Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 18, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through March 18, 2008 « Previous Next »

Dineshvs
Saturday, March 15, 2008 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, पोटॅटो सूप, क्रिस्पी व्हेज, कबाब, खबूस हम्मुस चा एक प्रकार, ग्रीक सलाड, वांग्याची बुरानी वगैरे, आणि फ़्रेंच ब्रेड स्लाईसेस, यातले बरेच आधी करुन ठेवता येईल.
असे मी सूचवीन


Lopamudraa
Sunday, March 16, 2008 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिएम्श्दा नाव वाचुनच गडबडले,
मी काहि फ़ार छान कूक नाहिये.. पण यातले ग्रीक सलाड आणि, क्रिस्पी veg हम्स हे पदार्थ कुठे सापडतील म्हणजे कृती


Anjalisavio
Sunday, March 16, 2008 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/83805.html?1166111910
लोपा, प्रादेशिक मधे मिळतील.

Dineshvs
Sunday, March 16, 2008 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार अंजली.
लोपा तिथेच मी ग्रीक सलाड लिहिले आहे. हुमुस ची कृति आहे तिथे. त्याचे टिनही मिळते. ते डिशमधे घेऊन त्यात खळगा करायचा, त्यात ऑलिव्ह तेल घालायचे आणि लाल मिरची पावडर शिवयरायची.
खबूस किंवा पिटा ब्रेड दुकानात मिळेल. त्याचे आठ त्रिकोणी तुकडे करुन ते जरा बेक करुन घ्यायचे. ह ब्रेड हुमुस मधे बुडवुन खायचा. ( अगदी झुणका भाकर )
क्रिस्पी व्हेज साठी, बटाटा, फ़्लॉवर, कोबी, सिमला मिरची, मश्रुम अश्या भाज्यांचे तुकडे घ्यायचे. कॉर्नफ़्लोअरमधे पाणी व मीठ घालायचे, आणि जाडसर घोळ करायचा. त्यात हवे तर थोडे लाल तिखट घालायचे. या घोळात भाज्यांचे तुकडे बूडवून कुरकुरीत तळायचे. हवी तर कुठलीही चायनीज ग्रेव्ही करुन त्यात हे तुकडे घोळवायचे. किंवा गेव्ही वेगळी दिलीस तरी चालेल.
थोड्या प्रमाणात करुन बघ, चव आवडली तर जास्त कर.

इकडचा खुप लोकप्रिय प्रकार आहे हा. चायनीज ग्रेव्ही मिक्सची पॅकेट्स तयार मिळतात, त्यामुळे काम सोपे होते. हवे तर वरुन हिरव्या मिरच्या, आले यांचे तुकडे तळुन घ्यायचे. कांद्याची पात पण छान लागते.


Lopamudraa
Monday, March 17, 2008 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्दा हमस, इकडे खुप प्रकारात मिळते, ते विकतच आणिन, बाकि सलड करते आणि मेनु आता टरवुन टाकला. कसा झला ते सांगिनच. धन्यवाद.

Leenas
Monday, March 17, 2008 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे भिजलेली हरभरा डाळ उरली आहे. त्याची आमटी कशी करायची? म्हणजे गोळ्याची आमटी?

Alpana
Monday, March 17, 2008 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोमोज किन्वा दम सम बरोबर मिळणारी चटणी कशी करतात..त्यात टोमटो केचप, लसुण आणी भरपुर तिखट असते बहुतेक

Dineshvs
Monday, March 17, 2008 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लीना, गोळ्याची आमटी इथे
/hitguj/messages/103383/138136.html?1205759180 लिहिली आहे.

अल्पना, चायनीज मधे मी ते लिहिले होते, अजुन असावे.

Alpana
Monday, March 17, 2008 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा तुमच्याच उत्तराचि वाट बघत होते. मोमोज कसे करयचेत ते लिहिलेय तुम्हि..पण ती चटणी नाहिये... मागे एकदा लाजपतनगर मध्ये वेज मोमो खाल्ले होते... मोमोज तर मस्त होते पण सोबतची ति झणझणीत चटणी खुप आवडली...फ़क्त त्या चटणीसाठी मोमोज खावे वाटतात... आई ला खाउ घालायचे होते मोमोज..पण तिथे जाणे नाही झाले..म्हणुन मग घरिच करावे असा विचार केला.. आता त्या चटणीसठी गाडे अडलय

Anaani
Monday, March 17, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

here is the greek salad video
http://www.videojug.com/film/how-to-make-greek-salad

Dineshvs
Monday, March 17, 2008 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना, मागे इंडियन चायनीज असा एक बीबी होता, तिथे मी लिहिले होते. तोपर्यंत इथेच लिहितो.

यासाठी अर्धी वाटी बारिक केलेला लसुण तयार ठेवायचा. हा लसुण बारिक न वाटता जर गार्लिक प्रेसमधून काढुन घेतला तर छान.
अर्धी वाटी तेल गरम करुन त्यात दोन चमचे साखर घालायची. आवडत असेल तर त्यात चक्रीफ़ुलाचे तुकडे वा पूड टाकायची. साखर तपकिरी झाली कि गॅस बंद करायचा आणि त्यात चार चमचे लाल तिखट घालायचे. भरभर ढवळुन त्यात पाव वाटी व्हीनीगर घालायचे. याचा धूर होईल. पण त्याने उग्र वास जाईल. मग ते जरा थंड झाले कि लसुण घालायची. हवे तर त्यात आणखी थोडे लाल तिखट घालायचे. मीठ किंवा सोया सॉस घालायचा. व्हीनीगर नको असेल तर त्यात तयार टोमॅटो पेस्ट घातली तरी चालेल.


Uno
Tuesday, March 18, 2008 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जेलीच्या विवीध रेसेपीज शोधत होते, ईथे लिहिलेल्या आहेत का कोणी. मला हव्या होत्या.

Dineshvs
Tuesday, March 18, 2008 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उनो जेलीच्या रेसीपीज म्हणजे काय. बाजारात आता सर्वच स्वादाच्या जेलीची पाकिटे तयार मिळतात. त्याहुन वेगळ्या स्वादाची हवी असेल तर अन्फ़्लेवर्ड जिलेटिन मिळते.
नेमके काय करायचे आहे ?


Alpana
Tuesday, March 18, 2008 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks dineshda.... आजच करेन

Uno
Tuesday, March 18, 2008 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्यु सो मच दिनेशदा. मी बाजारातुन जेलिचे पॅक आणले आणि जेली केली ती सेट पण झाली परंतु ती ज़रा जस्तच लुसलुशित आहे त्याचे तुकडे करता येत नहित. मला थोडी कड्क जेली कशी करयची हे सांगाना. तसेच आजकाल भारतात चिंचेची जेलि किन्वा आंब्याचि जेलि पण मिळ्ते ती घरी कशी करयचि.

Deepant
Tuesday, March 18, 2008 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हैदराबादी खट्टी दाल रेसिपी हवी आहे.प्लीज कोणी सांगेल का?
"आठवड्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी" हा बीबी ओपन होत नाही. कसा ओपन करायचा?


Jadoo
Tuesday, March 18, 2008 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Indian grocery store मधे MTR चे Muruku pack मिळते ते कोणि चकल्यांसाठि try केले आहे का? कशा होतात त्याच्या चकल्या?

Shyamli
Tuesday, March 18, 2008 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/60019.html?1184082740

हा इथे आहे की आठवड्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारीचा बीबी


Malavika
Tuesday, March 18, 2008 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगले होतात ते मुरुक्कू. त्यात लोणी घाल.



Jadoo
Tuesday, March 18, 2008 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका लोणि घाल म्हणजे आपण चकल्यांना जसे तेलाचे तुपाचे मोहन देतो तसे लोण्याचे द्यायचे का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators