Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कूकर मधे केलेली भाजी, उसळ... ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » कूकर मधे केलेली भाजी, उसळ... « Previous Next »

Bee
Friday, February 01, 2008 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूकर मधे जर एखादी भाजी वा उसळ फ़ोडणी देऊन ती केली तर पाण्याचे प्रमाण किती असावे आणि शिट्या किती होऊ द्यावात? भाज्या जर सुक्या करायच्या तर हे प्रमाण कसे असावे?

Dineshvs
Saturday, February 02, 2008 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, कडधान्याचा आकार आणि प्रकार यानुसार वेगवेगळा वेळ लागतो.
उदा मुगाला शून्य मिनिटे तर अख्ख्या उडदाला ५५ मिनिटे वेळ द्यावा लागतो.
कडधान्ये शक्यतो भिजवलेली असावीत, म्हणजे कमी वेळ लागतो.
कडधान्ये थेट कुकरमधे शिजवली तर कमी पाणी लागते आणि डब्यात शिजवली तर जास्त पाणी लागते.
मी परत लिहितो, कुकरसाठी वेळच मोजायची असते शिट्या नाहीत. प्रेशर आल्याबरोबर वेळ मोजायला सुरवात करायची.

कुकरच्या बरोबर मिळणारी पुस्तिका काटेकोरपणे पाळायची. त्यात वेळेचा तक्ता दिलेला असतो. ( तशी पुस्तिका मिळाली नसेल तर आवर्जुन मागवुन घे. ती पुस्तिका मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. )
कुकरमधे अगदी कोरड्या उसळी करण्याच्या प्रयत्न करु नये. पाणी कमी पडले तर कुकर खराब होतो. पाणी जास्त झाले तर ते काढुन घेऊन त्याचे सूप वा कळण करता येते. मग बाकिचे धान्य परतुन कोरडे करता येते.


Bee
Monday, February 04, 2008 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, माहिती छान दिली. पुस्तिका नव्हती आली कूकर बरोबर. पण कूकर कसे वापरायचे ह्याबद्दल सर्व, नेहमीच्या सवयीनुसार अगदी माहिती असलेली माहिती देखील, मी दुकानदाराला विचारून घेतली. पन उसळी संदर्भात माहिती विचारून घ्यायचे राहून गेले. पुस्तिका मिळते हे माहिती नव्हते.

उसळी ह्या भिजवू शकतो पण फ़ळभाजी, शेंगा शिजायला लागणारा वेळ ह्यासाठी काहे ठोकताळे असतील तर मलाही सांगा.

दिनेश, आभारी आहे.


Dineshvs
Tuesday, February 05, 2008 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ळभाज्या शिजवायला लागणारा वेळ हा त्या बाहेर शिजवायला जो वेळ लागतो, त्या प्रमाणातच असतो उदा सुरण बाहेर शिजायला वेळ लागतो पण दुधी लवकर शिजतो, तसेच हे आहे.
भाज्यांचे तुकडे सारख्या आकाराचे असावेत. तुकडे केले तर डब्यात शिजवावे, अखंड असतील तर थेट कुकरमधे शिजवावे.
कुकरमधे भाज्या वाफ़ेवर शिजतात, पाण्यात नाहीत. म्हणुन किलोभर बटाटे शिजवायला कपभर पाणी व पाच मिनिटे वेळ पुरेसा आहे. ( बटाटे सारख्या आकाराचे असावेत. ) खुपदा कुकरमधे बटाटे बुडतील इतके पाणी घातले जाते, त्याची गरज नसते.

पुस्तिका अत्यावश्यक आहे. त्या कुकरच्या निर्मात्याना पत्र लिहुन, पुस्तिका मागवुन घे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators