Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रताळ्याची भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » कंद - रताळे, सुरण, कोनफळ इ. » रताळ्याची भाजी « Previous Next »

Bee
Tuesday, December 06, 2005 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एका व्यक्तीपुरते -

दोन उकळलेले मध्यम आकाराचे रताळे.
दोन लहान टोमेटो
एक कांदा चिरलेला
फ़ोडणीचे साहित्य.

उकळलेल्या रताळ्याच्या फ़ोडी करायच्या.

कांदा टोमेटो परतून घ्यायचे. फ़ोडणी हवी तशी देता येईल. फ़क्त पाणी टाकू नका.

कांदा आणि टोमेटो गलगल झिजले की त्यात रताळ्याच्या कापलेल्या फ़ोडी टाकायच्या आणि अगदी हलक्या हातानी अरत परत करायच्या.

आपण जशी बटाट्याची भाजी करतो तशीच ही भाजी असते खरे तर. टोमेटो फ़क्त हवाच.


Ami79
Saturday, March 08, 2008 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली होती.

कढईत तूप थोडे जास्त घ्यावे. त्यात भरपूर जीरे घालावे. त्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. मिरचीचे प्रमाण तुमच्या चवी प्रमाणे ठेवा. फोडणी तयार झाली की त्यावर रताळ्याच्या बारिक कापलेल्या फोडी घालाव्या. ५ मिनिटे झाकण ठेवुन नंतर भाजीत थोडे पाणी घालावे. परत झाकण ठेवुन शिजवावे. शिजल्यावर हवे असल्यास थोडे खोबरे घालुन वाढावे


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators