Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गाजराची कांजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » पेये » गाजराची कांजी « Previous Next »

Dineshvs
Wednesday, December 14, 2005 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल्लीतला हा लोकप्रिय प्रकार. आपल्याकडे फ़ारसा प्रसारात नाही.

लाल किंवा केशरी गाजराचे लांबट तुकडे करावेत. रंगासाठी एखादे बीट पण घ्यावे. हे सगळे पाव किलो पुरेल. अर्धी वाटी मोहरीची डाळ घ्यावी.
गाजराला, चमचाभर साखर व मोहरीची डाळ चोळुन घ्यावी. त्यापुर्वी डाळ अगदी काहि सेकंद मिक्सरमधुन काढावी.
चिनीमातीच्या ऊभट बरणीत हे घालावे. साधी काचेची बरणी पण चालेल. मग त्यावर ऊकळुन कोमट केलेले पाणी, एक लिटरभर, ओतावे. झाकण लावुन बरणी बाजुला ठेवावी. दुसर्‍या तिसर्‍या दिवशी. या पाण्याला छान स्वाद येतो. मग त्यात काळे मीठ, आल्याचा रस, पुदिना किंवा कोथिंबीर घालुन गाळुन प्यावे.

मुगडाळ आणि ऊडिदडाळीचे वडे करुन या कांजीत कुस्करुन खायची पद्धत आहे.


Moodi
Wednesday, December 14, 2005 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश एकदम छान स्वास्थ्यवर्धक प्रकार दिसतोय हा. किती दिवस टिकेल? फ्रीझमध्ये नंतर राहील ना? चला मोहरीची डाळ सत्कारणी लागली.

Dineshvs
Wednesday, December 14, 2005 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बाहेरहि टिकते. त्यातच पाणी घालत रहायचे. मोहरीमुळे आंबटपणा वाढत जातो. हवे तेवढे आंबट झाले कि फ़्रीजमधे ठेवायचे.
यात चमचाभर अख्खे गहु घातले तर आणखी छान.


Giriraj
Thursday, December 15, 2005 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी मी गाजराची कारंजी
वाचली!


Sunilt
Thursday, December 15, 2005 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यासाठी गाजराचा रस चान्गला पण तो काढणे महा कठिण. गाजरे नुसती खाणे तर त्याहून कठिण. दात दुखतात आपल्याकडे baby carrots देखिल मिळत नाहीत. अश्या वेळी काय करावे

Moodi
Thursday, December 15, 2005 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाजराच्या चकत्या किंवा खरच ते जमत नसेल तर घरच्या लोण्यासारखे उत्तम औषध नाही. थोडा वेळ द्या यादी मी देत आहे स्वास्थ्य मध्ये vitamins ची. गाजर शिजवुन खाल्ले तरी त्याचे महत्व अजीबात कमी होत नाही. गाजर अन आवळा हे दोन्ही शिजवले तरी परीणाम चांगलाच देतात.

Dineshvs
Thursday, December 15, 2005 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या गिर्‍याला गाजरे खुप आवडतात. केळवणाला बोलावलत तर गाजर भात, गाजराची पुरी, गाजराची भाजी, गाजराची चटणी, गाजराचा हलवा, गाजराचे आईसक्रिम,
गाजराचे लोणचे आणि प्यायला गाजराची कांजी करा.
सगळ्याच्या कृति माझ्याकडुन घ्या.


Dineshvs
Thursday, December 15, 2005 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कच्ची गाजरे खाणे किंवा त्याचा रस पिणे हे काहिजणाना त्रासाचे होवु शकते.
त्यानी गाजरे ऊकडुन कुस्करुन दुध साखर घालुन खावीत. बीटा कॅरोटीन शिजवल्याने नाश पावत नाही.
रस काढताना मिरीपुड व पुदिना घालावा. त्याने स्वादहि येतो व रस बाधतहि नाही.



Amayach
Thursday, December 15, 2005 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, गाजराची कान्जी हिवाळ्यात खाणे चान्गले की उन्हाळ्यात??

Rachana_barve
Thursday, December 15, 2005 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोहरीची डाळ म्हणजे काय? कुठे मिळते आणि कशी दिसते?

Moodi
Thursday, December 15, 2005 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना मोहरी जर एका मिनिटात मिक्सरवर फिरवली तर पटकन फुटते, अन पाखडुन तिचे साल काढता येते. लोणच्यात वापरतात ना ती. विकतच्या लोणचे मसाल्यात पण असते अन रंगाने पिवळी. तीळाएवढी बारीक अन चपटी.

Sas
Friday, December 16, 2005 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोहरीची डाळ म्हणजे काय? कुठे मिळते आणि कशी दिसते?
फोडणी साठी वपरतो ती मोहरी का ही?
स्पष्ट केल्यास करुन पहत येEल.

How to write येEल.


Dineshvs
Friday, December 16, 2005 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांजी हिवाळ्यात किंवा ऊन्हाळ्यात कधीहि पिता येईल. तिने तोंडाला चव येते.
मोहरीची डाळ याच नावाने बाजारात मिळते. पिवळी असते. चिमुटभर खाऊन बघावी. फ़ार कडु लागता कामा नये.
फ़ेसुन करायच्या लोणच्यात हि वापरता येते. नेहमीच्या लोणच्यात अर्थातच वापरता येते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators