Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कमळफुले

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » कमळफुले « Previous Next »

Manuswini
Sunday, October 28, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमळफुले

कमळफुले करायला एक साचा असतो. त्याला लांब दांडा असतो, नी गोल गोल पाकळ्या असतात. म्हणजे imagine करु शकतो की सात गोल नी मध्ये एक आठ(बहुधा आठ, मला आता आठवत नाही कारण ते मुंबईला आहे).
तो पुर्वी लोखंडी असायचा. आईला आजीने रुखवतात दीला होता. आणि कोकणी(रा. स. कोकणी) पद्धत आहे की कमळफुले करायची लग्नसंभारभात.

1/2 वाटी मैदा,
1/4 वाटी साखर,
वेलची,
तळायला तूप,
कमळफुले mold ,

मैद्यात थंड पाणी घालून paste करावी. आता पाणी हे आधी साखर विरघळून घेतलेले घालावे. खुप पातळ नाही खुप घट्ट नसावी.

पिठ थोडा वेळ मिळून येण्यासाठी ठेवावे झाकून. मग तूप गरम करावे चांगले. गरम तूपात हा बुडवून ठेवावा.
आणि पटकन पिठात बुडवावा, एकदम चर्र आवाज येईल. मग पिठ चिकटेल त्याला. लगेच कढईत बुडवावा. त्या mold च्या आकारची फुले कढईत उतरतात( you will be surprised to see that how quickly the batter forms the shape of mold and you see 'flower shape floating in ghee ).
golden रंग आला की काढून नितळावा.
काही जणे ह्यात पिकलेले केळे कुसकरतात पण एकच problem आहे की mold भरपूर तापलेला असलेला पाहीजे.
हे एकदम कुरकुरीत असतात. फ़ेव item आहे मजहा.


Manuswini
Monday, October 29, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा घ्या फोटो, तुमच्यासाठी फोटो शोधून काढला,
(हा फोटो मी केलेल्या फुलांचा नाही, किती प्रामाणीक आहे ना मी):-).

फक्त फुले दिसतात कशी त्यच्यासाठी ही डोईफोड.
काही लोक थोडे तांदूळ पीठ नी अंडी फेटून घालतात, आम्ही नाही घालत बाई :-)(आताच आईला विचारून घेतले फोनवर नी add केली info .

kamalphule

Manuswini
Monday, October 29, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक आई म्हणाली हा authentic लोखंडी mould असलेलाच चांगला.मस्त तापतो.

Dineshvs
Monday, October 29, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचे केरळीय शेजारी हा प्रकार करतात. पण ते खोबरेल तेलात तळतात. यात बरेच आकार मिळतात.
हा साचा बेताचाच गरम करायचा असतो, आणि पिठातही अर्धाच बुडवायचा असतो, अगदी वरपर्यंत बुडवला तर फुल सुटे होत नाही.
यात मीठ घालुन खारट प्रकारही करता येतो.
हा साचा म्हणजे लोखंडाचा वा अल्युमिनियमचा जाड फ़ुलाचा आकार असतो त्याला मागे एक मोठा दांडा आणि लाकडी मूठ असते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators