Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रेशमी कबाब

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » कोंबडी किंवा चिकन » रेशमी कबाब « Previous Next »

Moodi
Tuesday, January 10, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेशमी कबाब.

साहित्य, ३ ते ४ चिकन पिसेस, फेटलेली मलई अथवा किसलेले चीज, आले लसुण पेस्ट, दालचिने अन काळी मिरी पावडर.

कृती : चिकन पिसेस धुवुन किचन टॉवेल वा कपड्यात कोरडे करुन त्याला चिरे पाडावेत. मलई किंवा किसलेले चीज, आले लसुण पेस्ट, दालचिनी अन मिरी पावडर एकत्र करुन त्यात चिकन पिसेस १० ते १२ तास मुरवत ठेवावे. नंतर ग्रील लावुन कोळशावर वा ओव्हममध्ये १६० तापमानावर भाजावेत, भाजताना वरुन बटर सोडावे.


Sunilt
Tuesday, January 10, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, पाककृतीबद्दल धन्यवाद !! माझ्या दोन शंका -
१) १०-१२ तास मुरवावे ते फ्रीझमध्ये की बाहेर कारण भारतासारख्या देशात १०-१२ तास पदार्थ बाहेर राहिल्याने खराब होऊ शकतो.
२) Microwave वापरायचा झाल्यास काय बदल करावे लागतील ?


Moodi
Tuesday, January 10, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनील ते ३ ते ४ तास मुरवले तरी चालतील. पण मायक्रोव्हेव विषयी मला कल्पना नाही. मी दिनेशना ते संध्याकाळी येतील तेव्हा विचारेन. अन हे बार्बेक्यु सारखे भाजले तरी चालतात अन आवडेल तो गरम किंवा तंदुरी मसाला पण मिक्स केला तरी चालेल. यात लसुण असल्याने ते लगेच खराब होणार नाही.

Sharmila_72
Tuesday, January 10, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल, मायक्रोवेव कुठला आहे त्यावर अवलंबून आहे. त्यात grill mode आहे का? असल्यास त्याचा किंवा combination म्हणजे grill+microwave चा उपयोग करुन हे करता येतात. मी चिकन टिक्का असाच करते.

Dineshvs
Tuesday, January 10, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेशमी कबाबासाठी बोनलेस चिकन घ्यायचे. आले लसुण लावल्याने, आणि दह्यात मुरवल्याने, चिकन सैल होते, मसाले त्यात मुरतात. त्यामुळे ते लवकर शिजते.
मायक्रोवेव्ह मधे करताना, आधी चिकन थोडे शिजवुन घ्यावे. त्याला दोन तीन मिनिटे लागतील. ( तुकड्यांच्या आकारावर अवलंबुन आहे ) आणि मग त्याला मलई, लावुन परत ग्रिल करायचे.
अगदी शेवटी मिरिपुड वैगरे शिवरुन परत अर्धा मिनिट ग्रिल करायचे.


Moodi
Tuesday, January 10, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश आता धन्यवाद नाही हं, तुम्हीच सांगीतले की हक्काने विचारा म्हणुन.

Maitreyee
Tuesday, January 10, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल, तुमची शंका बरोबर आहे. बाहेर इतका वेळ टिकण्याची खात्री नसते. मी तरी मसाला वगैरे लावून फ़्रीझ मधे ठेवऊन मुरवते, १० - १२ तास..

आणि microwave मधे कबाब वगैरे केले तर जरा चिवट होतात असे माझे मत!


Dineshvs
Tuesday, January 10, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मूडि, हक्क आहेच.
मैत्रेयी, मायक्रोवेव्ह मधे नेहमी स्टॅंडिंग टाईम धरावा लागतो. ओव्हन बंद केला तरी, पदार्थ आतल्या आत शिजत राहतो. आपण जर पुर्ण शिजायची वाट बघत बसलो तर त्यातले पाणी ऊडुन जाऊन, तो चिवट बनतो.
मुरवण्याची पद्धत खास करुन उत्तर भारतातली, तिथल्या थंड कोरड्या हवेत मुरवत ठेवलेला पदार्थ खराब होत नाही. पण ईतर ठिकाणी जर आंबु द्यायचा नसेल तर पदार्थ फ़्रीजमधेच ठेवायला हवा.
मोठ्या प्राण्यांचे मास काहि काळ ऊघड्यावर टांगुन ठेवल्याशिवाय त्यातले स्नायु लवचिक होवुन ते खाण्यायोग्य होत नाही. त्यामुळे ताजे मटण हा प्रकार नसतोच.


Bee
Wednesday, January 11, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे आहे का दिनेश.. मी विदर्भात कित्येकदा रविवारी प्राण्यांना उलटे टांगून ठेवलेलेच पाहिले आहेत. तेंव्हा मला वाटे बहुतेक रक्त टपकण्यासाठी हे असे करत असावे पण नुसते मास पाहून त्यातून तसे काहि होत असेल असे वाटत नव्हते. आज कारण कळले..

Sunilt
Friday, January 13, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश, microwave बंद केल्यावर लगेच पदार्थ बाहेर काढला तर तो चिवट होणार नाही तर. ह्या रविवारी रेशमी कबाब करायचा विचार आहे. झाल्यावर लिहीनच !!

Daizy
Friday, January 13, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही bee प्रमनेच वाटत होते.. नक्की कारण आज कळाले.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators