Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
खव्याच्या पोळ्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » खव्याच्या पोळ्या « Previous Next »

Anjali28
Thursday, March 18, 2004 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kvyaacyaa pÜL\yaa kXaa krayacyaa to kuNaalaa maaiht Aaho kaÆ

Karadkar
Thursday, March 18, 2004 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khava paratun tyaat sakhar ghalaychi .. jara jastich i think khava 1 vati asel tar 1/2 vati sakhar ghalatat .. velachi/keshar vagwire ghalayachi .. mag te ghatta karayache puranasarakhe .. maida mith dudh ghalun ghatta bhijavun thevayacha .. 1/2 tasane vagaire saran thaNd zalyavar puran polisarakhya karayachya ..

I think ashyach karatat ... chu. bhu. dya. ghya.

Prady
Tuesday, March 14, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी तसा बराच जुना आहे. पण जर रिसेन्टली कुणी केल्या असतील या पोळ्या तर मला सान्गाल का कि पुरण पोळी सारखा उन्डा भरून करायची ही पोळी कि गुळ पोळी सारखी कणकीच्या लाट्यान्मधे सारण भरून.सारणाची कन्सिसटन्सी कशी असावी.कारण मी एकिकडे वाचला होता कि गुळाचि पोळी करतो तशी करायची. इथे लिहिलय पुरण पोळी सारख़ी. थोड कन्फ़्युजन आहे. त्यामुळे कुणी जर रिसेन्टली केल्या असतील या पोळ्या तर प्लीज स्वत्:चा अनुभव शेअर करा.

Moodi
Wednesday, July 26, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खव्याची पोळी.

साहित्य : २ वाटी खवा, २ वाट्या पिठीसाखर, १० ते १२ वेलदोड्यांची पूड, ३ वाट्या कणिक, अर्धी वाटी तेल, तांदळाची पिठी, चिमुटभर मीठ, अर्धी वाटी बेसन( हरबरा डाळीचे पीठ)

कृती : खवा हाताने मोकळा करुन तांबूस रंगावर भाजून घ्यावा. डाळीचे पीठ( बेसन) तूप घालून बदामी रंगावर भाजावे. कोमट झाले की खवा, बेसन, पिठीसाखर एकत्र करुन चांगले मळावे. वेलदोडा पूड घालून परत मळावे.

कणिक बारीक चाळणीने चाळून घ्यावी. त्यात नेहेमीपेक्षा जास्त तेल व चवीपुरते मीठ घालावे. नेहेमीच्या कणकेपेक्षा थोडी घट्टच भिजवावी. पोळी करतांना १ गोळ्याच्या २ लाट्या कराव्यात. त्या गोळ्यापेक्षा मोठी गोळी खवा मिश्रणाची घ्यावी. लाट्या लाटुन घ्याव्यात अन मग एका लाटलेल्या लाटीवर मध्ये खव्याची गोळी चपटी करुन ठेवावी. त्यावर कणकेची दुसरी गोळी ठेऊन कडा दाबुन घ्याव्यात. अन पातळसर लाटून गुलाबी रंगावर भाजावी.

टिप्स : खव्यात बेसन भाजून घातल्याने सारण म्हणजे खवा उंड्याच्या बाहेर येत नाही.

तेल सगळ्या कणकेत फिरवुन घालावे. मुटका वळून पहावे की मग समजावे की ते व्यवस्थीत लागले गेलेय, म्हणजे पोळी खुसखुशीत होते.

कणकेचा अन सारणाचा मऊपणा सारखा असावा. एक सैल अन दुसरे घट्ट असे असू नये.

पोळी सगळीकडून एकसारखी पातळ लाटली जावी.

सौजन्य : साप्ताहीक सकाळ


Dineshvs
Wednesday, July 26, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरला गेलो कि भरपुर कंदी पेढे घेऊन येतो, आणि ते खायचा कंटाळा आला कि अश्या पोळ्या करतो. मुळात ते पेढेच खमंग असल्याने, पोळ्या छानच होतात.

Karadkar
Thursday, July 27, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कंदी पेढे सातारचे हो ना? कोल्हापुरचे दगडु बाळा भोसले यांचे पेढे अप्रतिम पण त्यांना कंदी पेढे नाहीत म्हणत.

Dineshvs
Thursday, July 27, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दगडु बाळा भोसलेचे ते फ़िके पेढे, पण कंदी पेढे पण मिळतात आता.जसे चिक्कीच्या मागे लोणावळा तसे कंदी पेढ्यांच्या मागे सातारा, हा शब्द गृहितच धरायचा.

Vrushs
Tuesday, January 23, 2007 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे US मध्ये खवा नाही मिळत तर Ricotta cheese वापरून करता येतील का खव्याच्या पोळ्या?

Prady
Tuesday, January 23, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देसी ग्रोसरी मधे बरेचदा फ्रोजन सेक्शन मधे मिळतो खवा. चेक करून बघ.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators