Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
झणझणीत, अस्सल कोल्हापुरी बाकरवडी ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » झणझणीत, अस्सल कोल्हापुरी बाकरवडी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 01, 200622 02-01-06  10:41 pm

Lalu
Thursday, February 02, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळा मसाला म्हणजे गोडा मसाला. आहे का तुझ्याकडे? यात मुख्यतः धणे, जीरे, शहाजीरे, लवन्ग, दालचिनी, तीळ, सुके खोबरे, दगडफूल, हिन्ग इ. असते. तरी रेसिपी हवी असल्यास सान्ग.

Seema_
Thursday, February 02, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी बेडेकर किंवा केप्र चा तयार काळा मसाला आता मिळतो indian market मध्ये. मी वापरला नाही कधी तो. पण चांगला असतो अस ऐकुन आहे .

Manuswini
Thursday, February 02, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लालु, आणि सीमा

माझ्याकडे आहे घर्चा गोडा मसाला

weekedn try करेन भाकरवडी मग


Prajaktad
Wednesday, February 22, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चैताली! बटाट्याच्या बाकरवडिचि रेसिपि एका मैत्रिनिकडुन मिळालिय इथे पोस्ट करतेय पण मि हि अजुन try केलि नाही.
समोस्याच्या पारिसाठि करतो त्याप्रमाणे कव्हरसाठी
मैदा मोहन मिठ, ओवा,वैगेरे घालुन घट्ट मळुन घ्यावा.
सारणासाठी बटाटे उकडुन सोलुन smash करुन घ्यावे.फ़ोडणितच थोडी बडिशोप,मोहरि घालावी.त्यावर smash बटाटे घालुन खमन्ग करावे..
अनारदाना वाटुन घालावा.धन्याजिर्‍याची पुड घालावि..
चटपटित सारन बनवावे.
मैद्याचा गोळा लाटुन त्यावर सगळिकडे हे सारण पसरावे.गुंडाळी करुन रोल बनवावा.
कापुन तळावे.


Prady
Tuesday, August 15, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू ही बाकरवडी कुरकुरीत होते का. कुणी जेवायला येत असेल तर आदल्या दिवशी करून ठेवल्या तर चालेल का? पोळी अगदी पातळ लाटायची असते का कुरकुरीत होण्यासाठी?

Dineshvs
Tuesday, August 15, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालुच्या जागी मी लिहितो. बाकरवड्या अवश्य टिकतात. कोल्हापुरच्या कोरड्या हवेत त्या कुरकुरीत राहतातहि.पोळी अगदी पातळ नाही वा अगदी जाड नाही, अशी लाटायची असते.
माझी आई मुंबईत करते तेंव्हा त्या काहि दिवसानी मऊ पडतात. पण तरिही त्या वातड होत नाहीत. चवदारच लागतात. मऊ पडल्या तर थोडा वेळ मायक्रोवेव्ह मधे ठेवता येतील. अगदी थोडा वेळ बरं का, नाहीतर आतुन जळतील.


Prady
Tuesday, August 15, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश. उद्या काही जण जेवायला आहेत. मी विचार करत होते की रात्रीच करून ठेवाव्यात. बरं झालं तुम्ही शंका दूर केली ते.

Lalu
Wednesday, August 16, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, बरं झालं तुम्ही वेळेवर लिहिलं. आता या माहितीचा Prady ला उपयोग होईल का माहित नाही पण लिहीते.

ही वडी कुरकुरीत असते पण अगदी 'चितळे बाकरवडी' सारखी नाही. ह्या आम्ही दिवाळीच्या फराळात करतो. फार टिकत नाहीत म्हणून शेवटी करायच्या. पण ८,१० दिवस टिकायला हरकत नाही. दमट हवेत मऊ पडतात. तळल्यावर एकावर एक काढून ठेवू नयेत, पसरुन ठेवाव्यात आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय डब्यात भरू नयेत म्हणजे मऊ पडणार नाहीत. पोळी फार पातळ लाटली तर सारण भरुन घडी घालताना एखाद्या वेळेस फाटण्याची शक्यता आहे. कव्हरच्या पिठात मैदा किंवा तांदळाचे पीठ घालून बघायला हरकत नाही कुरकुरीतपणा साठी, मी कधी करुन पाहिले नाही. आणि आतले सारण हे ताजे मऊसर असल्यामुळे वरचे कव्हर हे फार कडक नसलेलेच चांगले. मऊ पडल्या तर चकली, पापडासाठी करतो तसा मायक्रोवेवचा उपाय आहेच, पण त्यात ठेवून थंड झाल्यावर ते पदार्थ कडक होतात, त्याचा खुसखुशीतपणा जातो.


Prady
Wednesday, August 16, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू Thanks गं. काल नाहीच जमल्या करायला पण आज करतेच आहे. केल्या वर सांगीनच कशा झाल्या ते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators