Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through April 04, 2008 « Previous Next »

Dineshvs
Wednesday, March 19, 2008 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उनो, अगदी घट्ट हवी असेल तर त्या पाकिटावर दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी पाणी वापरायचे. तसेच त्यातले अर्धेच उकळायचे. त्यात जेली पावडर घालुन विरघळुन घ्यायची, आणि मग भांडे खाली उतरुन त्यात बाकिचे पाणी थंडच घालायचे. हा जेली मोल्ड पण बर्फ़ाच्या पाण्यात ठेवायचा आणि मग सेट होण्यासाठी, फ़्रीजमधे ठेवायची.
साधारणपणे फ़ळाची जेली घरी करताना त्यात थोडी कच्ची फ़ळे वापरायची असतात. त्यातील पेक्टिनमुळे जेली सेट होते. व्यावसायिक लोक हे प्रमाण काटेकोरपणे पाळतात. जर फ़ळातील पेक्टिन कमी पडत असेल तर ते आणखी भर घालतात. ( पेक्टिन कच्च्या पपईपासून करतात )
पण घरी कुठल्याही सरबतापासून जेली करता येते. हे सरबत नेहमीपेक्षा कमी पाणी घालून तयार करायचे. एक कप सरबत असेल तर आणखी पाऊण कप पाणी गरम करत ठेवायचे. त्यात बाजारात मिळणार्‍या अनफ़्लेवर्ड जेलीचे एक पाकिट उघडून टाकायचे. बाजारात चायना ग्रासच्या कांड्या किंवा पूडहि मिळते, ती वापरली तरी चालेल. ती पुर्ण विरघळली कि सरबतात नीट मिसळुन घ्यायची. हा द्रव जेलीप्रमाणेच सेट होतो. हि पुड साधारण २ चहाचे चमचे लागते. अनफ़्लेवर्ड जिलेटिनच्या पाकिटात छोटी पाकिटेच असतात, त्यापैकी एक वापरावे. त्या पाकिटावर किती द्रवाला ते पुरेल हे लिहिलेले असते, तेवढ्या द्रवाला ते वापरावे.
अननस आणि किवी सारखी काहि फळे ताजी वापरली तर जेली सेट होत नाही, त्यामुळे ती टाळावीत.


Manuruchi
Wednesday, March 19, 2008 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala koni butter chaklichi recepi dyal ka

Malavika
Wednesday, March 19, 2008 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, लोणी पातळ करून घालायचे.

Dineshvs
Wednesday, March 19, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांत हैद्राबादी खट्टी डाळ
/hitguj/messages/103383/138243.html?1205945696 इथे लिहिली आहे.

Alpana
Thursday, March 20, 2008 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा काल तुमच्या रेसिपीप्रमाणे ती मोमोजची चटणी केली..... मस्त झाली होती...आणी हो शेजवान फ़्राइड राइस पण

Deepant
Thursday, March 20, 2008 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्यू श्यामली.
थॅंक्यू दिनेशदा
तुम्ही लिहिलेली खट्टी दाल हैदराबादी पद्धतीची आहे हे माहित नव्हते.मला वाटले कि त्यात आंबटपणासाठी चिंच घालतात आणि तुरडाळ, मसुरडाळ दोन्ही वापरतात.


Uno
Thursday, March 20, 2008 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्यु दिनेशदा, मी करुन पाहिन तुम्ही सांगीतल्या प्रमणे.

Bee
Wednesday, March 26, 2008 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साबुदाण्याच्या थालीपिठाची आणि दह्यातील साबुदाणा ह्या दोघांची कृती मिळू शकेल का?

Dineshvs
Wednesday, March 26, 2008 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, इथे बघ
/hitguj/messages/103383/138405.html?1206513596

Prajaktad
Wednesday, March 26, 2008 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल भोपळी मिरचि(रेड बेल पेपर)चे पदार्थ भाज्या तत्सम सुचवा..

Karadkar
Wednesday, March 26, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prajaktad - here are few recipes

http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/07/blog-post_06.html

http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_29.html


Manuswini
Wednesday, March 26, 2008 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजे,

१)तु मस्त vegie omlet बनवू शकतेस त्यात julian styl ने मश्रूम,कांदा,हिरवा कांदा मिक्स चीज ( ricotta,moarella,cottage ), all color mix bell pepper )

२) stuffed red bell pepper with rice n red beans n cheese(three kinds), त्यात bread crumbs पण टाकावे लागतील नी अवनला 2750c वर बेक कर.
नाहीतर सरळ
३) veggie कबाब मध्ये टाक नी ग्रिल कर



Mrinmayee
Wednesday, March 26, 2008 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांपूर्वी नुस्त्याच आणून पडलेल्या लाल भोपळीमिरच्या संपवायच्या म्हणून खाली दिलेल्या लिंक मधल्या रेसिपीप्रमाणे सुप केलं छान लागलं. त्यात बदल म्हणजे एक टोमॅटो, मीठ, मिरपुड आणि सुप ब्लेंडरमधून काढताना एक सुकी लाल मिरची घातली.
http://allrecipes.com/Recipe/Roasted-Red-Bell-Pepper-Soup/Detail.aspx

आणखी एक सुप: ह्या मिरच्या रोस्ट करून त्या नारळाच्या दुधात वाटायच्या. वाटताना एक आल्याचा तुकडा, लाल मिरच्या, मीठ घालायचं. उकळी आणायची.

Prajaktad
Thursday, March 27, 2008 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, म्रु मनु धन्यवाद ! छानच आहेत रेसिपी .. करुन बघते आता एकेक..मिनोती ब्लॉग छान आहे तुझा...

Lajo
Thursday, March 27, 2008 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रायत पण छान होईल
लाल ढब्बू मिरच्या रोस्ट करायच्या. गरम असतानाच प्लास्टिकच्या पिशवीत घालायच्या. पिशवी बंद करायची २-३ मिनीट थांबायच. मग पिशवी उघडून मिरच्यांची साल आणि बिया काढायच्या.
दह्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर आणि हवी असल्यास लसूण पेस्ट घालावी. वरून हिंग, मोहरीची फोडणी... मस्त लागत...


Manuswini
Thursday, March 27, 2008 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजे, ही घे भोपळी मिरचीचे काय करायचे असेल तर :-)

/hitguj/messages/103383/119677.html?1206591884

दुसरे म्हणजे वरील प्रकारे लाजोने सांगीतले तशी मिरची भाजून सालसा बनव नी त्यात अननस, mango घाल, भरपूर कोथींबीर.

हाय काय नी नाय काय :-)

Chioo
Friday, March 28, 2008 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, मी ब्रेड करून बघितला. पण मी यीस्ट घातली होती. तरी छान झाला. धन्यवाद. :-) मी त्याचा लोफ केला होता आणि दोन बनपावसारखे. लोफ छान झाला पण बनपावसारखे नीट नाही झाले.

बनपाव कसे बनवतात? आणि भारतात जो गोडसर मिल्क ब्रेड मिळतो तो कसा बनवतात?


Dineshvs
Friday, March 28, 2008 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बनपाव करताना त्यात अर्थातच जास्त साखर घालावी लागते.

बनपावासाठी एक उंचा काठाचा ट्रे घेतात. त्यात गोळ्या आयताकृति म्हणजे चार बाय सहा वगैरे लावतात. त्याला तेलाचा हात लावुन त्या हाताने दाबतात आणि मग उबदार जागी झाकुन ठेवतात. अश्या रचनेमुळे आणि ट्रेच्या उंच काठामूळे, बनपावाला उंची मिळते. काहिवेळा वरून अंड्याचे किंवा दूधसाखरेचे मिश्रण ब्रशने लावतात, त्यामूळे वरुन चमक येते.


Soni_kudi
Friday, April 04, 2008 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीची तुरडाळीची आमटी चटकदार होण्यासठी काय करावे ? माझी आमटी चिंच गुळ घालुन वा वरणाला फोडणी घालुन केलेली बरी होते पण नेमकी अशी चव नही येत...सपक लगते...काय करावे? any suggesions...advice welcome pls

Manuswini
Friday, April 04, 2008 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अशी करते, जी बरेच friends सांगतात की त्यांना आवडते;
तूरडाळ आमटी :

तूरडाळ फक्त हळद नी किंचीत तेल घालून उकडवून घ्यावी.
मग घोटावी गरम असतानाच, त्यातच किंचीत काळा किंवा गोडा मसाला धणा पॉवडर(हो मी सेपरेट घालते), लाल मसाला घालते.

फोडणी एकदम खंमग द्यायची.

तेल तापले की गॅस कमी करावा. मग त्यात हिंग, भरडसर जीरे टाकावे(अक्खे टाकु नये), ठेचलेली लसूण(ठेचूनच टाकावी), हवे असल्यास कडीपत्ता, लाल सुखी मिरची(शोभेला), राई चांगली तडतडावी.
आम्ही(आमच्या घरी) कोकम वापरतो आमटीत. नाहीतर चिंच टाकावी. मग गूळ हातानेच चेपून टाकावा.
मग ही डाळ ओतावी चर्र आवाज़ होतो. :-)

मग वरून अगदी बारीक चिरलेली कोथींबीर मी टाकते. अगदी बारीक करावी. मग एखादा चमचा वरून मी शुद्ध तूप टाकते नेई मंद आचीवर ठेवते. मस्त लागते. हवे असल्यास कोथींबीर, हिरवी मिरची वाटून लाव वेगळेपणासाठी. गरम भाताबरोबर छान लागते ही डाळ. किंवा फुलके.

त्या शुद्ध तूपाचा वास मस्त वाटतो. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators