Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
टोमॅटोचे नर्गिसी कोफ़्ते ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » टोमॅटोचे नर्गिसी कोफ़्ते « Previous Next »

Dineshvs
Wednesday, January 11, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकडे घाईघाईने लिहिले होते ते आता सविस्तर लिहितो.
सहा मध्यम आकाराचे लाल घट्ट टोमॅटो घेऊन ते देठाकडुन पोखरावे. आतला सगळा गर बाहेर काढुन ते ऊपडे घालावेत.
तेलाची फ़ोडणी करुन त्यात हिंग हळद घालुन दोन वाट्या हिरवे वाटाणे घालावेत. फ़्रोझन असले तरी चालतील. तेलात परतुन ते शिजवावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, आले व कोथिंबीर घालावी. मीठ घालावे.माऊ शिजल्यानंतर डावेने ते घोटुन घ्यावेत. याच सारणात गाजराचे तुकडे घालता येतील, ते आधी परतुन घ्यावे लागतील. व वाटाणे वेगळे शिजवावे लागतील. मग हे सारण पोखरलेल्या टोमॅटोत दाबुन भरावे.

बटाटेवड्यासाठी वेगळे बेसन मिळते ते आणुन त्याचा भज्याच्या पिठाप्रमाणे घोळ करावा. ते न मिळाल्यास बेसनात अर्धे तांदळाचे पिठ मिसळुन घोळ करावा. कारवारी पद्धतीचे तांदुळ आणि तुरडाळ भिजवुन वाटुन केलेला घोळहि चालेल. हौस असल्यास, पनीर मैदा व मीठ मिसळुन त्याचा घोळ करावा. या घोळात टोमॅटो बुडवुन तळावा. वरचे कव्हर शिजण्यापुरताच तळावा. आतले सारण शिजलेले आहे, हे लक्षात ठेवावे.
खाताना याचे ऊभे दोन काप करुन घ्यावेत. घट्ट भरलेल्या सारणामुळे टोमॅटोचा आकार तसाच राहतो.
एखादी मलाईदार पांढरी वा केशरी करि करुन त्यात हे घालता येतील.


Meggi
Tuesday, January 17, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ही मलाईदार करी कशी करायची?

Shyamli
Tuesday, January 17, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आता पांढरी करी सांगा(च्)

Deemdu
Tuesday, January 17, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आणि ती केशरी करी ही सांगा दिनेशभाउ तीच हो ती व्हेज बिर्याणी बरोबर मिळते हाटीलात

आणि मलई कोफ़्ता नावाची जी भाजी मिळते त्याची करी कशी करायची?


Moodi
Tuesday, January 17, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिमडु मलई कोफ्ता इथे आहे ग.

/hitguj/messages/103383/91407.html?1129536290

Dineshvs
Tuesday, January 17, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो तशीच तशीच करायची, नाही केली तरी चालेल. पकोडा म्हणुन हा आयटेम खाता येतो.

Nandita
Friday, January 27, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maI kala k$na paihlaI hI krIÊ Canaca JaalaI pNa duQaacyaa pavaDrI evajaI maI taMdLaca ipz Gaatla :-)

Rachana_barve
Tuesday, June 13, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो दिनेश, मी केले हे कोफ़्ते पण ते डाळीच पिठ चिकटलच नाही टोमॅटोला. म्हणजे बटाट्यावड्यांना कस आवरण असत तस चढलच नाही. पण चव मस्त झाली होती. नुसतेच टोमॅटो तळल्याने वरच कव्हर सुट झाल आणि मग मी ते करी मध्ये टाकले. काय चुकल माझ नक्की? :-(

Bee
Tuesday, June 13, 2006 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, टोमॅटो पोखरायचे कसे? त्यातील गर काढून मधात छिद्र पाडायचे का.. म्हणजे जर गर काढला तर आपोआपच छिद्रही पडेलच.. पण मग गर वाया जाणार नाही का?

Gajanandesai
Tuesday, June 13, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यातील गर काढून मधात छिद्र पाडायचे का<<<

नाही, छिद्र पाडून गर काढायचा. वाया कशाला जाईल खाऊन टाकायचा. :-)

Dineshvs
Tuesday, June 20, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, पीठ जरा पातळ भिजवले गेले असणार. शिवाय बेसनात मी लिहिल्याप्रमाणे तांदळाचे पीठ वैगरे मिसळावे लागतेच. जास्त वेळ तेलात राहिले तरी असे होईल. अखंड टोमॅटोवर पीठ चिकटत नाही, पण भरण्यासाठी जो छेद दिलेला असतो त्यामुळे चिकटते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators