Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 17, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » दाक्षिणात्य » इडली » Archive through May 17, 2007 « Previous Next »

Dineshvs
Thursday, April 06, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady त्या चटणीला मुळगापुडी म्हणतात. त्याची कृति आहे ईथेच.
त्या चटणीत तेल वा तुप घालुन, ईडली डोश्याबरोबर खातात.
त्यासाठी कॉकटेल ईडल्या चांगल्या. कॉकटेल म्हणजे छोट्या ईडल्या, याचे वेगळे साचे बाजारात मिळतात.


Junnu
Thursday, April 06, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे दिलीये ती चटणी? मी चटण्यांचा बीबी पाहीला पण सापडली नाही.

Dineshvs
Thursday, April 06, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता लिहिली ईथे
/hitguj/messages/103383/106142.html?1144340000
कोरदी च्या जागी कोरडी असे वाचावे.

Junnu
Thursday, April 06, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks. :-)
ह्या week-end करेन मी. कशी झालेली ते सान्गते.

Mai
Sunday, April 09, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स दिनेश मसाला इड्ली ची सविस्तर रेसिपी दिल्याबद्दल

Miseeka
Saturday, July 29, 2006 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Palak Idli(Spinach Idli )kashi karaychi?

Prady
Monday, July 31, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पालक ईडली साठी मी पालक blanch करून आलं, मिरची बरोबर वाटून ती paste इडलीच्या पीठात घालते. बरोबर थोडे ओले मटारचे दाणे अक्खे पण पीठात घातले तर छान लागते.

Mrinmayee पालक आयत्या वेळी घालायचा.


Miseeka
Tuesday, August 15, 2006 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि पालक इडलि try केली आणि इडलि ला मस्त pista color आला आणि चव पण छान लागलि इडलिला मि सोबत म्हणुन coconut चटणी न घेता tomato sauce घेतले पण तुम्ही color combination म्हणुन लाल, yellow color ची कोणति पण चटणी घेवु शकता.

Manuswini
Wednesday, September 27, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हमखास soft इडली बनवायचा उपाय करून बघा
माझी आई करायची

इडली करण्या-आधी शिजवलेला नरम भात नाहीतर पातळ पोहे भिजवून mix करायचे.

इडली soft होते एक्दम.



Rajasi
Monday, October 02, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इडली stand न्यु जर्सीला (newport area) कुठल्या इन्डीयन दुकानात मिळतो कोणला माहित आहे का?

Swa_26
Thursday, March 15, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इडली करताना त्यात dry यीस्ट केव्हा आणि किती प्रमाणात घालायचे, कोणी सांगेल का??

Dineshvs
Thursday, March 15, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वाटी उडदाची डाळ दोन वाटी तांदुळ या मिश्रणाला, अर्धा चहाचा चमचा यीस्ट पुरते.
ड्राय यीस्ट वापरण्यापुर्वी. अर्धा कप कोमट पाण्यात अर्धा चमचा साखर घालावी. व त्यावर यीस्ट पसरावी. दहा ते पंधरा मिनिटात मिश्रण फ़सफ़सुन आले पाहिजे. ( तसे झाले नाही तर यीस्ट खराब झालीय असे समजावे. )
मग ते मिश्रण ढवळुन, ईडलीच्या ( वाटुन झालेल्या ) मिश्रणात मिसळावे व रवीने नीट घुसळुन घ्यावे. डाळ व तांदुळ वाटुन झाल्याबरोबर हे मिसळावे. काहि काहि मिक्सरमधे वाटताना मिश्रण फार गरम होते. तसे असेल तर मिश्रण जरा निवु द्यावे.
यीस्ट घातल्यानंतर चार सहा तासात पिठाचे आकारमान फ़ुगुन निदान दुप्पट झाले पाहिजे.
पण मुंबईच्या सध्याच्या हवेत, आठ दहा तासात तसेहि मिश्रण तयार होतेच.


Me_mastani
Thursday, April 12, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीकरान्च्या सुचना पाळून ईडलीचे पीठ छान फ़रमेन्ट व्हायला लागले आहे. पण ईडल्या ईडलीपात्राला चिकटतात, तेल लावले तरी. काय चूकत असावे बर? मी ३:१ असे प्रमाण घेते.

Dineshvs
Thursday, April 12, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीठ फार पातळ होतेय का ? वाटताना पाणी जास्त झाले का ? तसेच जर कमी शिजवले तर असे होईल.
चालत असेल तर एक स्वच्छ रुमाल. किंवा फ़ॉईलचे तुकडे वा केळ्याच्या पानाचे तुकडे त्या कप्प्यात ठेवले आणि वर पिठ टाकुन वाफवले तर असे होणार नाही.


Meggi
Friday, April 13, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तानी, इडल्या झाल्यावर त्यावर पाणी टाक, लगेच निघतात. गरम असताना पण काढू शकतो.

Me_mastani
Friday, April 13, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा आणि मेग्गी. कदाचित पातळ होत असेल. मी पुढच्यावेळी लक्षात ठेवीन.

Me_mastani
Friday, April 13, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेग्गी किती आणि कसे पाणी टाकायचे?

Meggi
Monday, April 16, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तानी, इडल्या झाल्या की लगेच कूकर मधुन काढ, आणि नळाचि छोटी धार करुन २ सेकंद धरलस तरी पुरे. इडल्या थंड किंवा पिचपिचित होत नाहित. लगेच निघतात. करुन बघ.

Ksmita
Friday, May 04, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायक्रोवेव इडली स्टन्ड मधे इडल्या दडदडीत झाल्या गरम असताना नरम मऊ होत्या काही उपाय ?

Prady
Thursday, May 17, 2007 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता मला microwave इडली स्टँडचा अनुभव नाही पण तु त्या ईडल्यांवर थोडं पाणी स्प्रे करून आणी मग झाकून परत एकदा microwave करून पहा. कदाचित soft होतील असं केल्याने.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators