|
Dineshvs
| |
| | Monday, December 12, 2005 - 5:22 pm: |
| 
|
दहा बारा खुर, ( येस हे सुप खुराचेच करतात ) २०० ग्रॅम मटणाचे तुकडे घ्यावेत. ते अगदी स्वच्छ धुवावेत. दीड लिटर पाणी घेऊन, अगदी मंद आचेवर हे पाच सहा तास शिजवावे. अधुन मधुन पाणी घालावे. दोन कांदे लांब चिरुन तळुन लाल करावेत.व चुरुन घ्यावेत. १ चमचा जिरे, आठ दहा मिरीदाणे, दोन तीन हिरव्या वेलच्या यांची भाजुन पुड करावी. एक ईंच आले, चार पाच लाल मिरच्या वाटुन घ्याव्यात. तुप तापवुन त्यात आणखी दोन कांदे बारिक चिरुन घालावेत. ते मऊ झाले कि वाटलेला कोरडा व ओला मसाला घालावा. हळद घालावी. ( थोडा तळलेला कांदा व मसाला बाजुला ठेवावा ) जरा परतावे. थोडे पाणी शिंपडावे. मग त्यावर शिजवलेला पाया गाळुन घालावा. मीठ घालावे. प्रत्येकाच्या बोलमधे सुप घालुन त्यात लिंबु रस, तळलेला कांदा व मसाल्याची पुड घालुन द्यावे. थंडीच्या दिवसात अंगात ऊब येण्यासाठी हे सुप पितात. हे सगळे रात्रभर शेकोटीवर शिजवतात.
|
मस्तं पाककृती! मटण पायाचं सूप तब्येतीलापण चांगलं.. -तात्या.
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|