Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through March 15, 2008 « Previous Next »

Manuswini
Tuesday, March 11, 2008 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

princess ,
ही घे रेसीपी,
/hitguj/messages/103383/138020.html

Shmt
Tuesday, March 11, 2008 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दह्याला तार आली आहे. असे दही खाले तर चालते का? की टाकुन द्यावे लागेल? बरेच दही आहे.
धन्यवाद


Dineshvs
Wednesday, March 12, 2008 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, ब्रेडसाठी मैदा सगळ्यात उत्तम, आणि ब्रेडसाठी यीस्टहि आवश्यक आहे. त्याची सविस्तर कृति आहे इथे.
नेहमीच्या चपातीसाठी भिजवलेल्या कणकेचा, एका चपातीचा गोळा, कपभर साखरपाण्यात बुडवुन, ( एक कप पाणी व अर्धा चमचा साखर ) तो फ़्रीजबाहेर ठेवला तर त्यात आपोआप यीस्ट तयार होते. त्याला ब्रेडच्या पिठासारखा वास येतो. ( म्हणजे यीस्ट तयार झाली असे समजावे ) त्याला पांढरी वा काळी बुरशी आली नाही याची खात्री करुन त्यात साधारण दोन कप मैदा भिजवला तर बर्‍यापैकी ब्रेड तयार होतो. हा तितकासा फ़ुगत नाही पण चवीला चांगला लागतो. हा ब्रेड नेहमीच्या तव्यावर पण करता येतो. तव्याला थोडेसे तेल लावुन त्यावर जाडसर थापायचे आणि वरुन उंच झाकण ठेवायचे. ओव्हन असेल तर प्रश्नच नाही.

मराठमोळी, नेहमीच्या चटणीत थोडे म्हणजे एक कप चटणीला एक चहाचा चमचा उडीद डाळ, किंवा पंधरा वीस शेंगदाणे तेलात परतुन घातले तर चटणी घट्ट होते, आणि जास्त टिकते. एरवी मिक्सरमधे वाटलेली चटणी, फ़्रीजमधेही टिकत नाही. चटणीत थोडे भाजके पोहे टाकले तरी चालतात. कुठल्याही कारणासाठी काकडी चिरली वा किसली असेल तर त्याला सुटलेले पाणी, चटणीत वापरले तर चटणीला छान चव येते.

shmt त्या दह्याचे ताक करुन, त्याला वाईट वास वा चव नसेल तर ते वापरता येईल. अन्यथा ते टाकुन देणेच चांगले. वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वाढल्याने, दह्याला अशी तार येते. पण त्याचे विरजण लावु नये.


Marhatmoli
Wednesday, March 12, 2008 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनापासुन धन्यवाद दिनेश,

एक शेवटचा प्रश्ण. अजच घरि पोहे भाजुन ठेवलेयत चिवड्यासाठि, कोथिंबिरिच्या चटणित तेच टाकलेत तर चालेल का? किति टाकु? कोथिंबिर दोन जुड्या आहे.

sorry मी जरा जास्तच किस पाडतेय पण कोणि घरि रहायला येण्याचि हि पहिलिच वेळ आहे म्हणुन जरा tension आलय.


Wel123
Wednesday, March 12, 2008 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazakade chote chote batate aahet tyache kay karu shakate?

Dineshvs
Wednesday, March 12, 2008 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी, एवढ्या कोथिंबीरीला अर्धी वाटी पोहे पुरेत. पुर्वी खंडाळ्याला रमाकांतचा बटाटेवडा फ़ेमस होत्या. त्यांच्याकडच्या चटणीत ते पोहे घालत असत.

आणि टेन्शन कसले. एवढी काळजी घेतली तर पदार्थ छानच होणार.

वेली अख्ख्या बटाट्यांची भाजी किंवा ते अख्खे तेलात परतुन भाजी करता येते. हिरव्या वाटाण्याच्या, किंवा हरभर्‍यांच्या भाजीत ते छान लागतात. ते घालुन बिर्याणी वा पुलावहि करता येईल.


Chioo
Wednesday, March 12, 2008 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, धन्यवाद. :-) मी इथे bread flour शोधत फिरत होते. आता या शनिवारी नवीन प्रयोग. :-)

Prady
Wednesday, March 12, 2008 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wel123 छोटे बटाटे थोडे मीठ घालून उकडून घ्यायचे. मग सोलून घ्यायचे. बटरमधे जिरं घालून फोडणी करायची त्यात कांदा परतायचा. मग धणे पूड, जिरे पूड,आमचूर किंवा चाट मसाला,चिमूटभर गरम मसाला घालायचा आणी त्यात हे बटाटे घालून थोडं परतायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. वरून भरपूर कोथिंबीर घालायची. पार्टीला हिट आयटम आहे.

Wel123
Wednesday, March 12, 2008 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks dineshvs and prady,karun pahate.

Lajo
Thursday, March 13, 2008 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेल१२३ छोटे बटाटे दम-आलू साठी बेश्ट... किंवा बटाटे अर्धवट ऊकडायचे, एका ओव्हनप्रूफ डिश मधे, लसूण पेस्ट, बटर, थोडे सी साॅल्ट, आणि मीरेपूड घालून त्यात हे बटाटे सोलुन घालायचे आणि थोड्यावेळ बेक करायचे (खरपूस कितपत हवेत त्याप्रमाणे). वरून चिरलेली पार्सली घालायची. गरम गरम खायचे... हवे तर टोमॅटो साॅस आणि व्हीप्पड क्रिम (सावर क्रिम)बरोबर खायचे..

Marhatmoli
Thursday, March 13, 2008 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश,

चटणिचि चव तर चांगलि वाटतेय आणि मिळुन पण आलिये. Hopefully ३,४ दिवस चांगलि राहिल. बाकि मंडळिंना आवडेल की नाहि ते मात्र सांगता येत नाहि.


Manishalimaye
Friday, March 14, 2008 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मी मंडईतुन दोन मोठ्ठ्या जुड्या कोथिंबीर आणली [वड्या करुयात या विकांताला म्हणुन] आणि निवडताना सहज खाऊन पाहीली तर अगादी कडु.:-(
हे कसं काय?? कोथिंबीर कडु असते काय??? काय झालं असेल???

आता या एवढ्या जास्त आणि मोठ्या मेहनतीने निवडलेल्या कोथिबीरीचं आता काय करु???
ती टाकुनच द्यावी लागणार का आता मला??:-(




कोणीतरी सांगा pls.


Dineshvs
Friday, March 14, 2008 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबीर कडु असणे शक्य नाही. कदाचित माती लागली असेल किंवा ज्या सुरीने कापली त्याने आधी कारले वगैरे कापले असेल.

चिरायच्या आधी, स्वच्छ पाण्याने, धुवुन फरक पडेल.
कोथिंबीरीत कधीकधी बाकिच्या वनस्पति मिसळलेल्या असतात, निवडताना नीट बघायला हवी.

आणि समजा कडुच राहिली तर मस्तपैकी पिठ पेरुन कोरडी भाजी करायची आणि मेथीचा झुणका केला असे सांगायचे.



Manishalimaye
Friday, March 14, 2008 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही ती खरचच कडु आहे..:-(

आणि सुरी तर मी अजुन लावलीच नाहीये...तीची पानही कडु आणि देठही कडुच आहे.
आणखी कोणाला असा अनुभव आहे का??


आणि जर झुणका करुन खल्ली तर ती कडु आहे म्हणजे काही रिस्क तर नाही ना खाण्यात??


Mrinmayee
Friday, March 14, 2008 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, सगळी कोथिंबीर सरळ उचलुन फेकुन दे!!!(तु चुकून कडु पार्स्ली तर नाही नं आणलीस?)अनोळखी कडु भाजी अजीबात खाऊ नकोस!

Manishalimaye
Friday, March 14, 2008 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ती सगळी फेकुन दिली सरळ,
खाऊन काही झालं बीलं तर परत पचाईत नको उगीच.
[मझी दोन दोन जुड्या निवडण्याची मेहनत वाया]:-(


Dineshvs
Friday, March 14, 2008 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मात्र मलाच ती कडु कोथिंबीर बघायची उत्सुकता लागली आहे.
पडवळ, दुधी, शिराळे, कधीकधी कडु निघते, पण कोथिंबीर ?


Jaymaharashtra
Friday, March 14, 2008 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिझा बेस कसा तयार करता येईल घरच्याघरी?


Sonalisl
Friday, March 14, 2008 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे बघा....

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » इटालियन » पिझ्झा




Lopamudraa
Saturday, March 15, 2008 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे काही मैत्रिणिम्ची पार्टी असते. काहि महिन्यांनि टर्न येतो प्रत्येकिचा...
. वर दीलेले spicy potaato मागच्या टर्न ला केले होते यावेळी काय करावे प्रश्न पडलाय. चिकन करी करुन झाली. भजि वैगैरे नेहमिचे indian करुन झाले.. माझ्या या मैत्रिणि म्हणजे देश विदेशाचे मिश्रण आहे तिखट खाणा-या दोन chinenese बाकि दोन english एक domenican republic मधलि, दोन टर्की., दोन पोलिश.
प्लीज सजेस्ट सम्थिंग नाइस.
पार्टी बुधवारी दुपारी आहे.
इथे मेनु साठी पण एक विभाग होता ना? मला सापडत नाहिये.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators