|
Arch
| |
| Wednesday, April 23, 2008 - 9:45 pm: |
| 
|
Princess , अग तुला सांगितलेली प्राची आणि श्रची मदत पण इथे लिही न. म्हणजे इतरांनाही उपयोगी पडेल.
|
Manuswini
| |
| Wednesday, April 23, 2008 - 9:59 pm: |
| 
|
पौष्टीक नी तसे बर्यापैकी झटपट मध्ये किन्वा( quinoa ) चा उपमा सुद्धा बनवता येतो. मी बनवते. रोजचेच उपम्याचे साहीत्य.. १ वाटी किन्वा(असाच उच्चार आहे ) तो भिजत ठेवून द्यायचा आदल्या दिवशी फ़्रीझ मध्ये झाकून, १ लाल कांदा चिरलेला, १ वाटी कांदा पाती बारीक कापायची, किसलेले आले, हिरवी ओली मिरची बारीक कापलेली, मटर वाफ़वलेले, गाजर बारीक चिरलेले,वेळ असेल तर किसलेले, फरसबी कपलेली, उडीद डाळ,चणा डाळ थोडीसी, कढीपत्ता, मस्त तडका डेवून vegetable stock मध्ये शिजवा, मस्त लागतो. बरोबर अंड्याचे काप अवकोडो डीप भरून(पिवळा बलक काढून) ही फ़ीलिंग करायचे. full complete meal in its way with enough protein(veegtable protein in quinoa),all vegies, avacodo पोट मस्त ४ तास भरते. हवेच असेल तर readymade pre-cooked shirmps टाकू शकता. नाहीतर चिकन. नो तेल तूप. किन्वा आधी मोकळा शिजवून घ्यायचा.
|
Aashu29
| |
| Thursday, April 24, 2008 - 2:31 am: |
| 
|
डब्यात नेणेबल पदार्थ सहसा थोडे ओले असले तर बरे, मुग किंवा मटकीची नुसते तिखट मीठ लिंबु टाकुन केलेली उसळ., उपमा वर सांगितला तसा ओलसर, किंवा कोरड्यात ब्रेडचा उपमा , झट्पट पुलाव,मेथीचे ठेपले एक्दम बेस्ट. पुनम, मेलला रेप्लाय दे की आता.
|
Aashu29
| |
| Thursday, April 24, 2008 - 2:37 am: |
| 
|
अजुन एक पदार्थ ओला, साऊथ वाले आणतात सहसा, फ़ोडणिचा दहि भात, थंड पण छन लागतो.
|
Bee
| |
| Thursday, April 24, 2008 - 4:26 am: |
| 
|
प्रिन्सेस, खरचं सिंगापुरमधे शाकाहारी भारतीयांचे हालच हाल आहेत. त्यात इथल्या कामाचे तास इतके लांब असतात की घरी जावून बनवायचे म्हंटले तर वेळ उरत नाही. मी तर इथे नोकरी करुन, M. Tech चा course करून, दोन्ही वेळेसचे जेवन बनवतो. खूप खूप धावपळ होते. पण इलाज नाही. इथे खानावळ देखील नाही आहेत. सध्या मी चायनीज शाकाहारी जेवन मागवायचा विचार करतो आहे. इथे तशी एक सोय आहे डबा मागवायची. ऑफ़ीसपोच डबे आणून देतात. पण माहित नाही कसे असते त्यांचे अन्न. पण नियम पाळून जर सर्व काही केले तर व्यवस्थित होत. थोड्या फ़ार वेगवेगळ्या कल्पना राबवून पहायच्या. जसे काही दाक्षिणात्य पदार्थ चटकन करून होतात. केरळी लोकांचे तांदळाचे कितीतरी पदार्थ आहेत. मी माझ्या कलीग्स कडून एक एक शिकतो आहे. पास्तापण छन होतो, आपल्याच पद्दतीने करायचा. इथे दमट हवामान असल्यामुळे कडधान्याला लवकर मोड येतात. इथल्या सुपरबाजारात दहा धान्य एकत्रीत मिसळून त्याचे एक पाकिट येते. ते ओतून भिजवून त्याची उसळ छान लागते.
|
Manjud
| |
| Thursday, April 24, 2008 - 6:00 am: |
| 
|
प्रिन्सेस, नवरा ६.३० ला घर सोडणार तर त्याआधी उठून तीन तीन डबे करायचे म्हणजे तुझी धावपळच आहे. मी सुचवायचा प्रयत्न करते, त्यातलं जे जमेल, आवडेल ते बघ... नाश्त्यासाठी तू लाडू करून ठेवू शकतेस. कणकेचे, बेसनाचे, मुगाचे, रवा, रवा बेसन वगैरे, अर्थात आवडत असतील तर. म्हणजे मग एखादं सँडविच, एक फळ आणि एक लाडू ह्यात नाश्ता व्हायला हरकत नाही. सँडविचला पर्याय शिरा, उपमा, पोहे, थालीपिठ, घावन वगैरे आहेत. दुपारसाठी तू पोळी भाजी देतेसच. तिकडचं हवामान कसं आहे मला माहीत नाही, त्यामूळे तू सकाळपासून केलेला डबा रात्रीपर्यंत कितपत टिकेल ते बघ. रात्रीच्या डब्यासाठी खिचडी, पुलाव, जिरा राईस, कडधान्यांची खिचडी वगैरे करू शकतेस. ह्यासाठी तुला बरीचशी तयारी आदल्या दिवशी करून ठेवता येईल. जसं की पुलाव करणार असशील तर तांदूळ भिजवून ठेवायचे. आणि नेहमीसारखी फोडणी करून त्यात धुतलेले तांदूळ आणि भाज्या, मसाला, मीठ वगैरे घालून चांगले परतायचे. आणि गार झाले की डब्यात भरून फ्रिजमधे ठेवायचे. दुसर्या दिवशी हे भाजलेले साहित्य किंचीत गरम करून त्यात मापाप्रमाणे उकळतं पाणि घालायचं आणि पुलाव शिजवायचा. अशीच तयारी तुला बाकीच्या भातांसाठीही करून ठेवता येईल. मी तर तांदूळ, तुरीची डाळ, टोमॅटो, गोडा मसाला वगैरे घालून पण खिचडी करते. आपण आमटी भात खातो तशीच चव लागते.
|
Princess
| |
| Thursday, April 24, 2008 - 6:26 am: |
| 
|
मृण, मनु, आशु, बी आणि मंजुडी खुप खुप धन्यवाद. मंजु अगदी बरोबर ओळखलस ग... ६.३० ला तो जाणार... त्याआधी तीन तीन डबे बनवणे म्हणजे सॉलिड फजिति होतेय. सकाळच दुध, चहा, डब्बे... कसे मॅनेज करु तेच कळत नाहीये. शिवाय गॅस फक्त दोन बर्नरचा आहे. तीन किंवा चारचा असता तर अजुन फास्ट करता येईल. तू दिलेली पुलावची आईडिया छान आहे. रात्रीच अर्धा तयार असल्याने दुसर्या दिवशी सकळी खुप वेळ जाणार नाही. अशाच अजुन काही टिप्स असतील तर दे ना किंवा इतरही कुणी द्या ना. बी, अगदी अगदी बरोबर. इथे खरच खुप हाल होतात जेवणाचे. आम्ही शाकाहारी नाहीत पण अगदी पक्के मासाहारी पण नहीत. अगदी क्वचित मांसाहार करतो. त्याच्या ऑफिसमध्ये चाईनीज जेवण मिळते ( veg/nonveg दोन्ही) पण त्याने आजपर्यंत खाऊन पाहिलेले नाही. आर्च, मी श्र आणि प्राचीने दिलेल्या टिप्स लवकरच लिहुन काढेन खुप वेळ लागेल ते सगळ लिहुन काढायला. इथे लिहिल्याने पुढे कोणाला असाच प्रश्न पडला तर उपयोग होईल.
|
Psg
| |
| Thursday, April 24, 2008 - 7:04 am: |
| 
|
exactly! इथे प्रश्न विचारण्याचा हेतूच हा असतो की आपल्याबरोबर बाकीच्यांनाही माहिती मिळावी! प्रिन्सेस, बर्याच जणींनी सांगितलेलं आहेच.. मन्जूच्या पोस्टला अनुमोदन. लाडू, सॅंडविच चे अनेक प्रकार, केक हे नाश्ता म्हणून देता येईल. शिवाय, अगदीच धावपळ झाली तर सीरीयल देत जा डब्यात, दूध वेगळे.. मायक्रोवेव्ह मधे गरम करता येईल, किंवा कोल्ड सीरीयलही आवडत असेल तर. त्यातच फ़ळं घातली तर मस्त लागतं. लंचला भाजी-पोळी आहेच. रात्री दाक्षिणात्य पदार्थ देऊ शकतेस.. दमट हवेमुळे लवकर पीठ आंबेलही आणि ते पचण्यास हलके. कधीतरी पिठलं, कधी आंबोळ्या असंही देता येईल. सकाळी घरातून निघताना दूधाला विरजण लावून दिलंस तर संध्याकाळपर्यंत झकास दही लागेल त्याचं कोशींबिरी, उसळी आहेतच. थोडं डोकं लढवून भाज्या शिजवून अनेक पदार्थ करता येतील हे म्हणजे मुलाला डेकेअर मधे सोडताना आपण कशी तयारी करून देतो, तसंच वाटतंय ना? दिवे घे!
|
Prachee
| |
| Thursday, April 24, 2008 - 3:08 pm: |
| 
|
पुनम, काल न आठवलेल्या काही गोष्टी.... १. कांदे चिरुन तेलावर गुलाबी परतुन घे, त्यात आले-लसुण वाटण घालुन चांगले परत. छान वास सुटेल. नंतर त्यात टोमॅटो घालुन परत. मग त्यात जिरेपुड,धणेपुड,मिरचीपुड, आमचुर आणि गरम मसाला घालुन परत. टोमॅटो चांगले शिजुन तेल सुटेपर्यंत परतत रहा. मग कढई खाली घेऊन गार होऊ दे. गार झाल्यावर मिक्सरमधुन पेस्ट करुन घे. हा मसाला खुप सारा बनवुन फ़्रिजमध्ये ठेवु शकतेस. नंतर याचा वापर करुन आलू मटर, मटर पनीर,छोले इ. बनवु शकतेस. मसाला तयार असेल तर पटकन बनेल सारे. हाच मसाला घालुन दाल फ़्रायही बनवता येईल. २. चीझ किसुन ठेव फ़्रिजमध्ये. पाहिजे तेव्हा कांदा मिरची-कोथींबीर बारीक चिरुन, मिरेपुड+मीठ घालुन त्याचे सारण बनव. चाट मसालाही घालु शकतेस. हे सारण वापरुन मग ग्रिल्ड सण्डविचेस बनव किंवा पराठे. जास्त वेळ लागत नाही.
|
Chinnu
| |
| Thursday, April 24, 2008 - 3:54 pm: |
| 
|
कशा गुणी मुली आहेत सगळ्या. प्रिन्सेस तू जशी माझ्या होणार्या हालाबद्दलच वाचा फोडलीस. साईड स्नॅक्स मध्ये फळे, चिप्स, विकतचे छोटे केक, कुकिस चा समावेश होवु शकतो. मोड आलेली धान्ये घालून कच्ची कोशिंबीर किंवा सॅलाडचा डबा आदल्या दिवशीच तयार ठेवता येईल. यात बीट, गाजर, काकडी, कोवळ्या शेंगा वगेरे वापरता येणार. मोड आणलेले मूगावर लिंबु पिळलेली कोशिंबीर हा कधी कधी भाजीला पण पर्याय होउ शकतो. मुगाची डाळ पाण्यात भिजवून त्यात पान्कोबी किसून (लिंबू, मीठ ऑप्शनल) खिरापत वाटायची दक्षिण भारतात पद्धत आहे! शक्यतो Fruit Juices , मिल्कशेक्स, दूध किंवा दही यांचाही डब्यात समावेश असावा. मेथी, पालक अगदी कोथिंबीर घालून दशम्या किंवा ठेपले छान होतात. गाजरचा, दुधीचा हलवा आधी करून ठेवता येतो, शिवाय टिकतो! फोडणीचा दहिभात, लेमन राइस (ह्याची फोडणी तयार करून फ़्रीज मध्ये ठेवायची, आयत्यावेळी भात करून गार झाल्यावर लिंबू पिळून मिसळायचे), पुलाव, Tamarind rice (ह्याची फोडणी पण आधी करून ठेवता येईल), वडा भात (हसू नका वडे आदल्या दिवशी करून सकाळी भातात कुस्करता येतात! एकदा चक्क ह्याच धरतीवर पापड भात पण डब्यात नेला आहे), गोड आवडत असेल तर साखर भात, चित्रान्न, शिरा वगेरे. वरील सर्व प्रयोग स्वानुभव आहेत. hope this helps!
|
Ashu
| |
| Thursday, April 24, 2008 - 5:04 pm: |
| 
|
इथल्या सगळ्याच टिप्स खरेच खूप छान आहेत. माझी एक सूचना म्हणजे जेवणासाठी भोपळ्याच्या पुर्या गोड किन्वा तिखट जशा आवड्तील तशा अशाच आवड्तील त्या भाज्या घालून करुन ठेवता येतिल सन्ध्याकाळी. शिवाय फ़्रोजन फिलो शीट मिळतात त्यामधे कोरडी भाजी भरुन पाटिस (हे मराठीत नीट लिहिता येत नाहिये.) सकाळी नुसते बेक करुन फ़ॉइल मधे गुन्डाळून देता येइल. मधल्या वेळेसाठी आपले नेहमीचे फराळाचे सगळेच पदार्थ मस्त आहेत जसे कुठ्लाहि चिवडा (राइस क्रिस्पी चा पटकन होतो ), शन्करपाळे, चकल्याशेव.
|
Manuswini
| |
| Thursday, April 24, 2008 - 5:51 pm: |
| 
|
एक म्हणजे weekend लाच मुख्य अश्या भाज्या कापून ठेवायच्या. धुवायच्या नाहीत. करायच्या आदल्या निथळून चाळणीत freez च्या खालच्या साईड ठेवायच्या. weekndend लाच चटण्या बनवून ठेवायच्या. टोमटो paste जी लागते राजम,छोले वगैरेला असे सगळे करून ठेवायचे. डोस्या साठी लागणारी उडीद डाळ वाटून freez करायची छोट्या डब्यात. मग्ग तो एकेक डब्ब काढून डोसा तयार. नाहीतर सर्व डाळी भिजवून वाळ्वून वाटून रवा ठेवायचा म्हणजे दररोज रात्री ती वाटायची खटपट नाही. असा रवा अगदी तीन चार तासान छान आंबतो मग झटपट डोसे तयार. मी रोज NJ ते albany,upside New york travel करायचे. सर्व commute साडे चार तासाचे,घर सकाळी 6:30 AM सोडा नी घरी रात्री 8.30PM . कुठे एवढी energy असते पण हे सर्व तयार असेल तर होते सर्व. माझा एक अनुभव. omlete बनवायचे microwave mold येतो. जरा चांगल्या quality चा पण mold मिळतो जो electric वर चालतो. अंडे नी भाज्या मिक्स करून ५ मीनीटात तयार. दर शनीवारी वा रवीवर असा एक दिवस निवडायचा(आदल्या दिवशी भरपूर आराम करायचा), बरोबर चार तास kitchen मध्ये राबून करावे लागते पण दुसर्या दिवशी कमी ताप असतो रात्री घरी थकून आल्यावर. १. रोज कांदा चिरण्यापेक्षा कांदा,लसूण भाजून एक paste . २. कोथींबीर + मिरची + आले एक paste ३. खोबरे + कांदा + लसून भाजून एक paste ४. मासे marinade करून ठेवायचे, कडधान्य उकडून ठेवायचे. मग freez करायचे. तो तो डब्बा काढायचा. mixer ची जी कामे आहेत ती तिथेच उभे राहून करून टाकायची. ५. रवा भाजून ठेवून द्यायचा शीरा,उपम्यासाठी. ६.दोन दिवसाचे चपाती,पुर्या पिठ भिजवून ठेवायचे. ७. वेगळे असे कधी पालक तर पुदीना puree घालून पराठा पिठे भिजवून freez करायचे. ८. डाळी उकडून ठेवायच्या आदल्या नी दोन दिवसात वापरायच्या. ८. पापड microwave मध्ये येतो भाजता oil spray करून. ९. फळे कपून ठेवायची( कलींगड, melon वगैरे) १०. एखादी तुझ्या आवडीप्रमाणे weekend ला cookie बनवून ठेवायची. भांडी पण कमी लागतात इतर दिवशी weekedays मध्ये घासायला असे करून ठेवल्याने. हे सर्व कामात एक helper (कुठल्याही form ) मध्ये असेल तर उत्तम its only about time management and planning
|
Aashu29
| |
| Friday, April 25, 2008 - 2:51 am: |
| 
|
मनु म्हणजे तुझ्याकडे कधिहि कोणि पाहुणा आला तर उपाशि रहणार नाहि याची हमी आहे तर! ;)
|
Princess
| |
| Friday, April 25, 2008 - 3:19 am: |
| 
|
प्राची, चिन्नु, आशु, मनु धन्यवाद मनु टाईम मॅनेजमेंटच जास्त कठिण आहे असे वाटतय मला. तुझ्या टिप्स उपयोगी पडतील त्यासाठी.
|
Princess
| |
| Friday, April 25, 2008 - 3:22 am: |
| 
|
श्रद्धाने दिलेल्या झटपट टिप्स : १. धिरडे भाज्या घालुन (भाज्या : पालक/ गाजर, चिरलेला कांदा) २. सगळी पिठे मिक्स करुन थालिपिठे ३. पोहे भिजवुन दही घालुन खमंग तुपाजिऱ्याची फोडणी ४. आदल्या रात्रीचा भात/ पोळी असल्यास फ्राईड राईस किंवा फोडणीची पोळी ५. आदल्या रात्रीच सुकी मसालेदार भाजी आणि चपाती करुन ठेवायची. दुसऱ्या दिवशी रोल करुन देणे. ६. चपातीचे पिठ दुधात भिजवले तर चपत्या कडक होणार नाहीत. ७. दुपारच्या चटकमटक साठी वीकेंडला चॉकोलेट केक किंवा कुठलाही आवडता केक बनवुन ठेवायचा. त्याचा एखादा तुकडा डब्ब्यात देता येईल. ८.चकल्या, खारे शंकरपाळे, कडबोळी ९. कढीपत्त्याची चटणी फ्रीजमध्ये नेहमी तयार ठेवायची. ब्रड बतर आणि ही चटणी लावुन झटपट सॅंडविच तयार. १०. बेक्ड बीन्सचा कॅन आणुन ठेवायचा. कांदा लसुण तेलात परतुन त्यात तो कॅन ओतायचा चवीप्रमाणे मीठ, तिखट, जिरेपुड, साखर घालायची. ११. ईडली मिक्स चा ढोकळ्याप्रमाणे बनवुन त्याला खमंग फोडणी द्यायची. १२. ओला खोबरे, कोथिंबीर, जिरे मिरचीचे वाटण आदल्या रात्री करुन ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळाची उकड काढुन त्यात हे सारण भरुन तिखट मोदक बनवायचे. १३. गाकर : कणिक+रवा+दही+ओवा+तीळ+मीठ मिक्स करुन घट्ट भिजवायचे. मग ते मुरु द्यायचे. आदल्या रात्री करुन ठेवले तरी चालेल. गोळे करुन चपटे करुन तव्यावर तुपात भाजुन घ्यायचे. याच्यासोबत एखादी मसालेदार रस्सा भाजी द्यायची. १४. कांद्याचा चटका : तेलात जिरे, मोहरी टाकुन फोडणी करा. त्यत लांब लांब बारिक चिरलेला कांदा टाकुन खुप वेळ परता. नंतर शेंगदाण्याचे कूट घालायचे. पोळीत रोल करुन किंवा पोळीबरोबर खायचे. या जेवणासोबत वेलदोडा अत्यावश्यक १५. दलिया १६. शेवची भाजी/ फ्लॉवर बटाटा/ वांगा बटाटा भाजी + गाकर १७. तुरीच्या दाळीचा घट्ट गोळा शिजवुन घायचा. दुसऱ्या दिवशी त्याला कांदा कोथिंबीर, लसुण मिरचीची फोडणी द्यायची. हलद, मीठ गोडा मसाला घालुन नंतर घोटलेली घट्ट तुरीची दाळ घालायची. १८. खारा बुंदीचा रायता प्राचीच्या टिप्स नेक्स्ट पोस्टमध्ये
|
Bee
| |
| Friday, April 25, 2008 - 8:10 am: |
| 
|
गाकरची टिप आवडली. पण ह्यात रवा घालतो तो भाजलेला असावा का? आणि जाड रवा की बारीक? पिठाचे आणि रव्याचे प्रमाण किती? मी हा प्रकार गावी शेजारच्या जोशींकडून खाल्लेला पण हे नाव ओझरतेच माझ्या लक्षात होते.
|
Chioo
| |
| Friday, April 25, 2008 - 8:31 am: |
| 
|
व्वा.. काय मस्त टिप्स आहेत. मलापण गाकर आवडलं. मनु, तू डोशासाठी उडदाची डाळ वाटून फ्रिज करायला सांगितली आहेस. त्यात तांदूळ नाही घालायचे? आणि पूर्ण आंबवून ठेवायची का?
|
Bee
| |
| Friday, April 25, 2008 - 11:58 am: |
| 
|
पण मी जे गाकर खाल्ले आहे ते वरतून तुप आणि साखरेची पिठी होती त्याला. बहुतेक कसेही खाता येतात असे आहेत ते.
|
उडदाची डाळ वाटून नुसती ठेवायची. बारीक वाटून,त्यात दुसरी कुठलीही डाळ घालायची नाही. पाहीजे तेव्हा एकेक छोटा डब्बा defrost करायचा नी त्यात तांदूळाचा रवा टाकायचा. नाहीतर खालील डाळीचा जाडा रवा बनवून ठेवायचा. २ वाटी उडीद डाळ (ही फक्त वेगळी धूवून वाळवायची, एकदम कोरडी नाही वाळवायची, मिक्सी मध्ये coarse वाटायची नी बंद डब्यात ठेवून द्यायची(हा डब्बा freez मध्ये ठेवला तर उत्तम)) २ वाट्या तांदूळ धूवून वाळवून कोरडा जाडा separate नाहीतर बारीक रवा करून ठेवायचा. तो कश्यतही वापरता येतो.(ढोकळा,गोड तांदूळ सांजा गूळ टाकून,इडली, जर बारीक वाटला असेल तर गावणे वगैरे वगैरे म्हणून हा separate ठेवायच) खालील डाळी एकत्र धूवून वाळवोन वाटायच्या. 1/2 वाटी चणाडाळ, 1/4 वाटे मूगडाळ २ मोठे चमचे मसूर डाळ ह्या डाळी वाटताना खालील हे टाकून वाटावे १ चमचा धणे १२ चमचा मेथ्या दाणे १ चमचा जीरे सोयाबीन हवे तर ते टाका. मग करायच्या आदल्या दिवशी तांदूळाचा रव्यात हा वरचा डाळ रवा मिक्स करा,त्यात उडीद डाळ रवा(प्रमाण इथे तिथे आहेच लिहिलेले जे करणार असेल ते डोसे, अढई, उत्तप्पा, वडे, थालीपीठे वगैरे वगैरे) तयार कोथींबीर चटणी टाकून जे काय तुम्हाला हवे ते टाकून तयार. किंवा ह्याच रव्यात ताक टाकून उकड करून भरपूर कोथींबीर टाकून मस्त खमंग वड्या करा. छान लागतात. ही सर्व मेहनत महिन्या दीड महिन्यात(तुम्ही कीती खादाड असाल त्यावर) एकदाच करावी लागते. पुन्हा दर दिवशी मिक्सर कोण धूवत बसतो नी वाटावाटी. असा रव्याचा उपयोग बर्याच पद्ध्तीने करता येतो जर तुम्ही डोकेबाज असाल तर. देशात रहाण्यार्यांना मजा आहे, चक्कीवाल्याकडून मस्त दळून आणता येते. दोन separate पिशव्या करून भैयाला सांगायचे एक को बारीक वाटना और दुसरे को एकदम बर्यापैकी जाडा. और आखीर मे वाटना भैया समजून जातो तुम्हाला नक्की काय हवे ते.
|
Shonoo
| |
| Friday, April 25, 2008 - 5:32 pm: |
| 
|
अमेरिकेत अन भारतात पण सगळीकडे इदली, डोसा यांची पीठं तयार मिळतात. ती आणून पहा. सिंगापूरमधे सुद्धा इतकी दाक्षिणात्य जनता आहे. तिथेही मिळत असणार. नूडल्स शिजवून ठेवून त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून हाका नूडल्स, singapore Mai fun वगैरे प्रकार करता येतील.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|