Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बेक्ड व्हेजीटेबल्स ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » मिश्र भाज्या » बेक्ड व्हेजीटेबल्स « Previous Next »

Moodi
Sunday, January 01, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉलीफ्लॉवर बेक.

साहित्य : २ सिमला मिर्च्या, २ ते ३ मोठे लाल टॉमेटो, २ मध्यम कांदे, दीड ते २ वाटी मटार दाणे / वाटाणे, १ मध्यम बटाटा, १० ते १२ फ्लॉवरचे तुरे, 2-3 लवंगा, ६ ते ७ लसुण पाकळ्या, अर्धा चमचा ताजी मिरीपुड, २ चमचे लोणी, १ वाटी ब्रेड क्रब्म्ज्स, मीठ, कोथिंबीर.

कृती : सिमला मिर्ची, बटाटा, कांदे यांचया पातळ चकत्या कराव्या. वाटाणा थोडा ठेचावा. टोमेटो २ मिनिट गरम पाण्यात ठेवुन सोलुन वेगळे ठेवावे. फ्लॉवरचे लहान तुरे करावेत.

सर्व भाज्या एकत्र करुन त्यावर लवंगपुड,मीरेपुड, मीठ,लसुण बारीक चिरुन घालावा. कांदा थोड्या लोण्यावर परतुन बदामी करावा.

एका ओवन प्रुफ डिशला लोणी लावुन एकावर एक असे भाज्यांचे थर लावावे, वर टॉमेटोचा गर अन कोथिंबीर घालावी.
पावाचा चुरा अन लोणी एकत्र करुन वर शेवटी घालावे.
ओव्हनमध्ये हे ठेवुन २ ते अडिच तास बेक करावे, मधुन मधुन लक्ष ठेवावे.. तांबुस रंग आला की डिश काढावी अन लोणी लावलेल्या गरम टोस्टबरोबर सर्व्ह करावी.


Prajaktad
Monday, January 02, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी ब्रेड्च्या चुय्राबरोबर वर चिझ पण घातले तर

Moodi
Monday, January 02, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालेल ग प्राजक्ता. चीज किसुन घाल म्हणजे पटकन वितळेल आणी सगळ्या भाज्यात मिक्स होइल. वरुन घाल.

Prasadp77
Monday, January 02, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi, please state the temperature as well otherwise emergency services would stop by my door in no time ;-)

Moodi
Monday, January 02, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद माझ्याकडे Electric oven आहे त्यामुळे यात टेंपरेचर १५० ते १६० च्या दरम्यान चालते मात्र आजच्या दिवस थांब, दिनेशना विचारते Gas assisted oven बद्दल.

Dineshvs
Monday, January 02, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या पाककृतिला १६० से. तपमान लागेल. केक सोडुन कुठल्याहि पाककृतिसाठी, वास, वरुन आलेला रंग यावर पण लक्ष ठेवावे. दिलेली वेळ हि सर्वसाधारण असते. रुमचे तपमान, घटकांचे तपमान, पाण्यातील द्रवपदार्थ यावर काहि मिनिटे कमी जास्त होतात.
सराईत नाकाला हा वास बरोबर समजतो.
साधारण गॅस मार्क ४ म्हणजे, १८० से असे सेटिंग असते.


Moodi
Monday, January 02, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश.
प्रसाद आता तुझ्याकडे ज्या प्रकारचा ओव्हन आहे त्याप्रमाणे सेटींग कर.
तसे इलेक्ट्रीक ओव्हनमध्ये लवकर बेक केले जाते.


Moodi
Monday, January 02, 2006 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेक व्हेजी २

२०० gm गाजर, १०० gm वाटाणा, १०० gm फ्लॉवर, ५० gm फरसबी, ५० gm चीज, ३० gm मैदा, ३० gm लोणी, १ कप दुध, अर्धा चमचा सफेद मिरी पावडर, १ टीस्पुन मीठ.

कृती : वाटाण्याचे तुकडे करा., फरसबी, गाजराचे लांब तुकडे कापा. फ्लॉवरचे लहान तुरे करा. सर्व भाज्या मीठाच्या पाण्यात थोडा वेळ शिजवा, जास्त शिजवु नका. भाज्या शिजल्या तरी अख्या स्वरुपात पाहिजेत, गाळ नको.

एका pan मध्ये लोणी वितळवा, त्यात मैदा टाकुन सतत हलवा, गोळे होऊ देवु नका. १ मिनिट परतल्यावर थोडे थोडे करुन दुध घाला, सॉसप्रमाणे उकळु द्या अन सतत ढवळा. उकडल्यावर हा व्हाईट सॉस उतरवा. त्यात अर्धे किसलेले चीज टाका. सर्व उकडलेल्या भाज्या अन सफेद मिरी पावडर घालुन नीट मिक्स करा. हलक्या हाताने बेकिंग डिशला तुपाचा हात लावुन वरील मिश्रण त्यात ओता. वर उरलेले चीज पसरा. आधीच तापवलेल्या ओव्हनमध्ये ही डिश १८० 0 वर ठेवा. १० ते १२ मिनिट बेक करा. वरचे चीज वितळुन बदामी झाले पाहिजे. गरम वाढा.


Parijat30
Monday, January 23, 2006 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी आजच केली होती मी ही बेक्ड वेजीटेबल. छान झाली होती.

Moodi
Monday, January 23, 2006 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता मी पण परत करणार आहे. मात्र चिमुटभर मसाला घातला तरी चालतो यात.

Harini
Thursday, January 26, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी मीसुध्दा केली होती कालच. खूप छान झाली होती. माझ्या मुलीसाठी विचारते, नाचणीचं पीठ वगैरे घातलं तर चालेल का?

Sia
Monday, May 22, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi hya baked vegetables Microwave madhe pan karata yetat ka? Tuza kuthala oven aahe kalala nahi mhanun vicharala.

Moodi
Monday, May 22, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिया मी मायक्रोव्हेवमध्ये करुन नाही पाहिली. माझा इलेक्ट्रीकचा ओव्हन आहे.

हरिणी खुप दिवसानी उत्तर देतेय त्याबद्दल सॉरी, पण नाचणीचे पीठ मी पण नाही वापरले कधी, जर तुला घालायचे असेल तर ते चांगल्या नॅपकीनमध्ये चाळणीने चाळतो तसे मऊ चाळुन मग घालुन बघ.


Asira
Tuesday, May 23, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यात अननसाचे तुकडे पण मस्त लागतात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators