Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 05, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through November 05, 2007 « Previous Next »

Manuswini
Tuesday, October 30, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशी, नाहीतरी एकडचे भोपळे बेचवच असतात म्हणून तर pot pie वगैरेला वापरतात. तुला देसी item बनवायचे तर आपलेच भोपळे बरे :-)

राजसी,
तु डाळ धूवून दूधात भिजत घालशील ना? आणि एवढे कुठे दूध लागणार आहे? मी काय केले बरे होते.. ह्म्म्म....... तु जर लगेच शीरा बनवणार असशील तर तेच टाक शीर्‍यात. नाहीतर पिवून टाक :-) दूध से शक्ती मिलती आहे(केव्हढा गहन प्रश्ण solve झाला नाही?):-)

चकली आणि बेक?? नाय बा नाही केली मी कधी उगाच खोटा कशाला ता बोलु? :-)


तरीपण ही घी baked चकली,
/hitguj/messages/103383/64889.html?1193765584

नाहीतर दिनेशदांना विचार.........


Prajaktad
Tuesday, October 30, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजसी ! मुगदाळ भिजवायला वापरुन दुध उरलेच तर कणिक मळताना वापरता येईल. ऑर्चिड! तस दिनेशदाने सांगितल आहेच..तरी.. आणखी मैदा,एक चमचा ताज़ दहि, एक चमचा साखर थोडे जिरे घालुन मळावे.. त्रिकोणी घडि घालुन पराठे करावे.

Shmt
Tuesday, October 30, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सोहनपपडी चि साशलने लिहिलेलि recipi हवी आहे. मी दिवळि फ़राळ मध्ये सोहनपपडी भागात बघितले पण तिथे मला मिळाली नाही. साशल पुन्हा ती recipi post कर किन्वा तिचि link दे.
धन्यवाद


Shmt
Thursday, November 01, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सोहनपापडी bb वर एकच post दिसते आहे बाकीच्या ९ post का दिसत नाहीत? सगळ्याना असच दिसते आहे का?


Mrinmayee
Friday, November 02, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण ज्या प्रकारचा लाल भोपळा खातो (खरंच जास्त चवदार), त्याला इथे अमेरिकेत कॅलाबाझा पमकिन म्हणून ओळखतात. इथल्या ग्रोसरी स्टोअर मधे मिळतो. बराच मोठा असेल तर हवा तेव्हडा कापून देतात. (मग भोपळ्याची थालीपीठं, पीठ पेरून 'कोरोडा', रायतं, उपासाची भाजी, काय वाट्टेल ते छान लागतं)
इथे बघा-
http://en.wikipedia.org/wiki/Calabaza

Chinnu
Friday, November 02, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, ते करोडा म्हंजे काय? रेसीपी असेल तर दे ना.

Vishee
Friday, November 02, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काय केलं, तांदुळाचं आणि उडदाचं पिठ एकत्र करुन त्यात घातला भोपळा किसुन (घावन घातले त्याचे) आणि एकदा वरीच्या उपम्यात घातला बटाट्याऐवजी ( prady ने सुचवल्याप्रमाणे), पण त्या भोपळ्याची ढम सुद्धा चव नाही त्या पदार्थांना. हम्म्म्म... आता नाही बा कशात घालणार.... मुलीला carving करुन दाखवलं, बास!

Prajaktad
Friday, November 02, 2007 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रिणिने इथे वाचुन मुगाच्या दाळीच्या(मुग दाळ+मैदा) चकल्या केल्यात..पण,तिच्या चकल्या विरघळत आहे.. काय कारण असावे?पटकन उपाय सुचवा..(ति मायबोलिकर नाही)

Manuswini
Friday, November 02, 2007 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिठ खुप नरम भीजवले असेल नी मोहन ज्यास्त झाले असेल. उकडीच्या चकलीत तेल कमीच टाकावे नी लगेच कराव्या

तीला microwave मध्ये पीठ ठेवून मग मळून घे त्यात extra चकली पीठ टकून(जर पीठ खुप नरम असेल तर) असेल तर नी लगेच जरासा तेलाचा हात लावून चकल्या पाडायला सांग. लगेच तळ. म्हणजे २ ते ३ पाडल्या की तळू सांग मला ही ट्रीक उपयोगी होती का नाही.


Prajaktad
Friday, November 02, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स मनु!लगेच reply दिलास त्याबद्दल...तिला सांगितलय बघु काय होत ते..

Prajaktad
Saturday, November 03, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रिणीची आणी माझी बरिच फ़ोनाफ़ोनी झाल्यावर शेवटचा चकलिचा घाणा जमला..
चिवडा करताना पोहे ओव्हन मधे किती temp वर ठेवायचे?आणी किती वेळ?


Manuswini
Saturday, November 03, 2007 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग प्राजे,शेवटी कसे जमला?(ऊतसुकतेपोटी विचारतेय :-))

Prajaktad
Sunday, November 04, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु! अग तिने पिठ एकतर सैल भिजवल होत त्यात मोहन ही थोड जास्त झाल होत..मग, अजुन पिठ घालुन तिला घट्ट करुन घ्यायला सांगितल शिवाय एकदा microwave मधुन काढायला सांगितल...मग जमल्या.तरि अळुवारच झाल्यात जरा.
आता माझ्या मावशीची एक टिप(कालच आईने दिलिय)..ऽजिबात तेल न पिणार्‍या टिकावु चकल्यांसाठी भाजणित थोडी ज्वारी घालावी.


Manuswini
Sunday, November 04, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग बरे झाली ही ज्वारी टीप्स सांगीतलीस ते, मला माझी ज्वारी संपवायची म्हणून मी दिनेशदांची प्रकार ६ भाजणी करणार होते ह्या वेळेला. मग ज्वारी पण काय भाजून टाकायची?

कारण मे तांदूळ बेस ठेवणार आहे तरी सुद्ध.


Prajaktad
Sunday, November 04, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो!हो! ज्वारी ही थोडी भाजुनच टाकायची..प्रमाण मात्र मला सांगता येणार नाही..खर सांगु का?मी अजुन कधी भाजणी केलीच नाहीये.(त्यामुळे एकदा दिनेशदाकडुन confirm करुन घे.)
मागच्या दिवाळीला मी सोअर क्रिम(आर्च चकली)च्या केल्या होत्या.
एकदा मुगाच्या केल्या होत्या..यंदा आईकडुन भाजणी आलिय..त्यामुळे मजा आहे..
आणखी एक..मने तु सांगितल्याप्रमाणे उत्तपे केले, मस्त झाले.


Manuswini
Sunday, November 04, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुद्धा आज breakfast ला उत्तपेच केले. नी चणाडाळ चटणी. आज सगळी भाजणी करून ठेवणार आहे. मला भाजणीचीच चकली आवडते.

Jadoo
Sunday, November 04, 2007 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजणी mixer वर दळता येइल का?

Mrinmayee
Monday, November 05, 2007 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, 'कोरोडा' म्हणजे भोपळ्याचा (किंवा काकडीचा) कोरडा झुणका! :-) त्यात ताज्या धन्याची आणि बडीशेपेची पावडर घालून तसंच आलं कसुण हिरवी मिरचीचं वाटण लावून केलेला.

Dineshvs
Monday, November 05, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्वारी पण भाजुनच घ्यायची. त्यावेळी काहि ज्वारीच्या लाह्या फुटतात.
भाजणी मिक्सरवर दळता येते, पण बारिक चाळणीने चाळावी लागते.
वरचा भरडा जो उरतो तो भाजीत घालता येतो. वरच्या कोरोडा मधे पण तो चालेल.


Jadoo
Monday, November 05, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you दिनेश मी कालच बेसनाच्या लाडुचे पिठ try केले mixer वर. डाळ थोडि भाजुन घेतलि होति.पण ते पिठ any way जरा रवाळ असते त्यामुळे problem नव्हता. पण भाजणिसाठि जाड पिठ लागते की बारिक हे माहित नव्हते. चाळणी नाहिये माझ्याकडे. त्यामुळे Arch च्या कृति ने चकल्या कराव्या लागणार असे दिसते आहे फ़क्त तांदळाचे पिठ वापरुन.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators