Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 14, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through December 14, 2007 « Previous Next »

Chinnu
Friday, November 30, 2007 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, छोटी भजी, ढोकळा, मसाला इडली, वडे हॉट साईड साठी आणि रसराज, रसगुल्ला नाहीतर गुलाबजामुन स्वीट म्हणून नेता येईल. बेक करत असशील तर एखादा केक करता येईल किंवा बेकिंग शीट्स वापरून मध्ये filling भरून बेक करून नेता येईल.

Jadoo
Monday, December 03, 2007 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chinnu, Divya thanks a lot for the suggestions ह्या अमेरिकन लोकांना ढोकळा आवडतो का? माझा तसा चांगला होत नाहि पण MTR pack वापरुन बरा होतो

Prajaktad
Monday, December 03, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे american आहेत अगदी country side.. hardcore beef,potato खाणारे. >>>

बटाटा वडा
कटलेट
समोसा(हे १००% आवडणार)/कॉकटेल समोसा
पफ़ पेस्टि समोसा(मिक्स वेज किंवा बटाटा भाजि भरुन)



Sahi
Monday, December 03, 2007 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बखलावा कसा करायचा? फ़िलसबेरिचे पेस्ट्री शीट वापरुन?
थेन्कस


Cutepraj
Friday, December 07, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी वेगवेगळ्या प्रकारची पिज्जा टाॅपिन्ग्स सुचवा. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरुन फक्त मश्रुम्स नको...

Dineshvs
Friday, December 07, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि, बकलावाची सविस्तर कृति मी लिहिली होती.
cutepraj बेबी कॉर्न, पालक, कॉर्न, अननस, बेसिल, वांगी, सिमला मिरची, काकडी, झुत्सिनी, कांदा, लसुण, शिंगाडे, कोबी, राजमा, बटाटा असे अनेक टॉपिंग्ज वापरता येतात.
मसाले आपल्या आवडीप्रमाणे.


Sahi
Friday, December 07, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Dineshda...aawarjun uttar dilyabaddal.
aata shaodhte

Asmaani
Saturday, December 08, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

where is veg cutlet? can someone give me link? thanx.

Dineshvs
Sunday, December 09, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सगळ्यांची इथे भरपुर चर्चा झाली होती.
admin इथल्या सर्च बद्दल माहिती इथेच वर देता येईल का ?


Wel123
Thursday, December 13, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hash brown waparun patties kasa kartat please recipe sangal ka.

Alpana
Friday, December 14, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच शेतातुन भरपुर मेथी, आले आणी गोबी आलाय.... मेथी आपल्याकडच्या सारखी नसुन इथल्या भागातली आहे ( उत्तर प्रदेश)....मोठी मोठी पाने..... काल डाळ मेथी केली, आज पराठे करतेय, शेजारी पाजारी पण वाटली अजुन काय करावे...भाज्या तर करेन पण वेगवेगळ्या चवीच्य असल्या तरी रोज मेथी कसे करु?.... आणी गोबी च तर मला वास पण सहन होत नाहिये..... गेल्या महिन्याभरात आलू-गोबी, गोबी पराठा, पकोडे आणी पुलाव करायचा आणी खायचा प्रयत्न केला होता पण त्याच्या वासाने किन्वा चुकुन घासात जरी एक तुकडा आला तरी मला मळमळायला सुरु होते..... काहीतरी सुचवा... सगळीकडे वाटुनपण घरात ७-८ गड्डे उरलेत गोबीचे

Akhi
Friday, December 14, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबी बरिक चिरुन घे आनि त्यात मटार लिम्बु रस टाकुन हिन्ग मोहरी चि फोडनी दे. छान लगते ही कोशिम्बीर


कोबी किसुन घे थोडा वाफवुन घे. बटर मधे आल लसुन टाकुन किसलेल गाजर बीट किन्वा टमाटा टाकणे. mixer मधुन बरिक करणे. मग परत थोड पाणी घालुन उकळी आणावी. हे सुपा मधे मीरे पावडर पण टाकणे.


Alpana
Friday, December 14, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप नक्की करुन बघेन...... कोशिम्बीर नवरा दीर वैगरे खातील... तसेही पन्जाबी गोबीप्रियच असतात.....गेला दीड महीना सासरी राहुन आलेय ना.... गोबी, पनीर, राजमा, मा की दाल, साग आणी छल्लेकी रोटी हे शब्द जरी एइकले ना तरी माझ्या कपळावर आठ्या येतात... हो आणी दुध पण.... कन्टाळलेय ह्या पदार्थाना

Alpana
Friday, December 14, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक, मी नसताना घरात ओटचे जाडसर पीठ आणलेय..त्याचे काय कारवे कळत नाही, काल कणकेत घालुन बघितले पण फुलके कसेतरीच झाले.... कसे सम्पवु आणी भरपुर ब्रेकफास्ट सिरल्स आहेत घरात.... मला ते दुधात घालुन खायला नाही आवडत गोडसर चवीमुळे.. आणी बाकीचे पण आता कन्टाळलेत... काही उपाय?

Shraddhak
Friday, December 14, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबी म्हणजे कॉलीफ़्लॉवर म्हणायचंय ना अल्पना तुला? पंजाबी लोकांमध्ये तरी गोबी म्हणजे फ़ुलकोबी ( कॉलीफ़्लॉवर) च असतो असे वाटते.

आणि अखीचा पत्ताकोबी असा समज झालाय बहुधा कारण कच्च्या पत्ताकोबीची तिने लिहिलीय तशी कोशिंबीर खाल्ली आहे. पण फ़्लॉवरची नाही. शिजवलेला फ़्लॉवरच उग्र लागतो कधीकधी. कच्चा कसा लागेल याची कल्पना न केलेली बरी.
:-)

Akhi
Friday, December 14, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shraddhak
नाही माझा काही गैरसमज झालेला नाही. flower चिच कोशिम्बीर लिहिलि मी. flower जर ताजा असेल ना तर खुप खुप छान लागते. मी नेहमी करते मला flower ची भाजी अजीबात आवडत नाही पण कोशिम्बीर आवडते.

flower शिजवल्या नंतर उग्र लागतोच. म्हनुन त्यात आल लसुण आणी मीरे टाकयचे. आणी फ़क़्त flower नाही तर त्यात गाजर बीट ची जोड आहे.


Akhi
Friday, December 14, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेथी चे मुटकुळे करुन बघ. starter म्हणुन छान लागतात.

Shraddhak
Friday, December 14, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं.. कधी खाल्ला नाहीये कच्चा फ़्लॉवर म्हणून मला तसे वाटले. चांगला लागत असेल तर करून बघायला हवी. :-)

Alpana
Friday, December 14, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो फ़्लॉवरच......सुप तर करुन बघेन..बाकी चवीमध्ये त्याची चव जरा माइल्ड होइल ना....आणी धन्यवाद... अजुनही सुचवा आक्खा फ्रीज ह्या दोघानी भरला आहे...मला तर सकाळी एक टोपली घेवुन बाजारात जावे वाटले होते :-)

Shyamli
Friday, December 14, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेथी निवडून सावलीतच सुकव आणि व्यवस्थीत वाळली की भरुन ठेव
नंतर कधिही थोडीशी पानं हातावरच जरा बारिक करुन ठेपल्यासाठी वापरु शकतेस मस्त होतात याचे ठेपले/पराठे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators