Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वालाचे बिरडे

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » उसळी » वालाचे बिरडे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 06, 200620 10-06-06  3:44 pm

Sai
Friday, October 06, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उडिदा ला मोड कसे आणायचे? म्हणजे उडिद डाळच वापरायची ना? आणि किती वेळ भिजवायचे?

Surabhi
Friday, October 06, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळीला कसे मोड येणार? अख्खे उडीद वापरावे लागतील सई!

Sai
Friday, October 06, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा गोन्धळ होतोय अख्खे उडिद म्हणजे दुकानात काय म्हणुन मिळतात? मला गोटा आनि स्प्लिट असे दोनच प्रकार माहित आहेत :-((

Mrinmayee
Friday, October 06, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरभी, भरपूर लांब मोड आलेल्या मुगाला गरम पाण्यात घातल्यावर तीन चतुर्थांश दाण्यांची सालं तर सुटून येतात. पाण्यावर तरंगणारी सालं हातानी (नाहीतर गाळणीनी) काढून टाकता येतात. सालं टाकून द्यावी लागतात बिरडं करताना. हो, सत्व तर वाया जातात. पण एरवी तर आमटी, उसळी करताना आपण सालं नाही ना काढत, मग एकदा फक्त बिरड्यासाठी कन्सेशन!! :-) ताटात मुग काढून घेऊन त्यातले सालासगटचे बाजुला करावेत. आणि उरलेले परत गरम पाण्यात टाकून ठेवावेत. थोडे थोडे बाहेर घेऊन TV वर आवडता कार्यक्रम बघत बघत सोलावेत. :-)
सई, उडदाला देखील मुगाप्रमाणेच मोड आणतात. रात्रभर पाण्यात भिजवून, दुसर्‍यादिवशी उडिद (अर्थात अख्खे) उपसायचे. घट्ट डब्यात किंवा फडक्यात गुंडाळून अंधारलेल्या जागी ठेवायचे. हिवाळ्यात वेळ लागतो मोड यायला. हिटरच्या जवळपास ठेवले तर बरं.
आर्च, मुग, उडिद आणि चण्याच्या बिरड्याचा मसाला आईनी दिलेला वापरते. पण तो नसेल तर थोडा गरम मसाला टाकून चांगलं होतं बिरडं.


Sai
Friday, October 06, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks म्रुण्मयी पण अख्खे उडीद कसे दिसतात? :-(

Varadakanitkar
Friday, October 06, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी मस्त आहे मुगाचं बिरड मी करुन पाहते आता.

Mrinmayee
Friday, October 06, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, हे बघ अख्खे उडिद. डाळ पण आहे बाजुला.
वरदा, वाटीभर पाठव इकडे. रोज असेल जेवणात तरी चालतं! :-)
uDid akhkheuDida DaaL

Manuswini
Friday, October 06, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई,
तु मारुतीला उडीद नाही वहात अख्खे उडीद?



Sai
Monday, October 09, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks !! म्रुण्मयी!!! आता मी आमच्या इथे एक शोध मोहिम सुरु करते :-)
आणि मनःस्विनि अग कुठ्ल्या देवाला काय वाहतात या विषयावर माझे ज्ञान तसे थोडे कमीच आहे ना!!!!!


Prarthana
Monday, November 13, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रिण्मयी, बिरड्याच्या मसाल्यात कोण्-कोणते पदार्थ असतात

Mrinmayee
Monday, November 13, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रार्थना, एरवी वालाच्या बिरड्याला तर जीरं पूड आणि लवंग, दालचिनी पुड (आर्थात हळद तिखट पण) खेरीज काही लागंत नाही. पण चणे, उडीद आणि मुगाच्या बिरड्यात मी जो आईनी दिलेला मसाला घालते त्यात सगळेच घटक असता. (धणे, जीरे, मीरे, बडीशेप, लवंग, दालचिनी, तमालपत्र, दगडफुल, नाकेशर, मोठी काळी विलायची, कर्णफुल, खोबरं, लाल मिरच्या, खडा हिंग आणि शहाजीरं)

Zee
Monday, November 13, 2006 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, ऊडीदाचे ही बिरडे असेच करतात का? मी वरच्या पोस्ट्स वाचल्या, पण नक्क्की कळले नाही.

thanks in advance.

Mrinmayee
Monday, November 13, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुग, चणे आणि उडिद या तीनही कडधान्याचं बिरडं एकाच प्रकारे करता येतं. ही लिंक:
/hitguj/messages/103383/117508.html?1160149481

Zee
Thursday, November 16, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला इथल्या सर्व जाणकारांना एक विचारायचे होते की, वाल कडवे असतात म्हणुन आपण सोलतो ना?? मुग ऊडिद, चणे सोलुनच बिरडे करायचे असते का?? एक भा. प्र..

Dineshvs
Thursday, November 16, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कडधान्याची सालु कडु तर असतातच आणि ती जरा जाडहि असतात, म्हणुन ती सोलायची असतात. मुगाची पण सोलतात. नाही सोलली तर शिजताना वेगळी होतात.
चण्याचीहि काढली तर चालतील, उडदाची काढावीच लागतील.आपल्याप्रमाणे आखाती देशात काबुली चणे भिजवुन सोलुन घ्यायची पद्धत आहे.


Prarthana
Friday, November 17, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्स म्रिन्मयी
मी वालाचे बिरडे असे करते
साहित्य मोड आलेले वाल किंवा भिजवलेली वालाचि डाळ फ़ोडणीचे साहित्य ओवा व गूळ कोथिंबीर

क्रुती भिजवलेले वाल किँवा वालाची डाळ नेहेमिप्रमाणे फ़ोड्णी करून त्यावर टाकावे. फ़ोडणीतच चमचाभर ओवा घालावा. जरासे शिजल्यावर तिखट मीठ व गूळ घालावा. वरून कोथिम्बीर पेरावी.
आवडत असल्यास कांदा लसूण आल्याची पेस्ट ओवा घातल्या नंतर फ़ोडणीवर परतून घावी.



Prarthana
Friday, November 17, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिरड्याच्या फ़ोड्णीत जीरे खोबरेही घालावे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators