यातले गुढ कळाले असते. मग हे बरोबर थरले असते का? सगळ्यांचीच तेव्हढी योग्यता आहे का?
असे अनुभव हे फ़क्त या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तिना जसे आपले' सद्गुरु' यांन गुप्तपणे सांगितले तर बरोबर ठरेल कारण तेच आपली जिज्ञासा पुर्ण करु शकतात.. परन्तु, तुम्हिच पहा. कि दिव्य योगिपुरुश,सन्त, सद्गुरु यांना ते सांगण्याचा अधिकार असतानाही ते सगळ्यांआच हे अनुभव सांगत नाहीत त्यांन सर्व्ज्ञान असुनही.. व्यक्तिंची पारख असुनही.. योग्य व्यक्ति,शिष्य भेटल्यावरच त्याच्या पात्रता असेल तेव्हढेच ते योग्य त्या वेळि त्याला सांगतात. मग आपण तर साधि माणसे. आपल्याला तो अधिकार आहे काय?

याबतित मला आलेला अनुभव असा की मी एका दिव्य अनुभवावर त्यातील अधिकारि दिव्य व्यक्तिला [माझे गुरुच ] जिज्ञासेपोटि एक प्रश्न विचारायला गेले आता मि निवडलेलि व्यक्ति योग्य होति त्याना विचरनेही योग्य होते परन्तु, मी अशावेळि त्यान विचरले जेव्हा आजुबाजुला जरा २-४ भावनाशुन्य टिगल करणारी माणसे तिथे होती... त्यान्च्यासमोर विचारले त्यामुळे माझ्या गुरुंनी उत्तर देणे टाळले[ जे गुरु मझ्या मनातुन विचारलेल्या मोठमोठ्या प्रस्नांनाही प्रत्यक्ष अचुक समर्पक उत्तरे देतात] कारण ते ठिकाण आणि ति वेळ योग्य नव्हती. मी त्याना योग्य ठिकाणि हा प्रश्न केला असता तर त्यानी त्याचि योग्य उत्तरे दिलि असति हे मला खात्रिपुर्वक माहित आहे. इथे तर आपल्याला काहीच माहीत नाही आपली post कोण वाचेल ते..

२. असे सांगण्याने करण्याने आणखी २ गोष्टी होवू शकतात. एक म्हणजे काही लोक त्या साधकाची कुचेष्टा करु शकतात ज्यामुळ्ले त्याला दुःख होवु शकते तो depressed होवुन त्याचा आनंद हरवू शकतो आणि ते ईश्वराला खचितच आवडणार नाही. २री म्हणजे जर असे सांगण्याने सधकाला प्रसिद्धी प्राप्त झाली तर त्याला गर्व होवुन तो मुळ ध्येयापासुन भरकटला जावु शकतो. दोन्हि गोष्टी त्यच्या प्रगतीआ घातकच. तुम्हीच विचार करा तुम्हाला असा अनुभव आला तुम्हि तो कुणाला सांगितला आणि त्याने त्याची टिंगल केली तर तुम्ही दुःखी होणार आणि मग त्या दिव्य अनुभवातला आनंद निराशेच्या गर्तेत कुठेतरि हरवण्याची शक्यता आहे. एक्प्रकारे अशामुळे साधनेचा,प्रेमाचाच अपमान असतो.

३. जर काहीनि हे वाचले तर [तुम्ही म्हणता तसे] ते या अध्यात्माकडे वळतीलही परन्तु, त्यान्ची योग्यता तेव्हढी वाढली नाही किंवाकधी कधी तर त्यांचि योग्यता असुन्देखिल योग्य वेळ आलि नसल्यामुळॅ त्यांना असे अनुभव आले नाही तर कोल्ह्याला द्राक्षे आम्बट या वृत्तिने त्यांचा आहे नाही तेव्ह्ढा विश्वासही उडुन जावू शकतो.देव सगळ्यांना योग्यतेनुसार स्वतः रुप दखवत असतोच.

४. या गोष्टिंचा काही लोक गैरवापरही करु शकतात.


आणखि एक तुमचा हेतु शुद्ध असला तरी "तसे सांगु नये "असा सन्केत स्वामी समर्थ अताही तुम्हाला देत आहेत असे मला वाटते कारण तुम्हाला ज्यापद्धतिचे अनुभव इथे हवे आहेत ते मिळण्यात[म्हनजे इथे सांगवे ही इच्छा पुर्ण होण्यात] तुम्हाला अजुनही जास्त यश आलेले नाही. ही चर्चा वेगळ्या पण सुन्दर वळणांवर जाते. आनी मला वाटते ती तशिच चालु रहावी कारण अशि चर्चा करण्याने होणार्‍या प्रगतीइचे प्रमाण जास्त आहे आणि ते सांगण्यात गैर काहीच नाही. खुप छान चर्चा होते आनी त्यातुन मार्गदर्शनही लाभतेय.
तेव्हा माझे काही चुकले असेल तर मला लहान समजून माफ़ करा. तुम्हाला पटेल तेव्हढेच घ्या. आणि हि सुन्दर चर्चा चालु राहुद्या ही विनन्ति.
क्षमस्व!!!

- सुप्रिया.



Prashantnk
Tuesday, July 25, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ//

अध्यात्म शास्त्र म्हणजे काय?

१)या चराचर सृष्टी मध्ये जे चैतन्य जाणवत,ज्याण कमी-अधिक प्रमाणात सर्वाना व्यापल आहे, ते आत्मा म्हणून सर्व प्राणिमात्रात साक्षी असत,
२)हा जो आत्मा आहे,तो परमात्म्याचा अंश मात्र असतो,
३)परमात्मा म्हणजे मूळ चैतन्य ज्याच्या पासुन जगाचा विस्तार झाला,
४)तर ह्या आत्म्याचा मनुष्य जन्माच सहाय्य घेऊन,परमात्म्या पर्यतचा जो प्रवास असतो,तो करायच्या पद्धतिला अध्यात्म शास्त्र असे म्हणतात.
(लक्षात घ्या, हा प्रवास फ़क्त मनुष्य जन्मातच शक्य आहे.)

प्रश्न असा पडतो कि,हा प्रवास का करायचा?

एक उदाहरण देतो- ओढा आणि समुद्र,ओढा हा समुद्राचा अंश मात्र असतो. ओढयाला समुद्रापर्यंत प्रवास करण भाग आहे,किंबहुना आपण अस म्हणू शकतो कि तेच त्याच अंतीम ध्येय आहे.
त्याच प्रमाणे आपलहि अंतीम ध्येय परमात्माच आहे.सगळेजण हळूहळू त्याच मार्गाने जात आहेत,लागणारा वेळ (जन्म) हा त्या त्या व्यक्ति वर अवलंबून असतो.


ज्या अधिकारी व्यक्तिंनी(सद्ग़ुरु,संत) हा प्रवास पुर्ण केला आहे,त्यांनी ह्या प्रवासातले खाच खळगे,मैलाचे दगड,अडचणी,पध्दत इ. विषयी बरीच माहीती लिहून ठेवली आहे.

ते मार्ग(पध्दत,योग) असे-

अ) ज्ञानयोग- संत ज्ञानेश्वर,स्वामी विवेकानन्द,

आ)कर्मयोग- स्वत्: भगवंत श्रीकृष्ण,संत रामदास स्वामी,

इ)भक्तीयोग- श्री रामकृष्ण परमहंस,संत नामदेव.

हा प्रवास करायला सुरुवात केल्यानंतर,येणारा प्रत्येक अनुभव मग तो भौतिक असो(नामस्मरण करताच संकटातून सुटका,) वा अतेंद्रिय असो (साधनेमध्ये सुंगध येण,अनाहत नाद ऐकू येण,भुवयाच्या मध्ये स्फ़ंदन जाणवन,प्रकाशाची वलय दिसण)हा त्या त्या व्यक्ती करिता तितकाच महत्वाचा असतो, कारण त्यामुळेच त्या व्यक्तीची,ह्या मार्गावरची श्रद्धा दृढ होते,पुढचा मार्ग सुकर होतो,सोपा होतो.




Kanak27
Wednesday, July 26, 2006 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय सच्चिदान्द
प्रशान्त, मार्ग वेगळे आहेत म्हणुन साधना करण्याचि पध्द्त वेगळी असु शकते का



Maudee
Wednesday, July 26, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुद्गंधा छान लिहिले आहेस......
अगदी समर्पक......:-)


Prashantnk
Thursday, July 27, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ//

परमेश्वर आणि सद्ग़ुरु-

१)परमेश्वर म्हणतो,

अरे माणसा तू जर सगळ सोडून आलास,तरच मी तूला जवळ करतो,
जो पर्यन्त तुझ्या कर्माचे गाठोडे, तुझ्या जवळ आहे, तोपर्यन्त मी तुला कसे जवळ करु?
परमेश्वराला "सवत" चालत नाही,त्याला फ़क्त आणि फ़क्त त्याच्यावरच प्रेम करणारा भक्त पाहिजे असतो.

२)सद्ग़ुरु माणसाला,

त्याच्या कर्मासहित, गुण-दोषासहित,रुप्-रंगासहित, जसा आहे तसा स्विकारतात आणि त्याला परमात्म्यापर्यन्त घेऊन जातात,
त्याकरिता जरुर पडली तर,आपल्या शिष्याचे प्रारब्ध हि ते बदलतात.

(शिष्य आपल्या सद्ग़ुरुंनी दिलेली साधना,जशीजशी सातत्याने आणि प्रेमाने करु लागतो,तसे तसे त्याच्या पत्रिकेतले एकेक स्थान शुद्ध होत जाते.)
(सिद्धांच्या पत्रिका बघितल्या,तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते.त्यांच्या बाल्यावस्थेतील,पूर्वदशेतील फ़ळे ही पत्रिकेनुसारच असतात;पण सद्ग़ुरुप्राप्तीनंतरचे आयुष्य मात्र 'पत्रिकेनुसारच' असेलच असे सांगता येत नाही.पत्रिकेच्या कक्षेत न बसणार्‍या अनेक अगम्य गोष्टी त्यानंतर घडू शकतात.)

म्हणूनच शास्त्रांनी सदग़ुरुंचा दर्जा हा परमेश्वर,आई-वडील, यांच्यापेक्षाही वरचा मानला आहे.

सद्ग़ुरु-शिष्य संबंध हे ऋणानुबंधाचे असतात.




Mrdmahesh
Friday, July 28, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा,
तू म्हणतेस ते बरोबर आहे... असे अनुभव सांगू नयेत... परंतु हा BB चालू करताना माझ्या मनात असा विचार होता की कित्येक साधकांनी आपले असे अनुभव लिहून पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत... त्याच धर्तीवर इथे काही अनुभव येतील अशी अपेक्षा होती.... तू म्हणतेस त्याप्रमाणे इथे त्याला अपेक्षित यश मिळालेले नाहीये... खरंच श्री स्वामी देखील असेच सांगत असावेत... असो... चर्चा वेगळ्या परंतु सुंदर वळणांवर येऊन ठेपली आहे... ती तशीच जरी चालू राहिली तरी मला त्यात आनंदच आहे कारण थेट अध्यात्माशी संबंधित BB माझ्या बघण्यात तेव्हा तरी आला नव्हता...
चेष्टा करणार्‍यांचे म्हणशील तर त्यांना करू देत.... त्याचा माझ्यावर किंवा अध्यात्मात जे आहेत त्यांच्यावर त्याचा फारसा परिणाम होईल असे मला वाटत नाही... सुदैवाने तसे अजून झालेले नाही..
तरी पण अनुभव नसले तरी, इथे काहितरी असे लिखाण व्हावे जेणेकरून वाचकांना ज्ञानप्राप्ती, प्रोत्साहन, स्फूर्ती इ. गोष्टींचा इथे आविष्कार व्हावा एवढीच श्री स्वामी चरणी प्रार्थना...
तू छान विवेचन करतेस... तू माझी अपेक्षा वाढवली आहेस...
प्रशांत,
अतिशय सुंदर लिहितोयस... वाचत रहावेसे वाटते... आणखी येऊ देत...


Mrudgandha6
Friday, July 28, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेशदादा,
मलाच इथे खुप छान मार्गदर्शन मिळतेय. आणि मला तुमचा निष्पाप हेतु कळाला होता म्हणुनच तर मला कळकळिने वाटले की मी जी चुक केली ति कुणि करु नये. तुमच्या सगळ्या posts ह्या bb वरच्या आणि इतरही bb वरच्या मी वाचल्या अहेत म्हणुनच तुमच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. तुमची आत्मियता बघुन खुप छान वटते.. स्वामी तुमची मदत अर्थातच करतिल. सर्वांच्यावर त्यांचा वरदहस्त आहेच. मी जरुर इथे माला मीळालेले काही अमृतकण वाटन्याचा प्रयत्न करेन.


Prashantnk
Friday, July 28, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

महेश,माउडी,मृद्गंधा,कनक सगळ्यांना नमस्कार,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

जे लिहिल आहे त्यात 'माझ' अस काहीच नाही,स्वामींची आणि सद्ग़ुरुंचीच अनंत कृपा!

कनक,
मार्ग(पद्धत) जरी वेगळे असले, तरी ध्येय एकच आहे.




Mrudgandha6
Saturday, July 29, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कनक,
मार्ग वेगवेगळे आहेत म्हणजेच साधना वेगवेगळ्या अहेत. त्याच्यापर्यन्त पोहचण्याच्यी वाट प्रत्येकाने स्वतः शोधायची असते. आता तुला साधानेचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे मला ठाउक नाही. माझ्या चिंतनातून मला माझ्या गुरुनी परमेश्वाराने ही उत्तरे दिली आहेत..

ईश्वराबद्दलची समर्पण वृत्ति हाच साधनेचा खरा भाव अहे. आणि या प्रेमातुन आलेला "सोऽहम" हा भाव हेच त्याच्या प्रयन्त पोहचण्यातले मर्म आहे.

१.ज्ञानयोगाधारे योगी "त्याच्याबद्दलचे" ज्ञान प्राप्त करतात. ज्यामुळे जे एकच शाश्वत सौन्दर्य परमज्ञान आहे त्या "परब्रह्माच्या" ठायी ते एकरुप होतात. म्हनज़ेच परमेश्वराप्रतिचे ज्ञान घेतल्यानंतर मनुष्यला "तोच" एक सत्य अहे हे कळते.आणि त्यामार्गानेच ते त्याच्याशि एकरुप होतात. प्रशांतदादानी उदाहरण दिले आहेच. ज्ञानेश्वर माउली, गौतम बुद्ध यांनी ज्ञानमार्गाने "त्याचे"अद्वैत सधले.

१.कर्म मार्ग म्हनजे आपल्या कर्तव्यकर्मातुन त्याच्यापर्यन्त पोहचणे. आप्ले कर्म हे त्या ईश्वराची इच्छा समजुन त्याने सान्गितलेल्या मार्गानुसार नितीमत्तेने करणे. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी हा मार्ग अनुसरुन आपल्याला शिकवण दिली आहे.
"कर्तव्य" म्हणुन केलेल्या कर्मांच्या फ़ळाची इच्छा आपोआपच मनुष्य करत नाही.ते अपोआपच ईश्वरास अर्पण केले जाते. संसारी मानसांना हा मार्ग जास्त योग्य आहे. श्रीकृष्णानी स्वतः अर्जुनालाही हाच मार्ग दखवला होता जेव्हा तो युद्ध तोन्डाशी आले असताना " मी चुकलो मला हे करायला नको म्हणु लागला.
विरक्ति म्हनजे कर्मबन्धनातुन मुक्ती नसुन त्याच्या फ़ळाच्या अपेक्षेपासुन मुक्ती होय.

याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हनजे "सन्त सावता माळी" एकदा त्यान्च्या गावातील सगळे वारकरि जेव्हा "विठ्ठलदर्शनाला पन्ढरीला निघाले होते तेव्हा सावता माळिंनी येण्याचा नकार दिला कारण त्यानी जी इवली इवली रोपे लवली होति त्याना पाणि देन्याचे त्यांचे कर्तव्य होते. त्याना ती रोपे तशिच सोडुन जाने म्हनजेच उलत "विठ्ठलाप्रती केलेले दुर्लक्श्य वाटले असते. ते म्हनालेच " कान्दा मुळा भाजी हीच माझी विठाई आहे". म्हणजेच याच कर्तव्यकर्मात्सुद्धा मझा परमआत्मा दडलेला आहे.
३. भक्ति मार्ग तर साधुसंतानी आपल्यावर केलेली कृपेची पखरणच आहे. केवळ "त्याच्याप्रती" प्रेमभाव ठेवल्याने त्याची प्राप्ति मिळने म्हनजे मझ्यामते परमेश्वाराने मझ्यासरख्या सामान्य माणासांवर केलेली अत्यन्तिक कृपा अहे की त्याने एव्हढा सधा सरल मार्ग दिला आहे.

योगी योगाने, कर्मयोगी कर्माने आनी भक्त प्रेमाने त्याला साध्य करुन घेतात. यातच "त्याच्या" अपल्यावरच्या अगणित प्रेमाचि प्रचिति येते.
खरे तर त्याचि परिपुर्ण साधना करता येणे शक्य आहे का? परन्तु तो आहेच एव्हढा दयाळु की आपले ओबडधोबड शुद्ध प्रेमही त्याला आवडते.
मला इथे अजुनही काही सांगायचे आहे जेव्हा श्रींची इच्छा होइल तेव्हा..


Limbutimbu
Saturday, July 29, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> Mrudgandha6 Tuesday, July 25, 2006 - 3:59 am:
तुमची येथिल अनुभव प्रकट न करण्याविषयीची पोस्ट छान हे! :-)
काही बाबी, कोणत्या का कारणने, उघड करु नयेत!
प्रशान्त, छान लिहिताय!
महेश, जे होत ते चान्गल्यासाठीच! :-)
तुमच चालुद्या, मी वाचतोहे


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators