Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 27, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » हे करुन पहा » Archive through November 27, 2007 « Previous Next »

Moodi
Wednesday, January 11, 2006 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारली मसाला भरुन sandwitch toaster मध्ये भाजावीत, तेल कमी लागते.

Moodi
Wednesday, January 11, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाजराच्या कोशिंबीरीत कुटाच्या मिर्च्या तळुन अन मग चुरुन / कुस्करुन घालाव्यात. खमंग लागते.

Moodi
Monday, January 23, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पदार्थात लिंबु पिळल्यावर त्याच्या साली फेकुन न देता त्या काचेच्या बरणीत साठवाव्यात अन त्यात मीठ घालाव. प्रत्येक वेळी साल घालताना थोडे मीठ घालावे. अन बाटली भरली की तिचे तोंड फडक्याने बांधावे. महिनाभरानी ही साले मुरली की त्यात वाडीनुसार तिखट अन साखर किंवा गुळ घालावा.

दुसर्‍या पद्धतीत उन्हाच्या तिरीपेत ही बरणी ठेवावी. अन ८ ते १० दिवसानी त्यात लाल तिखट, साखर अन जीरे पुड घालावी.

ही लिंबाची बाहेर वाळवलेली साल पावसाळ्यात पाण्यात उकळुन गार झाली की मिक्सरमधुन काढावी व केसाना लावावी. मग धुवावे. केस तुककीत होऊन कोंडा पण जातो. पाहिजे तर शिकेकाई अन रीठ्यात उकळावीत.


Mai
Monday, March 06, 2006 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लसणाच्या चटणीत देखील छोट्या खोब्र्याचा तुक्डा भाजुन घातला तर चटणी खमन्ग होते.

Lalitas
Wednesday, August 30, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओल्या नारळाचं खोबरं जर पिशवीत किंवा डब्यांत भरून डीप फ्रीज़मध्ये ठेवलं तर त्याचा घट्ट गोळा होतो. परत वापरायला घेताना गोळा फोडायला लागतो. स्वयंपाकाच्या घाईत फोडाफोड त्रासदायक व्हायला लागली म्हणुन एका सोपा उपाय शोधून काढला.

खोवलेलं खोबरं बर्फ़ाचे क्यूबस बनवायच्या ट्रेमध्ये, क्यूबच्या खोबणीत दाबून भरावे. हा ट्रे डीप फ्रीज़मधे ठेवावा. कमीत कमी दोन तासानंतर ट्रे बाहेर काढून खोबर्‍याचे क्यूबस ट्रेमधून सोडवावे. प्लॅस्टीकचा ट्रे असेल तर क्यूबच्या मागून दाब दिला की लगेच सुटतात..... झीपलॉकच्या पिशवीत खोबर्‍याचे क्यूबस भरून फ्रीज़रमध्ये परत ठेवावे.

लागेल तसं, गरजे प्रमाणे हव्या तेव्हढ्या खोबर्‍याच्या क्यूबस काढून खोबरं उपयोगांत आणता येतं.


Savani
Wednesday, August 30, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई, छान टीप दिलीत तुम्ही. माझं नेहमी हेच होतं.एकतर आधीच फ़्रीजर मधून बाहेर काढून ठेवायला विसरते आणि मग अशीच फ़ोडफ़ोड.
आता तुम्ही सांगितलेलं करून बघीन.


Moodi
Wednesday, August 30, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई छान सल्ला दिलात.
पण हे ओले खोबरे साधारण किती दिवस टिकते डिप किंवा साध्या फ्रिझमध्ये?


Lalitas
Wednesday, August 30, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवळ जवळ ३ महिने डीपमध्ये टिकतेच. साध्या फ्रिझमध्ये एक आठवडा टिकायला हरकत नसावी. अर्थात् फ्रीझच्या तपमानावर आणि ह्युमिडिटीवरही टिकण्याचा कालावधी अवलंबून आहे.

Vrushs
Friday, January 26, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथिंबिर जास्त टिकवण्यासाठी काय करावे? मी ती निवडून हवाबंद डब्यात ठेवते पण २ ते ४ दिवसांनी थोडी काळी पण पडते आणि थोडा वास पण यायला लागतो. pls कोणाला माहिती असेल तर उपाय सांगाल का?

Prady
Friday, January 26, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/120449.html?1157051276

इथे बघ. इथे झाली होती चर्चा.

Milindaa
Friday, January 26, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/60016.html?1085558403

Vrushs
Friday, January 26, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks prady ,Milinda.इतक्या पटकन reply दिल्याबद्द्ल.

Prachee
Friday, July 20, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sabudanyachya vafevarchya papdya (vafodya) Idlistand vaprun karavyat... khup chan hotat...chotya tatlya aani chalnicha vapar karnyapeksha he khupch sope aani soyiche hote.

Vishee
Thursday, September 06, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई, तुमच्या सल्ल्याप्रमाणे खोब्रं ठेवते मी आता. कधिही पटकन १-२ cubes टाकता येतात. छानच.. thanks

Manuswini
Thursday, September 06, 2007 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी सुद्धा ललिताताईंची ही ट्रिक वापरते. मस्त आहे, नाहीतर अक्खी frozen grated coconut ची bag बाहेर काढून ठेवावी लागते नी कधी कधी बाकीचे कोबरे खवट लागते मागाहून.


Wel123
Monday, November 26, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maza kade khup chana dal aahe tyache kay karawe samajat nahi aahe ......mala puran poli awadat nahi....please help me tya dalipasun kay karu shakate.thanks in advance.

Nalini
Tuesday, November 27, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळ भिजवुन वाटुन तिची भाजी(चटणी) करता येईल.
वाटलेल्या डाळीचे पिठले करता येईल.
कुणीतरी मागे भिजवलेल्या डाळीच्या लाडुची कृती पण दिलीय.
ऊन असेल तर सांडगे करता येतील.
डाळीची आमटी करता येईल.
डाळ भिजवुन, पंख्याखाली सुकवुन तळता येईल. त्यावर आवडीनुसार तिखट मिठ घालता येईल.

टिना, तुम्ही भारतात आहात का?
मग डाळ दळुन आणता येईल. बेसन पिठाचे तुम्हाला बरेच उपयोग माहित असतील.




Wel123
Tuesday, November 27, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Nalini,dal watun bhaji kashi karayechi please recipe sanga,me us madhe aahe.

Prady
Tuesday, November 27, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटली डाळ करता येईल. तसच जर तळण चालत असेल तर ही डाळ गाळणीत घेऊन तळायची आणी मग तिला तिखट मीठ लावून ठेवायचं. खायला घेताना कांदा आणी लिंबाचा रस घालायचा.

Wel123
Tuesday, November 27, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

watali dal kashi karayechi.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators