|  
  ईश्वरासाठी आळवलेली कुठलिहि गीते,प्रार्थना छानच असतात. पण ही पावसच्या स्वामी स्वरुपान्नंदांची एक प्रार्थना एकप्रकारचे पसायदानच..मी माझ्या माहीतीप्रमाणे देत आहे.    उदारा जगदाधारा  देई मज असा वर  स्वस्वरुपानुसंधाने   रमो चित्त निरंतर..    काम क्रोधानिका थारा   नच मिळो मज अंतरी  अखंडित वसो मुर्ती  तुझी श्रीहरी साजरी    शरिरी ही घरीदारी  स्त्रीपुत्रादी परिग्रही  अनासक्त असो चित्त  आसक्त तदनुग्रही    नको धन नको मान  नको लौकिक आगळा  सोडवी हा परि माझा  मोहपाशातुनी गळा    नको भोग नको त्याग  नको विद्या नको कला  अविट पदपद्माची   आमला भक्ती दे मला    नर-नारी हरी रुप   दिसो बाहेर अन्तरी  रामकृष्ण हरी मन्त्र   उच्चारो मम वैखरी    मी माझे मावळो सर्व  तू तुझे उगवो आता  मी तू पण जगन्नाथा  होवू एकची तत्वता    देवभक्ती असे द्वैत  अद्वैतन खंडिता  दाखवी देवदेवेशा  प्रार्थना ही तुला आता    उदारा जगदाधारा  देई मज असा वर   स्वस्वरुपानुसंधाने  रमो चित्त निरंतर.    श्रीकृष्णार्पणमस्तु  
 
  |  
Pillu
 
 |  |  
 |  | Monday, November 06, 2006 - 2:11 pm:    |  
 
 
 |   
  |   
 श्री स्वामी समर्थ    नमस्कार मायबोलीकर  ईथे श्री स्वामींचा तारक मंत्र देत आहे.  याची म्हणावयाची पध्दत अशी आहे. एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यामधे ऊदबत्तीची रक्षा पडेल असे करावे. म्हणुन झाल्यावर हे तिर्थ घरातील सर्वांना पिण्यास द्यावे.    निश:क हो निर्भय हो मना रे  प्रचंड स्वामी बळ पाठिशी रे    अतर्क्य अवधुत हे स्मर्तुगामी  अशक्यही शक्य करतील स्वामी    जिथे स्वामी पाय तिथे न्युन्य काय  स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय    आज्ञेविणा काळ हि ना नेई त्याला  परलोकी ही ना भिती तयाला    उगाची भितोसी भय हे पळू दे  जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे    जगी जन्म म्रुत्यू असे खेळ ज्यांचा  नको घाबरु तु असे बाळ त्यांचा    खरा होई जागा तु श्रध्दे सहित  कसा होशी त्या विण तु स्वामी भक्त    कितिदा दिला बोल त्यांनीच हात  नको डगमगु स्वामी देतिल साथ    विभूती नमन नाम ध्यानादि तिर्थ  श्री स्वामीच या पंचप्राणाम्रुतात    हे तिर्थ घे आठवी रे प्रचिती  न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती      श्री स्वामीसमर्थ चरणाविंदार्णपर्णमस्तू           
 
  |  
 
 | 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
  | 
 | 
 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
 
 
 |