Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चाट

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » चाट « Previous Next »

Eliza
Thursday, January 20, 2005 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दही वडा चाट अशी करते...

१. उडीदाचे दही वडे
२. हिरवी चटणी
३. चिंचेची चटणी (खजूर घालुन)
४. उकडलेला बटाटा
५. असतील त्या उसळींचे कडधान्य mix करुन आणि मीठाच्या पाण्यात शिजवुन (हे म्हणजे फ़ार वेळ आणि उत्साह असेल तर)
६. कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरुन
७. बारीक शेव
८. आणि उत्साह ओसंडुन वाहत असेल तर मैदा ओवा, काळी मिरी आणि तेलाचे मोहन घालुन घट्ट भिजवायचा आणि त्याचे द्रोण करुन तळायचे.

ह्या द्रोणात किवा bowls मध्ये सगळे जिन्न्स एकत्र केली की चाट तयार. दोन आठवड्यापूर्वी दिल्लीची एक मुलगी आलेले जेवायला तेव्हा मी हिच चाट केलेली. ती म्हणाली, वैसे तो बहुत अच्छी है मगर India gate वाली से थोडी अलग है. मे स्वःथा अनेकदा दिल्ली ला जाउन ही चाट खाल्ली असल्यामुळे मला आपल्याला तशी चाट करता यावी असं वाटलं म्हणुन तुम्हाला रेसीपी विचारली.



Chinnu
Wednesday, May 04, 2005 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Eliza, recepe chan ahe, pan te ati-utsahi maidyache dron kase karayche?

Charu_ag
Wednesday, August 10, 2005 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलाब जाम चे चाट.
हे नाव ऐकुन चाट पडलात ना! पण हा प्रकार मस्त लागतो.


साहित्य :- गुलाब जामचे तयार पीठ, एक टी स्पुन चाट मसाला, एक टी स्पुन जिरे पावडर, चवीपुरते काला नमक (शेंदेलोन मीठ),लिंबु,किसलेल ओल खोबर, बारिक चिरलेली कोथींबीर.

चटनीसाठी :- ७ - ८ पुदिन्याची पाने, ५ - ६ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, अर्धा टी स्पुन साखर.

कृती :- गुलामजाम करण्यासाठी नेहमीप्रमानेच पीठ तयार कराव. फक्त थोड मीठ मळताना घालयच. मध्यम आकारचे गुलाब जम तळुन घ्यायचे. थंड होउ द्यायचे. थंड झाल्यनंतर मध्ये सुरीने अलगद कापत दोन भाग करायचे.
यावर चाट मसाला, जिरे पावडर, काला नमक हे सगळे भुरभुरुन टाकायचे. वरुन लिंबु पिळायचे.

पुदिना, मिरच्या, मीठ, साखर हे सर्व मिक्सरमधुन काढुन त्याची चटनी करायची.

ही चटनी इतर चाट ला वरुन पसरतो तशीच या गुलाब जामच्या अर्ध्या भागांवर पसरायची. सगळ्यात शेवटी ओल खोबर आणि कोथींबीरीने सजवायचे.
मस्त चटपटीत लागतो हा प्रकार.

या पदार्थाचे credit goes to shraddhak .


Rachana_barve
Thursday, August 11, 2005 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

btw caa$ gaulaaba jaama tLtanaa %yaat ihrvaI imarcaIÊ lasaUNaÊ AalaoÊ imazÊ kÜqaIMbaIr pNa ima@sa kola naa tr sahI laagatat :-O .. gaÜD pdaqaa-XaI vaakDo Asalyaanao iZgaBar gaulaabajaamacao ipz Asaoca saMpvalao hÜto. pNa caaT idea sahI :-)

Bee
Thursday, August 11, 2005 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL Charu!!! Krca ÌtI vaacaUna ca^T pDlaÜ. kuzo Aaho hI Ea..

Zelam
Monday, August 15, 2005 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yaaca p`karcaI gaulaabajaama caI ÌtI saMjaIva kpUr nao Kanaa Kjaanaa maQyao saaMgaItlaI hÜtI. malaš kÜF,ta krtÜ naa %yaa p`karcaI. %yaat %yaanao kÜF,to mhNaUna gaulaabajaama Gaatlao hÜto AaiNa itKT gravy daKvaolaI hÜtI curry mhNaUna.

Sayonara
Wednesday, December 03, 2003 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच एक वेगळी recipe करुन पाहिली जी चाट प्रकारात मोडायला हरकत नाही. सर्वांबरोबर share करायला आवडेल.
ह्यात मी पोळ्यांकरता भिजवलेली कणीक वापरली.
filling करता : उकडलेले बटाटे(चौकोनी फोडी करून), बारीक चिरलेला कांदा, बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चाट मसाला(चवीप्रमाणे), धणे-जिरे पूड(चवीप्रमाणे), मीठ(चवीप्रमाणे),फोडणीकरता तेल आणि जिरं.
कृती : प्रथम तेल तापवून घेऊन त्यात जिरं टाकावं. तडतडल्यावर हिरव्या मिरच्या व कांदा परतून घ्यावा. त्यातच चाट मसाला, धणे-जिरे पुड टाकून एक वाफ काढावी. नंतर चौकोनी फोडी केलेले बटाटे घालून परत एक वाफ काढावी. वरून कोथिंबीर घालून मिश्रण गार होऊ द्यावे.
पुर्‍यांकरता: कणकेचा एक छोटा गोळा घेऊन पुर्‍यांच्या आकाराची पोळी लाटावी. त्यावर वरील मिश्रण पसरुन पोळी बंद करावी.(पराठ्यांप्रमाणे). वरून जरासं लाटावं म्हणजे मिश्रण नीट पसरेल. ही जाड पुरी मग deep fry करावी. serve करताना त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कुस्करलेला बटाटा (optional ), बारीक शेव, कोथिंबीर, चिंच - खजुराची चटणी, व तिखट चटणी घालून वाढावे. हवे असल्यास दही पण छान लागते.


Me_mastani
Thursday, September 25, 2003 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajun ek soppi dish aahe PAPDI CHAAT........
mexican tortila milatat na tya anayachya. flour chaya anavyat, karan corn chya tortilanna ek prakaracha vaas yeto. tyache tukade karun talun ghyavyat.dhahi fetun ghyave tyat thodi sakhar meeth takave.
ek tray ghyava. tyat pratham fry kelele tartila pasarave, nantar can madhle chhole, boiled potato che tukade. thoda meeth , chaat masala, jeera powder, laal mirchi powder, takavi nantar tyavar tayar kelel dahi takave thodi chinchechi catney barik shev ani kothimbir ghalun serve karavi. faar avadate lokaana. me baryach vela karate. dahi aayatya veli ghalave nahitar tortila mau padatil.

Prajaktad
Monday, July 10, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समोसा चाट.
तयार समोसा जरा दाबुन चपटा करावा.त्यावर तयार छोल्याची उसळ (वाटाणे नाही) घालावी. हि गरम गार कशिही चांगली लागते.त्यावर फ़ेटलेले गोड्सर दही घालावे. चिंच खजुराचि गोड चटनी,हिरवी पुदिना चटनी घालावी... बारिक चिरलेला कांदा,बारिक शेव सगळ्यात वरती घालावी...


Supermom
Monday, July 10, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता,धन्यवाद ग.
चिंच खजुराची चटणी नेहेमी भेळेला वापरतो तीच का आणखी काही वेगळी रेसिपी आहे?


Raigad
Wednesday, July 12, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी मी एक पनीर चिल्ला नावाचा एक चाट प्रकार खाल्लेला. बेसन्-मैदा चे घावन बनवून आत कोबी,गाजर,पनीर etc stir fry करून आत stuff करून कहि चटण्या, आमचूर पावडर वगैरे घालून एक चमचमीत chat item बनवलेला. मस्त होता. कोणाला ह्या प्रकाराची exact recipee माहिती आहे का?


Dineshvs
Wednesday, July 12, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैद्याचे घावन किंवा चिल्ला तितकासा कुरकुरीत होत नाही, आणि निवला कि खुपच चामट होतो.
हे माझे व्हर्जन.
या प्रमाणात साहा ते सात चिल्ले होतील

पाव किलो बाजारी पनीर घेऊन त्याचे लांबट तुकडे करावेत. त्याला एक टेबलस्पुन आले लसुण पेस्ट, एक चमचा वाटलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरेपुड आणि मीठ लावुन ठेवावे. त्यातच दोन उकडलेल्या बटाट्याच्या फ़ोडी घालाव्यात. हे एक तास तरी मुरु द्यावे.

एक कप मैदा, अर्धा कप तांदळाचे पीठ व अर्धा कप बारिक रवा एकत्र चाळुन घ्यावे. त्यात एक चमचा टोमॅटो प्युरी, थोडी हळद व थोडे मीठ घालावे. त्यात पातळ केलेल्या तुपाचे मोहन घालुन घट्टसर भिजवावे. त्यातच चमचाभर चिरलेला पुदीना वा कोथिंबीर घालावी. हा मसाला न घालता प्लेन पिठ मळले तरी चालेल.

पॅनमधे तेल व तुप तापवुन त्यात पनीर व बटाटे परतुन कोरडे करावेत. तेल बेताचेच असावे. सोनेरी रंगावर आले कि त्यावर एक टेबलस्पुन कणीक भुरभुरावी, आणि कोरडे करावे. त्यावर चाट मसाला वा दाबेली मसाला भुरभुरावा. व अर्ध्या लिंबाचा रस पिळावा.
मैद्याच्या मिश्रणाच्या फुलक्या एवढ्या जाडसर चपात्या लाटुन त्या शेकुन घ्याव्यात. जमले तर घडीच्या कराव्यात. त्यात पनीरचे मिश्रण भरावे. कापलेला कोबी घालुन घट्ट गुंडाळी करुन फ़ॉईल किंवा टिश्यु पेपरमधे गुंडाळुन खावी. या चपात्या आधी करुन ठेवु नयेत. आयत्यावेळीच कराव्यात. अगदी घाई असेल तर आधी अर्धवट शेकुन घ्याव्यात, व परत आयत्यावेळी पुर्ण भाजाव्यात.


Raigad
Friday, July 14, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thnak you दिनेश! हो, मी जो पनीर चिल्ला खाल्ला होता त्यात घावन सदॄश काहीतरी बनवले होते खरे! त्यामुळे मी तसच काहिसं बनवण्याच्या विचारात होते... आता ही कॄती करून बघते.

Chakali
Sunday, September 09, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि घरी शेव बटाटा पुरी बनवली होति. खुप छान झाली. त्याची लिन्क खालील प्रमाणे.
http://chakali.blogspot.com/2007/09/shev-batata-puri.html

Suparna
Sunday, September 09, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त फोटो आणि कृती लिहिली आहेस, चकली!!!
अगदी पाहुनच खावीशी वाटायला लागलीय!!



Chakali
Sunday, September 09, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपर्णा,

धन्यवाद! आपण सगळेच शेव बटाटा पुरी वेगवेगळ्या प्रकारे करतो, पण मी माझ्या बाबा कडून शिकले ना तशी दिली आहे कृती. फार वेगळी नाही लाल चटणी ने थोडी वेगळी आणि छान चव येते.

चकली


Peacelily2025
Sunday, September 09, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चकली, तुझा ब्लोग वाचला. सगळ्याच रेसिपिज दिसायला खूप आकर्षक आहेत, चव पण छानच असेल. बेक्ड वेजिटब्लेस मधे काजु बी वापरायचा असल्यास कुठे मिळेल? मी सगळ्याच रेसिपिज करुन पाहणार आहे. पुन्हा लिहिनच.

Maanus
Sunday, September 09, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चकली :-) काय ID आहे. :-)

blog मस्त आहे ग तुझा


Chakali
Monday, September 10, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi peacelily2025 & maanus

धन्यवाद माझ्या ब्लोग ला भेट दिल्याबद्दल..

इथे काजू बी मला एका ओरिएन्टल मार्केट मध्ये मिळालि. मी दादरमध्ये असताना शिवाजी मन्दिर शेजारी काजूबी घ्यायचे.


Wel123
Tuesday, November 27, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kunala khasta chaat chi recipe mahit aahe ka.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators