Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 14, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through January 14, 2008 « Previous Next »

Suparna
Saturday, December 29, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अस्सल सीकेपी पद्धतीने चिंबोरीचे कालवण करायची रेसिपी कोणी देऊ शकेल काय?

Vrushs
Saturday, December 29, 2007 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स दिनेशदा ,swa_26.मी ट्राय करते.

Arch
Monday, December 31, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल Indian store मध्ये गव्हाचे चुरमुरे मिळाले. त्याचा healthy चिवडा कसा करायचा? किंवा इतर काय करता येईल?

Manuswini
Monday, December 31, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आजी गव्हाच्या चुरमुराची लडू बनवायची शेंगदाणे नी नुसता गुळ टाकून. जरा भाजून गूळ मिक्स करायचा, त्यात भजलेले दाणे बस,
नो पाक, nothing .
नाहीतर कधीतरी खीर, ती सुद्धा गूळ टाकून, मला आवडायची म्हणून.खीर अजीबत ज्यास्त शिजवायचे नाही नाहीतर चिकट paste होते.
खीरीचे पद्धत :
नारळ दूधात वेलची, जरासे पाणी(पातळ रस असावा म्हणून),गूळ कुस्करून, ओले खोबरे उकळवायचे. मग हे भजलेले मुरे टाकायचे. मला तरी आवडायची. माझी बहिण नाक मुरडायची, काहीपण काय खाते मी करत.


Dineshvs
Tuesday, January 01, 2008 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, गव्हाचे चुरमुरे नुसतेच तिखट मीठ लावुन खायला चांगले लागतात.
त्याला आधीच मीठ लावले नसेल तर त्याची खीर करता येते. मिक्सरमधुन काढुन लाडु करता येतो.
ओली भेळ करायची असेल, तर त्या कुरमुर्‍याना आधी थोडेसे तेल लावुन घ्यावे लागते. मग कांदा, टोमॅटो, मिरची कोथिंबीर घालुन भेळ करता येते.

गव्हाचे कुरमुरे घरीही करता येतात. गहु आठ तास भिजवुन ते कुकरमधे उकडायचे. मग त्यात अर्धा किलो गव्हाला, अर्धा चमचा पापडखार घालुन परत दहा मिनिटे शिजवायचे. यावेळी गहु फ़ुटतात. मग ते गहु वाळवायचे. आयत्यावेळी गरम कढईत घोळवले, कि गव्हाचे कुरमुरे तयार होतात.


Wel123
Wednesday, January 02, 2008 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala koni stuff potato chi recipe sangel ka.

Arch
Wednesday, January 02, 2008 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks मनु आणि दिनेश. तसे ते नुसतेपण खायला चांगले लागतात.

Me_mastani
Wednesday, January 02, 2008 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि दिवसापूर्वी व्हेज लॉलीपॉप नावाचा पदार्थ हॉटेल मधे खाल्ला. क्रुपया कोणी रेसिपी देऊ शकेल का?

Heena21
Thursday, January 03, 2008 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला तेलगु sweet केसरी ची recipe माहित असेल तर pls share करा

Dineshvs
Thursday, January 03, 2008 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तानी, मी मागे लिहिला होता वाटते. मश्रुम, बटाटा, कोबी वगैरे ची साधारण चायनीज चवीची भाजी करुन घ्यायची. त्यात लाल रंग घालायचा. मग त्यात ब्रेडचा चुरा घालुन हलक्या हाताने मळुन घ्यायचे.
सुपस्टिकचे दोन तुकडे करुन त्याला ह्या भाजीचा गोलाकार करुन एका बाजुने चिकटवायचा व तळुन घ्यायचे.
भाजीत आपल्या आवडीप्रमाणे बदल करावा. सोया चंकसही वापरता येतील.


Me_mastani
Thursday, January 03, 2008 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you very much Dineshdada!!

Arch
Thursday, January 10, 2008 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे काही केळी पिकतच नाहीत. ४ - ५ दिवस झाले तशीच कच्ची राहिली आहेत त्या केळ्यांच आता काय कराव?

Prady
Thursday, January 10, 2008 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कटलेट कर थोडा उकडलेला बटाटा घालून. आणी जर हिरवी असतील केळी आणी पुरेशी घट्ट पण तर उपासाला रताळ्याचा कीस करतो तसा केळ्याचा कीस पण छान लागतो.

Arch
Thursday, January 10, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks, ग प्रज्ञा. आणि वेळखाऊपण नाही.

Dineshvs
Thursday, January 10, 2008 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन पिकली नसतील तर तिरपे काप करुन, त्याला तिखट मीठ व थोडी चिंच आवुन, रव्यात घोळवुन, उथळ तव्यात खरपुस तळुन घ्यावीत.

शाकाहारी फ़िश फ़्राय तय्यार.


Arch
Saturday, January 12, 2008 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, काल केलं हं शाकाहारी fish fry . शाकाहारी मित्रमंडळ एकदम खूष. Thanks !

Mvrushali
Saturday, January 12, 2008 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्चेचं थोडं पाणी करून घेउन ते,तिखट आणि मीठ असं चोळून ठेवायचं का केळ्यांच्या कापांना?

Dineshvs
Sunday, January 13, 2008 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो वृषाली, तसेच करायचे.
आर्च, गोव्यात गणपतिमधे, मासे खायचे नसतात, त्यावेळी हे करतात.
तसेच सुरणाची कापं, शेवग्याच्या फ़ुलांची भजी ( कालवांच्या भजीला पर्याय म्हणुन ) करतात.

एकवेळ मासा पाण्याबाहेर राहिल, पण गोवेकर माश्याशिवाय नाही जगु शकणार !!!


Wel123
Monday, January 14, 2008 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maza kade milk mawa powder aahe tya pasun kay karu shakel.cake madhe milk powder chya yewagi mawa powder waparu shakato ka.

Manuswini
Monday, January 14, 2008 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, हो हो अगदी अगदी, गौरीगणपतीचे विसर्जन करायचे नी येताना घरी मासे घेवून यायचे.
कोळणी पण त्या दिवशी संध्याकाळी बाजारात सजून बसत बर्‍याच दिवसाने गर्दी असाची म्हणून.

ती प्रथा आम्ही सुद्धा मुंबईत पाळतो, रात्री हमखास मासे जेवणाला विसर्जन झाले की. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators