Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दाल खिचडी

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » दाल खिचडी « Previous Next »

Dineshvs
Friday, May 16, 2008 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळची गुजराथी असणारी खिचडि आता दालखिचडी नावाने हॉटेलमधून मिळायला लागली आहे. एखाददोन फळभाज्या घालून, अलिकडे याचे दोन प्रयोग केले. दोन्ही उत्तम जमले.

प्रकार एक, एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ, एकत्र करून धुवुन घ्या. थोड्या पाण्यातच भिजत ठेवा. एक मोठ्या रताळ्याच्या धुवुन सालासकट फ़ोडी करून घ्या. घेवड्याच्या दहा बारा शेंगा मोडुन घ्या.
कूकरमधे चमचाभर तेलाची फ़ोडणी करून त्यात हिंग, जिरे व हिरव्या मिरच्या घाला. त्यात घेवडा व रताळी परतून घ्या. त्यावर हळद आणि थोडा काळा मसाला घाला, मग डाळ तांदूळ वैरा. सगळे नीट एकत्र करुन, चार वाट्या पाणी घाला. अर्धा कप दूध घाला. उकळी आली कि मीठ घालून, कूकरचे झाकण लावा. पाच मिनिटात हि तयार होते. हि खिचडी जराशी करपली तर जास्त खुमासदार लागते. वरून थोडे साजूक तूप घ्यावे. दोन जणाना पुरेल.

प्रकार दूसरा. यात मी वरील प्रमाणात डाळ तांदूळ शिजवुन घेतले होते. ( खरे तर आंबाडीच्या भाजीसाठी शिजवले होते, पण ते जास्त शिजल्याने खिचडी केली. ) एक मोठे गाजर जाडसर किसून घ्या. एक मोठा टोमॅटो, बारिक चिरुन घ्या. चमचाभर तेलाची हिंगजिर्‍याची फ़ोडणी करून त्यात गाजराचा किस घाला, जरा परतुन टोमॅटोच्या फ़ोडी घाला. झाकण ठेवून एक वाफ़ आणा. मग पाणी घाला. उकली आली कि हळद, थोडा गूळ आणि मीठ घाला. मग शिजलेले डाळतांदूळ घाला. नीट ढवळून झाकण ठेवून शिजु द्या. हि खिचडी पळिवाढी असावी. शिजली कि गॅस बंद करा. वाफ़ जिरल्यावर वरून बारिक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. थोडे साजूक तूप घाला. या खिचडीला सुंदर रंग तर येतोच, आणि चवही छान लागते. हि पण दोन जणाना पूरेल.

दोन्ही खिचड्या, अगदी कमी तेलात करा. फ़ोडणीत मोहरी वा मेथीही घालू शकता. भाज्या उपलब्ध असतील त्या प्रमाणे घ्या, पण वरील दोन्ही संयोग छान लागले. दोन्ही प्रकार पथ्यकर आहेत. सोबत भाजलेला पापड, कारळाची वा लसणाची चटणी आणि ताक घ्या.



Leenas
Friday, May 16, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! लग्गेच लिहुन घेते. आज संध्याकाळी ह्यापैकी एक प्रकार नक्की. लाल भोपळा घातला तर चालेल का हो दिनेश?

Dineshvs
Friday, May 16, 2008 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, लाल भोपळा आणि टोमेटो वापरुन दुसरा प्रकार करता येईल.

Leenas
Monday, May 19, 2008 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान झाले होते दोन्ही प्रकार वरीलप्रमाणेच केले होते....

Sonchafa
Monday, May 19, 2008 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लीना, दोन्ही प्रकार करून झाले..? म्हणजे दोन दिवस खिचडीच खाल्लीस??

Leenas
Monday, May 19, 2008 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, समहाउ. दोन दिवस एकदा आमटी भाताला ऑप्शन आणी एकदा फक्त ख़िचडी...

Dineshvs
Monday, May 19, 2008 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, तुमच्याकडे बिशि बेळे हुळी अन्ना, करतात कि नाही ? आणि मुख्य म्हणजे तूला चालतो का ?

साधारण गुजराथी घरात, रोजच दाल खिचडी करतात.


Sonchafa
Monday, May 19, 2008 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नवर्‍याला खिचडी कढी वगैरे प्रकार आवडत नाहीत.. त्यामुळे इथे आल्यापासून जेवणाला खिचडी कढी हा प्रकार मी विसरूनच गेले आहे.. माहेरी आठवड्यातून एक वेळ नक्कीच व्हायची खिचडी.. नवरा पक्के मासेखाऊ. त्यामुळे तोय-भात आणि मासे हेच त्याचे आवडते आहे सगळ्यात.. मला सारखं सारखं तोय-भात कंटाळवाणे होते पण काय करणार? गम्मत म्हणजे मी पण कालच रात्री खिचडी केली एकटी होते त्यामुळे.. माझी खिचडी आणखीच साधी.. मूगडाळ, तांदूळ एकत्र पाणी घालून त्यात छोटा चमचाभर साजूक तूप, थोडे मीठ, कच्चे जिरं चिमुटभर आणि थोडा कच्च हिंग घालून मी कुकरमध्ये ३-४ शिट्या काढते.. बरं वाटत नसेल तर पटकन करायला बरी पडते. मला ती फोडणीच्या मिर्चीसोबत आवडते.. दही असेल तर चांगलच नसेल तर दुधाबरोबरही आवडते..

दिनेश, माझ्याकडे खरंतर सगळे वाटल्या नारळाचे असते.. (म्हणजे सासूबाई असतील आणि त्यांनी स्वयंपाक केला असेल तर.. ) पण मला ते जास्त आवडत नाही.. नारळ खायची काही रीत? दर एक्-दोन दिवसाला एक नारळ??? सोलकढी, आमटी सगळ्यात नारळाचा वापर. अहो वरण-भाताच्या साध्या वरणात सुद्धा वाटलेला नारळ? :-( मी एरवी ह्या प्रकाराला चाट दिली आहे. भिशि ब्याळी अन्ना सुद्धा मी एकटी असेन तरच. करायला सोपा आणि पूर्ण अन्न. भाज्या, डाळ, तांदूळ सगळच एकदम पोटात जातं.


Manuswini
Monday, May 19, 2008 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपाली, सहज वाचले म्हणून तु कोकणी आहेस का?
कारण साध्या वरणात ओला खवलेला नारळ असतोच कोकणी जेवणात. :-)
मी पण टाकते, मस्त लागते.:-)


Sonchafa
Tuesday, May 20, 2008 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही मनु, मी माहेरची मुंबईची कोब्रा आणि सासर सारस्वत, सासूबाई गोव्याच्या त्यामुळे त्यांच्या पदार्थांत खूप नारळ असतो. आणि मला लहानपणापासून ते खायची सवय नसल्याने माझी होते पंचाईत.. एवढा नारळ जन्मापासून खाला असता तर आत्तापर्यंत माझे काय झालं असतं असा विचार पडतो.. त्यांचा तेलाचा वापर पण खूप असतो.. खोबरेल तेलाची फोडणी ही असते स्वयंपाकात! (आम्ही कर्नाटकात रहातो.) मला तर दिवसेदिवस नॉशिया यायला लागला आहे.. :-(.. नवर्‍यालाही सगळं चमचमीत हवं. पण मी हेल्थ कॉंशियस असल्याने मला तर हे सगळं नकोच वाटतं. उगाच चरबीचे चार-दोन थरही वाढले आहेत अंगावर असं वाटतं सारखं.. :-) ;)
म्हणून मग एकटी असले की सूप्स, उकडलेल्या भाज्या, खिचडी, पोळी, कमी तेलाच्या भाज्या, भिशि ब्याळी अन्ना,हातलं काही करते.. लगेच बारीक झाल्यासारखं वाटतं.. स्वप्नात! :-)


Dineshvs
Tuesday, May 20, 2008 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीने केला कानडी भ्रतार. रुपाली माझी आई कोल्हापुरची आणि वडिल मालवणचे. म्हणजे तिने किती सांस्कृतिक विरोधाभास सहन केला असेल बघ.
संपुर्ण किनारपट्टीवर नारळाशिवाय काहिच होवु शकत नाही. तिकडच्या खिरी पण नारळाच्याच दूधातल्या.
आणि वरती, म्हणजे घाटावर, दुर्मिळ म्हणून नारळ, खास देवाला वाहण्यासाठी. एरवी जेवणात सुकं खोबरं.


Sonchafa
Tuesday, May 20, 2008 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता इथे ऍडमिन येणार नक्की.. कसली खिचडी शिजत्येय ते बघायला म्हणून.. :-)
दिनेश खरं आहे.. मी समजू शकते.. माझेही अजून ते सांस्कृतिक, भाषिक असं सगळच काय काय ते चालू आहे.. पण एवढा नारळ खाऊन वजन आणि इतर गोष्टींचं काय हो?? एवढं खाणं चांगलं का? मला खरच कल्पना नाही. खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉल संतुलित रहाते म्हणतात पण नारळाचे काय? तळलेला फ़िश, तेलातली १७ प्रकारची कापं? आई गं! :-(


Manuswini
Tuesday, May 20, 2008 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफ़ा, अग काही नाही होत. मी पण लहानपणापासून ओला नारळ खावूनच वाढले. :-). पालकची भाजी ते खीर ते भेंडीची भाजी,टोपसांज्यात(खांडवी),मटणात नारळाचे दूध, कोंबडीत पण नारळ दूध.. कशात नसतो ते विचार. आपोआप पचनशक्तीला सवय होते. :-) स्कीन चकचकीत,काळे दाट केस. :-)
तेलकट पदार्थाचे माहीत नाही. पण मासे भरपूर खातो ना तेव्हा balance होते सर्व cholesterol .वजन प्रत्येक व्यक्तीच्या पचशक्तीवर असते तेव्हा ती एक बाब वेगळी.
असो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators