Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Vidarbhaachee khaseeyat

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » Vidarbhaachee khaseeyat « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 08, 200625 02-08-06  3:45 pm
Archive through October 03, 200720 10-04-07  1:47 am
Archive through January 15, 200820 01-15-08  4:40 pm

Manuswini
Tuesday, January 15, 2008 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, कमाल आहे तुझी. खरेच कीती ग हे efforts घेतलेस वड्या दाखवायला.

Thanks to you so much! I mean it!
ह्या वड्या करतेच बघ.
पण त्या काही खास लोकांसाठी करणार आहे तेव्हा थांबावे लागणार बहुधा. :-)

मी सुद्धा फोटो टाकेन.

पुन्हा खुप खुप धन्यवाद मनापासून.

मी मायबोलिच्या उगीच प्रेमात नाहे. .......... तुम्ही सगळे अगदी तत्पर्तेने उत्तर देता.


Mrinmayee
Tuesday, January 15, 2008 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, थँक्स कसले त्यात? मला पण आधी 'सुगरणींची' करामत वगैरे वाटायचे असले प्रकार. पण बहुतेक सवयीनी जमतात. बाय द वे, एक सांगायचं म्हणजे ह्या वड्या बेक करून जमत नाहीत. एक वडी करून बघीतली. शेवटी तीला पण तळून काढली.
वड्या खातानाचे खास लोकांचे पण फोटो टाकणार का?


Manuswini
Wednesday, January 16, 2008 - 12:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास लोकांचे फोटो ह्म्म बघुया....... :-)

Psg
Wednesday, January 16, 2008 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण.. :-) भारीच आहेस तू! तो प्रिझमचा आकार इतका परफ़ेक्ट कसा काय जमू शकतो एखादीला? :-) किती ते निगूतीनं करणं गं बाई! गुणाची आहेस! :-)

आता माझाही एक प्रश्न.. ती वडी कापायची कधी? गरम असतानाच की गार झाल्यावर? मऊ पडत नाही का? बाकरवडीसारखी टिकते का?


Nkashi
Wednesday, January 16, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wow , मस्तच दिसतात आहेत त्या वड्या (जिभ बाहेर काढुन लाळ टपकणारा चेहरा... )

Mrinmayee
Wednesday, January 16, 2008 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वड्यांचं खरंच*वाजवीपेक्षा जास्त कौतुक झालं. :-) मला जरा लाजल्यासारखं होतंय.
पुनम, वड्या अगदी न कापता खाल्ल्या तरी चालतात. एका माणसाला एक बंपर वडी! (बाहेरचं कुणी*किंवा 'खास' लोकांसाठी:-)खायला आलं तर तळल्यावर लागलीच कापता आल्या तर बरं. नाहीतर कोथींबीरीच्या बाकरातल्या वाफेनी मऊ पडतात वड्या. खूप एक्स्पर्ट लोकांच्या चांगल्या टणक टिकतात. (तेच प्रमाण पारीला घेऊन मला अजून काही जमलं नाही.) बाकरवडीसारख्या टिकत नाहीत.
त्रिकोणी आकार असला की भरपूर बाकर भरलेल्या वड्या पण अगदी आतपर्यंत व्यवस्थीत तळल्या जातात (असं ऐकलं) म्हणून तो खटाटोप. आणि निगुतीनी वगैरे कसल्या गं? रिकामपणचे उद्योग सगळे!


Savani
Wednesday, January 16, 2008 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ,
मी केल्या ह्या वड्या काल. तुझे हे फोटो बघुन वीकेंड पर्यंत कुठला धीर धरवतोय:-)
मस्त झाल्या होत्या. तो प्रिझम चा आकार तुझ्या सारखा सुबक नाही बाई जमला पण चवीला खुपच छान झाल्या. आज संध्याकाळी फोटो टाकेन.


Chinnu
Wednesday, January 16, 2008 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहाहा, मृण, काय tempting आहेत त्या वड्या! 'मनातील भावना ' overflow होत आहेत फोटो पाहून!

Bhagya
Thursday, January 17, 2008 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैदर्भीय खाण्यावर ही एक छान लिंक्:

http://punerimisal.googlepages.com/gandhjibheetatgelele2

Malavika
Thursday, January 17, 2008 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, ह्या पुडाच्या वड्यांबरोबर श्रीखंड करतात. भाग्यानी दिलेल्या लिंकवरचा लेख वाचून, वडाभात, गोळाभात असे अस्सल नागपूरी पदार्थ करण्याचा विचार आहे.

Bage
Friday, June 27, 2008 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक मदत हवी आहे urgently ...
मी एक तासापुर्वि कोथिम्बिर धुऊन ठेवली आहे आणि मला लगेच एक तासानि पुडाच्या वड्या करायच्या आहेत
अजुन कोथिम्बिर थोडी ओलिच आहे...वड्या करायला पुर्णपणे वाळलेलीच हवी का कोथिम्बिर?



Dineshvs
Saturday, June 28, 2008 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबीर टिश्यु पेपरने टिपून घ्यावी.
वड्या फ़ार टिकवायच्या नसतील तर थोडी ओली कोथिंबीर चालेल.


Bage
Sunday, June 29, 2008 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Dinesh
मला इतकी घाई झाली की मी शेवटी केल्याच नाही वड्या
:-(


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators