Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बालुशाही

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » बालुशाही « Previous Next »

Dineshvs
Friday, October 28, 2005 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baalauXaaih krayalaa Kup saÜpI Aaho. ek vaaTI maOValaa pava vaaTI tup caÜLuna Gyaavao. maga %yaat pava vaaTI AaMbaT dih va qaÜDasaa saÜDa Gaalauna Ôar Ga+ naahI AaiNa Ôar ma} naahI Asao iBajavaavao. %yaava hvao tr kajau Gaalaavaot. maga %yaacao lahana laaDu kÉna hatanao capTo kravaot. maoduvaD\yaasaarKa Aakar idlaa trI caalaola. maga %yaa tupat maMd Aacao var tLuna kaZavyaat.
ek vaaTI saaKrocaa p@ka pak kÉna %yaat yaa baalauXaaih garma Asatanaaca Takavyaat va caar paca imainaTo mauÉ Vavyaat. maga taTalaa tupacaa laat laavauna %yaat %yaa saukNyaasaazI zovaavyaat. pakat hvaa tÜ svaad imasaLta yaošla. maOVat Kvaa vaOgaro imasaLta yaošla.


Sharmila_72
Saturday, October 29, 2005 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh,
mazya kahi queries :
1. Maida bhijavlyavar kiti velane balushahi talnyas ghyavi?
2. Balushahi Taltana tee kadhai madhe khalun var ali pahije na gulabjam taltana yeto tyapramane?

3. Taltana lalsar talavi ki thodi badami talavi? ani talun zalyavar teeche swarup kase asave? mau, khuskhushit ki kadak?

Mage ekda mee karun pahili hoti, tevha talun pakaat takli ani mag pakatun var kadhtana tutun tukde zale.


Moodi
Monday, December 05, 2005 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बालुशाही

साहित्य : दीड कप मैदा, पाव ते अर्धा टीस्पुन बे. पावडर किंवा खायचा सोडा, पाऊण कप तुप, २ कप साखर, २ चमचे दुध, 3-4 चमचे दही.

मैदा बे. पावडर किंवा खायचा सोडा घालून चाळुन घ्यावा.त्यात पाऊण कप तुप घालुन फेसावे. त्यातच मग दही घालुन परत फेसुन चांगले मळावे. अन ४५ मिनिटे झाकुन ठेवावे.
नंतर या मळलेल्या मैद्याचे होतील तेवढे म्हणजे किमान १० ते १२ समान मध्यम चपटे गोळे करा. अन प्रत्येक गोळ्यात एक खड्डा भोक पाडा. अन परत झाकुन ठेवा.
कढईत तुप तापायला ठेवा आधी मोठ्या अन नंतर मंद आंचेवर ठेवा. अन मग हे गोळे तळून घ्या. किचन पेपरवर ते तळलेले गोळे काढा, तुप निथळू द्या.
काही ठिकाणी हे गोळे तळुन मग रात्रभर तसेच डब्यात ठेवतात. अन मग दुसर्‍या दिवशी सकाळी पाकात टाकतात.

पण लगेच हवे असल्यास एकीकडे तुप निथळुन झाले की दुसरी कडे झालेल्या साखरेच्या २ तारी पाकात ते गोळे सोडा. अन मुरु द्या तासभर.
रात्रभर ठेवणे नको असेल तर एकीकडे तळताना दुसर्‍या आंचेवर gas वर साखरेचा पाक करायला ठेवा. अन मग तुप निथळल्यावर लगेच पाकात टाका.

गोळ्याना मध्ये भोक पाडल्याने त्याना आतल्या आत पदर सुटुन ते बाजारातल्या बालुशाही प्रमाणे छान होतात.


Sharmila_72
Monday, December 05, 2005 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, या बालुशाहीच्या dough ची consistency कशी असावी? कारण जास्त मऊ असेल तर मध्ये खड्डा नाही करता येणार. मी एकदा प्रयत्न करुन पाहिला होता. पण नाही झाली चांगली. आणि सोनेरी रंगावर तळायची ना?

Moodi
Monday, December 05, 2005 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला मी जरा चांगले मळुन घेतले तरी पीठ जरा घट्टच ठेवले होते, कारण तु म्हणतेस तसे होवु शकते. पण मी जेव्हा पीठ घट्ट ठेवले होते तेव्हा छान पदर सुटुन चवही मस्तच लागली. मी ते लगेच पाकात टाकले होते तुप निथळल्यावर. पाहिजे तर मैदा अन सोडा चाळल्यावर दह्यात फेटुन मग घट्ट मळावे, अर्थात दह्याचे प्रमाण पाण्यासारखे पातळ नसावे आधीच. अन हो सोनेरी तांबुस रंगावर तळावेत.

Sharmila_72
Monday, December 05, 2005 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, धन्यवाद. अजुन एक query तूप गरम करुन घातलस कि रूम टेम्परेचर चं?

Moodi
Monday, December 05, 2005 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला तुप फ्रिझमधील असेल तर ते room temperature ला आणावेच लागते अन तुप गरम केल्यावर त्याला काही वेळेस वास लागतो म्हणुन पाहिजे तर ते एका वाटीत काढुन ती वाटी गरम पाण्यात, ते पाणी तुपात पडणार नाही अश्या पद्धतीने ठेवावी, म्हणजे तुप वितळते अन वासही लागत नाही.

Saj
Thursday, February 16, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी,
मला पाकाचे प्रमाण साग ना बालु शाही साठी


Vaishali_hinge
Thursday, February 16, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही एकतारी आणि दोनतारी पाकातलाअ फरक आणि प्रमाण कळेल का?

Sharmila_72
Thursday, February 16, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन वाट्या साखरेला एक वाटी पाणी घेऊन ते गॅस वर उकळत ठेवायच. मधून मधून ढवळत रहा. चेक करत रहा. ताटात थेंब टाकून दोन बोटांमध्ये धरून पहायच. तेव्हा एक बारीक तार येते. हा झाला एक तारी पाक. असाच पुढे उकळत ठेवायचा. परत चेक करत रहायच दोन तारा आल्या कि दोन तारी पाक झाला ! आणि असाच उकळत ठेवला कि ताटात टाकल्यावर टण असा आवाज येतो, त्याची गोळी बनते. हा झाला पक्का पाक !

Moodi
Friday, May 26, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश एक विचारायचे आहे हो. बालुशाही तुपातच तळतात का? जर तुप नसेल तर गुलाबजाम रीफाईंडमध्ये तळतात त्याप्रमाणे तळल्या तर चालतात का?

Dineshvs
Friday, May 26, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो चालेल कि. बालुशाहि हलक्या होत असल्याने सगळे तेलतुप बाहेरच राहते.

Megha16
Tuesday, August 29, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा मुडी धन्यवाद.
काल मी बालुशाही केली होती मस्त च झाली होती एकदम.


Manuswini
Tuesday, October 17, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी,

तुझ्या प्रमाणाने बालुशाही केली तर दोन वाटी सखार पाकाला पुरेशी आहे?

कीती होतात साधारण बालुशाही?

मी आज करणार आहे pls सांगशील का लवकर?


Manuswini
Wednesday, October 18, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कालच बालुशाही केली.

माझी छानच झाली.

माझा exp

१) पिठ हे घट्टच भिजवले तर छान होते.
२)दही थोडे कमिच टाकावे कारण तूप असते ना


माझ्या बहिणीने ही कालच केली तिने पिठ नरम भिजवले का झाले. आणी एकदम गोळा झाले. तर मी इथे पिठ घट्ट भिजवून सोडा टाकला.

बहिणीने baking powder टाकली तर ती एवढी फुलली नाही.

दोघीनी एकदम करायची ठरवली होती. तिने तिच्या घरी केली, मी माझ्या म्हणून हा exp share केला.




Ana
Tuesday, November 14, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, moodi
परवा बालुशाही करुन बघितली पण विकत असते तितकी
आतुन कडक झाली नाही आणी पटकन तळली जात होती मला तर मग भीती वाटत होती की आतुन कच्ची राहिली तर आत पाक पण शिरला नव्हता पण बाहेर साखरेच coating असल्यामुळे वाईट लागली नाही.
काय चुक झाली असेल?


Dineshvs
Wednesday, November 15, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळताना गॅस प्रखर होता म्हणुन पटकन तळली गेली. हि अगदी मंद आचेवर रंग न बदलु देता तळावी लागते. झार्‍याने तुप उडवले तरी चालेल म्हणजे आत तळली जाते.
गरम असतानाच पाकात टाकायची आणि पाकहि गरम असावा लागतो, तरच पाक आत जिरतो.


Manuswini
Wednesday, November 15, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा नी सागितलेच आहे तेच कारण आहे, तूप खुप गरम असेल

दुसरे बालुशाही नरम व्हायचे कारण,
तु दही वगैरे ज्यास्त टाकलेस का?

पिठ घट्ट भिजवायचे

माझ्या बहिणीचे पिथ नरम होते तेव्हा तीची नरम झाली पण पाक शिरला व्यावस्तीत कारण तूप गरम न्हवते नी पाक गरम असावा.



Ana
Thursday, November 16, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,मनु,
Thanku
तस तुप जास्त गरम नव्हत पण मंद आचेवर तळायला हवि होति खरि.
मला वाटत्तय पाकातच घोळ घातला मी निश्चित कारण पाक कोमट होता आणी नन्तर तर त्याची साखर झाली होती
मला Plesse सांगाना दोन तारी तीन तारी घट्ट, पाक कसा करायच ते. मी माय्बोलि वर असलेली क्रुती वाचली पण tube पेटली नाही. आई करत असताना कधी बघीतल नाही तर Pl जरा सोप करुन सांगा कोणीतरी.


Dineshvs
Thursday, November 16, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहिलेली पाकाची सविस्तर कृति वाचली का ? नेमका काय प्रॉब्लेम येतोय ?

Pinky00
Monday, December 04, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बालुशाही करता pillsbury चे all purpose flour use करू शकते का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators